K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...
Showing posts with label शालेय पोस्ट्स. Show all posts
Showing posts with label शालेय पोस्ट्स. Show all posts

Saturday, 15 December 2018

परिपाठाचे सुत्रसंचलन

परिपाठाचे सुत्रसंचलन

सुस्वागतम् सुस्वागतम् सुस्वागतम्....


फुल फुलत आहे, कळी उमलत आहे. अशा या आनंदाच्या वातावरणात आमच्या परिपाठाला सुरवात होत आहे...
सागराला साथ असते पाण्याची, बागेला शोभा असते फुलांची
तसेच, आमच्या परिपाठाला साथ असते काही विद्यार्थ्याची...
"ढगातील  पावसाची पडते, धरणीशी गाठ...
अशा या सुंदर समयी,
सादर करत आहोत आम्ही परिपाठ"

     माझे नाव ........ मी या परिपाठाचे सुत्रसंचलन करत आहे.

 "संस्कार शाळा आहे ज्ञानाची लाट
इथेच मिळते यशाच्या शिखराची वाट,
       अशा या सुंदर शाळेत नेहमी सादर होतो परिपाठ...

    म्हणून आज आम्ही इयत्ता......वी मुले/मुली परिपाठ सादर करणार आहोत तरी तुम्ही आमचा परिपाठ शांत चित्तेने एकून घ्यावा हि नम्र विनंती.
=================================
    राष्ट्रगीत   
           सावधान, विश्राम
सर्व लोकांच्या अंतःकरणाचा स्वामी
  आणि भारताचा भाग्यविधाता..
  अशा राष्ट्रगीताची गाऊ गाथा..
  गाऊनी राष्ट्रगीता,गाऊनी राष्ट्रगीता...!!
    सावधान एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे शुरू कर...

=================================

      राष्ट्रवंदना  
  राष्ट्र माझी माता राष्ट्र माझा पिता
  राष्ट्र गुरू आणि राष्ट्र माझा दाता
        या राष्ट्रा करूया वंदन
    तोडूनी साऱ्या धर्मांचे बंधन

  एकसाथ राष्ट्रवंदना शुरू करेंगे शुरू कर
=================================
                                   प्रतिज्ञा  

     देशा विषयी प्रेम मोठ्यां विषयी आदर   
 करून घेऊ बंधुभाव व कर्तव्याची जान
    उजळू सर्वांची प्रज्ञा...
      घेऊन प्रतिज्ञा,घेऊन प्रतिज्ञा...!!
      एकसाथ प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर...
=================================

    संविधान  
 लोकशाही गणराज्याचे गाऊ गान
   घेऊनी भारताचे संविधान
   घेऊनी भारताचे संविधान
    एकसाथ संविधान शुरू करेंगे शुरू कर...
=================================
     सुविचार  
A)  सुविचार म्हणजे सुंदर विचार असाच एक नवीन सुविचार सांगत आहे ........
   सांगून सर्वांना थोरांचे विचार...
  रुजवू विचारातून संस्कार...
  सांगून सुविचार,सांगून सुविचार...!!

 सुविचार सांगण्यासाठी येत आहे-------
B)  माणुसकी खूप कमी होत चाललीय. ती फक्त जपायला शिका. इतिहास सांगतो काल सुख होत. विज्ञान सांगते उद्या सुख असेल. पण माणुसकी सांगते, जर मनात चांगल्या विचारांची साठवण असेल तर दररोज सुख असते. आणि म्हणून आजचा सुविचार घेऊन येत आहे.......


