K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 28 April 2021

 आदर्श परिपाठ नियोजन

 

सन २०१७-१८ या सत्रापासुन शालेय परिपाठाला फक्त १० मिनीटे वेळ देण्यात आलेला आहे. त्यामुळे परिपाठाच्या नियोजनात आपणास खालील प्रमाणे बदल करता येईल.

 

शाळेतील ६ ते ८ विदयार्थ्याचे इयत्तेनुसार गट करावेत. त्यातील प्रत्येक विदयार्थ्याकडे परिपाठातील घटक द्यावा.

 

विशिष्ट घटकाची जबाबदारी सोपवावी. आठवडयातील 6 वार वर्गवार विभागून दयावेत. आठवड्यातील प्रत्येक दिवस नियोजनानुसार प्रत्येक इयत्तेकडे सादरिकरण द्यावे. जर आपल्या शाळेत परिपाठासाठी साउंड सिस्टीम असेल तर उत्तमच ! परिपाठासाठी आवश्यक सर्व गीते डाउनलोड करुन घ्यावी. त्याचा नियमित वापर करावा.

 

आदर्श परिपाठ कसा घ्यावा याच्या स्टेप खालील प्रमाणे आहेत. 1. सावधान- विश्राम आदेश संचालन करणा-या विदयार्थ्यांने इतर विदयार्थ्यांना सूचना कराव्यात

 

2. राष्ट्रगीत

 

१ मिनिट

 

3. प्रतिज्ञा मि. ३० सें

 

मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत घेण्याचे नियोजन करावे

 

4. भारताचे संविधान मि. ३० सें

 

मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेत घेण्याचे नियोजन करावे

 

5. दिनविशेष मि. ३० सें

 

यामध्ये तारीख, वार, सूर्योदय, सूर्यास्त, व जयंती, पुण्यतिथीचाच उल्लेख करावा.

 

6. सुविचार

 

४५ सेंकद

 

सुविचारात फक्त सुविचार व त्याचे स्पष्टीकरण असावे.

 

7. म्हण/ वाक्यप्रचार

 

४५ सेकंद

 

सुविचार अथवा वाक्यप्रचार कमी शब्दात जास्त अर्थ सांगणारा असावा.

 

वाक्प्रचार व म्हण अर्थासह सांगावे व त्याचा वाक्यात उपयोग करून दाखविण्याची संधी विदयार्थ्यांना दयावी.

 

8. समूहहित

 

२ मि.

 

आठवडयातील 6 दिवस वेवेगळी गीते घ्यावीत त्यात एखादे स्फूर्तीगीतही असावे, सर्व विदयार्थ्यांनी सामुदायिक समुहगीत/देशभक्तीपर गीत गायन करावे.

 

9. विसर्जन

 

विदयार्थ्यांनी तीन टाळ्या वाजवाव्या व आपापल्या वर्गात रांगेत जावे.

 

टिप:

 

पसायदान हे मध्यान्य सुट्टीत शालेय पोषण आहार सुरु करण्यापूर्वी सामूहिक घेण्यात यावे.

 

इतर बाबी ज्यामध्ये बातम्या वाढदिवस, व इतर सहशालेय उपक्रम ह्या शाळेत दर्शनी भागात एक स्पेशल फलक तयार करुन परिपाठापुर्वी फलकावर लिहिण्यात याव्यात.

 

महत्त्वाची सुचना :- वरील नियोजन यामध्ये आपण योग्य तो बदल करु शकता

No comments:

Post a Comment