K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 28 February 2019

आज 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन...!

राष्ट्रीय_विज्ञान_दिनाच्या_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा...

🙏✍🚀🎖🏅🔭🔬💡📝📐📶🇮🇳




       28 फेब्रुवारी 1928 रोजी भारतीय भौतिकवादी, सर चंद्रशेखर वेंकट रमण यांनी भारतातील रमण परिणामाचा शोध लावला. तेव्हा पासून 28 फेब्रुवारी हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात शास्त्रीय, शैक्षणिक, वैद्यकीय, तांत्रिक, संशोधन आणि सर्व महाविद्यालये, विद्यापीठे, शैक्षणिक संस्था, शास्त्रज्ञ, संशोधक हा दिवस खूप उत्साहाने साजरा करतात.

काही दिवसांपूर्वी भारताने संपूर्ण जगाचे लक्ष वेधणारे काम करून दाखवले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एकाचवेळी १०४ उपग्रह अंतराळात सोडून नवा विश्व विक्रम केला आहे. 21 वे शतक हे विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचे मानले जाते आणि ते खरे ठरत आहे. कारण आज आपण आपल्या आजूबाजूला पाहिले तर या विज्ञानामुळे आपली प्रगती खूप वेगाने होत चाललेली आपणाला दिसते आहे. नवनवीन यंत्रे, तंत्रज्ञान हे बदल सर्व विज्ञानामुळे होत आहेत. आपल्या समाजामधील ज्या अंधश्रद्धा होत्या त्या विज्ञानामुळेच नष्ट झाल्या आहेत आणि हे एक चांगल्या प्रगतीचे लक्षण मानले जाते.

आता आपण विज्ञानावर एवढे अवलंबून आहोत की, आपल्याला पहाटे उठण्यासाठी होणारा गजर म्हणजे घड्याळ हे सुद्धा एक विज्ञानाच्या प्रगतीचे छान उदाहरणच आहे. आपली संपूर्ण दिवसाची दिनचर्या आपण या छोट्याशा मशीनमुळे योग्य वेळेत पूर्ण करतो आणि त्याचा फायदा सर्वांना होताना दिसत आहे.

1999 पासून भारत देशात विज्ञान दिवसाच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारच्या संकल्पना राबविल्या जातात. यामुळे नवनवीन विषय तसेच विज्ञानामधील चांगले वाईट अनुभव किंवा पुढील काही वर्षाचे नियोजन आपण आतापासून करू शकतो आणि पुढील काळातील होणारे नुकसान टाळण्याचा प्रयत्न करू शकतो. 1999 मध्ये आपले विश्व बदलणे ही संकल्पना, 2004 मध्ये समुदायातील उत्साहवर्धक वैज्ञानिक जागृती ही संकल्पना तर 2013 मध्ये मॉडिफाईड पिके व अन्नसुरक्षा सुधारणा या संकल्पनेवर भर देण्यात आला.

चालू वर्षामध्ये ‘खास विकलांग व्यक्तींसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. प्रत्येक वर्षी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवसाला अनेक ठिकाणी चांगले संभाषण, विविध संशोधने शास्त्रज्ञांची चर्चासत्रे अशा अनेक कार्यक्रमांनी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा केला जातो. आतापर्यंत विज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे मानव जातीला तसेच संपूर्ण सृष्टीला चांगला फायदा झाला आहे. नवनवीन ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आणि जीवन जगण्याचे, उदरनिर्वाह करण्याचे एक प्रगतीशिल साधन मिळाले आहे. त्याचा सामाजिक, आर्थिक, व्यावहारिक चांगला फायदा होत आहे.

विज्ञानप्रसारासाठी काय करता येईल?

> समाजात विज्ञानप्रसाराची आत्यंतिक गरज लक्षात घेता संबंधित उपक्रम विज्ञान दिनापुरते मर्यादित नसावेत.

> सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत वैज्ञानिक माहितीची मांडणी केली जावी. विशेषतः मराठी आणि हिंदीतूनही वैज्ञानिक माहिती दिली जावी.

> उपक्रमांमधील तोचतोपणा टाळून अधिक आकर्षक आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले जावेत. सोशल मीडियाचाही आधार घ्यावा.

> संशोधन संस्थांनी वर्षातून एक विज्ञान दिन राबविण्यापेक्षा महिन्यातून एक असा विज्ञान दिन राबवला, तर अधिकाधिक विद्यार्थी आणि नागरिकांपर्यंत विज्ञान पोचू शकेल आणि विज्ञान दिनाची उद्दिष्टे खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकतील.

> प्रत्येक संशोधन संस्थेत स्वतंत्र विज्ञानप्रसार विभाग असावा. ज्याच्या माध्यमातून आपल्या विषयाचे ज्ञान सातत्याने सर्वसामान्यांपर्यंत पोचवता येईल.

आपल्याला ज्या सुखसोई आता उपलब्ध आहेत, त्या फक्त आणि फक्त विज्ञानामुळे आहेत आणि आपण भविष्यात काय घडवू शकतो हे सुद्धा विज्ञानच ठरवू शकते. भारतीय राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा....!

लेखक - मंगेश विठ्ठल कोळी
संकलक - कुलदिप प्रकाश बोरसे
स्त्रोत - महान्युज


28 फरवरी : क्यों मनाया जाता है राष्ट्रीय विज्ञान दिवस.


भारत में सन् 1986 से प्रतिवर्ष 28 फरवरी को राष्ट्रीय विज्ञान दिवस (नेशनल साइंस डे) मनाया जाता है। प्रोफेसर सी.वी. रमन (चंद्रशेखर वेंकटरमन) ने सन् 1928 में कोलकाता में इस दिन एक उत्कृष्ट वैज्ञानिक खोज की थी, जो ‘रमन प्रभाव’ के रूप में प्रसिद्ध है।

रमन प्रभाव में एकल तरंग- दैध्र्य प्रकाश (मोनोक्रोमेटिक) किरणें, जब किसी पारदर्शक माध्यम ठोस, द्रव या गैस से गुजरती है तब इसकी छितराई किरणों का अध्ययन करने पर पता चला कि मूल प्रकाश की किरणों के अलावा स्थिर अंतर पर बहुत कमजोर तीव्रता की किरणें भी उपस्थित होती हैं। इन्हीं किरणों को रमन-किरण भी कहते हैं।

