K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday, 19 November 2017

आता दप्तराचे ओझे झाले कमी


मुंबईतील 13 शाळांनी दप्तराचे ओझे केले कमी - - सकाळ वृत्तसेवा शनिवार, 2 एप्रिल 2016 - 12:30 AM IST Tags: school bags, mumbai मुंबई - एका बाकावर दोन विद्यार्थी बसतात, मग दोघांनीही सगळी पुस्तके कशाला आणायची? एकाने गणिताचे आणावे, दुसऱ्याने विज्ञानाचे. माटुंगा येथील आय.ई.एस. शाळेने दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी शोधलेली ही क्‍लृप्ती आहे. मातोश्री विद्यामंदिरने तासिकांचे नियोजन, एकच वही अशी उपाययोजना करून दप्तराचे वजन सरासरी दीड किलोग्रॅमने कमी केले आहे. अशा आणखी क्‍लृप्त्या शोधणाऱ्या मुंबईतील 13 शाळांची दखल शिक्षण विभागाने घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करा, या उच्च न्यायालयाच्या दणक्‍यानंतर शालेय शिक्षण विभागाने शाळांना दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी उपाययोजना शोधण्यास सांगितले होते. त्यानंतर शाळांनी आपल्या स्तरावर काही उपाय केले. मुंबईतील 13 शाळांनी शोधलेले उपाय "आदर्श‘ म्हणून आम्ही अन्य शाळांपुढे ठेवणार आहोत, अशी माहिती मुंबई शिक्षण उपसंचालक बी. बी. चव्हाण यांनी दिली. दप्तराच्या ओझ्यावर पर्याय शोधणाऱ्या शाळा आणि उपाय 1. आयईएस, माटुंगा - पुस्तकांची विभागणी, रिकामी बाटली आणून शाळेत पाणी भरण्याचे बंधन, वहीची पाने केली कमी 2. मातोश्री विद्यामंदिर, मानखुर्द - तासिका नऊ; पण विषय चारच, एका विषयाच्या सलग दोन तासिका, एकच वही, त्या वहीतील पाठ घरी स्वतंत्र वह्यांत उतरवणे हाच गृहपाठ, शाळेत परिपाठानंतर शिपाई आणि शिस्तमंत्री वजनकाटा घेऊन कोणत्याही पाच विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे करतात. 3. प्रगत विज्ञामंदिर, भांडुप- वेळापत्रकानुसारच दप्तर, पाणी बाटली बंद 4. पुरंदरे हायस्कूल, मुलुंड - 100 पानीच वही, चित्रकला साहित्य, व्यवसाय शाळेतच 5. आयईएस, मुलुंड - पॅड, चित्रकला साहित्याला मज्जाव 6. मोहम्मदी उर्दू हायस्कूल, भांडुप - कंपास पेटी, व्यवसाय, व्याकरण पुस्तके न आणण्याच्या सूचना 7. एस. एल. ऍण्ड एस. एस. गर्ल्स हायस्कूल - शाळेत पाणीशुद्धी उपकरण; इतिहास, भूगोल, विज्ञान, गणिताची पुस्तके शाळेतच. दप्तरात केवळ भाषेची पुस्तके 8. कोलंबा हायस्कूल, ग्रॅण्ट रोड - आठवड्यातून दोन वेळा दप्तराची अचानक तपासणी, विद्यार्थ्यांना कुलपासह कपाटे, डिजिटल बोर्डामुळे पाठ्यपुस्तकेही शाळेत आणणे बंद, प्रत्येक सत्राला स्वतंत्र वही 9. कॅम्पेन हायस्कूल, फोर्ट - फक्त भाषा विषयाची पुस्तके 10. एन.के.ई.एस., वडाळा - दप्तराचा आकार केला लहान, 100 पानी वही, स्वाध्यायासाठी फायली 11. सनफ्लॉवर हायस्कूल, जोगेश्‍वरी - पालकांमध्ये जागृती 12. विवेकानंद हायस्कूल, गोरेगाव - विषयनिहाय वहीऐवजी कागद 13. विद्याभूषण हायस्कूल, दहिसर - पाण्याची रिकामी बाटली, रिकामा डबा, शालेय पोषण आहार, तीनच वह्या, गृहपाठाच्या वह्या घरीच.

No comments:

Post a Comment