CBSE च्या मार्कांचा फॉर्म्युला ठरला...(CBSE 12th Result Evaluation)
मुंबई : सीबीएसई बोर्डाची (CBSE 12th Result) बारावीची परीक्षा रद्द झाल्यानंतर ज्या मार्कांच्या फॉर्म्युलासाठी विद्यार्थी गेले काही दिवस वाट पाहत होते, तो फॉर्म्युला आज समोर आला आहे. याबाबत, सरकारने गठित केलेल्या 13 सदस्यांच्या समितीने आपला अहवाल गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात सादर केला. या अहवालानुसार बारावीची गुणपत्रिका दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्वीच्या निकालाच्या आधारे तयार केली जाईल. (CBSE 12th Result Evaluation how To make marksheet)
असे दिले जाणार गुण…!
समितीच्या अहवालानुसार शेवटच्या तीन परीक्षा बारीवीचं मार्कशीट बनविण्यासाठी अमलात आणल्या जातील. यामध्ये विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यासाठी त्याचे दहावी, अकरावी आणि बारावीतील बेस्ट तीन विषयांचे उत्कृष्ट गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. या आधारे मार्कशीट तयार करण्यात येईल. तसंच अकरावीच्या पाच विषयांची सरासरी घेऊन वेटेज दिले जाईल.
मार्कशीट तयार करताना बारावीच्या पूर्व-बोर्ड परीक्षेच्या आणि प्रॅक्टिकलच्या गुणांनाही वेटेज दिले जाईल. अशा प्रकारे, जर आपण मूल्यमापनाच्या पूर्ण फॉर्म्युलाबद्दल बोललो तर निकाल दहावीच्या 30 टक्के, 11 वीच्या गुणांपैकी 30 टक्के आणि 12 व्या गुणांच्या 40 टक्के आधारावर 12 वीचा निकाल असेल. सीबीएसई बोर्ड निकाल तयार करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युला वापरू शकेल, अशी चर्चा होती. अखेर यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
सीबीएसईने सर्वोच्च न्यायालयात काय सांगितलं?
विश्वासार्हतेच्या आधारे वेटेजचा निर्णय समितीने निर्णय घेतला आहे. प्रीबोर्डमध्ये अधिक गुण देण्याचे शाळांचे धोरण आहे, त्यामुळे सीबीएसईच्या हजारो शाळांसाठी निकाल समिती गठीत केली जाईल. सीबीएसई शाळेतले दोन वरिष्ठ शिक्षक आणि आसपासच्या सीबीएसई शाळेतील एक शिक्षक ‘मॉडरेटिंग कमिटी’ म्हणून काम पाहणार आहे. जेणेकरुन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाढीव गुण देऊ नयेत. ही कमिटी गेल्या तीन वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचे मूल्यांकन करेल.
Source : TV9 Marathi.
No comments:
Post a Comment