K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday, 21 November 2017

स्वच्छतेची लोकचळवळ

स्वच्छतेची लोकचळवळ

मानवतेचा संदेश देणारे समाजसुधारक संत गाडगेबाबा यांनी करुणा जपली आणि प्रेरणा दिली. त्या प्रेरणेतून विदर्भाच्या प्रवेशव्दारी बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर नगरीत श्री गाडगेबाबा विचार मंचाचा जन्म झाला व मानवतेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी यांच्या जयंती दिनापासून या विचारमंचाने आगळीवेगळी श्रमदानाची चळवळ राबविली. यातून वर्षभरात ३५ ते ४० सार्वजनिक ठिकाणे सुंदर व स्वच्छ झाली.

आज गावागावात, रस्त्या-रस्त्यांवर, घराघरांत साचलेली घाण, चिखल, कचरा, प्रदूषण साफ करणे गरजेचे आहे. त्यासाठी कोणावर अवलंबून न राहता आपण स्वतः पुढे सरसावणे हाच यावर उपाय आहे, असा संदेश या विचारमंचाने आपल्या कृतीतून दिला आहे.

मलकापूर नगरीतील नळगंगेच्या परिसरात एका खडकावर पौराणिक शिवालय श्री गंगेश्वर मंदिराच्या नावाने होते. त्याचा जीर्णोध्दार (कै.) महादेव लोटूजी वाघ यांनी केला होता. नळगंगेच्या पुराने पुन्हा ते पडले. त्यानंतर राजाभाऊ कंडारकर यांनी काही साथीदारांना घेऊन त्याचा १९९९ साली जीर्णोध्दार केला. आज प्राचीन शिवालय सुंदर मंदिरासह प्रशस्त आवारासहित सांस्कृतिक, सामाजिक सर्वधर्म समभावाचे, उपक्रमाचे केंद्रच झाले आहे. येथे पोळा, शिवरात्री, स्वातंत्र्यसेनानी, पत्रकार (कै.) के.ना. सावजी व्याख्यानमालेसमवेत श्री गाडगेबाबा यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी साफसफाई व प्रबोधनपर कार्यक्रम होत होते. तेथेच श्री गाडगे महाराज विचारमंचाचा जन्म झाला व मलकापूर नगरीत एक आगळीवेगळी लोकचळवळ उभी राहली.

येथील शिवाजीनगर भागातील (कै.) नर्मदाबाई शिंदे स्मशानभूमीतील वाढलेले गवत, काट, अस्वच्छता पाहून श्री गाडगेबाबा विचारमंचाचे जनक राजाभाऊ कंडारकर यांच्या मनात साफसफाईची कल्पना आली. नऊ जण कुदळ, फावडे, विळा, टोपले घेऊन तेथे पोचले. त्यांनी स्वच्छता केली. तेव्हा काही काळ ही चळवळ चालेल व एखादे ठिकाण साफ करुन ती संपेल असे वाटले होते. परंतु दर बुधवारी व रविवारी सकाळी दोन तास ही चळवळ जणू लोकचळवळ बनत गेली. त्यातील सदस्यांची संख्याही ८०-९० च्या घरात पोहोचली.

श्री. गाडगेबाबा यांचा खराटा हातात घेतल्याने अनेकांचा अहंकार गळाला. सार्वजनिक ठिकाण, रस्ते यावर साचलेली घाण, चिखल, कचरा, काट, नाल्या साफ करण्यासाठी विळा, फावडे, कुदळ, टोपले घेऊन मग शिवाजीनगर भागातील स्मशानभूमी, लक्ष्मण चव्हाण वैकुंठधाम, हुतात्मा स्मारक, एसटी स्टॅण्ड, उपजिल्हा रुग्णालय, न्यायालय, पोलीस स्टेशन, बोहरा समाज स्मशानभूमी, पाणीपुरवठा विभाग, चाळीस बिघा गार्डन, नगरपालिका शाळा, तहसील, जयस्तंभ अशी जवळपास ४० ठिकाणे वर्षभराच्या ९६ तासात राबलेल्या आठ हजारावरील हातांनी संपूर्ण परिवर्तित करुन आगळीवेगळी एक लोकचळवळ उभी केली आहे.

हा आदर्श जिल्ह्यातील इतर गावांनीही घ्यावा, अशी येथील मंडळाची अपेक्षा आहे.
Cleanliness Slogans (स्वच्छता घोषवाक्य) in Marathi
हे खरे सांगितले आहे कि : “स्वच्छता असे जेथे, आरोग्य वसे तेथे.” स्वच्छता म्हणजे आपलं शरीर, मन आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व गोष्टी स्वच्छ असणे. ही एक चांगली सवय आहे. त्याची सवय वयाच्या सुरुवाती पासून असायला हवी.

Rastyavar Sugandh Prasaro, Kachra Dabyacha Aat Raho


Saf Sunder Maze Man, Desh Maza Sunder Raho:
Rastyavar Sugandh Prasaro, Kachra Dabyacha Aat Raho.

साफ सुंदर माझे मन, देश माझा सुंदर राहो,
रस्त्यावर सुगंध प्रसरो, कचरा डब्याच्या आत राहो.


Karu Aapan Ase Kam, Tikun Rahil Deshachi Shan.

करू आपण असे काम, टिकून राहील देशाची शान.


Swachhata Theva, Aajar Palva.

स्वच्छता ठेवा, आजार पळवा.


Baheerche Khaaun Aala , Tyala Kushtharog Zaala

बाहेरचे खाऊन आला, त्याला कुष्ठरोग झाला.


Jethe Asel Saandpani
 Tethe Lavaa Macchardani

जेथे असेल सांडपाणी, तेथे लावा मच्छरदानी.


Swacchata Mhanje Rojchaa Sann, Naheetar Kayamche Aajarpan

स्वच्छता म्हणजे रोजचा सण, नाहीतर कायमचे आजरपण.


Safai Kara Roj, Ghanicha Problem Close.

सफाई करा रोज, घाणीचा प्रोब्लेम क्लोझ.


Kacchra Karooni Kamee , Arogyachi Milel Hamee .

कचरा करुनी कमी, आरोग्याची मीळेल हमी.



Ghan Taklyane Vatavaranch Nahi Pan Aatma Suddha Maili Hote.

घाण टाकल्याने वातावरणच नाही पण आत्मा सुद्धा मैली होते.

Comments Off on Ghan Taklyane Aatma Suddha Maili Hote
Maze Sahar Saf Aso


Maze Sahar Saf Aso, Tyat Sarvancha Hat Aso.


माझे शहर साफ असो, त्यात सर्वांचा हात असो.

No comments:

Post a Comment