K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 11 July 2021

जाणून घेऊया जागतिक लोकसंख्या दिनाविषयी...

जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची उद्दिष्टे

11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज बनली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. या स्वारस्यात दिवसेंदिवस वाढ होत राहिल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले. सन 1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलनेे 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, सन 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम जगभर आयोजित केले जातात. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 

जागतिक लोकसंख्या दिन

वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी समाजातील भरपूर लोकांना एकत्रितपणे काम करायला लावून आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारचे कार्यक्रम आखून आणि कृती आयोजित करून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो. चर्चासत्रातील चर्चा, शैक्षणिक स्पर्धा, शैक्षणिक माहिती सत्रे, निबंधलेखन स्पर्धा, विविध विषयांवर सार्वजनिक स्पर्धा, पोस्टर वितरण, गाणी, क्रीडाविषयक कार्यक्रम, व्याख्याने आणि कविता, कलात्मक काम, घोषणा, मध्यवर्ती कल्पना आणि संदेश यांचे वितरण, कार्यशाळा, भाषणे, वादविवाद, गोलमेज चर्चा, पत्रकार परिषदा, विविध वृत्तवाहिन्या आणि इतर अनेक माध्यमांतून बातम्यांचे वितरण यांसारख्या अनेकविध कार्यक्रमांचा त्यामध्ये समावेश असतो. लोकसंख्यावाढीच्या समस्या सोडवण्यासाठी विविध प्रकारच्या आरोग्य संघटना आणि लोकसंख्याविषयक विभाग एकत्रितपणे काम करतात. त्यासाठी परिषदा, संशोधन कार्ये, बैठका, प्रकल्प विश्‍लेषण इत्यादी अनेक कार्यक्रमांची आखणी केली जाते.


सन 2011 मध्ये जागतिक लोकसंख्या 7 अब्जांवर पोहोचली, तेव्हा वाढती लोकसंख्या हे विकासासमोरचे एक प्रचंड मोठे आव्हान असल्याचे लक्षात आले. त्यामुळे ‘प्रजननविषयक आरोग्य सेवांची सार्वत्रिक उपलब्धता’ हा संदेश सन 2012 च्या ‘जागतिक लोकसंख्या दिना’च्या कार्यक्रमानिमित्त जगभर दिला गेला. त्यावेळी जागतिक लोकसंख्या ही सुमारे 7 अब्ज 2 कोटी 50 लाख 71 हजार 966 एवढी होती. समाजातील जास्तीत जास्त कुटुंबे छोटी आणि आरोग्यपूर्ण असावीत आणि लोकांना शाश्‍वत भवितव्य मिळावे, यासाठी मोठी पावले उचलली गेली. प्रजननविषयक आरोग्यासाठी आवश्यक त्या सुविधांचा मागणीनुसार पुरवठा व्हावा, या अनुषंगाने महत्त्वपूर्ण गुंतवणूक करण्यात आली. प्रजननविषयक आरोग्यात वाढ करून आणि लोकसंख्यावाढीचा दर घटवून सामाजिक दारिद्य्र कमी करण्यासाठीही पाऊल आजमितीस उचलले गेले.


जगभरामध्ये गर्भवतींचे अनोराग्य आणि त्यांचे मृत्यू होण्याचे प्रमाण मोठे आहे. यामागे प्रजननविषयक आरोग्याच्या समस्या हे प्रमुख कारण आहे. त्यामुळे ‘संयुक्त राष्ट्रसंघाचा विकासविषयक कार्यक्रम (UNDP) त्याकडे आता विशेष लक्ष देत आहे. जागतिक स्तरावर प्रसूतीदरम्यान दररोज सुमारे 800 महिलांचा मृत्यू होतो. या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी लोकसंख्या दिनाची मोहीम ‘प्रजनन आरोग्य आणि कुटुंब नियोजन’ याविषयी जगभरातील लोकांची माहिती आणि कौशल्य वाढवण्याचे काम करते. जगभरात दरवर्षी सुमारे 1.8 अब्ज तरुण-तरुणी प्रजनन वयात प्रवेश करत असतात. त्यामुळे प्रजनन आरोग्याच्या प्राथमिक बाबींकडे त्यांचे लक्ष वेधणे अनिवार्य आहे, त्यातही 15 ते 19 वयोगटातील किशोरवयीनांच्या लैंगिकतेशी संबंधित समस्या सोडविण्याची अत्यंत आवश्यकता आहे. कारण आकडेवारीनुसार, या वयोगटांतील सुमारे दीड कोटी महिला माता बनतात आणि सुमारे 40 लाख महिला गर्भपात करवून घेतात.


जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याची उद्दिष्टे

मुले आणि मुलींचे (दोन्ही लिंगांच्या) तरुणाईचे समान संरक्षण करणे आणि त्यांचे सक्षमीकरण करणे.

तरुण-तरुणींना आपल्या जबाबदार्‍या समजून घेण्याची क्षमता येईपर्यंत त्यांना लैंगिकता आणि उशिरा लग्न करण्यासंबंधीची तपशीलवार माहिती देणे.

संततीनियमनविषयक योग्य साधने वापरून आणि उपाययोजना योजून अनैच्छिक गर्भारपण टाळण्यासाठी तरुणाईला शिक्षित करणे.

समाजातून लिंगनिहाय तेच ते (स्टिरिओटाईप) दृष्टिकोन हद्दपार करण्यासाठी लोकांना शिक्षित करणे.

कमी वयातील प्रसूतीच्या धोक्यांविषयी जागृती करण्यासाठी गर्भारपणाशी संबंधित आजारांविषयी शिक्षित करणे.

लैंगिक संबंधातून संक्रमित होणार्‍या आजारांविषयी शिक्षित करणे.

मुलींच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी काही प्रभावी कायदे करण्याची आणि धोरणे आखण्याची मागणी करणे.

मुलांना आणि मुलींना समान प्राथमिक शिक्षण मिळेल याची खात्री करणे.

मूलभूत प्राथमिक आरोग्याचा एक भाग म्हणून प्रत्येक जोडप्याला प्रजननविषयक आरोग्य सेवा सहजगत्या सर्वत्र उपलब्ध होतील याची खात्री करून घेणे.

दि. 1 जानेवारी, 2014 रोजी जागतिक लोकसंख्या 7 अब्ज 13 कोटी 76 लाख 61 हजार 30 वर पोहोचली. या वास्तवाची जाणीव करून देण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिनाच्या वार्षिक कार्यक्रमात जागृती घडवून आणणार्‍या विविध उपक्रमांची आणि कृतिशील कार्यक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे. या कार्यक्रमांमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, यासाठी प्रोत्साहन देणेही आवश्यक आहे. अशा कार्यक्रमांमध्ये कुटुंबनियोजनाचे महत्त्व, लिंग समानता, माता आणि शिशू आरोग्य, गरिबी, मानवी हक्क, आरोग्याचा हक्क, लैंगिकतेचे शिक्षण, मुलींना शिक्षण, संततीनियमनाच्या साधनांचा आणि निरोधचा वापर करणे, प्रजननविषयक आरोग्याची माहिती घेणे, किशोरवयातील गर्भारपण टाळणे, बालविवाह टाळणे, लैंगिक संबंधातून संक्रमित होणार्‍या संसर्गांची माहिती घेणे अशा उपाययोजनांचा समावेश असला पाहिजे.


 


स्त्रोत - 

Friday 9 July 2021

शैक्षणिक वर्ष- 2021-23 साठी YCMOU बीएड ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात YCMOU BEd online application start for academic year 2021-23

दि.8 जुलै ते 31 जुलै पर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज

          यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2021-23 साठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन सरु करण्यात आली आहे. YCMOU BEd साठी ऑनलाईन अर्ज 8 जुलै पासून करता येतील. अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 जुलै पर्यंत आहे. त्यानंतर 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट या कालावधीत अर्जाचे स्वयं संपादन करावयाचे आहे. YCMOU BEd ला अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेला असावा. तसेच DEd DTEd कोर्स पूर्ण केलेला असावा.


रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे टच करा. - Click Here


🔖 मार्गदर्शक सूचना - 

1) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी ह्या प्रणालीचा प्रथमच वापर करणाऱ्या उमेद्वारांनी युजर आईडी व पासवर्ड मिळविण्यासाठी वर दिलेल्या Register बटन क्लिक करून नोंदणी करा.


2) ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर तुम्हाला तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड मिळेल.

तुमचा स्वतःचा युझर आयडी आणि पासवर्ड वापरून आपण ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकता.


3) ऑनलाईन प्रवेश अर्ज पूर्ण करण्यात आपणास कधीही काही अडचण अथवा अडथळा आपल्यास आपण ycmou च्या help desk शी संपर्क साधून त्याचे निराकरण करून घ्या. 


4) ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी प्रथम आपणास वरील लिंक वरून ऑनलाईन नोंदणी करावयाची आहे.


YCMOU BEd माहिती पत्रक 2021-23 - Click Here 👈


YCMOU BEd prospect 2021-23 - Click Here


YCMOU ऑनलाईन नोंदणीसाठी अटी आणि शर्ती 👈


YCMOU BEd 2021-23 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी डायरेक्ट लिंक - Click Here 👈


Friday 2 July 2021

 शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत.

🔖 शासनाचा आजचा जीआर वाचा 👇



🔖 इयत्ता बारावी मूल्यमापन कार्यपद्धती (शै.वर्ष-२०२०-२१) बाबत शासनाचा आजचा जिआर डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा


🔖 इयत्ता बारावी मूल्यमापन माहिती २०२०-२१


💥 बारावी निकाल संदर्भात आजच्या शासन निर्णयानुसार मला समजलेली मूल्यमापन पद्धती 80+20 पॅटर्न साठी खालील प्रकारे आहे. याच्यात मंडळाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचनांनुसार बदल होऊ शकतो व तोच अंतीम असेल.

80+20 पॅटर्न

*80 पैकी*
1) 10 वी 30%= 24 गुण
2) 11 वी 30%= 24 गुण
3) 12 वी लेखी 40% =32 गुण

एकूण =80+20(प्रात्यक्षिक/तोंडी) =100



🎯 इयत्ता दहावी

मराठी                         65
हिंदी/ हिंदी-संस्कत       60     
इंग्रजी.                        45
गणित.                        *85*
विज्ञान.                       *72*   
समाजशास्त्र.                *78*

वरील उदाहरणात इयत्ता दहावीत गणित विज्ञान व समाजशास्त्रात सर्वाधिक गुण आहेत त्यांची एकूण बेरीज 235 होते म्हणजे त्यांची सरासरी *75* एवढी आली.

म्हणजेच इयत्ता दहावी मध्ये मिळालेल्या सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांच्या सरासरी चे गुण इयत्ता बारावीच्या प्रत्येक विषया समोर भरले असता शंभर पैकी 75 म्हणजेच 24 पैकी 18 अशा पद्धतीने आपोआप रुपांतरीत होतील.

🎯 इयत्ता अकरावी

विषय          पैकी 100  पैकी 24

1. इंग्रजी             47.          11
2. मराठी.            52.          13
3. हिंदी               61.          15
4. इतिहास.         63.          16
5. भूगोल.            65.          16
6. राज्यशास्त्र.      72.          18


🎯 इयत्ता बारावी
          इयत्ता बारावीत जेवढ्या गुणांची लेखी परीक्षा घेतली पहिली परीक्षा 25 गुण, दूसरी परीक्षा 50 गुण व तिसरी परीक्षा 80 गुण *किंवा* कोणतीही एक यापैकी मिळालेले गुण बत्तीस गुणांमध्ये रुपांतरीत होतील.( खालील उदाहरणात 80 गुणांची सराव परीक्षा घेतलेली आहे आपण या ऐवजी 50 गुणांची प्रथम सत्र परीक्षा किंवा 25 गुणांची चाचणी/सराव परीक्षा किंवा कोणत्याही दोन किंवा तिनही परीक्षा घेवू शकतात त्यांचे आपोआप 32 गुणात रुपांतर होइल.)

विषय  लेखी पैकी 80  पैकी  32

1. इंग्रजी             52.          21
2. मराठी.            66.          27
3. हिंदी               61           25
4. इतिहास.         59.          24
5. भूगोल.            69          28
6. राज्यशास्त्र.      71.         29


इयत्ता बारावी प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा

*विषय*          *पैकी 20*  

1. इंग्रजी              16
2. मराठी.             15
3. हिंदी                 17
4. इतिहास.          14         
5. भूगोल.             16
6. राज्यशास्त्र.       18

*इयत्ता बारावी निकाल*

*विषय*           

1. इंग्रजी        
18+11+21+16=66

2. मराठी.                               18+13+27+15=73

3. हिंदी              
18+15+25+17=75

4. इतिहास.        
18+16+24+14=72

5. भूगोल.            
18+16+28+16=78

6. राज्यशास्त्र.      
18+18+29+18=83

447/600= 74.50%

Thursday 1 July 2021

१ जुलै डाॅक्टर दिवस

          आपण भारतात १ जुलै रोजी भारतात राष्ट्रीय डॉक्टर दिवस साजरा करतो.

