K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 1 April 2021

 शेवग्याच्या शेंगा (आहारातील फायदे)

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

*दुधाच्या ४ पट, मटणाच्या ८ पट कॅल्शियम असलेली, तुरट असुनही चवीचा बादशहा, ३०० विकारांवर मात करणारी, कुपोषण थांबविणारी पोषक अशी ही शेवग्याच्या पानांची भाजी*

🍁🍁

*१)रक्तदाब नियंत्रित करणारी, आतड्यांचे व्रण-जखमा बरी करणारी, पित्त नियंत्रित करणारी शेवग्याच्या पानांची भाजी ही सहज उपलब्ध होत असलेली रानभाजी आहे.*

🍁🍁

   *२)बाळाच्या पाचवीला ही भाजी सटवाईला नैवेद्य म्हणून दाखवितात.तो नैवेद्य बाळाच्या आईला खाण्यास देतात.*

🍁🍁

*३) अंजन:- शेवग्याच्या पर्णरसात मध घालून अंजन केल्यास डोळ्यांचे सर्व विकार बरे होतात.*

🍁🍁

*४) डोकेदुखी:- शेवग्याच्या पर्णरसात मिरे वाटून लावल्यास डोकेदुखी थांबते.*

🍁🍁

*५) कोंडा:- शेवग्याच्या पर्णरसाने माॅलिश केल्यास केसातील कोंडा जातो.*

🍁🍁

*६) पिसाळलेले जनावर चावल्यास शेवग्याच्या पर्णरस,मीठ,काळी मिरी, लसूण, हळद यांचे मिश्रण पोटात घेणे, तसेच जखमेवर लावणे.* व लगेच वैद्यकीय सल्ला घ्यावा

🍁🍁

*७) तोंड येणे, गळ्याची सुज, वांती, खरुज शेवग्याच्या पर्णरस चोळणे, गुळण्या करणे, पिणे हे सर्वोत्तम,नसल्यास शेवग्याच्या पर्ण चुर्ण खावे अथवा दररोजच्या भाजीत मिसळली तरी चालेल.*

🍁🍁

*८) जेवल्यावर धाप लागणे,पोटात गॅस धरणे, डोकेदुखी, डोळ्यांचे विकार, तोंडाची चव जाणे, कुपोषण आदी विकारांवर शेवग्याच्या पर्णरसाचे,पावडरचे पोषणमुल्य अनन्यसाधारण आहे.*

🍁🍁

*९)वायुगोळा:- पोटातील वा स्नायूंचा वायुगोळ्यावर शेवग्याच्या पर्णरसात खडीसाखर मिसळून खाणे फायदेशीर ठरते.*

🍁🍁

*१०) पोटातील जखमा-व्रण, शारिरीक थकवा, हाडांची कमजोरी, कृमी आदि विकारांवर शेवग्याच्या पर्ण भाजीला तोड नाही.*

🍁🍁

*आयुर्वेदामध्ये 300 रोगांवर शेवग्याने उपचार केले जाऊ शकतात, असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आज तुम्हाला शेवग्यातील औषधी गुणांची माहिती आणि काही खास उपाय सांगत आहोत. शेवग्यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शिअम, पोटॅशिअम, आयर्न, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलॅक्स भरपूर प्रमाणात आढळून येते.* 

*शेवग्याच्या पानांची भाजी करतात. लोणच्यात, सॅलेडमध्ये, सूप करण्यासाठी त्याचा वापर करतात.*

*पचनक्रियेशी संबंधित आजार शेवगा सेवनाने नष्ट होतात.* *कावीळ या आजारांमध्ये शेवग्याच्या पानांचा ताजा रस, एक चमचा मध आणि नारळ पाणी एकत्र करून पिल्यास आराम मिळतो.*

🍁🍁

*शेवग्याच्या कोवळ्या पानांच्या भाजीने आतड्यांना उत्तेजना मिळून पोट साफ होते. त्यामुळे जठराचा कर्करोग टाळण्यासाठी भाजीचा उपयोग होतो. शेवग्याच्या पानांचा रस घेतल्यास आंतड्यातील व्रण भरून येण्यास मदत होते. हाडे ठिसूळ होणे, वजन जास्त वाढणे, आळस आदी लक्षणे दिसू लागल्यानंतर शेवग्याची भाजी खावी. ही सर्व लक्षणे कमी होतात. शारिरीक आणि मानसिक थकवा, जडपणा या भाजीने कमी होतो. शेवग्याचा पाला रक्तवर्धक व हाडांना बळकटी देणारा आहे. सर्व प्रकारच्या नेत्ररोगांमध्ये शेवग्याच्या पानांची भाजी लाभदायक ठरते.* 

*शेवग्याच्या फुलांची भाजी ही संधीवातासाठी चांगली आहे. शेंगाची भाजीसुद्धा स्नायूगत संधीवातासाठी तसेच कृमीनाशक आहे.*

टीप - पोस्ट मधील उपायांनी संबंधित व्याधी मोठ्या प्रमाणात असेल तर वैद्यकीय सल्ला घ्यावा तसेच संबंधीत प्राथमिक व्याधी 15 दिवसात बरी न झाल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा

📌 भाजी कशी करावी?

*शेवग्याचा पाला स्वच्छ धुऊन निथळून घ्यावा. नंतर पाने चिरून घ्यावीत. मूग डाळ एक तास आधी भिजत ठेवावी. नंतर निथळून घ्यावी. जिरे, हिरव्या मिरच्या, लसूण वाटून घ्यावा. फोडणी करून वरील सर्व पदार्थ घालून खमंग परतल्यावर त्यात डाळ घालावी व परतावी. परतल्यानंतर त्यात भाजी घालावी, मीठ घालून झाकण ठेवून मोकळी शिजू द्यावी.*

🍁🍁

*शेवग्याचा पाला काहीसा तुरट-कडवट चवीचा असतो मात्र भाजी केल्यानंतर तो खूप चविष्ट लागतो.*

 *शेवग्याच्या पानांची सुकी भाजी, पातळ भाजी, वड्या, भजी, टिकिया, सूप, झुणका, थालीपीठ, शेवगा पुलाव, शेवगा फुलांची भाजी, फुलांचे भरीत, शेंगेची रसभाजी, पानांची कढी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या केल्या जातात.*

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 

माहितीचा स्रोत : व्हॉट्सॲप

No comments:

Post a Comment