K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 14 January 2019

जागतिक भूगोल दिन



भूगोल दिनाचे कर्मकांड!

मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले. शालेय पातळीवर मात्र भूगोल विषयाची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे...
>> विद्याधर अमृते

मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले. शालेय पातळीवर मात्र भूगोल विषयाची अक्षम्य उपेक्षा सुरू आहे...
गेली तीस वर्षे १४ जानेवारी हा भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. विषयानुरूप ‘दिन’ पाळण्याची एक परंपरा महाराष्ट्रात रुजू झाली आहे. मराठी दिन (२७ फेब्रुवारी), विज्ञान दिन (२८ फेब्रुवारी), तर संस्कृत दिन (आषाढस्य प्रथम दिवसे) इत्यादी. त्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचा पण दुर्लक्षित असा विषय म्हणजे भूगोल.
देशाच्या पातळीवरील भूगोल विषय-तज्ज्ञ प्रोफेसर चं. धुं. ऊर्फ सी. डी. देशपांडे यांचा अमृतमहोत्सवी सत्कार १९८६ मध्ये पुणे येथे पं. भीमसेन जोशी यांच्या झाला होता. पुण्यातील पत्रकार, लेखक डॉ. सुरेश गरसोळे यांनी तो घडवून आणला होता. तेव्हापासून मकरसंक्रांतीच्या दिवशी डॉ. देशपांडे यांचा जन्मदिन महाराष्ट्रभर ‘भूगोल दिन’ म्हणून विशेषतः शालेय पातळीवर सुरू आहे. मकरसंक्रांतीला मुलांना शाळेत तिळगूळ वाटला जातो. ऋतुबदल होण्याचा हा दिवस भूगोलात महत्त्वाचा आहे. म्हणून याच दिवशी ‘भूगोल दिन’ साजरा करण्याचे ठरले. त्यानुसार भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे उपक्रम निवडले जातात. व्याख्याने, ध्वनिफिती दाखवून भौगोलिक घटकांचे महत्त्व सांगणे, भौगोलिक सहली, नकाशे व इतर भौगोलिक साहित्याची प्रदर्शने, भौगोलिक विषयावर निबंध लिहिणे, इतर विषयांशी असलेला भूगोलाचा सहसंबंध असे अनेक उपक्रम घेतले जातात. वर्षांतून एकदा तरी या विषयावर लक्ष केंद्रित व्हावे, या उद्देशाने अनेक उपक्रम घेतले जातात.

अलीकडे या विषयाचे महत्त्व सर्वच संबंधितांना कळेनासे झाले आहे. शालेय पातळीवर तर सर्वच संबंधित मंडळी केवळ ४० गुणांचा विषय म्हणून त्याकडे दुर्लक्षित करतात. फक्त इंग्रजी, विज्ञान व गणित हेच जणू शालेय विषय असल्याचे मानून सामाजिक शास्त्रांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात. खरं म्हणजे विकासाच्या कोणत्याही समस्येमध्ये स्थानिक भूगोलाचे ज्ञान महत्त्वाचे असते. गाव आणि पंचक्रोशीचा भूगोलदेखील स्थानिक समस्या सोडविण्यास उपयोगी ठरतो. मात्र शासनाने फारसा विचार न करता ‘जिल्हा - भूगोल’ ही संकल्पनाच सोडून दिली असे इयत्ता तिसरीच्या अभ्यासक्रमावरून लक्षात येते.

