K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 15 May 2021


बँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणारी माहिती आणि काही महत्वपूर्ण टिप्स (Tips for Banking Exams in Marathi Language)

How to prepare for Bank Exams in Marathi

मित्रांनो, आजचे युग हे स्पर्धा परीक्षेचे युग आहे हे आपण सर्वांना माहिती आहे. आज आपण  कुठल्याही क्षेत्राकडे गेल्यास त्या ठिकाणी स्पर्धा असल्याचे आपणास जाणीव होते. अश्या स्पर्धा परीक्षेच्या योगात जर आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असला तर त्याकरिता आपणास खूप सारे पर्याय उपलब्ध आहेत.

आज या लेखाच्या माध्यमातून बँकिंग स्पर्धे परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या महत्वपूर्ण बाबींची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. बँकिंग क्षेत्रांत उपलब्ध असणाऱ्या विविध पोस्ट करिता घेण्यात येणाऱ्या परीक्षा आणि त्याकरिता आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता.

बँकिंग स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या काही महत्वपूर्ण टिप्स – Tips for Banking Exams in Marathi Language

How to prepare for Bank Exams
पोस्ट(POST)आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता
Pionकमीत कमी दहावी पास / संगणक ज्ञान
Clarkकुठल्याही क्षेत्रांतील पदवीधर/ संगणक ज्ञान
Managerकुठल्याही क्षेत्रांतील पदवीधर/ संगणक ज्ञान
ASSISTENTकुठल्याही क्षेत्रांतील पदवीधर/ संगणक ज्ञान
PO, SOकुठल्याही क्षेत्रांतील पदवीधर/ संगणक ज्ञान

अश्या प्रकारे बँकिंग क्षेत्रांत उपलब्ध असेलल्या विविध पदाकरिता दरवर्षी परीक्षा या होत असतात. या सर्व परीक्षा आर बी आय(RBI), आय बी पी एस (IBPS) व एस. बी. आय (SBI) बँक कार्यलयाच्या च्या अंतर्गत घेण्यात येतात. परीक्षेचे स्वरूप हे Online असल्याने परीक्षा ही संगणकावर घेतली जाते. या करिता शहराच्या ठिकाणी खासगी कंपनीचे मोठ मोठाले संगणक हब तयार करण्यात आले आहेत.

बँकिग परीक्षा ही पर्यायी स्वरुपाची असून त्या करिता ९० मिनिटांचा कालावधी दिला गेलेला असतो. या सर्व परीक्षांचे अर्ज Online स्वरूपाने स्वीकारले जातात. त्याकरिता आपणास आर बी आय (RBI), आय बी पी एस (IBPS) व एस. बी. आय (SBI) बँकेच्या वेब लिंकवर त्या संबंधी संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाते. मित्रांनो, बँकिग स्पर्धा परीक्षेची तयारी करतांना प्रथम आवश्यक बाब आहे ती, परीक्षा करिता आवश्यक असलेल्या अभ्यासक्रमाची. 

प्रत्येक पोस्ट साठी विविध स्वरूपाचे परीक्षेचे स्वरूप असतेक्लर्क आणि परिचर पदाकरिता एकच पेपर घेण्यात येतो. परंतु, अधिकारी पदाकरिता प्रथम व मुख्य परीक्षा घेण्यात येते. परीक्षे संबंधी आवश्यक असणारा अभ्यासक्रम

  • Quantitative Aptitude and Data Interpretation – school level maths, basic charts, and tables.
  • Logical Reasoning – puzzles, analytical and critical reasoning.
  • English Language – school level grammar, English comprehension.
  • General Awareness – GK and current affairs.

परीक्षेचे स्वरूप हे निगेटिव्ह मार्किंग स्वरूपातील असल्याने चुकीच्या प्रश्नाचे गुण कमी केले जातात. परीक्षा ही १०० गुणांची असते. त्यामुळे योग्य तेच उत्तर देणे आवश्यक असते. मित्रांनो, कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना आवश्यक गोष्ट असते ती म्हणजे आपण त्या परीक्षे करिता पूर्णपणे तयार असलो पाहिजे.

परीक्षेचे स्वरूप आणि त्याकरिता असलेला अभ्यासक्रम आपल्या लक्षात आल्यानंतर आपण त्या अभ्यासाचे वेळा पत्रक तयार करणे. आणि सातत्याने सराव करून आपल लक्ष गाठणे. कुठलीही परीक्षा सोपी नसते परंतु आपण केलेल्या मेहनतीने ती सोपी होते. म्हणतात ना !

“केल्याने होत आहेआधी केलेची पाहिजे.”

No comments:

Post a Comment