प्रथमोपचार पेटी
प्रथमोपचार:
प्रथमोपचार म्हणजे एखादा अपघात घडल्यानंतर व आजारावर केलेला प्राथमिक व तत्काळ उपाय योजना होय. एखादी दुर्घटना घडल्यास या दुर्घटना ग्रस्त व्यक्तीला तज्ज्ञांपर्यंत म्हणजेच डॉक्टरांपर्यंत नेण्या पूर्वीपर्यंत नेण्यापूर्वी केलेली खबरदारी म्हणजेच प्रथम उपचार होय.
प्रत्येक व्यक्तीला विशेषतः शिक्षकांना प्रथमोपचार तंत्र माहिती असणे गरजेचे आहे. कारण अपघात घडताच केलेली लहानशी कृती किंवा खबरदारी देखील खूप मोठे वरदान ठरू शकते.
उदा. खेळा प्रसंगी एखाद्या मुलाला अनावधानाने अस्तिभ्रंश झाल्यास व त्यावर प्रथम उपचारान्वये खबरदारी घेतल्यास त्याच्या अस्थिभंगाची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते.
बऱ्याचदा अपघात घडला तर अशा अपघाताला घाबरून जाऊन भीती पोटी खबरदारी किंवा प्रथम उपचार घेणे राहून जाते आणि त्यातूनच अपघाती व्यक्तीची इजा वाढते व किंबहुना परिस्थिती हाताबाहेर ही जाण्याचा धोका निर्माण होतो. मात्र प्रथमोपचारानंतर डॉक्टरांचा सल्ला हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो.
प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रथमोपचार पेटी असणे अत्यावश्यक आहे.
प्रथमोपचार पेटीतील साहित्य:
शाळेतील प्रथमोपचार पेटी मध्ये खालील साहित्य असले अत्यावश्यक असते.
१. छोटी कात्री
२. अँटिसेप्टिक क्रीम किंवा लोशन (सेव्हलॉन,डेटॉल) इत्यादी
३. कापडी पट्टी, बँडेज
४. कॉटन किंवा कापूस
५. आयोडीन
६. थर्मामीटर
७. पेट्रोलियम जेली
८. साबण
९. चिमटा
१०. टॉर्च
११. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे त्या औषधांचे उपयोग, मात्रा किंवा प्रमाण, मुदत, माहिती करून घेणे व नोंद ठेवणे गरजेचे असते
१२. जवळचा डॉक्टर, दवाखाना व अँबुलन्स इत्यादींचे नंबर असलेली डायरी असणे आवश्यक असते.
महत्वाचे:
१. अपघातानंतर घाबरून न जाता धैर्याने प्रथम उपचार करावा.
२. प्रथमोपचारानंतर लागलीच डॉक्टरांकडे अपघातग्रस्ताला घेऊन जावे.
३. काही होत नाही……. मी बघतो……. माझ्यावर विश्वास ठेवा……. अशा व्यतितिरिकीपणा जीवघेणा ठरू शकतो.
४. शासनाचा आरोग्य विभागा मार्फत पुरवली जाणारी 108 ही सुविधा निश्चितच कामी येऊ शकते.
५. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संदर्भात विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन, शिबिरे, कार्यशाळा, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन इत्यादी खबरदारीचे उपाय घेणे गरजेचे असते त्यामुळे विद्यार्थी होणाऱ्या अपघाता पासून वाचण्यासाठी मदत होऊ शकते.
६. लक्षात ठेवा अपघातग्रस्तांना मदत करताना ही माझी जबाबदारी नाही हे माझे काम नाही असे विचार मनात मध्ये आणू नयेत कारण अपघातग्रस्त आपणही होऊ शकतो.
Prevention is better than cure…….
प्रथमोपचार पेटी संदर्भात ठेवावयाचे नोंदी PDF मध्ये Download करण्यासाठी खालील लिंक ला click करा.
Great work give valuable notes Thanks sir
ReplyDeleteप्रथमोपचाराविषयीचे प्रशिक्षण हे तज्ञांकडून घेणे योग्य ठरते. संकटे काही
कोणावर सांगून येत नाहीत, हे लक्षात घेऊन प्रत्येक सुजाण नागरिकाने ‘प्रथमोपचार प्रशिक्षण’ घेऊन उत्तम प्रथमोपचारक बनणे अपेक्षित आहे.
Visit for First Aid Training www.firstaidtrainings.com Contact 9850083500