एकूणच अभ्यासक्रम, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, विद्यार्थ्यांसाठी कृती-पुस्तिका, शिक्षकांसाठी तयार केलेल्या हस्तपुस्तिका, शिक्षकांचे प्रबोधन, विषयातील नवनवीन संकल्पना व संज्ञा त्याचबरोबर संदर्भ पुस्तके या सर्वच बाबतीत निदान भूगोल विषयाबाबत अत्यंत उदासीनता निर्माण झालेली आहे. ही उदासीन वृत्ती एवढ्या टोकाला गेलेली आढळते की पाठ्यपुस्तके कशीही असोत, जड व बोजड असोत, असंख्य चुकांनी भरलेली असोत, त्यातील नकाशांचे स्वरूप कितीही चुकीचे व क्लिष्ट असो, वर्षानुवर्षे अशी पुस्तके तशीच शिकविली जातात! अध्यापकांनाही विषय-ज्ञान नसते! पदवीला विषय एक व अध्यापन दुसऱ्याच विषयाचे असा प्रकार असल्यावर त्यांना आत्मविश्वास कसा वाटणार? याउलट विषयज्ञान पक्के असेल तर विषय अध्यापनाच्या विविध पद्धती (मॉडेल्स) हाताळता येतील. पण प्रत्यक्षात शिक्षकांचे जाऊ द्या, तर डिटी.एड् किंवा बी.एड्ला जे ‘मेथड-मास्टर्स’ असतात त्यांचाही पदवीला भूगोल विषय नसतो! तरीही असे बहाद्दर अध्यापक ‘भूगोल विषय कसा शिकवावा’ यावर खोट्या आत्मविश्वासाने शिकवित असतात! त्यांच्यासाठी तर ज्ञानरचनावाद ही सध्याची कळीची संकल्पना ‘कोसों दूर है!’ अगदी खरं सांगायचं तर बालभारती व राज्य शिक्षण मंडळामधली तथाकथित तज्ज्ञ लेखकमंडळी पाठ्यपुस्तके तयार करताना केवळ पाट्या टाकण्याचे काम करीत असतील व असंख्य चुका करीत असतील तर एकूणच आपल्या राज्यात भूगोल विषयाचे अध्यापन केवळ ‘दिन’ साजरे करून कसे सुधारणार?

माझ्या उ​द्विग्नतेची प्रमुख कारणे :

- राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एप्रिल २०१३ मध्ये प्रकाशित झालेले १०वीचे भूगोलाचे पाठ्यपुस्तक! हे पुस्तक महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी कसे ‘घातक व भयानक’ आहे हे स्पष्ट करूनही मंडळ त्यावर जून २०१८ पासून कार्यवाही करून बदल करणार आहे!

- इयत्ता तिसरीपासून बारावीपर्यंत एकाही पाठ्यपुस्तकात भारतात पर्जन्यमानाचे वितरण दाखविणारा नकाशा अंतर्भूत केलेला नाही!

- चुका करणारे मंडळ पूर्वीच्या सरकारने बरखास्त केल्यावर विद्यमान सरकारने पुन्हा त्यातील कथित तज्ज्ञांना नवीन समितीवर घेतले आहे.

- विधानसभेत एकूण ४८ आमदार जोशात उभे राहिले व दहावीच्या पुस्तकाचा निषेध करून विविध शिक्षा सुनावीत होते. ते सर्व विरोधी पक्षातील आमदार आता स्वस्थ आहेत कारण आता त्यांचे राज्य आले आहे.

- महाराष्ट्राच्या लोहमार्ग दाखविणाऱ्या नकाशात ‘शिर्डी’ व ‘उस्मानाबाद’ स्थानकांचा पत्ता नाही, तरीही तेथील आमदार काहीच कसे बोलत नाहीत? अशा १०० चुका मी दाखविल्यावरही शालेय शिक्षणखाते गप्प आहे! कशाला करावा साजरा भूगोल दिन? त्यापेक्षा ‘श्राद्ध’ घाला!!
Source- Maharashtra Times

==========================================================


राष्ट्रीय भूगोल दिनाचे महत्त्व अनन्यसाधारण
स्मिता करंदीकर

भूगोल महर्षि डॉ. सी. डी. देशपांडे यांचा 14 जानेवारी हा जन्मदिन राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. गेली 33 वर्षे पुण्यात हा दिवस विविध उपक्रम करून साजरा केला जातो. आजच्या मकर संक्रांतीच्या निमित्ताने या दुर्लक्षित पैलूचा वेध.

भूगोल या शब्दाचा सरळ अर्थ "पृथ्वीचा गोल' असा होतो. "भूगोल' हा शब्द इंग्रजीतील 'Geography' या शब्दासाठी पर्याय वापरला जातो. लॅटिनवरून आलेल्या या शब्दाचा अर्थ "भूवर्णन शास्त्र'. "पृथ्वीवरील भौतिक व मानवी पर्यावरणातील रचना, क्रिया व आंतरक्रिया यांचा अभ्यास म्हणजे भूगोल' असे स्थूलमानाने मानले जाते. भूगोल म्हणजे मानव व पर्यावरण यांचा संबंध शोधणारे शास्त्र अशी देखील भूगोलाची व्याख्या केली जाते.

भूगोलाची विभागणी प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल व प्रादेशिक भूगोल अशी केली जाते. प्राकृतिक भूगोलात भूरुपशास्त्र, हवामानशास्त्र, जैविक भूगोल यांचा समावेश होतो. तसेच यासोबत किनारी प्रदेश, खनिजस्त्रोत आणि नैसर्गिक आपत्ती यांचाही समावेश प्राकृतिक भूगोलात होतो. मानवी भूगोलात ऐतिहासिक भूगोल, सांस्कृतिक व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, आर्थिक व राजकीय भूगोलाचा समावेश होतो. प्रादेशिक भूगोलात पर्यावरणाचे व्यवस्थापन आणि विविध संसाधन स्त्रोतांचे जनन व संवर्धन यांचा समावेश होतो. भूगोलाच्या सखोल आणि सविस्तर अभ्यासात अनेकविध पद्धतींचा समावेश केला जातो. प्रत्यक्ष क्षेत्र निरीक्षण, नकाशे यांना भूगोलात महत्त्वाचे स्थान तर आहेच पण आजकाल दूरसंवेदी कृत्रिम उपग्रहांचा वापर, हवाई छायाचित्रण यांनी भूगोलाच्या निरीक्षण क्षमतेत क्रांतिकारक भर घातली आहे. त्यामुळे बदलत्या युगात भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

भूगोल विषयाचे महत्त्व व व्याप्ती 
भूगोलात संख्याशास्त्राच्या वापरामुळे नेमकेपणा, गणिती अचूकता व निष्कर्ष क्षमता आली यातून भावी घटनांबद्दल अनुमान काढण्याच्या क्षमताही आल्या यामुळे स्वतःचा आशय नसणारा केवळ वर्णनात्मक विषय असे स्वरूप न राहता "भूगोलशास्त्र (Science of Geography) हे स्वरूप भूगोलाला प्राप्त झाले आहे.
भूगोलाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. आपण जगतो ते जग व विश्‍व याचे नेमके स्वरूप, विविध भूप्रदेश व तेथील जीवन, निसर्ग त्यातील संशाधनस्रोत व मानव यांचे परस्पर संबंध इत्यादी महत्त्वाच्या बाबींचे ज्ञान भूगोलामुळे होते. वेगवेगळे देश, लोक व तेथील समस्यांचे ज्ञान होते. पृथ्वीवरील भौतिक, जैविक व मानवी घटकांचे वितरण व त्यांची आंतरक्रिया यांचे स्पष्टीकरण भूगोलातून मिळते. संशोधन व विश्‍लेषणामुळे संसाधनांचे व्यवस्थापन, पर्यावरणीय समस्या (पूर, दुष्काळ) यांचे विश्‍लेषण शक्‍य होते. मानव संसाधनाच्या विकासाशी संबंधित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये भूगोलतज्ज्ञांची भूमिका महत्त्वाची ठरत आहे.

पर्यावरणशास्त्र भूमी उपयोजन व घरांची बांधणी, नगररचना हवामानशास्त्र, पर्यटन विभाग, नकाशाशास्त्र, सागरशास्त्र, हवाई छायाचित्रण, जी.पी.एस. (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम) तंत्रज्ञान, जी.आय.एस. भौगोलिक माहितीप्रणाली (जिओग्राफिक इन्फर्मेशन सिस्टीम) अतिप्रगत तंत्रज्ञान इत्यादी सर्व विषय भूगोल विषयाशी निगडित आहे. भूगोल हा केवळ एक विषय नसून स्पर्धात्मक परीक्षा MPSC व UPSC परीक्षांमधील एक अभ्यासाचा महत्त्वाचा भाग समजला जातो.

पृथ्वीचे सूर्य सन्मुख आणि विन्मुख होणे 
पृथ्वीच्या आसाच्या तिरपेपणामुळे सूर्याचे उत्तर व दक्षिण दिशेकडे होणारे भासमान चलन म्हणजे उत्तरायण व दक्षिणायन होय. पृथ्वीच्या आसाचा तिच्या परिभ्रमण कक्षेच्या प्रतलाशी होणारा कोन 66.5 अंशाचा आहे. याचाच अर्थ पृथ्वीचा अक्ष तिच्या कक्षेच्या संदर्भात 23.5 अंशानी झुकलेला आहे. पृथ्वीच्या तिरप्या आसामुळे पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करताना वर्षातील सहा महिने पृथ्वीचा उत्तर गोलार्ध तर सहा महिने दक्षिण गोलार्ध सूर्यासमोर झुकलेला असतो. पृथ्वीच्या गोलार्धाचे हे सूर्यसन्मुख व विन्मुख होणे किंवा सूर्याच्या भासमान सरकण्याला "अयन' म्हणतात. दरवर्षी 22 डिसेंबरपासून सूर्य मकरवृत्तावरून उत्तरेकडे सरकू लागतो. तो 22 मार्च रोजी विषुववृत्तावर पोचून तसाच उत्तरेकडे सरकत 21 जून रोजी कर्कवृत्तावर पोचतो. या दिवशी सूर्यकिरणे कर्कवृत्तावर लंबरूप पडतात. हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस होय. आपला भारत देश उत्तर गोलार्धातच वसलेला आहे. दिनांक 22 डिसेंबर ते 21 जून या कालावधीत सूर्य रोज थोडा थोडा उत्तरेकडे सरकतो. या कालावधीस "उत्तरायण' असे म्हणतात.

भूगोल दिनाचे महत्त्व 
तारखेनुसार उत्तरायणाची सुरुवात 22 डिसेंबर रोजी असली तरी भारतीय तिथीनुसार ती पौष महिन्यात म्हणजे जानेवारीत होते. तसेच 14 जानेवारी रोजी येणाऱ्या मकरसंक्रांतीतील सूर्य धनू राशीतून मकरराशीत प्रवेश करतो. सूर्याचा एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्याचा काळ साधारणपणे एक महिना असतो. अशा बारा राशीतून बारा महिने त्याचा प्रवास सुरू असतो. 14 जानेवारी रोजी होणाऱ्या मकरसंक्रमणात सूर्याच्या ऊर्जेचे संक्रमण होते. म्हणून हा दिवस भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो.
या दिवशीच्या विविध उपक्रमांत भौगोलिक प्रदर्शनांमध्ये भौगोलिक प्रतिकृती, नकाशे, तक्ते, खडकांचे, मातीचे, खनिजांचे नमुने ठेवले जातात. भौगोलिक सहलींचे आयोजन केले जाते. भौगोलिक हस्तलिखितांचे प्रकाशन केले जाते. भूगोलतज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. शालेय वर्गवाणीवरून भूगोल दिनाचे महत्त्व सांगितले जाते. आयुका, CWPRS, बालभारती इत्यादी नामांकित संस्थांना भेटी दिल्या जातात.

Source- Dailyhunt

1 comment: