K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 15 January 2019

मकर संक्रांती, मकरसंक्रात मराठी माहिती निबंध भाषण





भारत हा सणवारांचा देश म्हणून ओळखला जातो. भारतीय संस्कृतीत जवळपास दर महिन्याला एक सण असतोच. थंडीच्या दिवसात, वर्षाच्या सुरुवातीला येणारा सण म्हणजे मकर संक्रांती. विशेष म्हणजे इतर सणांची तारीख ही पंचांगानुसार बदलती असते मात्र संक्रांत ही दरवर्षी १४ जानेवारी या तारखेलाच येते. मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे अध्यात्मिक महत्त्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्त्वही आहे. या दिवसा आधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवस मोठा होत जातो. तसेच संक्रांतीनंतर ऋतूबदल होण्यास सुरुवात होते. हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते. संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी असे म्हणतात. थंडीत बाजारात जास्त भाज्या उपलब्ध असल्याने सर्व भाज्या खाऊ शकतो. भोगीच्या दिवशी सर्व भाज्या एकत्र करुन भाजी केली जाते. तसेच बाजरी शरीर उष्ण ठेवण्यास आवश्यक असल्याने या दिवशी तीळ लावून बाजरीची भाकरी खाण्याचीही पद्धत आहे
आपल्या मधील खूप कमी लोकांना मकर संक्रांती बदल खूप कमी माहिती आहे. जसे संक्रांती का साजरी केली जाते? आणि ही जानेवारी च्या 14 तारखेलाच का? याच नाव मकर संक्रांतीच का आहे? इत्यादी बाबी सहसा कोणाला माहिती नाहीयेत तर अश्या प्रश्नांना उत्तरे देत च आजचा लेख लिहला गेला आहे.

1.  मकरसंक्रात कसे पडले नाव?
मकर एक रास आहे आणि सूर्य एका राशि मधून दुसऱ्या राशी मध्ये प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांती असे म्हटले जाते. तर मकर संक्रांती दिवशीच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे या सणा ला मकर संक्रांती असे म्हणटले जाते.
याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे फार वर्षापुर्वी संकारसुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार पीडा देई. त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांतीदेवीने संकरासुराला ठार केले आणि लोकांना सुखी केले. इत्यादी.


मकरसंक्रांती या सणाबद्दल दंतकथाही सांगितल्या जातात, त्यापैकी एक म्हणजे STORY OF MAKAR SANKRANTI IN MARATHI. MAKAR SANKRANTI FESTIVAL INFORMATION IN MARATHI

अनादी वर्षांपुर्वी संकरासुर नावाचा एक राक्षस होता. तो लोकांना फार त्रास देत असे, मग त्याला मारण्यासाठी देवीने संक्रांतीचे रूप घेतले. या संक्रांती देवीने संकरासुराचा वध केला आणि लोकांची त्याच्यापासून सुटका केली. याला आणखी एक अख्यायिका आहे. ती म्हणजे, महाभारतामध्ये कुरु वंशाचे संरक्षक महाराज भीष्म बाणांच्या शय्येवर उत्तरायणाची वाट पहात पडून होते. त्यांना इच्छामरणाचे वरदान प्राप्त होते. त्यांनी या शुभ दिवशी म्हणजेच उत्तरायण सुरू होताच प्राणत्याग केल्याची गाथा आहे. हिंदू परंपरेमध्ये उत्तरायणाचा कालावधी दक्षिणायन कालावधी पेक्षा जास्त शुभ मानला जातो.

2.  मकरसंक्रात दर वर्षी एका तारकेलाच कसे काय येत हे.
कदाचित हा हिंदु संस्कृती मधील एकमेव असा सण असेल जो एकाच तारखेला येतो. याच कारण हा सण सोलर (सूर्या च्या स्थान वर) कॅलेंडर फॉलो करतो. बाकी सर्व सण हे चंद्र कॅलेंडर (चंद्रमा च्या स्थना वर) आधारलेले असतात.सोलर सायकल ही दर 8 वर्षांनी एकदा बदलते, त्या वेळी मात्र हा सण 15 तारखेला साजरा केला जातो.
मागच्या वर्षी म्हणजे 2016 ला मकर संक्रांती ही 15 तारखेला साजरी करण्यात आली होती. हा सण दर 50 वर्षी नी एक तारीख पुढे जाते. जसे स्वामी विवेकानंद यांचा जन्म 12 जानेवारी ला झाला तेव्हा मकर संक्रांतीच होती. या हिशोबाने 2050 ला हा सण 15 जानेवारीला साजरा होईल.
3. मकरसंक्रात _ तीळ आणि गूळ यांचं महत्व.
मकर संक्रांतीला तीळ आणि गूळ यांचे लाडू बनवायची परंपरा आहे. या माघे, भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून त्यात तीळ आणि गूळ यांचा गोडवा भरायचा अशी मान्यता आहे. जर याला वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघायचे झाल्यास गूळ शरीराला थंडीमध्ये उष्णता देईल आणि तीळा मुळे शरीरात आवश्यक प्रमाणात स्नीग्धता राहील असे आहे.