C)   कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती करा.वाटेत खूप ससे आडवे येतील बस त्यांना हरवायची हिम्मत ठेवा.आणि जर तुमची श्रीमंती तुम्हाला मोजायची असेल तर नोटा मोजू नका चुकून कधी डोळ्यातून दोन अश्रू आले तर ते पुसायला कितीजण येतात ते मोजा म्हणून कासवाच्या गतीनं का होईना थोडी थोडी प्रगती करा आणि प्रगती करण्यासाठी आपल्याकडं चांगले व सुंदर आचार विचार असणे गरजेचे आहे.म्हणून आजचा चांगला विचार म्हणजे सुविचार सांगण्यासाठी येत आहे......
=================================

    आजचे पंचांग    
A) आपल्याला वार , दिनांक , शके यांची माहिती असणे अवश्यक असते, म्हणुन आजचे पंचांग सांगत आहे.........
=================================

    आजचे दिनविशेष  
A) नवीन दिवस नव्या उम्मेदी जरा शोधूया.नवीन वाटा प्रकाशाकडे वाटचाल अन अंधाराच्या थोपवू लाटा.खरच येणारा दिवस कालच्या पेक्षा अधिक आनंदाने,उत्साहाने आणि चांगल्या दृष्टीकोण जगायचा असतो आजचा दिवस हि असाच आहे.म्हणून आजच्या दिवसाचे महत्व दिनविशेषातून सांगण्यासाठी दिनविशेष घेऊन येत आहे......

B)    कधी सोनेरी, कधी काळा दिवस असतो विशेष 
घेऊन येत आहे...... आजचा दिनविशेष...

C) आयुष्यात उगवणारा प्रत्येक दिवस हा नवी उमेद घेऊन  येत असतो.आणि या प्रत्येक दिवसाचे विशेष महत्व आपल्याला माहित असणे गरजेचे असते. म्हणून आजच्या दिवसाचे विशेष महत्व सांगण्यासाठी आजचे दिनविशेष घेऊन येत आहे........
=================================
   आजच्या बातम्या  
A)  आपल्या शिक्षकांची  आणि आपल्या पालकांची आपल्याकडून खूप मोठी स्वप्ने असतात. आणि ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आजच्या आधुनिक युगातील घटना आपल्याला माहित पाहिजे म्हणून आजचे बातमी पत्र घेऊन येत आहे....

B)  मित्रहो असा प्रश्न पडत नाही का? कि बातम्यांना इंग्रजीमध्ये NEW,S असे का म्हणतात? कारण N-म्हणजे नॉर्थ,E-म्हणजे ईस्ट,W-म्हणजे वेस्ट व S-म्हणजे साऊथ अशा जगातील चार दिशातील कानाकोपऱ्यातील घडामोडी आपल्याला कळतात म्हणून त्याला NEW,S असे म्हणतात. म्हणून आजचे न्युज म्हणजे बातमीपत्र घेऊन येत आहे........

C) आपल्याला देशातील घडामोडिंची माहिती घेणे आवश्यक असते म्हणुन वार्तापत्र सांगत आहे ..............


D)  काय घडले जगात काय घडले देशात...
         जाणून घेऊया आजच्या बातम्यात...!!

बातम्या सांगण्यासाठी येत आहे -------
=================================
    बोधकथा  
A) सर्व काही मनासारखं होत नाही,पण मनासारखं झालेलं विसरू नका. आणि अशा या जीवनात वेळोवेळी कठीण प्रसंग हे येणारच पण कठीण प्रसंगी आपल्याला योग्य बोध घेऊन यशाचे शिखर गाठायचे आहे. म्हणून बोध देणारी बोधकथा घेऊन येत आहे......

B) आपल्याला ज्यातून बोध होतो अशी एक बोधपर कथा सांगत आहे........

C) खूप काही शिकून जाते जाता जाता म्हणून रोज ऐकायची असते एक छोटीशी बोधकथा म्हणून आजची बोध कथा सांगण्यासाठी येत आहे......


D)   संस्काराशी नाते जडे...      
        बोधकथेतून घेऊ धडे...
 बोधकथा सांगण्यासाठी येत आहे-----
=================================
  सामान्य ज्ञान 

A) उन्हात चालण्यासाठी सावलीची गरज असते, अंधारात चालण्यासाठी उजेड हवा असतो. तसेच ज्ञानरूपी जीवन जगण्या साठी ज्ञानाची गरज असते , म्हणून सामान्य ज्ञान घेत आहे......

B)   प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा असेच का अन तसेच का शिकणे कधी संपत नाही होऊ दे लाख चूका खरंच माणूस हा आयुष्यभर विद्यार्थीच असतो.अन आयुष्यभर विद्यार्थी म्हटल्यावर प्रश्न हे पडणारच तसेच आम्हाला हि काही प्रश्न पडले आहेत बघूया तुम्हाला त्याची उत्तरे येतात का?म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे......

 C)  सागरा समान विस्तृत ज्ञाना
     थेंब थेंब मी वेचून घेतो
  सामान्य ज्ञानातून मिञा
 मोती होवून चमकून जातो
 सामान्य ज्ञान सांगण्यासाठी
                येत आहे ---------

D)   आपल्याला खूप काही प्रश्न पडत असतात. काही सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, शैक्षणिक वगैरे... आम्हालाही काही प्रश्न पडलेले आहेत. बघू तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे येतात का म्हणून आजचे प्रश्न घेऊन येत आहे...
=================================
एकसाथ निचे बैठेंगे निचे बैठ...

                                     प्रार्थना गीत  
     साने गुरुजींनी दिले सर्वांना ज्ञान
         त्यांचे रचित गाऊया गान
         त्यांचे रचित गाऊया गान
      एकसाथ ....... शुरू करेंगे शुरू कर....
=================================
     स्फूर्ती गीत  
          राह पे चलते वक्त 
         मुसिबते तो आयेगी
        स्फुर्तीगीतोंसे वों कंही
         दूर भाग जायेगी
  एकसाथ स्फुर्तीगीत शुरू करेंगे शुरू कर....
=================================
      कोडे   
A)  छोट्या या आयुष्यात खूप काही हवं असतं पण पाहिजे तेच मिळत नसत.असंख्य चांदण्यांनी भरूनही आपलं आभाळ मात्र रिकामं असतं.हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी माणसाला मिळत नसतात.पण नमिळणाऱ्या गोष्टीच का माणसाला हव्या असतात? म्हणून म्हणतात जीवन एक खेळ नव्हे,फुकट मिळालेला वेळ नव्हे जीवन एक कोडे आहे.सोडवला तितके थोडे आहे.म्हणून जीवनासारखे एक मजेदार कोडे घेऊन येत आहे....

B)  आपलं आयुष्य हे  कोड्याप्रमाणेच असतं. थोडं कठीण,थोडं सोप तर थोडं मजेदार... आजचे कोडे हे आयुष्यासारखेच आहे. थोडे कठीण, थोडं सोप तर थोडं मजेदार म्हणून आजचे कोडे घेऊन येत आहे ......
=================================
    इंग्रजी संवाद  
A)    आपल्याला इतर विषयाबरोबरच इंग्रजी विषयही सोपा वाटावा. म्हणून इंग्रजी विषयाचा पाया भक्कम होण्यासाठी आपल्याला इंग्रजी शब्दाबरोबर आपल्याला छोटे छोटे संवाद सादर करता आले पाहिजेत. म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे...

B)     इंग्रजी भाषा हि आंतरराष्ट्रीय भाषा आहे.त्याचा पाया मजबूत होण्यासाठी शब्दार्था बरोबर छोटे छोटे संवाद येणे गरजेचे आहे म्हणून आजचा इंग्रजी संवाद घेऊन येत आहे....
=================================
   स्वच्छतेची प्रतिज्ञा  
        तन-मनास देण्यास आज्ञा
     घेऊया सारे स्वच्छतेची प्रतिज्ञा...
       एकसाथ स्वच्छतेची प्रतिज्ञा शुरू करेंगे शुरू कर
=================================
      पसायदान 
  समाज उद्धरण्या मागीतले दान
         ज्ञानेश्वरांचे पसायदान...
  एकसाथ पसायदान शुरू करेंगे शुरू कर...
=================================
                                     समारोप  

A)  शेवटी जाता जाता एवढंच म्हणेन


 "जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका...
   येईल तारावयास कोणी
   वाट कुणाची पाहू नका..,
  यश तुमच्याजवळ आहे.
जिंकल्याशिवाय राहू नका...!!

