पर्यावरण शपथ
मी आज संकल्प व निश्चय करतो की, माझ्या दैनंदिन जीवनशैलीत मी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची काळजी घेईन. याकरिता प्लास्टिक पिशवीचा वापर न करता कापडी पिशवीचाच वापर करेन. पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल आहे, त्याची बचत करेन.
घरातील ओला व सुका कचरा वेगळा करेन व ओल्या कचऱ्याचे सेंद्रिय खत करेन. माझ्या सभोवतालच्या नैसर्गिक जलस्त्रोतांचे म्हणजे विहिरी, तळे, नदी अशा पाणवठ्यांचे प्रदूषण होणार नाही याची काळजी घेईन.
मी असे वचन देतो की, नैसर्गिक अधिवासात वास्तव्य करणारे प्राणी, पक्षी, जलचर व जैव विविधता यांचे मी संरक्षण करेन.
मी असा संकल्प करतो की, समृद्ध पर्यावरणाच्या रक्षणाकरीता मी वाढदिवसाला किमान एक झाड लागेल व त्याचे नित्यनियमाने संगोपन करेन.
आम्ही भारतीय प्रजासत्ताकाचे सर्व सुजाण नागरिक शपथ घेतो की, आजपासून आम्ही पर्यावरणपूरक दैनंदिन जीवन व्यतीत करण्याचा निश्चय करीत आहोत.
No comments:
Post a Comment