सातबारा (७/१२) बद्दल मूलभूत माहिती
सात बारा म्हणजे काय व त्यात कशाचा समावेश होतो?
जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय.जमिनीची माहिती ज्यामध्ये असते त्याला गाव नमुना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी 1-21 अशी विभागणी केलेली असते. त्यातील 7 नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर 12 नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण 7/12 मध्ये केलेले असते.
7/12 संबंधीची महत्वाच्या महत्वाच्या बाबी:
1) 7/12 हा जमीन मालकी हक्का चा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो.
2 7/12 बेकायदेशीर ठरविला जात नाही तो पर्यंत तो कायदेशीर मानला जातो.
3 7/12 ची नविन पुस्तके साधारणता 10 वर्षानी लिहिली जातात.
4 7/12 तील मालकी व इतर हक्का च्या ठिका नी कोण तेही महत्वाचे लिखान हे फेरफार नोंद के ल्या शिवाय ये वू शतेकत नाही. गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही.
5 प्रतेक वेळी 7/12 काढल्यावर कर्ज व कर्ज देना री संस्थेची नावे, विहीर बोअरवेल, फळझाडे, झाडे अशा नोंदी खात्रीने पाहिल्या पाहिजे.
6 प्रतेक स्वतंत्र गटा साठी एक सातबारा असतो.
7 7/12 पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते .
8 7/12 त मालकाशिवाय दूसरया व्यक्तिचे नाव , कुळ , खंड सदरात थेट लावण्याचे अधिकार तलाठी यां ना नाही.
9 7/12 वरुण जमिनी च्या मालकी हक्का बाबत माहिती मिलते.
10 पूर्वी जेव्हा 7/12 नसत तेव्हा शेतवार पत्रक व सूडपत्रका वर नोंद लिहत.
फेरफार / गावनमुना 6 मधील नोंद
गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही यावर घेतले ल्या नों दी च 7/12 वर येतात. त्यामुळे शेतकर्याच्या दृष्टिने फेरफार उता रयाला अनन्य साधारण महत्व आहे. यातिल तपशील हा चार भागात लिहिला जातो. यात १ ) फेरफार नोंदणीचा अनुक्रमांक 2) हक्क प्राप्त व्यक्तिच्या अधिकाराचे स्वरुप, व्यवहाराचे स्वरुप दिनांक, संबंधित खातेदारांची नावे, मोबदला रकम आदी. बाबीचा उल्लेख असतो. 3) जमीन ज्य़ा गटात अथवा सर्वे नम्बर मधील आहे त्याचा नम्बर लिहिला जातो. 4) शेवटी फेरफार बरोबर आहे असे प्रामाणित करनारा अधिकारी / मंडल अधिकारी यांचे पदनाम व स्वाक्षरी असते.
फेरफार नोंद व प्रामाणित नोंद
शेत जमीन अथवा जमीन व्यक्तीकडे जमीन खरेदी करून किंवा इतर कारणाने येते.अशी प्राप्त झालेली जमीन आपल्या मालकीची आहे यासाठी त्याचे रीतसर नोंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती जमीन आपल्या कडे कश्या पद्धतीने आली आहे हे दर्शवणारे पुरावे सादर करावे लागतात त्या कागदपत्रांच्या आधाराने सर्वप्रथम फेरफार नोंद लिहिली जाते.व ती प्रमाणित आहे किंवा नाही हे तपासण्याची प्रक्रिया सुरु होते.
१.कोणत्याही कागदपत्राद्वारे जमिनीचा हक्क प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी सर्व संबंधिताना नोटीस देणे आवश्यक असते. नोटीस दिल्याशिवाय फेरफार मधील नोंद प्रमाणित करण्याची प्रक्रीयापूर्ण होत नाही. २.खरेदी करणार व घेणार हे वेगवेगळ्या गावाचे असतील तर त्याचे नाव पत्ते तलाठी यांना कळविणे गरजेचे असते.त्याच प्रमाणे वारसाच्या नोंदीसाठी सर्व वारसांचे नाव पत्ते व वारसांचे मयत खातेदारांशी नाते कळविले पाहिजे. ३.फेरफार नोंद लिहिल्यानंतर ती प्रमाणित होणे करिता नोटीस काढल्यानंतर किमान १५ दिवसाचा कालावधी जाऊ देणे गरजेचा असतो.या नंतर नोंद प्रमाणित करता येते .व त्यानंतर दुरुस्तीचा ७/१२ मिळतो.
फेरफार नोंद व प्रमाणित नोंद यामधील काही महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.
१.फेरफार नोंद झाल्यावर लगेचच त्याची नोंद ७/१२ वर येते. २.काही कारणाने जर सूची २ मध्ये चूक झाली असल्यास ते खरेदीखत सादर करून सब रजिस्टर यांच्या कार्यालयातून दुरुस्ती करता येते. ३.सातबारा वरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो. ४.कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत ती खरी मानण्यात येते. ५. जमिनीच्या अधिकारात जसजसा बदल होतो. म्हणजेच जमिनीचे मालक जसे बदलतात त्या क्रमवारीने त्याच्या नोंदी फेरफार मध्ये नमूद केलेल्या असतात. ६. फेरफार वरून खातेदाराच्या मालकीच्या एकूण जमिनीबाबत माहिती मिळते
सातबारा (७/१२) बद्दल मूलभूत माहिती पहा 👇
सातबारा (७/१२) बद्दल मूलभूत माहिती पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
No comments:
Post a Comment