B) शेवटी जात जात एवढंच म्हणेन

"किती क्षणाच हे आयुष्य असतं...
आज असतं तर उद्या नसतं...
म्हणून ते हसत हसत जगायचं असतं ...
कारण येणारे दिवस येत असतात, 
जाणारे दिवस जात असतात,
येणाऱ्यांना घडवायच असतं, 
जाणाऱ्यांना जपायच असतं,
अन आयुष्याच गणित सोडवायच असतं, 
म्हणूनच कधीतरी कोणासाठी तरी जगायच असतं..!!

C) प्रत्येक माहिती नवीन मुलगा सांगेन व त्याने त्याचे सांगितलेले काम केले की सुत्रसंचलन करणारा विद्यार्थी त्याचे नाव घेऊन धन्यवाद करीन.
=================================

Friday, 14 December 2018

संगीतमय परिपाठ

⏮ संगीतमय परिपाठ Mp3

 ━━═•●◆●★◆★●◆●•═━━
 ▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

          ''के.पी.बोरसे'' या माझ्या ब्लॉगवरील संगीतमय परिपाठ फोल्डर मधील गाणी ही माझी स्वतःची नसुन संगीत क्षेत्रातील विविध दिग्गज  मान्यवरांची आहेत. त्या सर्व गीतकार, संगीतकार, गायक, निर्माते, दिग्दर्शक, रेकॉर्डिंग कंपनी, ज्ञात-अज्ञात कलाकारांना शतशः प्रणाम..!!

            ही सर्व गीते मी फक्त संग्रहीत केली असुन माझ्या शिक्षक बांधवांना व माझ्या सर्व चिमुकल्या विद्यार्थी मित्रांसाठी माझ्या ब्लॉगवर प्रसारित करीत आहे. यातुन वरील मान्यवरांच्या व इतर कोणाच्याही भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही.   

1) राष्ट्रगीत  
अ.क्र.  CLICK HEAR  
01राष्ट्रगीत बिनासंगीत Download
 02राष्ट्रगीत म्युझिक सह  Download
 03राष्ट्रगीत म्युझिक सह 2  Download

   2] प्रतिज्ञा           
अ.क्र.  CLICK HEAR  
01 मराठी  Download
 02  हिंदी  Download
03 ENGLISH  Download

  3] वंदे मातरम 
 अ.क्र.   CLICK HEAR  
01 वंदे मातरम  Download

  4]  संविधान गीत           
 अ.क्र.   CLICK HEAR  
01 संविधान गीत  Download 

    5]  पसायदान          
 अ.क्र.   CLICK HEAR  
01 पसायदान
  Download

6]   राष्ट्रवंदना       
 अ.क्र.   CLICK HEAR  
 01राष्ट्रवंदना  Download



    'देशभक्ती गीत' साठी इथे CLICK करा....  


Thursday, 13 December 2018

सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदी

सेवापुस्तकातील नोंदी

         सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.


१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी


२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.


३. वैद्यकिय दाखल्याची नोंद.


४. जात पडताळणी बाबदची नोंद.


५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.


६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.


७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.


८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.


९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार)


१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.


११. विहीत संगणक आर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.


१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.


१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.


१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.


१५. नाव बदनाची नोंद.


१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.


१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.


१८. सेवेत कायम केल्याची नोंद.


१९. स्वग्राम घोषपत्राची नोंद.


२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.


२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.


२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.


२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.


२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.


२५. रजा प्रवास सवलत नोंद.


२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.


२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.


२८. सेवा पडताळणीची नोंद.


२९. जनगणना रजा नोंद.


३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.