यह किरणें माध्यम के कणों के कंपन एवं घूर्णन की वजह से मूल प्रकाश की किरणों में ऊर्जा में लाभ या हानि के होने से उत्पन्न होती हैं। इतना ही नहीं इसका अनुसंधान की अन्य शाखाओं, औषधि विज्ञान, जीव विज्ञान, भौतिक विज्ञान, खगोल विज्ञान तथा दूरसंचार के क्षेत्र में भी बहुत महत्व है।

भौतिक शास्त्री सर सी.वी. रमन एक ऐसे महान आविष्कारक थे, जो न सिर्फ लाखों भारतीयों के लिए बल्कि दुनिया भर के लोगों के लिए प्रेरणास्रोत हैं।

रमण की यह खोज 28 फरवरी 1930 को प्रकाश में आई थी। इस कारण 28 फरवरी राष्ट्रीय विज्ञान दिवस के रूप में मनाया जाता है। इस कार्य के लिए उनको 1930 में नोबेल पुरस्कार से सम्मानित किया गया था।

इस दिवस का मूल उद्देश्य विद्यार्थियों को विज्ञान के प्रति आकर्षित करना, विज्ञान के क्षेत्र में नए प्रयोगों के लिए प्रेरित करना तथा विज्ञान एवं वैज्ञानिक उपलब्धियों के प्रति सजग बनाना है। इस दिन, विज्ञान संस्थान, प्रयोगशाला, विज्ञान अकादमी, स्कूल, कॉलेज तथा प्रशिक्षण संस्थानों में वैज्ञानिक गतिविधियों से संबंधित प्रोग्रामों का आयोजन किया जाता हैं। रसायनों की आणविक संरचना के अध्ययन में 'रमन प्रभाव' एक प्रभावी साधन है।

राष्ट्रीय विज्ञान दिवस देश में विज्ञान के निरंतर उन्नति का आह्वान करता है, परमाणु ऊर्जा को लेकर लोगों के मन में कायम भ्रातियों को दूर करना इसका मुख्य उद्देश्य है तथा इसके विकास के द्वारा ही हम समाज के लोगों का जीवन स्तर अधिक से अधिक खुशहाल बना सकते हैं।

रमन प्रभाव में एकल तरंग- दैध्र्य प्रकाश (मोनोक्रोमेटिक) किरणें, जब किसी पारदर्शक माध्यम ठोस, द्रव या गैस से गुजरती है तब इसकी छितराई किरणों का अध्ययन करने पर पता चला कि मूल प्रकाश की किरणों के अलावा स्थिर अंतर पर बहुत कमजोर तीव्रता की किरणें भी उपस्थित होती हैं। इन्हीं किरणों को रमन-किरण भी कहते हैं।

भौतिक शास्त्री सर सी.वी. रमन एक ऐसे महान आविष्कारक थे, जो न सिर्फ लाखों भारतीयों के लिए बल्कि दुनिया भर के लोगों के लिए प्रेरणास्रोत हैं। यह किरणें माध्यम के कणों के कंपन एवं घूर्णन की वजह से मूल प्रकाश की किरणों में ऊर्जा में लाभ या हानि के होने से उत्पन्न होती हैं। इतना ही नहीं इसका अनुसंधान की अन्य शाखाओं, औषधि विज्ञान, जीव विज्ञान, भौतिक विज्ञान, खगोल विज्ञान तथा दूरसंचार के क्षेत्र में भी बहुत महत्व है।

Source : webduniya.


इंग्रजी  माहिती :

National Science Day Speech


National Science Day is used to celebrate every year in India on the 28th February in order to provide the Respect to the Raman effect by the Indian physicist. Sir ChandraSekhara Venkata Raman. Dr. Chandrashekara Venkata Raman was provided with many awards and also honored by getting Nobel Prize in the Subject of Physics in 1930.

Sir Chandrasekhara Venkata Raman had worked from 1907 to 1933 at the Indian Association for the Cultivation of Science, Kolkata, West Bengal in India during which he had researched on many topics of the Physics from which the Raman Effect (effect on scattering of light when passing through different materials) became his great success and discovery which has been marked in the Indian history. For his big invention he was honored through the various Indian awards including the Nobel Prize in the year 1930. From the year 2013, the “Raman Effect” has been designated as an International Historic Chemical Landmark by The American Chemical Society.

Dr Chandrashekara was a great Scientist and used to dream about making a developed Nation for the people to come up between many Countries. He made many innovations by which every people are used to get something unbelievable for their future growth.

He received many ideas and plans from the young Children’s and also from the experience person to build a superior technology to develop the infrastructure of the India Country. He used to gather every knowledge from his Teachers and also from many technological Books to gain much of the knowledge to build a Strong and Wealthy Nation.

Science Day is celebrated every year with immense passion at the Giant Metrewave Radio Telescope (also called GMRT) at Khodad which is a worldwide famous telescope getting operated at low radio frequencies by the NCRA (National Centre for Radio Astrophysics) established by the TIFR (Tata Institute of Fundamental Research).

Variety of activities is organized by the NCRA and GMRT at the ceremony of national science day celebration in order to recognize their leading research activities in the field of radio astronomy and astrophysics. Variety of programmes is also held for the common public and student community to popularize the science and technology in the country.

OBJECTIVES OF CELEBRATING NATIONAL SCIENCE DAY


National Science Day is being celebrated every year to widely spread a message about the significance of scientific applications in the daily life of the people.
To display the all the activities, efforts and achievements in the field of science for human welfare.
To discuss all the issues and implement new technologies for the development of the science.
To give an opportunity to the scientific minded citizens in the country.
To encourage the people as well as popularize the Science and Technology.

THEMES OF NATIONAL SCIENCE DAY


The theme of the year 1999 was “Our Changing Earth”.
The theme of the year 2000 was “Recreating Interest in Basic Science”.
The theme of the year 2001 was “Information Technology for Science Education”.
The theme of the year 2002 was “Wealth from Waste”.
The theme of the year 2003 was “50 years of DNA & 25 years of IVF – The blue print of Life”.
The theme of the year 2004 was “Encouraging Scientific Awareness in Community”.
The theme of the year 2005 was “Celebrating Physics”.
The theme of the year 2006 was “Nurture Nature for our future”.
The theme of the year 2007 was “More Crop Per Drop”.
The theme of the year 2008 was “Understanding the Planet Earth”.
The theme of the year 2009 was “Expanding Horizons of Science”.
The theme of the year 2010 was “Gender Equity, Science & Technology for Sustainable Development”.
The theme of the year 2011 was “Chemistry in Daily Life”.
The theme of the year 2012 was “Clean Energy Options and Nuclear Safety”.
The theme of the year 2013 was “Genetically Modified Crops and Food Security”.
The theme of the year 2014 was “Fostering Scientific Temper and Energy conservation”.
The theme of the year 2015 was “Science for Nation Building”.
The theme of the year 2016 was “Make in India: S&T driven innovations”.
The theme of the year 2017 was "Science and Technology for Specially Abled Persons"
 The theme of the year 2018 was "Science and Technology for a sustainable future."
The theme of the year 2019 was on "Science for the People, and People for the Science"

आज २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिन...!

