K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

२७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होणार – शिक्षण मंत्री

 

मुंबई : करोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी मागच्यावर्षी लॉकडाउन करण्यात आला. त्यावेळी राज्यातील शाळा देखील बंद झाल्या. आता हळूहळू शाळा उघडण्यास सुरुवात झाली आहे. आधी नववी ते बारावीचे वर्ग सुरु झाले. सरकारने आता पाचवी ते आठवीचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवीचे वर्ग सुरु होतीलराज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री महोदयांनी राज्यातील शाळांमध्ये इ.५ वी ते ८ वीचे वर्ग सुरु करण्यासंदर्भात मंजुरी दिली आहे. येत्या २७ जानेवारीपासून कोरोनासंबंधित सगळी खबरदारी घेऊन हे वर्ग उघडले जातील. विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाहीअशी खात्री पालकांना देते” असे राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.

शिक्षण विभागाच्या बैठकीत वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शाळा सुरु करण्याच्या विषयासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर त्यांच्या मंजुरीने शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरु करताना करोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घ्यावीअशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.

शाळा बंद झाल्यापासून ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. शिशुबालवर्गापासून ते उच्चशिक्षणाचे वर्ग ऑनलाइन होत आहेत. पण या ऑनलाइन शिक्षण पद्धतीला काही मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना आता पूर्वीप्रमाणे शाळेत जाऊन शिकता येईल.

 


No comments:

Post a Comment