K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 11 May 2021

 थंड हवेची ठिकाणे

 (1)तोरणमाळ

Toranmal उंचीने महाबळेश्वर पाठोपाठ महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणजे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ होय. समुद्रसपाटीपासून ११४३ मीटर उंचीवर असलेले हे स्थान सातपुडा पर्वतरांगांमध्ये आहे. राज्यातील इतर पर्यटन स्थळांप्रमाणे विकसित न झाल्याने हे स्थान केवळ उत्तर महाराष्ट्रातील पर्यटकांचेच विशेष आकर्षण आहे. तोरणमाळ हे उत्तर महाराष्ट्रातील एकमेव थंड हवेचे ठिकाण आहे (खानदेशच्या जनतेच्या आवडीचे सापुतारा हे स्थळ गुजरात राज्यात येते.) जवळपास कुठल्याही शहराचा आणि वर्दळीचा अभाव या कारणांनी तोरणमाळने आपले नैसर्गिक सौंदर्य जपले आहे.

तोरणमाळ येथील प्रमुख आकर्षण

१) सात पायरीचा घाट – घाट चढून गेल्यावर शेवटच्या उंच टोकावरून रस्त्याकडे पाहिल्यास एका खाली एक सात पायऱ्या दिसतात. हा घाट तोरणमाळ पासून ४ किमी आधी सुरु होतो. सात पायरी घाटाच्या पायथ्याशी काळा पाणी नावाचा पहाड आहे. गंभीर गुन्हे केलेल्या कैद्यांना इंग्रज या पहाडावरून लोटून देत असत. तोरणमाळ माथ्याच्या सुरुवातीलाच असलेल्या एका गुहेत अर्जुनाची आदि मानवाच्या अवस्थेतील मूर्ती आहे म्हणून त्याला नागार्जुनाची गुहा असेही म्हणतात.

२) सिताखाई पॉइंट (सिता गुफा) –

तोरणमाळच्या ईशान्य भागात सिताखाई पॉइंट आहे. प्रचलित आख्यायिकेनुसार प्रभू रामचंद्र सितेसोबत या भागातून जात असताना या ठिकाणी रथ अडकून गुफा तयार झाली. येथे रथाच्या दोन चाकांची तसेच घोड्याच्या खुरांच्या खुणा आजही स्पष्ट दिसतात. भौगोलिकदृष्ट्या ही गुफा पाषाण आणि उंच सुळक्यांनी वेढलेली आहे. सीतेला तहान लागली असता प्रभू रामचंद्रांनी पृथ्वीच्या पोटात बाण मारून भूगर्भातील जल बाहेर काढले. ते स्थळ आज सिताकुंड म्हणून ओळखले जाते. सिताखाई धबधब्यातून वाहणारे पाणी पुढे सरकल नदीला जाऊन मिळते. पुढे ही नदी नर्मदेस मिळते.

३) यशवंत तलाव – yashwant lake Toranmal वर्षातील बाराही महिने पाणी असणाऱ्या तोरणमाळ मधील या तलावाची मोहिनी राज्याचे पहिले मुख्यमंत्री अशावंतराव चव्हाण यांच्यावरही पडली होती. त्यांच्या भेटीनंतर २६ सप्टेंबर १९६९ पासून या तलावाचे यशवंत तलाव असे नाव नामकरण झाले. या तलावाचे मूळ नाव अज्ञात आहे. या ठिकाणी बोटिंगची सोय उपलब्ध आहे. तलावातील पाणी पुढे सिताखाईच्या धबधब्याला जाऊन मिळते.

गोरक्षनाथ मंदिर, खडकी पॉइंट, पुरातन किल्ला हे स्थळ, सूर्योदय आणि सूर्यास्थाचे विलोभनीय दृश्य ही तोरणमाळची इतर वैशिष्ट्ये आहेत. Location Icon

सापुतारा

Saputara गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये वसलेले हिलस्टेशन म्हणजे ‘सापुतारा’. सापुतारा समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचीवर आहे. शुध्द आणि थंड हवा असल्याने पर्यटक येथे उन्हाळ्यात गर्दी करतात.

नाशिकहून सापुता-याला जातांना वळवळांचा, घाटाचा रस्ता असल्याने मजा येते. सापुतारा सर्कल वरून थोडं चालत गेल्यास गांधी शिखर लागते येथे सनसेट पॉईंट आहे. इथून दिसणारा सूर्यास्त एक अविस्मरणीय अनुभव आहे. सूर्योदय पाहण्यासाठी लोकं आवर्जून सरदार शिखरावर जातात. खो-याच्या मध्यवर्ती भागात टेकड्यांनी वेढलेला ७० फुट खोल तलाव येथील आकर्षण आहे. या तलावात बोटिंग करण्याचा आनंद ही पर्यटकांना घेता येतो. डांग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लोकांची जीवनशैली, परंपरा, दाग-दागिने, संगीत-वाद्ये, घरे अशी संस्कृती जपणारे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. विविध गुलाबाची फुले असलेले रोझ गार्डन तसेच पाय-यांची रचना असलेले स्टेप गार्डन ही पाहण्यासारखे आहे. ऋतभरा विश्वविद्यालयापुढे असलेल्या एको पॉईंच्या पठारावर खेळायला मजा येते. जातांना वाटेत तुम्हाला भरपूर लालचुटूक स्ट्रॉबेरीज खायला मिळतात.

