K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday, 9 June 2021

 शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) साठी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत चे परिपत्रक जाहीर.

दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले


संदर्भ 
१. शासन निर्णय क्रमांक परीक्षा ०५२१/प्र.क्र.३९/एसडी-२, दि. १२ मे २०२१ 
२. शासन निर्णय क्रमांक परीक्षा ७५२१/प्र.क्र.४३/एसडी-२, दि. २८ मे २०२१

         कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या असामान्य परिस्थितीमुळे सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत आयोजित करण्यात येणारी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १०वी) परीक्षा उपरोक्त संदर्भ क्र.२ अन्वये रद्द करण्यात आलेली आहे. सदर परीक्षा रद्द केल्यामुळे परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक / प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित करण्यात येतील, असेही उपरोक्त शासन निर्णयाद्वारे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्र. २ अन्वये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) साठी मूल्यमापन कार्यपध्दतीचा तपशील जाहीर केलेला आहे.

         महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांना या परिपत्रकाद्वारे सूचित करण्यात येते की, सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षात मंडळामार्फत आयोजित करण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परीक्षेसाठी मंडळाकडे नोंदणी केलेल्या नियमित, पुनर्परिक्षार्थी, नाव नोंदणी केलेले खाजगी विद्यार्थी, तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे परिक्षार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट विद्यार्थी यांचे मूल्यमापनाबाबत उपरोक्त संदर्भ क्र.२ मधील शासन निर्णयातील तरतूदी लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

         सदर शासन निर्णयातील दिलेल्या निर्देशानुसार मंडळामार्फत मूल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

📌 परिपत्रकातील महत्त्वाचे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.

१) कार्यवाहीचे वेळापत्रक

२) निकाल समिती गठीत करणे

३) मुख्याध्यापकांनी करावयाची कार्यवाही

४) निकाल तयार करण्यासाठी कार्यपद्धती

अ) नियमित विद्यार्थ्यांसाठी

ब) पुनर्परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी

क) खाजगी विद्यार्थ्यांसाठी (नियमित)

ड) तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी

इ) श्रेणीसुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट विद्यार्थी

🎯 10th Evaluation letter 👇



🎯 परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी इथे टच करा 👈


📄 डाऊनलोड विभाग 📄

💥 इयत्ता दहावी सर्व गुणदान तक्ते  एक्सेल (MS Excel) फॉरमॅट मध्ये...


🎯 विषयनिहाय गुणतक्ता (नियमित विद्यार्थ्यांसाठी) 


🎯 विषयनिहाय गुणतक्ता (खाजगी विद्यार्थ्यांसाठी) 


🎯 विद्यार्थीनिहाय तपशील व विषयनिहाय गुणतक्ता प्रविष्ट पुनर्परीक्षार्थी (खाजगी / नियमित)


🎯 विद्यार्थीनिहाय तपशील / गुण (तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी) (राज्य मंडळ / अन्य मंडळ प्रविष्ट विद्यार्थी)


आजपासून शिक्षकांना प्रशिक्षण...

         मुल्यमापन कार्यपद्धती साठी 10 जूनपासून मुख्याध्यापक आणि शिक्षकांना राज्य शिक्षण मंडळाच्या यूट्यूब चैनल वरून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर या प्रशिक्षणानंतर शिक्षकांना विषय निहाय गुण तक्ते वर्ग  शिक्षकांकडे सादर करण्यासाठी 11 जून 20 जून पर्यंत सादर करावे लागणार असून त्यावर आधारित संकलित निकाल अंतिम करून तो शाळेचा निकाल समितीकडे सादर केला जाणार आहे. तर यासाठी सर्व प्रकिया ही 30जून पर्यंत चालणार आणून त्यानंतर  विभागीय मंडळ व राज्य मंडळ स्तरावर प्रक्रिया ही 3 जुलैपासून केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment