K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 28 May 2021

अभ्यास कसा करावा ? एकाग्रता रहस्य !!!

         प्रस्तुत लेख विद्यार्थ्यांसाठी मनाच्या एकाग्रतेचे रहस्य या रामकृष्ण मठाने प्रसिद्ध केलेल्या स्वामी पुरुषोत्तमानंद यांच्या पुस्तिकेवर आधारित आहे.

         कोणतेही काम प्रभावी रितीने करण्यासाठी मनाच्या एकाग्रेची गरज असते. एखादा लोहार, सुतार, केशकर्तनकार किंवा सोनार मनाची एकाग्रता सहजपणे अंगी बाणवितो. कारण एकाग्रतेच्या अभावी त्यांच्या कामामध्ये अपघात होउन नुकसान होण्याची शक्यता असते. मनाची एकाग्रता साधण्यासाठी हे कारागीर लोक कोणतीही पुस्तके वाचत नाहीत वा कोणत्या योगशिबीरातही जात नाहीत. सरावाने आपोआपच त्यांना ही एकाग्रता साधत असते. अभ्यास करणे हे विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, आणि ते प्रभावी रितीने पार पाडण्यासाठी "मनाच्या एकाग्रतेची गरज विद्यार्थ्याला निश्चितच आहे. मनाची एकाग्रता नसेल तर साध्या साध्या कामांमध्येही चुका होउ शकतात, आणि एकाग्र मनाने अतिशय जोखमीची अवघड कामेदेखील अचूक होउन जातात.

         मनाच्या एकाग्रतेमध्ये येणारे अडथळे कोणते? मनाची चंचलता ही। सर्वात मोठी अडचण आहे. मन मोठे बलवान असते, चंचल असते. मनाला काबूत ठेवणे वा-याला पकडण्याएवढे अवघड असते. अखंड अभ्यास आणि अनासक्ती (वैराग्य) यांच्या सामथ्र्यानेच मनाला ताब्यात ठेवता येते असे भगवंतांनी गीतेमध्ये सांगीतलेले आहे. मनाची एकाग्रता साधणे हे सहजसोपे नाही तसे अशक्यही नाही. आयुष्यात कोणत्याही गोष्टीत असाधारण यश प्राप्त करून घ्यायचे असेल तर मनाच्या एकाग्रतेला पर्यायदेखील नाही. मनाची एकाग्रता साधण्यासाठी ज्यासाठी ही एकाग्रता साधायची त्या ध्येयाप्रती आपली अविचल श्रध्दा पाहिजे. ती गोष्ट प्राप्त करून घेण्याची अपरिहार्यता मनाने स्विकारली पाहिजे. इतर अनेक पुरक गोष्टी एकाग्रता साधायला मदत करतील.

         स्वामी विवेकानंद म्हणतात की एकाग्र मन हे एखाद्या सर्चलाईटप्रमाणे आहे. सर्चलाईटमुळे आपल्याला दूरवरची कानाकोप-यातली वस्तूदेखील स्पष्ट दिसते. योगी जन आपल्या मनावर ताबा मिळवून अखंड परिश्रमाने मनाचे संतुलन प्राप्त करून घेतात आणि असे संतुलीत मन एकाग्र करून परमसत्याची प्राप्ती करून घेतात. आपले सध्याचे ध्येय त्याहून बरेच सोपे आहे. आपल्याला आपले मन अभ्यासावर कसे केंद्रित करता येईल ते शिकायचे आहे.


१. अभ्यासाला बसताना योग्य आसन असणे गरजेचे आहे. टेबल खुर्ची किंवा डेस्कसारखी उंच वस्तू घ्यावी. पाठीचा कणा ताठ राहील अशी बसण्याची स्थिती असावी. पुरेसा उजेड असावा, लिहिताना आपल्या हाताची सावली लेखनावर पडणार नाही अशी प्रकाशाची दिशा असावी. रोज एकाच ठिकाणी अभ्यासाला बसण्याची सवय ठेवावी. स्वतंत्र खोली असल्यास उत्तम, अथवा विशिष्ट कोपरा निवडावा. एकाच ठिकाणी रोज अभ्यासाला बसल्याने त्या ठिकाणी गेल्यानंतर मन आपोआप अभ्यासासाठी तयार होते. मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते कारण त्या ठिकाणी ईश्वराचे वास्तव्य आहे अशी आपल्या मनाची धारणा असते, तसेच हे आहे. 


२. एकदा अभ्यासाला बसले की शरीर शक्यतोवर स्थिर ठेवावे,चुळबुळ करू नये. पेन किंवा पेन्सील चावणे, केस खाजविणे, विनाकारण इकडेतिकडे बघणे, वेडेवाकडे बसणे अशा गोष्टी टाळाव्यात. हे एकाग्रतेच्या दृष्टीने प्रतिकुल व हानीकारक समजावे.सतत हलणा-या भांड्यातील पाणी जसे हिंदकळत राहते, त्याप्रमाणे अशा गोष्टींमुळे मनदेखील अस्वस्थच राहते. स्थिर व गंभीरपणे एका जागी बसणे खूप महत्वाचे आहे.


३. एखाद्या विषयाचा अभ्यास सुरु केला की किमान तासभर तरी त्या विषयाला द्यायला हवा. याचे कारण असे की मन त्या अभ्यासघटकाशी समरस व्हायलाच दहा मिनिटे लागतात. मनाची प्रवाही अवस्था त्यानंतर सुरु होउन आपण त्या विषयाच्या अंतरंगात प्रवेश करतो. त्या घटकांत दडलेला खरा अर्थ आपल्या अंतः चक्षुसमोर उघड व्हायला लागतो. याआधी शिकलेले संबंधित घटक आठवायला लागतात, त्यांचे या घटकाशी असलेले सांधे मेंदूत जुळायला लागतात व हळूहळू त्या घटकावर प्रभुत्व मिळायला लागते. ही प्रभुत्वाची भावना मग अभ्यासाची प्रेरणाही बनते.


४. अभ्यासाला बसल्यानंतर लगेच मनात ना ना त-हेचे विचार येणे सहाजिक आहे. मन अभ्यासासाठी तयार नसते. तरीही दहा मिनिटे चिकाटीने अभ्यास करीत रहावे. मन हळूहळू शांत होत जाईल व अभ्यासघटकाच्या अंतरंगात जायला लागेल. त्याचप्रमाणे अभ्यास एकदम थांबवूही नये, त्यानेही अभ्यासाचे नुकसान होते. आपण चालण्याचा व्यायाम करताना जसे सुरुवातीला व शेवटी हळूहळू चालतो व मध्यावर वेग जास्तीत जास्त ठेवतो उसेच हे आहे. वॉर्म अप त काम डाउन केल्याने मधल्या अवस्थेतील कामाचा पुरेपुर फायदा आपल्याला मिळतो.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

अभ्यास कसा करावा?

आपण ज्यांना टीनएजर्स असे संबोधतो किंवा
किशोरवयीन मुलं म्हणतो- म्हणजे १३ ते १८ या
वयोगंटातील मुले व अभ्यासांचा कंटाळा
करणारी.
मला माझ्या तीन इच्छा कोणत्या हे
विचारले तर सांगेन -
परीक्षा आणि अभ्यास नावाचे राक्षस नसावेत.
शिक्षकांनी आमच्याशी मित्राप्रमाणे  वागावे आणि
शाळेत जाणे म्हणजे पिकनीक ला गेल्या सारखे वाटणे असे १४
वर्षाची सरीता सांगते.
       सर्वसाधारणपणे किशोरवयीन मुले अभ्यांसाचा
कंटाळा करतात.अभ्यास न करण्याची कारणे
ती शोधत असतात. "माझ पोट आज दुखतंय मला
आज बर वाटंत नाही किंवा मला सगळ येतयं. वैगरे
बहुतेक वाक्य आईवडीलांना आपल्या मुलांकडुन
ऎकायला मिळतात.

          खुप अभ्यास करुन परीक्षेत चांगले यश मिळवणे हे
मुलांच्या योग्य वाढीचे द्योतक आहे. अभ्यास
न करणारी मुले आणि त्यांना अभ्यांसाला
जबरदस्तीने बसवणारी पालक मंडळी या
दोघांच्या वादविवादाने घरांच वातावरण
पार बिघडुन जाते. म्हणुनच मुले का अभ्यास करत
नाहीत, याची कारणे आपण अभ्यासली
पाहीजेत.

१. अभ्यास करणे हे मुलांना कंटाळवाण
वाटतं.बऱ्याचदा अभ्यासक्रम भरपुर असतो आणि
अभ्यास आणि आपल्याला एवढा प्रंचड
अभ्यास करायचा आहे, हे पाहुनच मुलांचा
अभ्यासातला रस संपतो.
२. आमचे शिक्षक आम्हाला निट शिकवत
नाहीत. किशोरवयीन मुलांना शिकवण्यात
येणारे अनेक विषय असतात. ते योग्य रीतीने
शिकवले तरच मुलांना रस वाटतो.
३. पाठांतराचा तीटकारा- अनेक मुले न
समजताच धडाधड पाठंतर करतात. पण मध्येच
एखादा विषय शब्द किंवा वाक्य विसरल तर
प्रश्नाला उत्तर देणं त्यांना कठीण जातं.
त्यामुळेच त्यांना परीक्षेत कमी मार्क
मिळतात. त्यामुळे अभ्यास करण्यासाठी
लागणारा आत्मविश्वास ते गमावतात.
४. अभ्यास करणे महत्वाचे आहे असं मला वाटंत
नाही. बऱ्याच मुलांना अभ्यासांच महत्वच पटलेल
नसतं.पालकांना वाटत असंत की, आपल्या
मुलांनी अभ्यास का करायचा हेच माहीत नसंत.
आणि हेच माहीत नसल्याने त्यांचे अभ्यासांत
लक्ष लागंत नाही.
५. "माझे आई-वडील माझ्याकडुन अति अपेक्षा
करतात." अस अनेक मुलं म्हणतात. आई-वडीलांच्या
अति अपेक्षामुळे मुलांवर दडपण येतं. मुले एकाग्र बनु
शकत नाहीत. (या ठिकाणी सद्या चालु
असलेल्या ’घरोघरी’ या उत्कृष्ट नाटकाची
सहजच आठवंण यावे.)
६. काही वेळा मित्रांच्या संगतीने , आई-वडील
घटस्फोटीत आहेत, व्यसनी आहेत , एकमेंकाशी
सतत भांडत असतात, मुलांला देखील सतत
मारहाण करत असतात, त्याने मुलं अभ्यासात
मागे पडतात.
७. काही वेळा मित्रांच्या संगतीने अभ्यास
करण्यांच मुलं टाळतात. अभ्यास आपल्या
मित्राला आवडत नाही, म्हणुन त्यांना पण
आवडत नाही. कारण आपण जर का अभ्यास मधे
रस दाखवला तर ग्रुप मधे बाहेर फेकले जावु अशी
त्यांना भीती असते.
अभ्यासांने प्रत्येक व्यक्त्तीचा मनाचा,
बुध्दीचा मोठया पमाणावर विकास
होतो.आपल्या आजुबाजुच्या वातावरणांची
माहीती होते, ते समजुन घेता येते. स्व:ताच्या
प्रगतीसाठी अभ्यासाची अत्यंत आवश्यकता
असते आणि म्हणुन किशोररवयात हे अभ्यास तर
भरपुर करतात. पण त्यानी त्यांचा अभ्यास कसा
करतात याचा नोंदी पण दीलेल्या आहेत.
त्यामुळे मुलांना आपला अभ्यास नक्कीच
सुधारता येईल.
१. तुमचे अभ्यासाचे टेबल, टीव्ही, स्वयंपाकघर हे
ट्रँफिकच्या आवाजापासुन दुर असायला हवे.
टेबलावर काँमीक्स व गोष्टीची पुस्तके
नसावीत.
२. शक्य असेल तर अभ्यासाची एक ठरावीक वेळ
असावी, म्हणजे त्या वेळेत अभ्यासात तुमंच मन
एकाग्र होण्यास मदत होईल. रविला रात्री
दहानंतर अभ्यास करायला आवडतं. कारण
त्यावेळी सर्वजण झोपलेले असतात आणि सर्वत्र
शांतता असते.
३. सर्वसाधारण प्रत्येक व्यक्ती ४५ मीनीटं ते १
तास एकाग्र राहु शकते. त्यानंतर एकाग्रता भंग
होवु लागते. म्हणजेच जेव्हा एखादा किशोर
वयीन मुलगा एकच पाठ एक तासापेक्षा जास्त
वेळ वाचत असतो. तेव्हा त्याची स्मरण करणे
त्याला कठीण जांत. त्याही पेक्षा जेव्हा
मुलगा तीन तास सलग अभ्यास करीत असतो.
तेव्हा त्यांची स्मरणशक्ती कमी होते. आणि
तो अधिक विस्मरणशील होतो . म्हणुनच
कीशोरयीन मुलांनी सर्वसाधारणपणे तासभरच
अभ्यास करायला हवा. त्यानंतर १०-१५
मिनिटांचे मध्यंतर घेऊन मग पुन्हा अभ्यासाला
सरुवात करावी. यामुळे स्मरणशक्ती
ताजीतवानी राहते आणि अभ्यासक्रम चटकन
लक्षात यायला मदत होते.
४. छोट्या मध्यांतराप्रमाणे मुलांनी काही
काळ खेळण्यात, मित्रांशी गप्पा मारण्यात,
टीव्ही बघण्यात घालवला पाहीजे. यामुळे
मुलांना जीवनावीषयी आस्था वाटते आणि
अभ्यास करताना उस्ताह येतो.
५. रोज अभ्यास करायची सवय ठेवा, म्हणजे
परीक्षेच्या वेळी ताण जाणवार नाही.
६. एखादा धडा वाचताना तो नेमका
कशाबद्दल आहे ते जाणुन घ्या.त्यातील
मुद्याची शिर्षके, धड्याची प्रस्तावना आणि
सारांश नीट वाचा. यामुळे धड्याची नीट
ओळख होते
७. वाचुन झाल्यांनंतर पुस्तक बंद करुन, तुम्ही जे
वाचंल आठवण्याचा प्रयत्न करा. केलेला अभ्यास
लिहुन काढणे सर्वात उत्तम. त्यामुळे तुम्ही तुमची
उत्तरे अधिक चांगल्या तऱ्हेने लिहु शकता. आणि
तुमचा गोंधळ उडत नाही. शिवाय लिखाणामुळे
तुम्ही केलेला अभ्यास तुमच्या स्मरणात राहतो.
शिकण्याची क्षमता ही माणसाला
मिळालेली महान देणगी आहे. तिचा उपयोग
करा. आणि आयुष्यात यशस्वी व्हा.

माहिती संकलन : कुलदिप बोरसे.
स्त्रोत: आरोग्य.कॉम
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

No comments:

Post a Comment