३१) हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद

शालेय साहित्य खरेदी यादी

■ शाळा साहित्य खरेदीसाठी मार्गदर्शक यादी ■

------------------------------------------------
१📕 खडू रंगीत व पांढरे
२📗कागद कोरे रेघी, बदामी, ड्रॉइंग
३📘 पेन साधा, स्केच वगैरे,
४📙 गोंद आणि फेव्हिकॉल
५📓 पेन्सिल काळी, रंगीत वगैरे
६📔 कलरबॉक्स वॉटर कलर, अॉईल पेंट वगैरे
७📒 कार्बन
८📕 फाईल कव्हर
९📗 कोरे रजिस्टर इतिवृत्त लिहिणे, सुचना वही साठी
१०📘 वह्या टाचण, नोंदी साठी
११📙 विविध प्रकारच्या अॉडीयो आणि व्हिडिओ कॅसेट्स
१२📓 टाचण्या
१३📒 स्टेपलर
१४📕 स्टेपलर पिन
१५📗 टेबलक्लॉथ
१६📔 विविध फोटो
१७📘 ब्लॅकबोर्ड पेंट
१८📙 टॅग
१९📓 गुंडाळी फडे
२०📒 विविध प्रकारचे शिक्के
२१📕 शाईचे पॅड
२२📗 पॅड इंक
२३📔 शोकेस
२४📘 कचरापेटी
२५📙 कुलूप
२६📓 पाणी पिण्याचे ग्लास
२७📒 पाण्याचे पिंप
२८📕 शाळा, अॉफीस, वर्गाच्या पाट्या किंवा बोर्ड
२९📗 बागकाम किंवा शोभेसाठी कुंड्या
३०📔 कात्री
३१📘 विविध माहिती पत्रकासाठी लागणारे बोर्ड
३२📙 बॉक्सटाईप रोटो मशीन
३३📓 कपबश्या
३४📒 स्टोव्ह
३५📕 वजनकाटा
३६📗 राष्ट्रध्वज
३७📔 दोन वर्तमानपत्र
३८📘 शैक्षणिक मासिके, वाचनालय पुस्तके
३९📙 नकाशा स्टॅंड
४०📓 लाईट, बल्ब, ट्युब, विजेचे साहीत्य
४१📒 पाण्याचे जग
४२📕 पातेले, गंज, भांडी, ग्लास वगैरे
४३📗 कार्यानुभव, उद्योग, कलासंगीत साहित्य
४४📘 प्रथमोपचार पेटी
४५📙 बादली
४६📓 टॉवेल
४७📒 भिंतीवरील घड्याळ
४८📕 घंटा
४९📔 दंतमंजन
५०📘 नेलकटर
५१📙 आरसा
५२📓 कंगवा
५३📗 कॅमेरा
५४📒 फोटो रोल
५५📕 रांगोळी
५६📔 विविध प्रकारचे माती रंग
५७📘 हार्ड बोर्ड
५८📙 कार्ड बोर्ड
५९📓 थर्माकॉल
६०📗 सुतळी
६१📒 दोरे
६२📕 जिलेटीन पेपर
६३📔 खराटा व केरसुणी
६४📘 विज्ञान साहित्य
६५📙 नकाशे
६६📓 पृथ्वीचा गोल
६७📗 खेळाचे साहित्य - डंबेल्स, लेझीम, घुंगुरकाठी, दोरी, लगोऱ्या इ.
६८📒 लाऊड स्पीकरचा सेट
६९📕 अक्षरखेळ संच
७०📔 चित्र जुळवणी संच
७१📘 लोकर
७२📙 फ्लॅनेल कापड
७३📓 फ्लॅनेल बोर्ड
७४📗 भाषेचे तक्ते
७५📒 गणित पेटी
७६📕 भूमिती पेटी
७७📔 बॅंड पथक साहित्य
७८📘 अभ्यासक्रम पुस्तिका
७९📙 हस्तपुस्तिका
८०📓 लोकनृत्य साहित्य
८१📗 टूल बॉक्स
८२📒 कार्यानुभव साहित्य - बागकाम वगैरे
८३📕 संगीत साहित्य
८४📔 योगासन तक्ते
८५📘 ज्ञानपेटी
८६📙 विविध प्राणी, वनस्पती, मातीचे नमुने, मॉडेल्स
८७📓 अंक खेळ संच
८८📗 पॉलिथीन बॅग्ज
८९📒 रंगीत शाईच्या पुड्या
९०📕 कापूस, बटन, टिकल्या, ब्लेड, सेलोटेप
९१📔 विविध भौमितिक आकाराचा संच
९२📘 घनाकृती विविध आकाराचे ठोकळे
९३📙 गुणाकाराचे चौरस संच
९४📓 वर्णमाला इंग्रजी संच
९५📗 प्रक्रिया चिन्हांचा संच
९६📒 अर्ध्या अक्षरांचा संच
९७📕 अक्षर चिन्हांचा संच
९८📔 वृध्दी चिन्हांचा संच
९९📘 लाकडी मण्यांची माळा
१००📙 सुटे मणी
१०१📓 संख्या स्टॅंड
१०२📗 अंकाचा जिना
१०३📒 संख्येवरील क्रियांचे स्टॅंड
१०४📕 चित्रपदी
१०५📔 जिगसॉ खेळणी
१०६📘 रिंगाचे - ठोकण्याचे मनोरे
१०७📙 शिवण पेटी
१०८📓 घरांचे मॉडेल्स
१०९📗 लोहचुंबक
११०📒 ग्रहणपेटी
१११📕 ग्रहमाला
११२📔 मुखवटे
११३📘 बाहुली नाट्याच्या खेळाचे साहित्य
११४📙 घडाळ्याचे मॉडेल
११५📓 धरणाचे मॉडेल
११६📗 विविध रंगाचे ठोकळे
११७📒 सर्व प्रकारचे नकाशे - भारत, जिल्हा, राज्य, राजकीय, भौगोलिक इ.
११८📕 डस्टर
११९📔 शाळा बागकामासाठीचा आवश्यक खर्च
१२०📘 शाळा कुंपणासाठी लागणारा जुजबी खर्च
१२१📙 शाळा सजावट/वर्ग सजावटीसाठी लागडारा खर्च
१२२📓 शैक्षणिक साहित्य व यंत्रसामग्री यांची दुरुस्ती व देखभालीकरीता लागणारा खर्च
१२३📗 जीवन शिक्षण मासिक तसेच शासनाने वेळोवळी प्राथमिक शाळांच्या उपयोगाकरिता मान्य केलेली पुस्तके.