मराठी_भाषादिनाच्या_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा...

🙏💐🇮🇳








Saturday, 23 February 2019

👉 *संत गाडगे महाराज*

👉 *वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक*

👉 *जन्मदिन : फेब्रुवारी २३, १८७६*
💐💐💐💐💐💐💐

👉 *गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते.*

👉 *तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे.*

👉 *समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत.*

👉 *देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला.*

👉 *‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.*

👉 *संत गाडगेबाबा यांना जंयत्ती निमित्त विनम्र अभिवादन..!*
🙏🙏🙏🙏💐💐💐💐

Monday, 18 February 2019

छत्रपती शिवाजी महाराज 



संकलक :- श्री.कुलदिप प्रकाश बोरसे,धनुर.


अ.क्र.
माहिती  
           डाऊनलोड करा                   
1शिवरायांचे बालपण आणि बाणेदारपणा
2शिवाजी महाराजांचे पराक्रमी मावळे
            DOWNLOAD
3शिवजयंती चारोळ्या            DOWNLOAD
4शिवाजी महाराज कविता            DOWNLOAD
5शिवाजी महाराजांचे पोवाडे            DOWNLOAD
6शिवस्तुती            DOWNLOAD
7Comming Soon...            DOWNLOAD
8Comming Soon...            DOWNLOAD
9Comming Soon...            DOWNLOAD
10Comming Soon...            DOWNLOAD

Thanks.
   
               All The Best To All Of You.




कारगिल विजय दिवस
कारगिल युद्ध




१९९९ चे भारत-पाकिस्तान कारगिल युद्ध

दिनांक मे, इ.स. १९९९ - जुलै २६, इ.स. १९९९

स्थान कारगिल जिल्हा व द्रास

 जिल्हा , जम्मू आणि काश्मीर, भारत

परिणती घुसखोरांनी ताब्यात घेतलेला प्रदेश भारताला पुन्हा मिळवण्यात यश.

कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगिल व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली, त्यामुळे याला मर्यादित युद्ध  म्हणतात. तसेच या पूर्वीच्या भारत पाक युद्धांप्रमाणेच याही युद्धात, युद्ध सुरू झाल्याची व संपल्याची कोणतीही घोषणा करण्यात आलेली नव्हती. उलट पाकिस्तानतर्फे युद्धादरम्यान त्यांचा देश अलिप्त आहे असा कांगावा करण्यात आला होता. पुढे अनेक वर्षांनंतर हळूहळू पाकिस्तान सरकारने व अनेक लष्करी अधिकाऱ्यांनी हे युद्धच होते असे जाहीर केले. इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

हे युद्ध आधुनिक इतिहासातील अतिउंचीवरच्या युद्धाचे अत्युत्‍कृष्ट उदाहरण आहे. यात युद्धाला लागणारी सामग्री व मनुष्यबळ ने-आण करण्याचा चांगलाच अनुभव भारतीय सैन्याला मिळाला. हे युद्ध दोन्ही देश अण्वस्त्रसज्ज  झाल्यानंतरचे पहिलेच युद्ध होते त्यामुळे सगळ्या जगाचे लक्ष हे युद्ध कसेकसे पुढे चालले आहे याकडे होते. परंतु भारताने हे युद्ध कारगीलपुरतेच मर्यादित ठेवले. त्यामुळे दाखवलेल्या संयमाबद्दल भारताचे जगभर कौतुक झाले. म्हणूनच, भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठिंबा मिळाला व याउलट, सैन्य मागे घ्यावे यासाठी पाकिस्तानवर अमेरिकेसह अनेक देशांनी दबाव आणला. या युद्धानंतर भारताने आपल्या संरक्षण खर्चात अनेक पटीने वाढ केली. तर पाकिस्तानात राजकीय अस्थिरता माजली. परिणामी, काही महिन्यांतच (ऑक्टोबर, इ.स. १९९९ मध्ये) पाकिस्तानात जनरल परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांचे सरकार उलथून लष्करशाही लागू केली.

स्थळ 

कारगिल हे असून जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर  पासून २०५ किलोमीटर अंतरावर आहे.हे शहर पाकव्याप्त काश्मीरच्या नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. कारगिलमध्ये काश्मीरमधील इतर ठिकाणांसारखे हवामान आहे. उन्हाळा हा सौम्य कडक तर हिवाळा अतिशय कडक असतो व तापमान उणे ४० अंश सेल्सियस पर्यंतही उतरू शकते.

राष्ट्रीय महामार्ग लेह ते श्रीनगर या रस्त्यावर कारगिल वसलेले आहे. कारगिलचे युद्ध होण्याचे प्रमुख कारण हा रस्ता हे होय. घुसखोरांनी पाकव्याप्त काश्मीरच्या जवळच्या आणि रस्त्याला समांतर अशा १६० किलोमीटरच्या पट्यातच साधारणपणे घुसखोरी केली. लष्कराच्या अनेक चौक्या या भागात आहेत. त्यातील काही चौक्या समुद्रसपाटीपासून ५,००० मीटरपेक्षाही अधिक उंचावर आहेत.नुसतेच कारगिल नव्हे तर आग्नेयेकडील द्रास व नैऋत्येकडील मश्को खोऱ्यातील, तसेच बटालिक विभागातील चौक्यांवरही घुसखोरी झाली.

वर नमूद केल्याप्रमाणे कारगिल, द्रास व मश्को खोऱ्यातील चौक्या ह्या अतिउंचीवर आहेत. अतिउंचावरील चौक्यांवर कडक हिवाळ्याच्या महिन्यांत सैन्य तैनात करून ठेवणे अतिशय अवघड असल्याने, हिवाळ्यापूर्वी दोन्ही बाजूने सैन्याची माघार व्हावी आणि उन्हाळ्यात बर्फ वितळल्यावर व हवामान मानवी रहाण्यास स्थिर झाल्यानंतर, ते ते सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतावे, असा अलिखित समझौता भारत-पाकिस्तानमध्ये, कारगिल युद्धाच्या आधीपर्यंत होता. या वेळेस मात्र, भारतीय सैन्य भारतीय चौक्यांवर परतण्यापूर्वीच पाकिस्तानी घुसखोरांनी ऐन हिवाळ्यात चौक्यांचा ताबा घेतला. त्यामुळे, कारगिलचे युद्ध भडकण्यास ठिणगी पडली.या चौक्यांचा ताबा घेतला गेल्याने राष्ट्रीय महामार्ग १ अ हा पाकिस्तानी तोफगोळ्यांच्या आणखी जवळच्या टप्प्यांत आला. तसेच, उंचावरील चौक्यांचा ताबा घुसखोरांकडे गेल्याने त्यांना उतारावरील चौक्यावर नियंत्रण ठेवणे सोपे गेले. या चौक्या डोंगरमाथ्यावरील किल्ल्यांप्रमाणे होत्या. त्यांचा ताबा मिळवण्यास मोठ्या प्रमाणावर फौजेची गरज लागते.त्यातच अतिउंची व कडाक्याची थंडी हे काम अजूनच अवघड करते

कारणे

इ.स. १९७१ च्या युद्धानंतर भारत व पाकिस्तानमध्ये थेट मोठे युद्ध झाले नाही. तरी सातत्याने छोट्या छोट्या चकमकी होत आहेत. सियाचीन हिमनदी वर भारतीयांचे नियंत्रण तसेच सभोवतालचा परिसरावर नियंत्रण मिळवण्यात दोन्ही बाजू सातत्याने प्रयत्‍नशील असतात. इ.स. १९८० च्या सुमारास पाकपुरस्कृत दहशतवाद्यांनी पंजाबात खलिस्तानच्या नावावर दंगा घातला तसेच इ.स. १९९० च्या सुमारास काश्मीरमध्ये दहशतवादाने मूळ धरले परिणामी भारताने काश्मीरमध्ये कायमस्वरूपी सैन्य तैनात केले. हे दहशतवादी सुरुवातीच्या काळात काश्मीरमधील असत व त्यांना प्रशिक्षित करून पाठवले जात असे. काही काळानंतर पाकिस्तानी सैनिक, अधिकारी व तालिबानी अफगाणिस्तानातील भाडोत्री अतिरेक्यांनाही काश्मीरमध्ये पाठवले जाऊ लागले. पाकिस्तानने नेहमीच या बाबतीत आपला सहभाग असल्याचा इन्कार केला. कारगिलच्या युद्धातदेखील पाकिस्तानने हीच खेळी वापरली व घुसखोर हे काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक आहेत असे जगाला सांगण्याचा प्रयत्‍न केला. इ.स. १९९८ मध्ये भारत पाकिस्तानने अणु चाचण्या  केल्यानंतर दोन्ही देशातील संबंध चांगलेच ताणले गेले. परंतु वाजपेयी यांनी मैत्रीचा हात पुढे करून संबंध निवळण्याचा प्रयत्‍न केला व त्यासाठी ते स्वत: लाहोरला जाऊन आले होते.

इ.स. १९९८-९९ च्या हिवाळ्यात पाकिस्तानी लष्करातून अनेक तुकड्यांना मुजाहिदीनच्या वेषात भारतात नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यात आले. या कारवाईला ऑपरेशन बद्र  असे नाव देण्यात आले व कुणाच्याही लक्षात न येता त्यांनी रिकाम्या भारतीय चौक्यांचा ताबा घेतला. (वर नमूद केल्याप्रमाणे हिवाळ्यात प्रचंड थंडीमुळे सैन्य माघारी घेतले गेले होते.) नियंत्रण रेषेच्या जास्तीत जास्त आत घुसखोरी करून राष्ट्रीय महामार्ग १ च्या जवळ यायचे. असे केले की, महामार्गावर कायमस्वरूपी ताबा मिळवता येईल आणि नंतर राजकीय वजन वापरून काश्मीरच्या प्रश्नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करणे पाकिस्तानला सोपे पडेल असा हा या कारवाईचा मुख्य उद्देश होता. भारताला नवीन नियंत्रण रेषा मान्य करायला भाग पाडले की. लडाख व सियाचीनला भारतापासून तोडणे सोपे जाईल असा पाकिस्तानी युद्धनीतिज्ञांचा कयास होता. तसेच घुसखोरीदरम्यान कारगील/काश्मीर परिसरात अंतर्गंत बंडखोरी भडकावून भारताला अजून बुचकळ्यात पाडण्याचा पाकिस्तानी व्यूह होता. भारतीयांनी सियाचीन हिमनदीवर नियंत्रण मिळवण्यात जी क्‍ऌप्ती वापरली तसाच काहीसा प्रकार पाकिस्तानने केला असा काही लेखकांचा सूर होता.

घटनाक्रम

कडक हिवाळ्यातील महिन्यांमध्ये मनुष्यहानी कमी व्हावी म्हणून, अतिउंचावरील चौक्या रिकाम्या करायचा प्रघात भारत व पाकिस्तान हे दोघेही पाळत. हवामान पुन्हा ठीकठाक झाल्यानंतर दोन्ही बाजूंचे सैन्य आपापल्या चौक्यांमध्ये परतून संरक्षणाची जवाबदारी घेत असे.

फेब्रुवारी, इ.स. १९९९ मध्ये पाकिस्तानी लष्कराने कडक हिवाळ्यातच भारतीय चौक्यांचा ताबा घेणे आरंभले. पाकिस्तानने ही कारवाई अतिशय सूत्रबद्धरीत्या व थांगपत्ता लागू न देता पार पाडली. यांतच भर म्हणजे, भारतीय गुप्तहेर खात्याला या घटनेची माहिती अजिबात मिळाली नाही त्यामुळे भारतीय गुप्तहेर खात्याच्या कार्यक्षमतेवर सर्वत्र भारतातून व जगातूनही चांगलीच टीका झाली.स्पेशल सर्विसेसच्या सर्वोत्कृष्ट तुकड्या, तसेच नॉर्दर्न लाइट इन्फट्रीच्या ४ ते ७ बटालियन तुकड्या या कामात गुंतल्या होत्या. रिकाम्या चौक्यांव्यतिरिक्त भारतीय सैन्याला हल्ला करायला अवघड जावे म्हणून मोक्याच्या जागाही ताब्यात घेण्यात आल्या. साधारणपणे, अतिउंचावरील एक मुख्य चौकी व त्याला टेका देणार्‍या दुय्यम उतारावरील व कमी उंचीवरील चौक्या ताब्यात घेण्यात आल्या. पाकिस्तानी मुख्य सैनिकांबरोबरच अफगाणी मुजाहिदीन, काश्मिरी मुजाहिदीन यांनाही या कार्यवाहीत समाविष्ट केले गेले.

