K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 25 May 2021

 🎂वाढदिवस आभार संदेश🎂

१) सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद....

खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो !


"बघायला गेलंतर आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी.

        माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान,थोरा-मोठ्यांनी  दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील  किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो !

असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या !!


पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !!!!

🙏🙏🙏🙏🙏


**********************************


२)कालचा माझा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या असंख्य शुभेच्छांमुळे अविस्मरणीय ठरला. असेच प्रेम करीत रहा. आशिर्वाद देत रहा. तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी ताकद आहे. मी व्यक्तीश: प्रत्येकाला धन्यवाद देण्याच्या पूर्ण प्रयत्न केला परंतु तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर क्षमस्व 🙏🏽


**********************************


३) प्रथम सर्वांचे मनापासून #आभार।।

काल माझ्या #वाढदिवसानिम्मित विविध क्षेत्रातील त्यात #राजकीय, #शैक्षणिक, #सामाजिक, #वडीलधारी आणि मित्र परिवार तुम्ही सर्वांनी दिलेल्या #आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो।।

#शुभेछाचा वर्षाव एव्हडा होता की कोणाचे #वैयक्तिक आभार पण करता आले नाही त्याबद्दल #दिलगिरी व्यक्त करतो।।

कोणी विचारलं काय कमावलं तर मी #अभिमानाने सांगू शकेल की तुमचा सारखे जिवा #भावांचे #मानस कमावली।।।

 #मनापासून आभार।।।।


**********************************


४) आजच्या या धावपळीच्या युगात

                          आपण मला आठवणीने

                जन्मदिवसाच्या    

          शुभेच्छा दिल्या. आपले 

       प्रेम, आपुलकीचे,आशिर्वाद

       असेच सदैव सोबत राहुद्या 

         आपल्या सर्वाचे मनापासून

     

                     #आभार


**********************************


५) 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय ??🚩

#आभार

#आपन_सर्वांनी_माझ्या

#वाढदिवसानिमित्त_शुभेच्छा_दिल्या, #आपले_प्रेम_आणि_आशीर्वाद_दिलेत , #आपणा_सर्वांचे_धन्यवाद...


**********************************


६) 🙏#आभार🙏


 माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन , एसएमएस ,व्हॉट्सअप,फेसबूक ,सोशल मिडीया,प्रिंट मिडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,आशिर्वादही दिले , त्या सर्वांचा मी आभारी आहे.......!!! असेच सर्वांचे प्रेम,सहकार्य,आशिर्वाद,शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।

पुनः एकदा धन्यवाद...


**********************************


७) आपला खुप खुप आभारी आहे

आपण कितीही व्यस्त असलात तरी, मला तुम्ही वेळात वेळ काढून शुभेच्छा संदेश पाठविले.

आनंदलो, सुखावलो!


तुमचे प्रेमाचे बंध असेच घट्ट राहू दया. मैत्री, प्रेम आणि विश्वास असाच कायम राहुद्या ! ज्याने मला माझी नवी वाट शोधताना एकटेपणा जाणवणार नाही.


तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे!🍁🙏🏼


**********************************


८) 🎂💐🎂आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..🎂💐🎂

    मनुष्य जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे,तितकीच किंमत ही वेळेचीही आहे,असे मला वाटते.

 आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून मला फोन,टेक्स्ट मॅसेजेस,व्हाट्सअप,फेसबुक,ई.सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच पर्सनली भेटून दिवसभर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छ्या दिल्या,

त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे..

तसेच बऱ्याच जणांनी मनोमन दिलेल्या शुभेच्छ्यांचाही मी स्वीकार करतो तसेच ईच्छा असतांनाही वेळेअभावी शुभेच्छ्या देऊ न शकलेल्या माझ्या सर्व स्नेहीजणांचाही मी आभारी आहे..

     आपण दिलेल्या ह्या शुभेच्छ्यांच्या जोरावर मी माझ्या पुढील आयुष्यात गरूडझेप घेईल,यात शंका नाही..

आपले हे प्रेमच आयुष्याचा मूळ भाग असलेल्या देव,देश,धर्म अर्थात थ्री डी च्या संकल्पना माझ्या आयुष्यात दृढवत करतील..

     यापुढील आयुष्यपर्वात आपले प्रेम आणि साथ अशीच कायम रहावी,अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो..

  

                       धन्यवाद..!!

                        शुक्रिया..!!

                         थँक यू..!!

                        आभारी..!!

                  आपला ऋणनिर्देशी..


**********************************


९) छत्रपती शिवरायांच्या पावन भुमीत माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे, ज्या महाराष्ट्रात मराठी अस्मितेची ज्योत पेटवत ठेऊन शिवरायांनी पवित्र भगवा ध्वज फडकला, अश्या या महाराष्ट्रात मी जन्म घेतला हि मी माझी पुण्यायीच समजतो. येथे तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळं होण्यासारखे आहे. तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे माझे भाग्यच म्हणावे लागेल. मला या वाढदिवसासाठी तुम्ही नेहमी प्रमाणे शुभेच्छांचा वर्षाव करत माझा जन्मदिवस पुन्हा एकदा अविस्मरणीय बनवला त्यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. आपण दिलेल्या शुभेच्छा रुपी आशिर्वादाचा मी कायम ऋणी राहील......तुमच प्रेम असच राहुद्या....

आपण दिलेल्या शुभेच्छांचा

अगदी मनापासून स्वीकार…

आपले मनःपूर्वक आभार…!

असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा…                             

              मनापासून मी आपला आभारी  आहे


**********************************


१०) माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आठवणीने स्नेहपूर्वक शुभेच्छ्या दिल्यात, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. 🙏🏽 *धन्यवाद*🙏🏽

वाढदिवस हे निव्वळ निमित्त, खरेतर या निमित्ताने अमुल्य क्षण आठवतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि सर्वांत महत्वाचे, जगण्याच्या लढाईला बळ मिळते.....

माझा जन्मदिवस अविस्मरणीय केला, आपले मनःपूर्वक आभार.....

माझ्या आजवरच्या वाटचालीत आपल्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्या आणि स्नेह यांचा बहुमोल वाटा आहे. 

आपल्या शुभेच्छ्या मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढविणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार आहेत. 

यापुढेही आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो! 


**********************************


११) मनापासून आभार...


सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद......


खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्याशिवाय कधी कधी पर्यायच नसतो ! "काल माझा वाढदिवस होता, परंतू तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा, आशिर्वाद व आजवर मिळलेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावानांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी, माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातील मित्र मोठे लहान थोरा-मोठ्यांनी दिलेल्या अमूल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासून स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडून झाल्या असतील किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुःखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो ! असेच स्नेह, प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहु द्या !!


पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद...!


आपलाच


१२) 


१३) 




No comments:

Post a Comment