Friday, 30 November 2018

लोकसहभागातून करावयाची शालेय कामे

शाळा व लोकसहभाग :

शाळा आणि समाज हे दोन अविभाज्य घटक आहेत. समाजासाठी शाळा व शाळेसाठी समाज    असतो. व्यक्तिमत्वविकास व त्यातून समाज विकास हे शाळेचे प्राथमिक ध्येय आहे. तर समाज साहाय्याने शाळेचा विकास साधणे हेही तितकेच गरजेचे असते. त्यासाठी शाळेच्या कार्यामध्ये लोकांचा व समाजाचा सहभाग घेणे अगत्याचे ठरते.
भारत सरकारच्या शिक्षण हक्क अधिनियम RTE २००९ नुसार शालेय कार्यामध्ये समाजाचा सहभाग घेणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याबरोबरच महाराष्ट्र शासनाने १६ मे १९९६ व २४ ऑगस्ट २०१० रोजी पारित केलेल्या परिपत्रकान्वये तसेच माध्यमिक शाळा संहितेमधील नियम क्रमांक ३.२ मध्ये शाळेत शिक्षक पालक सभेच्या माध्यमातून शालेय अभ्यासक्रम तसेच विद्यार्थी व शिक्षक यांच्या समस्या सोडविणे असे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
१७ जून २०१० च्या महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकान्वये शिक्षणाची उद्दिष्टे पूर्ततेत विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास साध्य करत असतानाच सामाजिक न्याय, लोकशाही, मानवी मुल्य प्रस्थापित करण्यासाठी शिक्षणामध्ये लोकसहभाग घेणे अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगण्यात आले आहे.  शाळेमध्ये लोकसहभाग वाढवावा हे ध्येय समोर ठेवून स्थानिक पातळीवर शाळा व्यवस्थापन समितीची रचना करण्याचे सर्व शासकीय व खाजगी शिक्षण संस्थांना बंधनकारक करण्यात आले आहे.
वरील सर्व संदर्भांचा विचार करता शासन ध्येय असे दिसून येते की, विद्यार्थ्यांचा विकास व शिक्षण संकल्पना साकारण्यासाठी अध्ययन-अध्यापन कार्यामध्ये समाज पालक किंवा लोकसहभाग घेणे व त्या माध्यमातून विद्यार्थी विकास करणे अपेक्षित आहे.

