K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 28 May 2021

 दहावीची परीक्षा होणार नाही; नववी-दहावीच्या गुणांआधारे मूल्यमापन.


शासनाचा आजचा जीआर (दि.३१ मे)

         राज्यातील महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे मार्फत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा सन २०२१ च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. यानुसार इ. १० वी ची परीक्षा दि. २९ एप्रिल २०२१ पासून सुरु होणार होती. कोविड १९ चा प्रार्दुभाव वाढत गेल्यामुळे इ. १० वीची परीक्षा घ्यावी किंवा कसे याबाबत शिक्षण संस्थांचे संस्थाचालक, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षण क्षेत्रातील कार्यरत व्यक्ती यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सींगद्वारे विचार विनिमय करण्यात आली. कोविड १९ चा पुन्हा वाढलेला प्रादुर्भाव विचारात घेता सदर परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. तथापि कोविड १९ चा प्रादुर्भाव मार्च २०२१ पासून राज्यात मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याने उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे इ.१० वीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच परीक्षेसंदर्भातील सर्व घटकांचे हित लक्षात घेऊन मा. मंत्रीमंडळाने खालील प्रमाणे निर्णय घेतला आहेे.
         कोविड-१९ च्या दुसऱ्या लाटेमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे दहावीची बोर्ड परीक्षा राज्य सरकारने रद्द केली होती. या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन कसे होणार, त्याची पद्धती राज्य सरकारने शुक्रवारी जाहीर केली. दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के गुणांचे वेटेज दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनावर तर ५० टक्के गुणांचे वेटेज नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणांना देऊन विद्यार्थ्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. विद्यार्थ्यांचे प्रत्येक विषयाचे १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येईल. दहावीत अंतर्गत मूल्यमापनासाठी ३० गुण, प्रात्यक्षिकसाठी २० गुण आणि नववीत मिळवलेल्या गुणांसाठी ५० गुणांचे वेटेज अशा पद्धतीने मूल्यमापन करून दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबतची घोषणा केली.

हे पण वाचा : इयत्ता दहावी साठी मूल्यमापन पद्धती जाहीर करणे बाबत शासनाचा आजचा जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा


         शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटकांशी यासंबंधी तब्बल २४ बैठका घेतल्यानंतर दहावीच्या मूल्यांकनाबाबतची पद्धती तयार करण्यात आली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. नववीतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कोविड स्थितीत वस्तुनिष्ठ पद्धतीने झाले होते. त्याची नोंद सरल प्रणालीत आहे, असेही त्या म्हणाल्या. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन दहावीचा निकाल आणि अकरावी प्रवेश प्रक्रियेविषयीच्या निकषांची माहिती दिली.
दहावीच्या निकालाचे नेमके सूत्र कसे?

         दहावीचा निकालाचे सत्र शालेय शिक्षण विभागाने जाहीर केले आहे या सूत्रानुसार इयत्ता नववी व दहावी या दोन्ही इयत्तांमध्ये शाळांनी घेतलेल्या परीक्षांचे गुणांचे रूपांतर शंभर गुणांमध्ये करून अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे
हे सूत्र खालीलप्रमाणे -


- विद्यार्थ्यांचे इयत्ता दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाचे ३० गुण


- विद्यार्थ्यांचे इयत्ता १०वीचे गृहपाठ/ तोंडी परीक्षा / प्रात्यवक्षक परीक्षा यांच्या आधारे २० गुण


- विद्यार्थ्यांच्या इयत्ता नववीच्या अंतिम निकालात मिळालेल्या गुणांचे ५० टक्के वेटेज


- वरीलप्रमाणे विषयनिहाय एकूण १०० गुणांपैकी मूल्यांकन होणार


- म्हणजेच प्रत्येक विषयातील १०० गुणांपैकी नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वेटेज वापरून तयार होणार अंतिम निकाल



शाळांमध्ये निकालासाठी समिती

        विद्यार्थ्यांच्या निकालाचे नियमन करण्यासाठी शाळा स्तरावर मुख्याध्यापकांच्या अध्यक्षतेखाली ७ सदस्यांची निकाल समिती असेल. या निकालपत्रांच्या अभिलेखांची पडताळणी विभागीय स्तरावीर शालेय शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांद्वारे केली जाईल. शाळास्तरावर गैरप्रकार किंवा अभिलेख यामध्ये फेरफार झाल्यास शिस्तभंग व दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात येईल.
नववीत अनुत्तीर्ण विद्यार्थांचे काय?

         नववीत अनुत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी फॉर्म नंबर 17 भरून खासगीरित्या दहावीच्यचा परीक्षेला बसले आहेत, त्यांचेदेखील मूल्यमापन निश्चित करण्यात आले आहे. श्रेणीसुधार योजनेअंतर्गत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांना लागू असलेल्या पुढील एक किंवा दोन संधी कायम राहणार आहे. राज्यातील इयत्ता दहावी परीक्षेसाठी बसलेल्या सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचा विचार करून हा निर्णय घेतल्याचे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

 स्रोत : म. टा. ऑनलाईन.

इयत्ता दहावी साठी मूल्यमापन पद्धती जाहीर करणे बाबत शासनाचा आजचा जीआर पहा. 👇
काळजी घ्या

No comments:

Post a Comment