शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी साठी मूल्यमापन कार्यपध्दती जाहीर करण्याबाबत.
🔖 शासनाचा आजचा जीआर वाचा 👇
🔖 इयत्ता बारावी मूल्यमापन माहिती २०२०-२१
💥 बारावी निकाल संदर्भात आजच्या शासन निर्णयानुसार मला समजलेली मूल्यमापन पद्धती 80+20 पॅटर्न साठी खालील प्रकारे आहे. याच्यात मंडळाच्या माध्यमातून मार्गदर्शक सूचनांनुसार बदल होऊ शकतो व तोच अंतीम असेल.
80+20 पॅटर्न
*80 पैकी*
1) 10 वी 30%= 24 गुण
2) 11 वी 30%= 24 गुण
3) 12 वी लेखी 40% =32 गुण
एकूण =80+20(प्रात्यक्षिक/तोंडी) =100
🎯 इयत्ता दहावी
मराठी 65
हिंदी/ हिंदी-संस्कत 60
इंग्रजी. 45
गणित. *85*
विज्ञान. *72*
समाजशास्त्र. *78*
वरील उदाहरणात इयत्ता दहावीत गणित विज्ञान व समाजशास्त्रात सर्वाधिक गुण आहेत त्यांची एकूण बेरीज 235 होते म्हणजे त्यांची सरासरी *75* एवढी आली.
म्हणजेच इयत्ता दहावी मध्ये मिळालेल्या सर्वाधिक गुण असलेल्या तीन विषयांच्या सरासरी चे गुण इयत्ता बारावीच्या प्रत्येक विषया समोर भरले असता शंभर पैकी 75 म्हणजेच 24 पैकी 18 अशा पद्धतीने आपोआप रुपांतरीत होतील.
🎯 इयत्ता अकरावी
विषय पैकी 100 पैकी 24
1. इंग्रजी 47. 11
2. मराठी. 52. 13
3. हिंदी 61. 15
4. इतिहास. 63. 16
5. भूगोल. 65. 16
6. राज्यशास्त्र. 72. 18
🎯 इयत्ता बारावी
इयत्ता बारावीत जेवढ्या गुणांची लेखी परीक्षा घेतली पहिली परीक्षा 25 गुण, दूसरी परीक्षा 50 गुण व तिसरी परीक्षा 80 गुण *किंवा* कोणतीही एक यापैकी मिळालेले गुण बत्तीस गुणांमध्ये रुपांतरीत होतील.( खालील उदाहरणात 80 गुणांची सराव परीक्षा घेतलेली आहे आपण या ऐवजी 50 गुणांची प्रथम सत्र परीक्षा किंवा 25 गुणांची चाचणी/सराव परीक्षा किंवा कोणत्याही दोन किंवा तिनही परीक्षा घेवू शकतात त्यांचे आपोआप 32 गुणात रुपांतर होइल.)
विषय लेखी पैकी 80 पैकी 32
1. इंग्रजी 52. 21
2. मराठी. 66. 27
3. हिंदी 61 25
4. इतिहास. 59. 24
5. भूगोल. 69 28
6. राज्यशास्त्र. 71. 29
इयत्ता बारावी प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा
*विषय* *पैकी 20*
1. इंग्रजी 16
2. मराठी. 15
3. हिंदी 17
4. इतिहास. 14
5. भूगोल. 16
6. राज्यशास्त्र. 18
*इयत्ता बारावी निकाल*
*विषय*
1. इंग्रजी
18+11+21+16=66
2. मराठी. 18+13+27+15=73
3. हिंदी
18+15+25+17=75
4. इतिहास.
18+16+24+14=72
5. भूगोल.
18+16+28+16=78
6. राज्यशास्त्र.
18+18+29+18=83
447/600= 74.50%
No comments:
Post a Comment