शालेय कार्यात समाज किंवा लोकसहभागाची उद्दीष्ठे:


१.               समाज व शाळा संबंध जोपासणे.
२.               शाळेची विश्वासहर्ता वाढविणे.
३.               शालेय समस्या सोडवणे.
४.               शालेय कार्यावर नियंत्रण प्रस्थापित करणे.
५.               सहशालेय उपक्रमात समाज सहकार्य मिळवणे.
६.               समाजातील ज्येष्ठ व प्रतिभावंत व्यक्तींच्या ज्ञानाचा व अनुभवाचा वापर विद्यार्थी विकासासाठी करणे.
७.               शालेय विकासासाठी आर्थिक मदत प्राप्त करून घेणे.
८.               शालेय विकासामध्ये लोकांकडून भौतिक सामग्री, निधी, मनुष्यबळ प्राप्त करणे.
९.               विद्यार्थी उपस्थिती वाढवणे.
१०.         शालेय वातावरण प्रसन्न, आकर्षक व सुरक्षितता करणे
११.         समाज सहकार्यातून शालेय सामग्रीचे संवर्धन करणे.
१२.         समाजामध्ये परस्परसहकार्य भावना जोपासणे
१३.         विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक, सामाजिक स्वच्छता व श्रमप्रतिष्ठा, नैतिक मूल्य, सामाजिक ऐक्य, एकता, विषमता निर्मूलन इत्त्यादी बाबींची जोपासना करणे.

वरील उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी शाळेमध्ये लोकसहभाग घेणे अत्यंत गरजेचे आहे.
लोकसहभाग व सामाजिक सहभागातून करावयाची शालेय कार्ये :

लोकसहभाग व सामाजिक सहभागातून करावयाची कामांचे वर्गीकरण केल्यास त्याचे चार विभागांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते.
१.     शैक्षणिक कार्यातील सहभाग
२.     सहशालेय उपक्रमातील सहभाग
३.     आर्थिक बाबींमधील सहभाग
४.     श्रम किंवा मनुष्यबळ सहभाग

१.     शैक्षणिक कार्यातील लोकसहभाग:
समाजातील प्रतिभावंत, अनुभवी, उच्चविद्याविभूषित व्यक्तींच्या ज्ञानाचा व अनुभवाचा उपयोग विद्यार्थी समुपदेशन व मार्गदर्शन करण्यासाठी केला जाऊ शकतो.
त्याबरोबरच जीवनामध्ये अनुभव हीच सर्वात मोठी शिदोरी आहे व अशा अनुभवरुपी शिदोरीचे गाठोडे  ज्येष्ठ नागरिकांकडे असते.  म्हटले जाते की ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुती हि एक स्वतंत्र अनुभव कथा असते. हे अनुभव विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरू शकतात.
लोकसहभागातून करावयाचे शैक्षणिक कार्य :
१.               विद्यार्थी मार्गदर्शन
२.               विद्यार्थी समुपदेशन  
३.               अनुभवकथन सोहळा
४.               ज्येष्ठ व्यक्तींचा शालेय तास

२.              सहशालेय उपक्रमातील सहभाग :
सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधताना शाळेला अनेक अडचणी येऊ शकतात या अडचणी दूर करण्यासाठी सहशालेय उपक्रमाचे नियोजन करत असताना लोक सहभाग घेणे योग्य ठरते.

