K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 29 April 2021

 कसा भरावा कर्जमाफीचा ऑनलाईन अर्ज

        राज्य सरकारने नुकतीच कर्जमाफीची घोषणा केली होती. पण कर्जमाफी मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक आहे. राज्य सरकारच्या 'आपले सरकार' या पोर्टलवर हा फॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे हा ऑनलाईन अर्ज कसा भरावा ते जाणून घेऊयात...


● प्रथम https://aaplesarkar.maharashtra.gov.in/en/ या संकेतस्थळावर लॉग इन करावे.


● या संकेतस्थळावर 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना वर्ष 2017' हे नाव दिसेल. यावर क्लीक करावे.


यानंतर छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे एक नवीन पेज ओपन होईल.


• या ठिकाणी अगोदर नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी नवीन नोंदणी हा पर्याय निवडावा. त्यावर क्लिक केल्यानंतर आधार कार्डने नोंदणी करावी.


आधारने नोंदणी केल्यानंतर पुढे ओटीपी जनरेट करावा लागेल, जो तुमच्या आधार कार्डशी संलग्नित मोबाईल नंबरवर पाठवला जाईल.


● शेतकऱ्याचा मोबाइल क्रमांक आधार नोंदणीकृत नसल्यास बायोमेट्रिक नोंदणीची निवड करावी.


ओटीपी किंवा बायोमेट्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या आधारशी संलग्नित बँक अकाऊंट आपोआप दाखवलं जाईल.


तुमचं बँक अकाऊंट आधारशी लिंक नसेल, तर ते तुम्हाला लिंक करावे लागणार आहे.


● पुढच्या स्टेपमध्ये तुम्हाला तुमचं युजर नेम आणि पासवर्ड तयार करावा लागणार आहे. जो फॉर्म भरताना लॉग इन करण्यासाठी कामी येईल.


नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मुख्य पानावर जाऊन तुम्ही तयार केलेल्या युजर नेम आणि पासवर्डने लॉग इन करावे. त्यानंतर तुम्हाला कर्जमाफीचा अर्ज दिला जाईल. त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे माहिती भरावी.


सौजन्य- लेट्सअप मॅगझिन.

No comments:

Post a Comment