          सध्याच्या धावपळीच्या युगात अनारोग्य हा कळीचा मुद्दा आहे. जसे आईशी आपले नाते असते तसेच ते आपली डॉक्टरशी असते. कोणत्याही आरोग्यविषयक तक्रारीसाठी आपण ज्या व्यक्तीवर अवलंबून असतो ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर. डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. वैद्यकीय क्षेत्रात आपल्या मागण्यांसाठी डॉक्टरांची सततची होणारी आंदोलने, उपोषणे आणि या घटनांचे सर्वसामान्यांवर होणारे दुष्परिणाम तसंच इतर क्षेत्रांप्रमाणेच या क्षेत्रातही बोकाळलेला भ्रष्टाचार. तत्सम असंख्य गोष्टींमुळे एकूणच वैद्यकीय व्यवस्थेबद्दलचं सर्वसामान्यांचं मत काहीसं कलुषित झालेलं दिसतं. असं असताना आज हा दिवस नव्याने डॉक्टर-रुग्ण या नात्यातील विश्वासार्हता दृढ करण्याच्या उद्देशाने साजरा केला गेल्यास भविष्यात आंदोलनाप्रसंगी सर्वसामान्यांना वेठीस न धरण्याचे आशादायी चित्र आपण रंगवू शकतो. मुळात, समाजात चांगल्या-वाईट प्रवृत्ती समाजाच्या सर्वच स्तरावर आहेत. डॉक्टरही माणूस आहे, हे आपण विसरून चालणार नाही. आपल्या कर्तव्याप्रती दक्ष असणा-या, दिनरात्रीची तमा न बाळगता सेवेसाठी तत्पर असणा-या आणि संशोधनातून वैद्यकीय क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणा-या तसंच कित्येकांना नवं जीवनदान देणा-या अनेक डॉक्टरांची उदाहरणं आजही आपल्या आसपास दिसतात. त्यामुळे डॉक्टरांचा व्यवसाय आजही एक उदात्त व्यवसाय समजला जातो. आपणापैकी सगळ्याच लोकांचा डॉक्टरांशी आयुष्यात अनेकदा संबंध येतो. आज हा दिवस त्या चांगल्या गोष्टींची आठवण करण्याचा.. आपल्या डॉक्टरांनी आतापर्यंत आपल्या जीवनात सुदृढ आरोग्यासाठी केलेल्या मदतीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा. आतापर्यंत आपल्या आरोग्याची वेळोवेळी काळजी घेत आलेल्या आपल्या डॉक्टरांना आजच्या जागतिक डॉक्टर दिनानिमित्त त्यांच्याही उत्तम स्वास्थ्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा.

संकलित

 १ जुलै - महाराष्ट्र कृषी दिन

          हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आजचा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.


कृषी क्षेत्रातील मोलाच्या योगदानाची आठवण म्हणून महाराष्ट्र सरकारने १ जुलैला कृषी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यभर हा दिवस वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा केला जातो.


कृषीविषयक समस्या हाताळून महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत कसा स्वयंपूर्ण होईल, याकडे वसंतराव नाईक यांनी लक्ष दिले होते. ‘दोन वर्षात महाराष्ट्र धान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला नाही, तर मी स्वतः फाशी जाईन’ असे त्यांनी १९६५  मध्ये सांगितले होते. 


वसंतराव नाईक यांनी त्यावेळची मर्यादित साधने आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना करुन राज्यात कृषीक्रांती घडवून आणली. ते हाडाचे शेतकरी होते. 'शेती आणि शेतकरी' हे त्यांच्या जिव्हाळ्याचे  विषय राहिले. 


शेतीला आधुनिक स्वरुप देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. राज्यात 'कृषी विद्यापीठां'ची स्थापना केली. शेतकऱ्यांना संकरीत बियाणे उपलब्ध करुन अन्न-धान्याच्या दुष्काळावर मात केली. १९७२ च्या दुष्काळाचे संकट त्यांनी आव्हान म्हणून स्विकारले आणि दुष्काळनिवारणाचा शाश्वत मार्ग दाखवला.


राज्याच्या कृषीविकासाला योग्य दिशा दिली. 'रोजगार हमी योजने'तून महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत केला. कृषीक्षेत्रातील त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस आपण 'कृषी दिन' म्हणून साजरा करतो. 


संकलित

संदर्भ : इंटरनेट