कसे जाल?

नाशिक ते सापुतारा हे अंतर साधारण ७७ कि. मी आहे. नाशिकहून दिंडोरी – वणी – बोरगाव मार्गे २ तासात सापुता-याला पोहोचता येते. तेथे बसेसची सोय आहे तसेच खाजगी वाहनाने ही जाता येते. Location Icon

 (2)महाबळेश्वर

Mahabaleshwar मुंबई-गोवा महामार्गावर जाताना महाड सोडल्यावर डावीकडच्या सह्याद्री पर्वत रांगेमध्ये रायेश्वर, महाबळेश्वर, कोल्हेश्वर अशी एकापेक्षा एक उत्तुंग पठारे लागतात. यापैकी महाबळेश्वर हे ब्रिटीश कालातच थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्दीस आले होते. ब्रिटीशांनी या ठिकाणाला मुंबई प्रांताची उन्हाळयातील राजधानी म्हणून विकसीत केले होते. या ठिकाणी येण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग (पोलदपूर मार्गे) हा सोयीचा मार्ग आहे. या शिवाय मुंबई-पुणे किंवा मुंबई-बँगलोर महामार्गावर खंबाटकी घाट ओलांडल्यावर वाई-पाचगणी मार्गे महाबळेश्वर गाठता येते.

चेरापुंजी नंतर भारतात सर्वाधिक पाऊस पडणारे हे दुस-या क्रमांकाचे ठिकाण आहे. त्यामुळे पावसाळयात महाबळेश्वर बहुतांशी चार महिने बंदच असते. महाबळेश्वर ते प्रतापगड मधले घनदाट, निबीड अरण्य म्हणजेच जावळीचे खोरे. अफझलखानाचा प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी वध केल्यानंतर मराठयांनी आदिलशाही फौजेला याच जावळीच्या खो-यात धूळ चारली होती.

Mahabaleshwar महाबळेश्वरची उंची ४,७१८ फूट आहे, त्यामुळे इथून सह्याद्रीतील द-या, कडे-कपारींचे होणारे दर्शन हे निश्चितच वेगळे आहे. ब्रिटीशांच्या नावांनी ओळखले जाणारे इथले विविध पॉईंटस् पर्यटकांना विशेष आकर्षित करतात. यापैकी काही पॉईंटस् बाजारपेठेच्या जवळ तर काही १०-१३ किलोमीटरच्या परिघात आहेत. यामध्ये सर्वात प्रसिध्द आर्थर सीट पॉईंट आहे, जिथून महाबळेश्वरच्या सगळया द-याखो-यांचे दर्शन होते. याच पॉईंटपासून खाली असलेल्या विंडो पॉईंटपासून ढवळया घाटाने ट्रेकर्सना कोकणात उतरता येते. महाबळेश्वरपासून पुण्याला जाण्याच्या रस्त्यावर केटस् पॉईंट आहे. इथून कृष्णा नदीवर बांधलेल्या धोम धरणाचा परिसर, डावीकडे घंटेच्या आकाराचा कमळगड आणि समोर दिसणारे पाचगणीचे टेबलटॉप यांचे दर्शन होते. महाबळेश्वरचे पश्चिम म्हणजे लॉडविग पॉईंट. ज्याने १८२४ मध्ये मुंबईच्या उष्ण वातावरणापासून काही दिवस दूर जाता यावे म्हणून महाबळेश्वरचा आणि या पॉईंटचा शोध लावला, त्या जनरल लॉडविगच्या नावावरून या पॉईंटला लॉडविग पॉईंट असे नाव देण्यात आले. इथून पश्चिमेचा प्रतापगड आणि त्या खालचे जावळीच्या खो-याचे निसर्गदृश्य दिसते.

Mahabaleshwar येथील सर्वात जुने ठिकाण म्हणजे क्षेत्र महाबळेश्वर. या मंदिरात कृष्णा, कोयना, सावित्री, गायत्री आणि वेण्णा या पाच नद्यांचा उगम होतो. स्ट्रॉबेरी, रासबेरी, मलबेरी ही महाराष्ट्रात इतर कुठेही न आढळणारी फळे आपल्याला महाबळेश्वरला मिळतात. इथला मधही चांगला असतो.

