कोरोना जोक्स
मास्क चा प्रभाव
गंपू आईला जेवताना म्हणतो
गंपू -आई ही खीर कशी बनवली आहे
आई -का रे बाळ काय झाले?
गंपू -आई दूध तर पोटात गेलं पण हे तांदूळ तसेच राहिले.
आई- अरे मूर्खा, खीर खाण्यापूर्वी तेवढा मास्क तरी बाजूला करायचा.
कोरोना लसीकरण जोक ४
*चिमणराव vaccine घेउन घरी आले आणि थोड्याच वेळ्यानी त्यांचे तोंड,नाक,डोळे सुजले ।*
*काय ? Vaccine चा reaction / side effect ?*
*नाही हो ! त्यांनी बायकोला एवढच सांगीतलं कि*
*“vaccine देणारी नर्स मस्त होती”.*
🤣🤣🤣🤣🤣
कोरोना लसीकरण जोक ३
*वडिल:* तु बारावी केल्यावर पुढे काय करणार आहेस?🤔
*मुलगा:* मी डॉक्टर बनून कोरोनाला मारण्यासाठी लस बनवणार...😇
*वडिल:* अरे नालायका... ज्या कोरोना मुळे तु परीक्षा न देता पास झालास.. त्याचे उपकार विसरलास?😡
कोरोना लसीकरण जोक २
*७१* देशात *भारताची* लस
आणि
भारतात रोज *२००००+* रुग्ण सापडत आहेत
हे म्हणजे असं झालं,
"बायको *फाटक* लुगडं नेसली तरी चालेल पण शेजारणीला *पैठणी* मीच घेणार"😅😅😅
कोरोना लसीकरण जोक १
सध्या लसीकरण मोहीम (कोविड 19 ) बरीच चर्चेत आहे. लसीकरण मोहिम जसजशी वाढत आहे. तसतसे त्यासंबंधीत विविध शब्द मराठी भाषेत भर घालत आहेत. आणखी खूप नवीन शब्द लसीकरणसंबंधी येऊ शकतात. अगदी सुरुवातीलाच लसातूर हा शब्द आणि लसस्वी हा आधीच प्रचारात आला होता. आणखी शब्द पहा. नवीन शब्द सुचले तर आपणही ॲड करा. हे सारे केवळ विनोदी अंगाने घ्यावे.
१.लस घेऊन फ्रेश वाटणे - लस लशीत वाटणे
२.लस घेण्यास आतुर - लसातूर
३.लस विरुद्ध बोलणारा -लसासुर
४.लस संबंधी लूट इ. करणारा - लसण्या उद
५.लस केव्हा मिळेल ह्याची शक्यता वर्तवणारा शब्द -लसंभाव्यता
६.लस मिळू शकण्याच्या समूहात बसू शकणारा - लसेबल
७.लस मिळू दे हा आशीर्वाद - लसस्वी भव किंवा लसवंत हो
८.लस मिळालेला - लसवंत
९.दोन्ही लसी मिळालेला - द्विलसवंत (एक लसवंत-पहिली लस मिळालेला)
१०.लसीला दाद देणारा - लसज्ञ
११.लस घेऊनही उलट सुलट बोलणारा - लसघ्न
१२.क्रम नसतांना लस घेण्यास मध्ये घुसू पाहणारा - लसंतुक
मंडळी, सगळ्यांना स्कोप आहे, वेळ आहे. नवीन शब्द ॲड करा.
ता. क.
१.लसोजेनिक - लस घेताना फोटो काढण्यास इच्छुक
२.लसेन्द्र बाहुबली - लस घेऊन शक्तीवान झाल्याचा फील येणारा
३.लसेच्छूक - लस घेण्याची इच्छा असणारा!
Source : Whatsapp
No comments:
Post a Comment