भारतीयांना उशीराने मिळालेली खबर संपादन करा
सुरुवातीला, अनेक कारणांमुळे कारगिलची घुसखोरीचा पत्ता लागण्यास उशीर झाला. मुख्यत्वे पाकिस्तानने अनेक भागात तोफांचा मारा केल्यामुळे शोधपथक पाठवण्यास दिरंगाई झाली. भारतीय लष्कराच्या मते, हा तोफखान्याचा मारा नेहेमीचा असतो, त्यात नवे काही नाही. पाकिस्तानने हा मारा नियंत्रण रेषेपलीकडील सैनिकांना/घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी केला. मेच्या दुसऱ्या आठवड्यात स्थानिक मेंढपाळ यांनी घुसखोरीची सूचना भारतीय सैन्याला दिली. त्यानुसार भारतीय सैनिकांनी टेहळणीसाठी तुकडी पाठवली. तिच्यावर हल्ला करण्यात आला व घुसखोरी झाल्याचे सिद्ध झाले. सुरुवातीला ही मुजाहिदीन स्वरूपाची भासल्याने घुसखोरी लवकरच संपवता येईल असे वाटले. परंतु लगेचच नियंत्रण रेषेच्या बऱ्याच लांबीवर ही घुसखोरी झाल्याचे लक्षात आले. घुसखोरांकडून आलेले प्रत्युत्तर वेगळ्याच प्रकारचे होते व वरवर घुसखोरी वाटणारी घटना मोठ्या नियोजनाचा भाग आहे असे लक्षात आले. अशा रितीने कारगिल येथे युद्ध सुरू झाले आहे यावर शिक्कामोर्तब झाले. पाकिस्तानने एकूण सुमारे १३० ते २०० चौरस किलोमीटर प्रदेश ताब्यात घेतला होता.तर मुशर्रफ यांच्या मते १३०० चौरस किलोमीटर इतका प्रदेश ताब्यात घेण्यात आला होता.


भारतीय प्रत्युत्तर


कारगिलचे युद्ध सुरू झाल्यानंतर केवळ रसद तोडण्यासाठी पाकिस्तानचा श्रीनगर-लेह मार्ग कापून काढायचा इरादा आहे हे नक्की झाले. भारताने सैन्य जमवाजमवीचे प्रयत्‍न सुरू केल्यानंतर पाकिस्तानकडून श्रीनगर-लेह मार्गावर मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा करण्यात आला. प्रत्युत्तरादाखल भारताकडून श्रीनगर-लेह या राष्ट्रीय महामार्गाच्या जवळचा भाग ताब्यात घेण्यास जास्त महत्त्व देण्यात आले. असे केले की हा महामार्ग सुकर होणार होता.

घुसखोरांनी, आधुनिक शस्त्रास्त्रांनी चौक्या सुरक्षित केल्या होत्या. बंदुका, स्वयंचलित मशीन गन, छोट्या उखळी तोफा  व विमानभेदी क्षेपणास्त्रे यांनी चौक्या सज्ज होत्या. तसेच, चौक्यांचा सभोवतालचा परिसर पेरलेल्या सुरुंगांनी संरक्षित केला होता. यातील ८,००० सुरुंग भारतीय सेनेने युद्ध संपल्यावर निकामी केले. या चौक्यांना पाठीमागून पाकिस्तानी हद्दीतून मोठ्या प्रमाणावर तोफखान्याचे संरक्षण मिळाले होते. पाकिस्तानने या युद्धाआधी त्या परिसराची चालकरहित विमानांमधून टेहळणीदेखील केली होती.वर नमूद केल्याप्रमाणे भारतातर्फे आधी महामार्गलगतच्या चौक्यांवर हल्ले करण्यात आले. हा मारा बहुतांश कारगीलच्या जवळच्या भागावर केंद्रित करण्यात आला. या चौक्यांवर ताबा मिळाल्याने भारताने काबीज केलेल्या जागेत भर पडली व महामार्गही सुरक्षित होत गेला. जसा महामार्ग सुरक्षित होत गेला तसे पुढील हल्ल्यांचे नियोजन सूत्रबद्ध रितीने होत गेले.

महामार्गाच्या जवळच्या चौक्यांवरील भारतीय आक्रमणांत टायगर हिल व तोलोलिंग शिखर या दोन चौकीवजा शिखरांवरील आक्रमणे नोंद घेण्याजोगी होती.यानंतर बटालिक व तुर्तुक या सियाचीन लगतच्या भागाला लक्ष्य करण्यात आले. यातील काही जागा गमावणे पाकिस्तानी संरक्षणाच्या दृष्टीने परवडणारे नव्हते. पॉईंट ४५९० व पॉइंट ५३५३ या त्यापैकी काही महत्त्वाच्या जागा होत्या. (या भागात शिखरांना नावे त्यांच्या उंचीप्रमाणे असतात). ४५९० हा महामार्गाला सर्वात जवळचा पॉइंट होता तर ५३५३ हे युद्धातील सर्वात अधिक उंचीचे शिखर होते.पॉइंट ४५९० वर १४ जून १९९९ रोजी भारतीय सेनेने ताबा मिळवला व युद्धाचे पारडे हळूहळू भारताच्या बाजूने झुकू लागले. याच शिखराच्या ताब्यासाठी भारतीय सेनेला सर्वाधिक मनुष्यहानी सोसावी लागली.जरी भारतीय सेनेने जूनच्या मध्यापर्यंत महामार्गासाठी महत्त्वाची ठिकाणे ताब्यात घेण्यात यश मिळवले असले तरी पाकिस्तानी बाजूने युद्धाच्या अंतापर्यंत, तोफखान्याचा भडिमार चालूच होता.

कारगिल युद्धाची परिनीती

कारगिलचे युद्ध हे भारतीय लोकसभा बरखास्त झाल्यानंतर झाले होते, तरीही युद्धाच्या सुरुवातीला विरोधी पक्षानेही सत्तारूढ पक्षाला लष्करी कारवाईसाठी चांगलाच प्रतिसाद दिला, त्यामुळे भारतीय राजकारणात फारशी न दिसणारी एकता कारगिल युद्धाच्या निमित्ताने दिसली. मात्र, आगामी निवडणुकांच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षाला विजयाचे श्रेय घेणे लाभदायक ठरणार होते, म्हणून सैनिक कारवाई सुरू करण्यास विलंब लावला, असा आरोप युद्ध पार पडल्यावर विरोधी पक्षाने केला. या आरोपानंतरही भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुढील निवडणुकीत भरघोस यश मिळवले. निवडणूकपूर्व आघाडीने संपूर्ण बहुमत मिळवले असे हे इ.स. १९८४ नंतर प्रथमच घडले..

