स्मार्ट मनी मॅनेजमेंट तुमच्या मुलांसाठी (पैशांची बचत)
MONEY MANAGEMENT FOR CHILDREN
1. मुलांच्या नावावर बैंक अकाउंट ओपन करा. लहानपणापासून त्यांना गिफ्ट किंवा सण समारंभात मिळणारे पैसे त्यामध्ये ठेवा.
2. बचत आणि गुंतवणूक यातील फरक मुलांना समजावून सांगा.
3. लहान मुलांना बँकेच्या ATM सतत घेऊन जाऊ नका. यातून त्यांची चुकीची समजूत तयार होते कि ATM मध्ये गेलो कि पैसे मिळतात.
4. महिन्याला वर्ष्याला त्यांच्या शिक्षणासाठी होणार खर्च त्यानां कळू द्या...
5. घरातील छोटे-मोठे होणारे खर्च त्यांना लिहायला सांगा.
6. घरात होणाऱ्या आर्थिक व्यवहारामध्ये मुलांना स्थान द्या. ते निर्णय देऊ शकत नाहीत पण जी चर्चा होईल ती कानावर पडण्याने सुद्धा खूप फरक पडतो.
7. घरासाठी / गाडी साठी किंवा शिक्षणासाठी घेतलेली कर्जे याची जाणीव मुलांना करून द्या. त्या कर्जाचे हफ्ते किंवा त्यावरील व्याज किती जाते याची जाणीव करून द्या.
8. खूप वेळा मुलांचे मित्र मैत्रीण उच्च ब्ररुह परिवारातून असतील तर आपलीकडे असलेल्या गोष्टी हि त्यांना खुज्या वाटू लागतात त्यासाठी त्यांना हे पटवून द्या कि या जगात आपल्यापेक्षा हि बिकट परिस्तिथी मध्ये राहणारे परिवार आहेत.
9. महिन्यातून एकदा अनाथाश्रम किंवा तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या गरीब कुटुंबातील मुलांना मुलांच्या हस्ते मदत करा. याचा परिणाम असा होईल कि तुम्ही जे त्यांना पुरवता ते काही जणांना मिळत नाही हे त्यांना कळेल.
10. ज्या प्रमाणे आज तुमचा स्मार्ट गुंतवणूकदार होण्याचा प्रवास चालू झाला आहे त्याप्रमाणे मुलांना हि स्मार्ट करण्याची जबाबदारी तुमची आहे त्यांना मुतुअल फंड, शेअर्स याबद्दल वाचायला द्या.
पालकहो, कृपया लक्षात घ्या आर्थिक शिक्षण हि आज काळाची गरज आहे आणि त्यापेक्षा आहे त्या आर्थिक परिस्थिती मध्ये आनंदी राहणे गरजेचे आहे आणि त्यासाठी पैश्या बद्दल दृष्टिकोन बदल होणे गरजेचे आहे.
धन्यवाद.🙏
No comments:
Post a Comment