पाच पर्वतांनी वेढलेले पाचगणीही इथून जवळच आहे. येथील प्रसिध्द टेबलटॉप पठार, ब्रिटीश आणि पारशी पध्दतीची घरे, हिरव्यागार वनश्रीने नटलेला परिसर यामुळे हे ठिकाणही पर्यटकांच्या पसंतीस उतरते. तसेच महाबळेश्वरहून साधारण ३० किलोमीटर अंतरावर असलेले तापोळे हे नव्याने उदयास आलेले, शिवसागर तलावाच्या काठावर असलेले ठिकाण आहे.

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून सुपरिचीत आहे. माणसांचीही इथे सतत वर्दळ असते त्यामुळे राहण्याची-जेवण्याची सोय असलेली भरपूर हॉटेल्स इथे उपलब्ध आहेत. याशिवाय एम.टी.डी.सी. चे बंगलेही आहेत. खिशाला परवडण्याजोग्या दरात आपली इथे सोय होऊ शकते. Location Icon

आंबोली

Amboli ब्रिटीश अधिकारी कर्नल वेस्ट्रूप याने आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसीत केले आहे. सावंतवाडीहून ३५ कि.मी. अंतरावर असलेले हे ठिकाण दोन दिवस निसर्गसान्निध्यात घालवण्याच्या दृष्टीने हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. जून ते ऑक्टोबर दरम्यान इथे जवळजवळ ७५० सेमी. एवढा पाऊस पडतो. यादरम्यान हा पूर्ण परिसर धुक्याने वेढलेला असतो.

सावंतवाडी ते आंबोली घाटात सावंतवाडी संस्थानिकाचा राजवाडा दिसतो. इथे देवीच्या मंदिराजवळ हिरण्यकेशीचे मंदिर व साधूचा आश्रम आहे. हिरण्यकेशी मंदिरामध्ये हिरण्यकेशी नदीचा उगम होतो. आंबोलीची उंची ६६४ मीटर्स आहे. या परिसरामध्ये सदाहरित, समशीतोष्ण कटिबंधीय, रुंदपर्णी अरण्य आणि घनदाट जंगले पसरलेली आहेत. आंबोलीपासून १० किलोमीटरवर नांगरतास हा ७० फूट उंचीचा धबधबा आहे. इथे एम.टी.डी.सी.चे रेस्टहाऊस आहे. त्याच्या मागच्या उद्यानात सांबर, चितळ, भेकर, साळिंदर असे प्राणी ठेवलेले आहेत. याच्या पश्चिमेला महादेवगड, तर उत्तरेला मनोहरगड व मनसंतोषगड हे किल्ले आहेत.

इथले आरक्षण मुंबईच्या एम.टी.डी.सी.च्या ऑफिसमध्ये होते. मुंबई, पुणे, कोल्हापूर व बेळगाव इथून आंबोलीपर्यंत एस.टी.ची सोय उपलब्ध आहे. Location Icon

(3)

सापुतारा

Saputara गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्याद्री पर्वताच्या रांगामध्ये वसलेले हिलस्टेशन म्हणजे ‘सापुतारा’. सापुतारा समुद्रसपाटीपासून ३६०० फूट उंचीवर आहे. शुध्द आणि थंड हवा असल्याने पर्यटक येथे उन्हाळ्यात गर्दी करतात.

नाशिकहून सापुता-याला जातांना वळवळांचा, घाटाचा रस्ता असल्याने मजा येते. सापुतारा सर्कल वरून थोडं चालत गेल्यास गांधी शिखर लागते येथे सनसेट पॉईंट आहे. इथून दिसणारा सूर्यास्त एक अविस्मरणीय अनुभव आहे. सूर्योदय पाहण्यासाठी लोकं आवर्जून सरदार शिखरावर जातात. खो-याच्या मध्यवर्ती भागात टेकड्यांनी वेढलेला ७० फुट खोल तलाव येथील आकर्षण आहे. या तलावात बोटिंग करण्याचा आनंद ही पर्यटकांना घेता येतो. डांग जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या लोकांची जीवनशैली, परंपरा, दाग-दागिने, संगीत-वाद्ये, घरे अशी संस्कृती जपणारे संग्रहालय पाहण्यासारखे आहे. विविध गुलाबाची फुले असलेले रोझ गार्डन तसेच पाय-यांची रचना असलेले स्टेप गार्डन ही पाहण्यासारखे आहे. ऋतभरा विश्वविद्यालयापुढे असलेल्या एको पॉईंच्या पठारावर खेळायला मजा येते. जातांना वाटेत तुम्हाला भरपूर लालचुटूक स्ट्रॉबेरीज खायला मिळतात.

कसे जाल?

नाशिक ते सापुतारा हे अंतर साधारण ७७ कि. मी आहे. नाशिकहून दिंडोरी – वणी – बोरगाव मार्गे २ तासात सापुता-याला पोहोचता येते. तेथे बसेसची सोय आहे तसेच खाजगी वाहनाने ही जाता येते. Location Icon

No comments:

Post a Comment