कारगीलचे युद्ध भारतातील प्रसारमाध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चिले गेले. अनेक वाहिन्यांची युद्धक्षेत्रात जाउन बातम्यांचे संकलन करण्यात चढाओढ झाली. त्यामुळे भारतीय नागरिकांना प्रथमच भारतातील युद्धाची क्षणचित्रे टीव्हीवर पहायला मिळाली. यामुळे भारतात एकंदर राष्ट्रीयत्वाच्या विचारसरणीने चांगलेच मूळ धरले. या युद्धानंतर भरलेल्या कित्येक सैन्य भरती शिबिरांना अनेक राज्यात अफाट प्रतिसाद मिळाला.

या युद्धात भारतीय गुप्तहेर खात्याचे कच्चे दुवे स्पष्ट झाले, संपूर्ण जगातून गुप्तहेर खात्याच्या अकार्यक्षमतेमुळे हे युद्ध झाल्याचे मत प्रदर्शित झाले होते. तसेच युद्धादरम्यान भारतीय सैन्याकडे अतिउंचीवर लढण्यासाठी पुरेशी साधने नव्हती. त्यामुळे युद्धानंतर भारताने सैन्यखर्चामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ केली.

पाकिस्तान

कारगिलच्या युद्धानंतर पाकिस्तानी राज्यकर्त्यांमधील कच्चे दुवे बाहेर आले. पाकिस्तानातील नवाज शरीफ यांचे लोकशाही सरकार व लष्कर यांच्यात कोणत्याही प्रकारचा ताळमेळ नव्हता हे सिद्ध झाले. सूत्रांनुसार नवाज शरीफ यांना या युद्धाबद्दल फारशी माहिती नव्हती असे कळते. तसेच युद्धादरम्यानही पाकिस्तानी लष्कराने शरीफ यांना अद्यतने दिली नाहीत. त्यामुळे नवाज शरीफ यांना आंतराष्ट्रीय स्तरावर या युद्धासाठी मान्यता मिळवणे अवघड गेले. अगदी युद्धाच्या काळात नवाज शरीफ यांना, त्यांच्या अगदी जुना लष्करी मित्र असलेल्या अमेरिकेनेही सैन्य माघारीचा सल्ला दिला. पाकिस्तानने सुरुवातीपासूनच हे सैनिक आमचे नाहीत हा पवित्रा घेतल्याने शहीद सैनिकांचा स्वीकार करण्यास नकार दिला. ज्या सैनिकांना मानाने अंत्यसंस्कार मिळायला पाहिजे होते, त्यांचे संस्कार भारतीय सैन्याने केले. त्यामुळे पाकव्याप्त काश्मीर मध्येही सरकार विरुद्ध जनमताची लाट उसळली.

पाकिस्तान सरकार व पाक लष्कर यांच्यातील दरी वाढत गेली. असे कळते की मु्शर्रफ यांच्यावर कारवाईची तयारी शरीफ यांनी केली होती परंतु मु्शर्रफ यांनी शरीफ यांचे प्रयत्‍न फोल पाडले. यादरम्यान एका घटनेत मु्शर्रफ यांचे विमान इस्लामाबाद येथे उतरून देण्यास नकार दिला, परंतु त्यांचे विमान त्यांच्या निष्ठावंतानी दुसऱ्या विमानतळावर उतरवून मु्शर्रफ यांचा जीव वाचवला. मु्शर्रफ यांनी हत्येचा प्रयत्‍न या आरोपाखाली शरीफ यांचे लोकशाही सरकार उलथून लावले व पाकिस्तानात आणीबाणी लागू केली. त्यानंतर काही दिवसातच पाकिस्तानच्या भल्यासाठी आपले सत्तेत राहणे गरजेचे आहे, असे दूरचित्रवाणीवर सांगत लष्करी राजवट लागू केली.

माध्यमांचा प्रभावी वापर 

कारगीलचे युद्ध हे भारतीय माध्यमांसाठी एक मैलाचा दगड ठरले. कारगीलच्या युद्धाच्या वेळेस भारतीय माध्यमांनी जागतिकीकरणात उडी घेतली होती व बी.बी.सी , सी.एन,एन्. या आंतराष्ट्रीय दर्जाच्या वाहिन्यांचा दर्जा गाठण्यास सुरुवात केली होती. कारगील युद्धाच्या निमित्ताने या वाहिन्यांनी युद्धाच्या जास्तीत जास्त बातम्या सादर करण्यात पुढाकार घेतला. भारतीय सैन्यानेही यात मागे न रहाता, माध्यमांचा वापर काळजीपूर्वक आपल्या सोयींकरता करून घेतला. त्यामुळे युद्धाबाबत भारतीय सैन्याला सहानूभूती मिळवणे सोपे गेले.तसेच युद्धदृश्ये व त्यांच्या यथायोग्य विश्लेषणामुळे भारतीयांमध्ये ऐक्याची भावना वाढीस लागली.

जसजसे युद्ध पुढे सरकत गेले तसतसे माध्यमांनी प्रक्षेपण अजून वाढवले. प्रक्षेपणाची व्याप्ती भारतात पाकिस्तानपेक्षा खूप जास्ती होती. काही वाहिन्यांनी सरळसरळ युद्धक्षेत्रात जाउन युद्धाचे थेट प्रक्षेपण केले. भारतीय सैन्यांच्या तोफांचा मारा काही खास करून दाखवला गेला. यामुळे बोफोर्स तोफांबद्दलचा भारतीय जनमानसातील राग कमी झाला. सीएन्‌एन्‌ने आखाती युद्धाचे जसे प्रक्षेपण दाखवले तसेच काहीसे भारतीय माध्यमांनी दाखवले.भारतीय माध्यमांचे यश पाकिस्तानी माध्यमानीही कबूल केले, कराची येथे झालेल्या कॉन्फरन्समध्ये पाकिस्तानी पत्रकारांनी नमूद केले की भारतीय सरकारने माध्यमांना व जनतेला विश्वासात घेतले तर पाकिस्तानने एकदम विरुद्ध अशी भूमिका घेतली.