लोकसहभागातून राबविल्या जाऊ शकणाऱ्या सहशालेय उपक्रमांची यादी:
१.               वार्षिक स्नेहसंमेलन
२.               वृक्षारोपण कार्यक्रम
३.               राष्ट्रीय सण समारंभ आयोजन
४.               आरोग्य शिबीर
५.               महिला किंवा बालिका मेळावा
६.               समुपदेशन
याव्यतरिक्त प्रसंग निहाय व कल्पकतेने बऱ्याच सहशालेय उपक्रमांमध्ये लोकसहभाग किंवा समाज सहकार्य मिळवता येऊ शकते.

३.              आर्थिक सहभाग:
विकास व अर्थ (पैसा) हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. विकास साधण्यासाठी अर्थ किंवा पैसा आवश्यक आहे. मग तो उपक्रम राबवणे, शाळेचा भौतिक विकासात, शालेय इमारतीची डागडुजी किंवा बांधणी करणे, शैक्षणिक साहित्य निर्मिती अश्या अनेक कार्यसाठी पैशाची गरज पडत असते.  बऱ्याचदा शासनाकडून प्राप्त झालेल्या निधी कमी पडत असतो अशा वेळी समाजातील व्यक्तींकडून मदत किंवा देणगी स्वरूपात निधी प्राप्त करून घेणे  गरजेचे असते.  मात्र देणगीदारांची इच्छा  व परिस्थिती या गोष्टींचा विचार केला गेला पाहिजे. निधीसाठी कुठलीही शाळा समाजावर बंधन टाकू शकत नाही.
आर्थिक सहभागातून उपक्रम:
१.               शाळा कृतज्ञता निधी कार्यक्रम
२.               शाळा विकास निधी निर्मिती
३.               वृक्षारोपण कार्यक्रम
४.               संगणक ( डिजिटल साहित्य )खरेदी
५.               परिसर सुशोभीकरण
६.               शालेय रंगरंगोटी
७.               फर्निचर निर्मिती
८.               गणवेश
९.               स्वागतकमन व संरक्षण भिंत
१०.         शैक्षणिक साहित्य निर्मिती किंवा खरेदी
११.         इमारत  बांधकाम, डागडुजी
१२.         क्रीडामैदान निर्मिती
१३.         ग्रंथालय समृद्धी

४.              श्रम किंवा मनुष्यबळ सहभाग :
सामाजिक कार्यात पैश्या एवढेच महत्त्व मनुष्यबळाला आहे. एकमेकांना सहकार्यातून व मदतीतून महाकाय सेतू बांधला जाऊ शकतो. त्याप्रमाणे एक आकर्षक, सुशोभित, संस्कार पूरक शालेय वातावरण तयार करण्यासाठी मनुष्याबळा चे योगदान मोलाची ठरू शकते.



श्रम किंवा मनुष्यबळातून करावयाची कामे:
१.               परिसर स्वच्छता
२.               सुंदर शालेय परिसर
३.               शालेय इमारत बांधकाम किंवा डागडुजी
४.               संरक्षण भिंत
५.               फर्निचर निर्मिती
६.               शालेय बगीचा निर्मिती
७.               क्रीडा मैदान निर्मिती
८.               वृक्षारोपण
गरजेनुसार मनुष्यबळाची निगडीत व इतर कार्यही आपण याद्वारे करू शकतो.


“विना सहकार नाही उद्धार” या उक्तीप्रमाणे सामाजिक सहकार्याशिवाय शाळेचा विकास साधणे म्हणजे अशक्यप्राय आहे. हे साध्य करण्यासाठी शालेय व्यवहारात पारदर्शकता व समाज विश्वास जिंकणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण शाळेवर केवळ पुस्तके शिकवायचे नाहीत तर उद्याची आधुनिक, संस्कारक्षम, सर्वगुणसंपन्न पिढी घडवण्याची जबाबदारी आहे.

उपक्रमशीलता व नवकल्पकतेच्या माध्यमातून यापेक्षाही नवोदित उपक्रम शाळा राबवू शकते.