K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday, 4 April 2021

तुमचे आधार कार्ड पॅनकार्ड सोबत लिंक झालेले आहे का?

        ३० जून पर्यंत Pan Card ला Aadhar Card लिंक केलं नाही तर तुमचे Pan Card बंद पडणार आहे. केंद्र सरकारने आता पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करणे बंधनकारक असल्याचं स्पष्ट केलंय. एवढंच नाही तर आयकर कायद्याच्या नियमानुसार, या काळात जर आधार कार्ड हे पॅन कार्डला लिंक न केल्यास तुम्हाला एक हजार रुपयांपर्यंत दंड द्यावा लागेल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

       सर्व कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी पॅन कार्ड त्यांच्या आधारला लिंक करावं लागणार आहे. तसं जर नाही केल्यास त्या कर्मचाऱ्यांना 20 टक्के अतिरिक्त कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरं जावं लागणार आहे. 

       या आधीही सरकारन पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी अनेकदा डेडलाईन वाढवली होती. गेल्या आठवड्यात लोकसभेत या संबंधी अर्थ विधेयक, 2021 पारित करण्यात आलं आहे. त्यानुसार आता नागरिकांनी आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नाही तर एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. 

स्रोत : एबीपी माझा

       आपणांस कळवण्यात येते की तुमचे आधार तुमच्या पॅनसोबत लिंक झालेले आहे आणि आम्ही ते इनकम टॅक्स च्या पोर्टल सोबत तपासून बघितले आहे.आपण  आपल्या कुटुंबातील सदस्य तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या, जर नसेल झाले तर ३० जून २०२१ च्या आधी  करून घ्या नाहीतर त्यांचे पॅन काम करणे बंद करेल आणि त्याची मुदत संपेल . 

       आधार-पॅन लिंक आहे का तपासण्यासाठी खालील लिंक १ चा वापर करा व 

       आधार-पॅन लिंक नसेल तर लिंक २ चा वापर करून लवकरात लवकर लिंक करून घ्या. 


🛑 लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी :

https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html


🛑 लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी :

https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng


🔗 आधार कार्ड पॅनकार्ड सोबत लिंक झालेले साठीची प्रक्रिया खालीलप्रमाणेे.👇

१)सर्वप्रथम 

https://www.incometaxindiaefiling.gov.in  

👆 या इन्कम टॅक्सच्या इ-पोर्टलवर लॉग इन करावे.

२) या पानाच्या डाव्या बाजूला असलेल्या लिंक आधार या पर्यायावर क्लिक करा

३) या पर्यायावर क्लिक केल्यावर तेथे पॅन कार्डचा नंबर तसेच आधार नंबर, आधार कार्डावर असलेले नाव टाकावे.

४) आधार कार्डावर केवळ जन्माचे वर्ष असल्यास त्या पर्यायाला टीक करावी

५) येथील सर्व माहिती भरल्यानंतर तेथे असलेला कॅप्चा टाकून सबमिट करावे.

६) यानंतर येथेच आपल्याला लिंकिंग झाल्याचा संदेश मिळेल. जर आपले पॅन आणि आधार कार्ड आधीच लिंक झालेले असेल, तर तसा संदेश आपल्याला दिसेल.


🔗 याशिवाय एसएमएस द्वारेही आपण हे लिंकिंग करू शकता. यासाठीची प्रक्रिया खालीलप्रमाणे.👇


१) मेसेज बॉक्समध्ये जाऊन यूआयडीपॅन (स्पेस) <१२ अंकी आधार क्रमांक> (स्पेस) <१० अंकी आधार क्रमांक>

२) UIDPAN<12 digit Aadhaar><10 digit PAN>

(उदाहरणार्थ, आपला आधार क्रमांक 108956743120 असेल आणि तुमचा पॅन ABCD1234F  असा असेल तर UIDAI स्पेस तुमचा पॅन 108956743120 ABCD1234F टाइप करा आणि 567678 किंवा 56161 वर पाठवा.)

३) असे टाइप करावे. हा मेसेज ५६७६७८ अथवा ५६१६१ या क्रमांकावर पाठवावा. यासाठी एनएसडीएल अथवा यूटीआय कोणताही आकार घेणार नाहीत. मात्र मोबाइल ऑपरेटर एसएमएसचे चार्जेस आकारतील.

       तुमचे आधार कार्ड तुमच्या पॅनसोबत लिंक झालेले आहे की नाही ते पहा, तसेच आपल्या कुटुंबातील सदस्य, तसेच आपले मित्र यांचेसुद्धा आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या.

       जर लिंक नसेल तर ३० जून २०२१ पर्यंत करुन घ्या. अंतिम मुदत आहे, त्यानंतर मुदत संपेल . 

स्रोत :व्हॉट्सॲप.




No comments:

Post a Comment