कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी "शिक्षण सेतू अभियान" राबविणेबाबत.
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये राज्यातील शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळांमधून नियमित शिक्षण केव्हा सुरु होईल याविषयी अनिश्चितता आहे. दरम्यानच्या काळात आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी योजना राबविणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आदिवासी विद्यार्थ्यांना पोषण मुल्यांचा पुरवठा होत राहावा म्हणून सुद्धा खबरदारी घेणे व त्याबाबत उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे. वरील बाबींचा विचार करुन यासंदर्भात सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
आजचा निर्गमित शासन निर्णय
२४-०५-२०२१
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय व अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये आणि पोषणामध्ये खंड पडू नये व ते पुर्वीप्रमाणेच निरंतर रहावे यासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षामध्ये "शिक्षण सेतु अभियान" राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. आश्रमशाळा नियमितपणे सुरू होईपर्यंत सदरचे अभियान राबविण्यात येईल..
शिक्षण सेतू अभियानामध्ये विशेष करून खालील बाबींचा अंतर्भाव करण्यात येत आहे. 👇
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना "शिक्षण सेतू अभियान" संदर्भात शासनाचा आजचा जीआर डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.
No comments:
Post a Comment