भारतातील व जगभरातील वृत्तपत्रेही भारताच्या बाजूने सहानूभूतिमय होती. पाश्चिमात्य देशांनी सरळसरळ सहानूभूती प्रदर्शित न करता हे युद्ध भडकवल्याचा ठपका पाकिस्तानवरच ठेवला. काही तज्‍ज्ञांच्या मते भारतातील माध्यमांनी या युद्धासाठी लागणार्‍या बाह्य शक्तींचे काम केले व भारतीय सैन्याचा उत्साह दुणावणारी कामगिरी केली. जसे युद्ध पुढे सरकत गेले तसतसा पाकिस्तान या पातळीवर मागे पडू लागला व भारताने महत्त्वाची अशी आंतरराष्ट्रीय राजनैतिक आघाडी मिळवली.

चित्रपट

कारगिलच्या युद्धावर बॉलिवूडमध्ये काही चित्रपट निघाले. एल.ओ.सी कारगील हा जे.पी.दत्ता यांचा चित्रपट कारगिल युद्धात मरण पावलेल्या हुतात्‍म्यांच्या जीवनावर आधारित आहे. चार तासांपेक्षाही अधिक लांबीच्या ह्या चित्रपटात सैनिकांनी लढाया कशा पार पाडल्या याचे चित्रण आहे. अति वास्तवपूर्ण करणाच्या प्रयत्‍नामध्ये या चित्रपटाने काही मर्यादा ओलांडल्या. त्यामुळे चित्रपटावर बरीच टीका झाली. चित्रपटाऐवजी माहितीपट काढला असता तर जास्त शोभला असता, अशी चर्चा होती.


लक्ष्य हा चित्रपट इ.स. २००४ मध्ये प्रदर्शित झाला. हा कारगिल युद्धातील एक काल्पनिक कथेवर आधारित आहे. कारगिल युद्धात बहुतांशी अधिकारी हे खूपच नवीन अधिकारी होते. त्यापैकी एक कारगिलचे एक शिखर आपल्या आयुष्याचे लक्ष्य बनवतो व त्यात यशस्वी होतो अशी कथा आहे.


सैनिक (इ.स. २००२),हा कन्नड भाषेतील चित्रपट कारगील युद्धात सहभागी झालेल्या एका सैनिकाच्या आयुष्यावर आधारित होता. महेश सुखदर ह्याने हा काढला होता.

धूप (इ.स. २००३),हा चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. याचे दिग्दर्शन आश्विन चौधरी यांनी केले होते. महावीर चक्र मिळवलेल्या अनुज नय्यर यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे. ओम पुरी यांनी अनुज नय्यर यांच्या वडिलांची भूमिका केली आहे
मिशन फतेह - रियल स्टोरी ऑफ कारगील हीरोज ही मालिका दूर्चित्रवाणीच्या सहारा वाहिनीवर प्रदर्शित झाली होती. यातील प्रत्येक भागात कारगिल युद्धात कामी आलेल्या एका सैनिकाची कहाणी होती.
फिफ्टी डे वॉर
कुरुक्षेत्र (मल्याळी चित्रपट) हा इ.स. २००८ मध्ये प्रदर्शित झालेला मल्याळी चित्रपट आहे. कारगिल युद्धातील अनुभवांवर हे युद्ध अनुभवलेले मेजर रवी यांनी हा चित्रपट काढला.
टँगो चार्ली हादेखील चित्रपट कारगील युद्धाची प्रेरणा घेऊनच काढला गेला होता

आदर्श राजा शिवछत्रपती



छत्रपती शिवाजी महाराज : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता !हिंदवी साम्राज्याचे संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्‍यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही ह्यांच्याशी लढा दिला, आणि मराठी साम्राज्याचे बीजारोपण केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य बलाढ्य असली तरी महाराष्ट्रात त्यांची सगळी भिस्त स्थानिक सरदारांवर आणि किल्लेदारांवर होती. ते सरदार/ किल्लेदार जनतेवर अन्याय-अत्याचार करत असत. शिवाजीमहाराजांनी त्या अन्याय-अत्याचारातून जनतेची सुटका केली, आणि उत्तम शासनाचे एक उदाहरण भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले.

छत्रपतींच्या व्यक्तिमत्त्वाचा व कारकीर्दीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता काही गोष्टी समोर येतात. शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा… असे उच्च कोटीचे गुण महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेले दिसतात.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बालपणी,
तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले,
पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला,साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला,
स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले;
महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले,
योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला,
आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला;
सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली;
राजभाषा विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला.
तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला.
....या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात !
सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान,
ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते.
शिवस्तुती





शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।

सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।

याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।

शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।
शिवाजी महाराज पोवाडे




 धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे

सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई
निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने
उन पावसाची न करता तमा फ़ोज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार
करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे
रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव
पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.
राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात
जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात
अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी
शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण
पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो
मरताना शिवा काशिद बोलतो “सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो”
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत
गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास
💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

नरवीर तानाजी मालुसरे
बाजी प्रभू
सिंहगड
छत्रपति शिवाजी महाराजांचा पोवाडा
सरदार शिद्दी जोहार व बाजी देशपांडे यांचा पराक्रम
सरदार शाहिस्तेखानाची मोहीम
शिवाजी महाराजांचें आग्र्यास गमन, अटक आणि सुटका
नरवीर मालुसरे, सिंहगडावर छापा
छत्रपती शिवाजी अवतारी कसे ?
शिवप्रतिज्ञा पोवाडा
प्रतापगडचा रणसंग्राम
वीरमणि बाजीप्रभु देशपांडे
शाहिस्तेखानाचा पराभव
ठकास महाठक
वीररत्‍न तानाजीराव मालुसरे
शिवाजी महाराज कविता



