K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

शालेय तक्रार पेटी

शालेय तक्रार पेटी


               शाळेमध्ये तक्रार पेटीची (School Complaint Box) आवश्यकता का आहे? काय शाळेमधील तक्रारपेटी ची रचना कशी असावी? उद्देश व शालेय तक्रार पेटीवर कार्यवाही काय करावी? शालेय तक्रार पेटीची नोंदवही कशी असावी? या सर्व प्रश्नांची उकल करण्याचा हा एक प्रयत्न:

शालेय तक्रार पेटी:
शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने दिनांक 5 मे 2017 रोजी एक परिपत्रक काढण्यात आले. या परिपत्रकानुसार राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक उच्च प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी आदेशित करण्यात आले आहे.
शाळांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून राज्यातील शाळांमध्ये तक्रार पेठी बसवण्याची आवश्यकता निर्माण झाल्याचे या परिपत्रकामध्ये नमूद करत करत, काही शाळांमध्ये तक्रारपेटी बसविण्याची कार्यवाही झाली आहे तथापि राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची कार्यवाही होणे आवश्यक आहे व ही आवश्यक ती कार्यवाही पुढील प्रमाणे असण्यात यावी असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

शाळा व्यवस्थापनाने किंवा शाळा प्रशासनाने करावयाची कार्यवाही:
प्रत्येक प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये तक्रारपेटी शाळेच्या दर्शनी भागात किंवा प्रवेशद्वारानजीक संबंधीतांच्या नजरेत येईल अशा रितीने लावण्यात यावी.
तक्रार पेटी पुरेशा मापाची व सुरक्षित असावी त्यावर तक्रार पेटी असा उल्लेख असावा.

तक्रार पेटी प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी तक्रार तक्रार पेटी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात यावी. ज्या शाळेस पोलीस पाटील उपलब्ध आहे, त्या ठिकाणी पोलीस पाटील मदत तक्रार पेटी  उघडताना उपलब्ध करून घेण्यात यावी. मात्र ज्या ठिकाणी पोलीस पाटील किंवा पोलीस प्रतिनिधी यांच्या सेवा उपलब्ध करणे प्रत्यक्ष शक्य नाही अशा ठिकाणी प्रत्येक वेळी तक्रार पेटी उघडताना पोलीस प्रतिनिधी उपस्थित असण्याबाबत आग्रह धरण्यात येऊ नये. अशा परिस्थितीत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक / प्राचार्य, पालक प्रतिनिधी किंवा विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष तक्रार पेटी उघडण्यात यावी.
गंभीर किंवा संवेदनशील स्वरूपात तक्रारींबाबत पोलीस यंत्रणेचे सहाय्यक आवश्यक असल्यास तात्काळ घेण्यात यावे.
तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्यासाठी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही किंवा उपाययोजना करण्यात यावी. ज्या तक्रारी शाळा व्यवस्थापन किंवा प्रशासन स्तरावर निकाली काढणे शक्‍य आहे त्याबाबत तात्काळ शाळा व्यवस्थापन स्तरावर कार्यवाही करावी. ज्या तक्रारींसंदर्भात क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर किंवा शासन स्तरावर कार्यवाही किंवा मार्गदर्शन अपेक्षित असेल तेथे योग्य त्या स्तरावर तक्रारीच्या प्रतिसह संदर्भ करण्यात यावा.
तक्रारकर्त्याचे नाव गुप्त राहील व तक्रारीच्या अनुषंगाने त्यांना कोणताही त्रास होणार नाही याबाबतची योग्य ती दक्षता घेण्यात यावी.
संबंधित शाळेतील महिला शिक्षक किंवा विद्यार्थिनी यांच्या लैंगिक छळाबाबतच्या तक्रारी महिला तक्रार निवारण समिती / विशाखा समिती समोर ठेवण्यात याव्यात. तसेच शाळेतील विद्यार्थी / विद्यार्थिनीवर अत्याचारा बाबतच्या तक्रारी शाळा व्यवस्थापन समिती समोर ठेवण्यात याव्यात महिला तक्रार निवारण समिती किंवा शाळा व्यवस्थापन समितीने या विषयाची तक्रार सर्वात प्रथम विचारात घेऊन त्याबाबत योग्य ते निर्देश द्यावेत. समितीचे निर्देश किंवा निर्णय शाळा प्रशासनासमोर योग्य त्या कार्यवाहीसाठी ठेवण्यात यावेत.

क्षेत्रीय यंत्रणेची परिवेक्षक जवाबदारी:
या परिपत्रकातील निर्देशानुसार आवश्यक कार्यवाही होण्याबाबत पर्यवेक्षकीय नियंत्रण आयुक्त (शिक्षण) यांचे राहील. 

शिक्षण संचालक (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक) यांनी राज्यातील, सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याबाबत कार्यवाहीचा आढावा घेऊन सर्व विभागीय शिक्षण संचालकांना त्यांच्याकडील एकत्रित माहिती प्राप्त करून घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. 

विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शाळांमध्ये तक्रारपेटी बसवण्याच्या कार्यवाहीचा आढावा घेऊन शिक्षण अधिकारी यांच्याकडून माहिती प्राप्त करून विभागीय स्तरावरील माहिती शिक्षक संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांना तसेच शासनाला सादर करावा. 

शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक माध्यमिक यांनी संबंधित जिल्ह्यातील, शाळांमध्ये तक्रार पेटी बसविण्याची कार्यवाही बाबत शाळांमध्ये सातत्याने पाठपुरावा करावा आणि त्या जिल्ह्यातील एकत्रित माहिती, संबंधित विभागाचे शिक्षण संचालक यांना सादर करावी. 

१. शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक २. विभागीय शिक्षण संचालक व ३. शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक यांनी त्यांच्याकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी बाबत योग्य ती कार्यवाही करून तक्रार निवारण करणे आवश्यक राहील. 
वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.

त्या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये तक्रारपेटी बसविणे, प्राप्त झालेल्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करणे, समस्या गंभीर होण्याअगोदर  दखल घेऊन सोडविणे अत्यंत गरजेचे आहे.

शाळेमध्ये तक्रारपेटी बसविल्यानंतर त्यामध्ये प्राप्त होणाऱ्या तक्रारी किंवा सूचनांवर कार्यवाही करण्यासाठी खालील नमुना किंव्हा नोंदनमुना कार्यावाहीसाठी मदतगार ठरू शकतो. या नमुन्यानुसार प्राप्त झालेल्या प्रत्येक तक्रारीची नोंद ठेवून त्यावर होणारी कार्यवाही व परिणाम यांची नोंद ठेवणे आवश्यक आहे.  यावर शाळा प्रमुखाचे म्हणजे प्राचार्य किंवा मुख्याध्यापकांचे संनियंत्रण असणे आवश्यक आहे.

वरील नोंद वही नमुना Pdf मिळवण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा:

तक्रारपेटी बाबतीतचा शासन निर्णय 



2 comments:

  1. सेवा पुस्तक मिळत नाही.मागील१० वर्षे पासूनHM, EO.कडे,व २ वर्षे पासून Dypt.Director कडे निवेदने देत आहे. पण काही फायदा नाही. कोठे न्याय मिळेल.

    ReplyDelete
  2. सेवा पुस्तक मिळत नाही.मागील१० वर्षे पासूनHM, EO.कडे,व २ वर्षे पासून Dypt.Director कडे निवेदने देत आहे. तरीपण काही फायदा नाही. कोठे न्याय मिळेल.

    ReplyDelete