4. मकरसंक्रात नाव अनेक पण सण मात्र एकच
संक्रांति ही काय फक्त भारतातच साजरी नाही होत. ही आशिया खंडातील अनेक ठिकाणी साजरी केली जाते. याला नेपाळ मध्ये माघी किंवा माघी संक्राती, थायलंड मध्ये सोंग्क्रान, लाओस मध्ये पी मा लाओ आणि म्यानमार मध्ये थिंगयान असे म्हंटले जाते. भारतात देखील याला लोहरी, मकर संक्रांती, पोंगल इत्यादी नावे आहेत. पण हा सण मात्र एकच आहे.
5 .  मकरसंक्रात महाराष्ट्रातील संक्रांत
महाराष्ट्रात हा सण तीन दिवस साजरा करण्यात येतो.या ३ दिवसामध्ये भोगी (सामान्यतः १३ जाने), संक्रांत ( १४ जाने) व किंक्रांत ( १५ जाने) अशी नावे देण्यात आली आहेत. संक्रांतीस सर्व जवळच्या लोकांना आणि मित्रमंडळींना तिळगुळ आणि स्त्रियांना वाण वाटून ‘तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला’ असे सांगून प्रेम आणि चांगली भावना वाढीस लागण्यास शुभकामना दिली जाते. विवाहित स्त्रिया या दिवशी एकमेकांना हळदी-कुंकू लावतात.इंग्रजी कॅलेण्डर महिन्यानुसार हा दिवस साधारणपणे १४ जानेवारी रोजी येतो.तरी दर ७० वर्षांनी ही तारीख एक एक दिवस पुढे जात असते.
भारतीय संस्कृती ही कृषी प्रधान संस्कृती आहे. या दिवसांमध्ये आपल्या शेतांत आणि मळ्यांमध्ये उगवलेल्या धान्याचे वाण स्त्रिया एकमेकांना देतात. बोरे,तीळ,हरभरे, ऊस,गव्हाची ओंबी अशा गोष्टी सुगडात भरून त्या देवाला अर्पण केले जातात.
6. मकरसंक्रात पतंगा चे महत्व
भारतात गुजरात आणि राजेस्थान या ठिकाणी हा सण पतंगाचा सण म्हणून ओळखले जाते. पतंग सकाळी सकाळी उठून उडवल्याने शरीराला ऊन लागून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन D मिळते. याने थंड हवे पासून होणाऱ्या समस्या पासून दूर राहायला मदत मिळते.
7.  मकरसंक्रात दिवस आणि रात्र एक समान
या दिवसा अगोदर रात्र मोठी असते दिवस लहान असतो. मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात. या नंतर रात्री लहान दिवास मोठा होत जातो. या दिवसा पासून थंडी कमी होऊन गर्मी चे दिवस यायला लागतात.


मकरसंक्रांतीच्या निमित्ताने अनेक यात्रा आयोजित केल्या जातात, यात सर्वात प्रमुख म्हणजे प्रसिद्ध कुंभमेळा. हा कुंभमेळा दर बारा वर्षांनी नाशिक, हरिद्वार, प्रयाग, उज्जैन अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित केला जातो. याशिवाय कोलकाता शहरा जवळ गंगा नदी जेथे बंगालच्या उपसागरास मिळते त्या गंगासागर नावाच्या ठिकाणी गासागर यात्रा आयोजित करण्यात येत असते. संक्रांतीच्या दिवशी केले जाणारे तीर्थ स्नान आणि दान पुष्यदायी मानले आहे. या दिवशी प्रयाग, गंगासागर इत्यादी ठिकाणी भक्तांचे प्रचंड मेळे भरतात. मकरसंक्रांतीस अनेक यात्रांचे आयोजन देखील केले जाते. यामध्ये सर्वात प्रमुख म्हणजे प्रख्यात कुंभमेळा जो दर बारा वर्षांनी हरिद्वार, प्रयाग, उज्जैन आणि नाशिक अशा चार जागी चक्राकार पद्धतीने आयोजित होतो. याबरोबरच गंगासागर येथे, कोलकाता शहराजवळ गंगा नदी, ज्याठिकाणी बंगालच्या उपसागरास मिळते, तेथे गंगासागर यात्रा आयोजित केली जाते. केरळच्या शबरीमला येथे मकरज्योतीचे दर्शन घेण्यास या दिवशी अनेक भाविकांची गर्दी होते. पूर्व भारतातील संक्रांत: संक्रात संपुर्ण दक्षिण पूर्व आशियामध्ये थोड्या फार बदलाने साजरी केली जाते.
मकर संक्रांतीला भारतातील विविध भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो.
Makar Sankranti festival Information in Marathi
काही राज्यांमध्ये या नावाने ओळखला जातो मकर संक्रांती…
पंजाब – लोहडी किंवा लोहळी हिमाचल प्रदेश – लोहडी किंवा लोहळी, बिहार – संक्रान्ति, आसाम – भोगाली बिहु, पश्‍चिम बंगाल – मकर संक्रान्ति, ओडिशा – मकर संक्रान्ति, गुजरात व राजस्थान – उतरायण (पतंगनो तहेवार) पतंगांचा सण, कर्नाटक, आंध्र प्रदेश – संक्रांति, तमिळनाडू – पोंगल शबरीमाला मंदिरात मकर वल्लाकु उत्सव साजरा केला जातो,
भारताचे अन्य भागात मकर संक्रान्ति
थारू लोक – माघी, थायलंड – सोंग्क्रान. लाओस – पि मा लाओ

म्यानमार – थिंगयान
अश्या या नाविन्य पूर्ण आणि वैशिष्ट्य पूर्ण मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा.. तीळ गूळ घ्या आणि गोड गोड बोला…. 

No comments:

Post a Comment