K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 28 May 2021

करिअर निवडण्यासाठी स्वतःला हे '४' प्रश्न अवश्य विचारा

(Before you choose your career)


 माझ्यासाठी उत्तम आणि योग्य करिअर काय आहे?

         हा प्रत्येक विद्यार्थ्याला पडणारा प्रश्न जीवनात योग्य करिअरची निवड करणं फार महत्त्वाचं असत. काही विद्यार्थी करिअरची निवड करण्यापूर्वी करिअर काऊंन्सिलरचा सल्ला घेतात. पण तुमच्याशिवाय दुसरे कोणीही तुम्हाला जास्त ओळखू शकत नाही. त्यामुळे करिअर निवडण्यापूर्वी स्वतःला हे प्रश्न नक्की विचारा. हे प्रश्नांमुळे करिअर निवडण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल, तर जाणून घेऊया काय आहे हे प्रश्न...


मी कोणते काम न कंटाळता करु शकतो?

         हा प्रश्न स्वतःला विचारा. त्याचबरोबर स्वतःला विचारा की, कोणते काम करणे, तुम्हाला अधिक भावते? जर तुम्ही तुमच्या आवडीने, मनाप्रमाणे कामाची, करिअरची निवड केली तर तुम्ही अधिक चांगले काम करू शकाल. त्यामुळे त्यानुसारच कोर्सची निवड करा. यामुळे यशाची पायरी गाठण्यास तुम्हाला कोणीही अडवू शकत नाही.


मी ज्या कोर्ससाठी प्रवेश घेत आहे, त्याचा मला माझ्या करिअरमध्ये फायदा होईल का?

         हा प्रश्न स्वतःला विचारणे आणि त्यानुसार कोर्सला प्रवेश घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण विनाकारण कोणत्याही कोर्समध्ये पैसे, वेळ वाया घालवणे काही कामाचे नाही.


हा कोर्स माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसा आहे का?

         प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीत्व वेगवेगळे असते. त्यानुसारच रायला आवडते. काम त्यामुळे करिअरच्या सुरुवातीलाच हा प्रश्न स्वतःला विचारणे, जगदी गरजेचे आहे.


१० वर्षांनंतर मी स्वतःला कुठे बघतो?

         या प्रश्नावर तुमचे संपूर्ण करिअर अवलंबून असते. हा प्रश्न स्वतःला वारंवार विचारल्याने तुम्ही स्वतःच्या ड्रिम करिअरसाठी पूर्ण मेहनत घेऊ शकाल. करिअरची ब्लू प्रिंट तुमच्याकडे तयार असेल आणि भविष्यातील तुमची प्रगती कोणीच रोखू शकणार नाही.

No comments:

Post a Comment