टेकूनी माथा जया चरणी
मी वंदन ज्यासी करितो…
नित्यारोज तयांचे
नवे रूप मी स्मरितो…
न भूतो न भविष्यती
ऐसेची होते माझे शिवछत्रपती…
जन्मले आई जिजाऊ उदरी
पावन झाली अवघी शिवनेरी…
ऐकत असता पोवाडा सदरी
त्यात वर्णिली राणी पद्मिनी…
रजपूत राणी सुंदर विलक्षणी
कैद झाली मोघल जनानखानी…
चरचर कापले हृदय शिवरायांचे
डोळ्यात दाटले अश्रू संतापाचे…
कडाडले शिवरायsss
आम्ही आहो वंशज रामरायाचे
दिवस भरले आता मोघलांचे…
ज्याची फिरेल नजर वाकडी
आईबहिणीकडे….
त्याच क्षणी शीर मारावे
हुकुम घुमला चोहीकडे…
काबीज करता कल्याण-भिवंडी
अमाप आला हाती खजिना…
वेळ न दवडिता सरदारांनी
सादर केला एक नजराणा…
कल्याण सुभेदाराची
स्नुषा विलक्षण सुंदर…
उभी होती राजांपुढती
झुकुवूनी घाबरी नजर…
धीमी पाऊले टाकीत राजे
तिज जवळी आले…
रूप पाहुनी विलक्षण सुंदर
राजे पुढे वदले….
जर का आमच्या मांसाहेब
इतक्या सुंदर असत्या…..
आम्ही तयांचे पुत्र लाडके
असेच सुंदर निपजलो असतो….
वंदन तुजला शतदा करतो
धन्य तू शिवराया….
स्त्री जातीचा मान राखुनी
तूच शिकविले जगाया….!!

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।
|| जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे||

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

नाव होतं त्याचं ''छत्रपती शिवाजी''...

महाराष्ट्र माझा होता अंधारात
औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
...
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
आणि पाठीवर दादोजींचा हात
डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग

नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी

म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना

बसून त्यानं दख्खनच्या भूमीं...त
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव होतं त्याचं ''छत्रपती शिवाजी''

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
महाराष्ट्राची ही पावन भूमी
संताची लाभली पुण्याई
भगवी पताका शिवनेरीची
फडकू दे आता दारोदारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || १ ||

एक एक थेंबातुन दुधाच्या
पाज शौर्य तव बाळासी
नको खेळणी नकोत गोष्टी
नको रात्री ती अंगाई
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || २ ||

होउनी मैतर, मावळा, दादोजी
शिकव रणांगण आणि लढाई
निष्पापांचे रक्त सांडते
अश्रु ढाळी माय भवानी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ३ ||

घर आपुलेच जाहले रणभूमि
आप्ल्यांशिच आपली लढाई
ओरबाडुनि माझ्या मातृभूमीला
राज्यकर्ते आपुली भाजती पोळी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ४ ||

होईल का ग पुन्हा एकदा
इतिहासाची पुनरावृत्ती
एक जाणता राजा मांगे
धाय मोकलून माय मराठी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ५ ||

संहार करू दे
विनाशाचा, नराधमांचा, आतंकाचा
लखलखु दे तलवार विजयी
गर्जु दे पुन्हा एक मर्द मराठा
सह्याद्रीच्या कड़ेकपारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ६ |
===================================
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।

सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।

याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।

शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।

शिवजंयती चारोळ्या



किती आले किती गेले
केले मुघलांना हद्दपार ।
राजे बहु धरतीवरती
ना कुणा शिवबांची सर ।।

सह्याद्रीच्या रांगांवरती
सदा मुघलांच्या नजरा ।
बोटे छाटली तयांची
त्या शिवबांना माझा मुजरा ।।

अशी करारी नजर सदा 
गनिमा भेदुनी पाही आरपार ।
शिवरायांमुळेच जाहले
स्वप्न स्वराज्याचे साकार ।।

सदा गायी तुझे गुणगान
असाची माझ्या पोटी वंश दे ।
फक्त तुझ्याच.. फक्त तुझ्याच..
शिवशौर्याचा तू अंश दे ।।

शब्दही पडती अपुरे
अशी शिवरायांची किर्ती ।
राजा शोभूनी दिसे जगती
अवघ्या जगाचा शिवछत्रपती ।।

अंगी संचारीता शौर्य
थरथरा कापे क्रौर्य ।
जणू कडाडती वीज
भासे तेज शिवशौर्य ।।

न्यायदानाची जयांची
असे तरहाच निराळी ।
लेणे सौभाग्याचे शाबूत
असे शिवशौर्यामुळे भाळी ।।

मायमुलीच्या स्त्रीत्वाचा
शिवबांनी केला सदैव सन्मान ।
यमसदनी धाडुनी सैतानांना
राखीली स्वराज्याची शान ।।

न काळवेळ तयांना लागे
शत्रू धारातीर्थी पाडाया ।
स्मरता शिवरायांचे शौर्य
लागे आजही इतिहास घडाया ।।

डंका शिवछत्रपतींच्या नावाचाच
आजही वाजतोय जगती ।
राखीले स्वराज्य अबाधीत
असे हे एकमेव शिवछत्रपती ।।

राजे तुम्हीच अस्मिता
तुम्हीच महाराष्ट्राची शान ।
जगती तुम्हीच छत्रपती
तुम्हीच आमचा स्वाभिमान ।।

छत्रपति शिवाजी महाराजांचे पराक्रमी मावळे
शिवबाचे  मावळे



आपणास आषाढी पोर्णिमेचे म्हणजे गुरु पोर्णिमा हे माहित असेल पण आज पासुन ३४९ वर्षा आधीच्या आषाढी पोर्णिमाला शिवाजी महराज केवळ ६०० मावळ्यासोबत पन्हाळगडावरुन विशालगडाकडे निघाले होते.
पण त्यान्ची ही वाट सोपी नव्हती. पन्हाळगडा बाहेर सिद्दी जोहर ४०००० फ़ोज घेउन बसला होता. त्या नंतर त्या वेळच्या घोडखिन्डित बाजी प्रभु देशपान्डे यानी अतुलनीय साहस व पराक्रम गाजवला. मला अस वाटते की आपणास हे महीत असेल. ज्या वेळी बाजी महाराजा सोबत विशालगडा कडे कुच करत होते त्यास वेळी अजुन एक मावळा एक अतुलनीय शोर्य व धाडस करत होता.
तो मावळा म्हणजे शिवा काशिद. शिवा काशिद हा महाराजाचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ही शिवाजी महराजासारखिच होती. जर शिवा काशिदास महाराजाचे कपडे घातले तर नवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या. एक महाराजांजी आणी दुसरी शिवा काशिद. एक विशालगडाकडे व दुसरी सिद्धी जोहरकडे.
हे तर आपण जाणलच असेल की ४०००० च्या आत गेलेला शिवा काशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एक सामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचा राजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाईल.
धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे
सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई
निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने
उन पावसाची न करता तमा फ़ोज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार
करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे
रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव
पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.
राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात
जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात
अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी
शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण
पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो
मरताना शिवा काशिद बोलतो “सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो”
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत
गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास