K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday, 18 February 2019

शिवरायांचे बालपण व बाणेदारपणा



शिवरायांचा जन्म हा १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी वर झाला , नंतर तीन चार महिन्यांनी शहाजी महाराजांनी बाल शिवाजीचे पुत्र मुखावलोकन विधीयुक्त केले. पुढे वर्ष दीड वर्ष हे सर्व कुटुंब शिवनेरी वरच एकत्रित होते. “त्या नंतर १६३२ ते १६३६ ह्या दरम्यान शहाजी महाराजांनी निजाम वंशातील लहान पोराला गादीवर बसवून निजामशाही स्वतःच चालवायचा प्रयत्न केला”…(संदर्भ – छत्रपती शिवाजी – सेतू माधवराव पगडी.) त्या मूळे १६३२ ते १६३६ मध्ये शहाजी महाराज आणि संभाजी राजे मोघालांशी लढण्यात मग्न होते.

पुढे १६३६ च्या उत्तरार्धात .. निजामशाही बुडाल्यावर … शहाजी राजे आदिलशहा कडे बारा हजारी “फर्जंद ” वजीर म्हणून गेले…तहाप्रमाणे शहाजी महाराजांना रानदुल्ला खानाबरोबर कर्नाटकात घाईने जावे लागले. तहा प्रमाणे गडकोटांचा ताबा मोगली सरदारांनी त्यांचे पश्चात घेतला व बादशहाच्या आज्ञे प्रमाणे जिजाई वगैरेंना शिवनेरी वरून आपल्या सर्व जीनगी वगैरेसह उतरू दिले. प्रथम जिजाबाईला “चौलात” ठेवायचा शहाजीचा प्रयत्न होता. परंतु पोर्तुगीजांनी तिला त्यांच्या हद्दीतून नेऊन इतरत्र ठेवण्याची सूचना केली. तेव्हा शहाजी राज्याने शिवाजी – जिजाई ला खेड (शिवापूर) ला पाठविले.. तिथे त्यांचा वर्षभर मुक्काम होता…खेड (शिवापूर) हे दादाजी कोंडदेवाने शहाजी महाराजांच्या आज्ञेवरून नुकतेच वसवले होते.. पुढे इ.स. १६३७ च्या अखेर जिजाई शिवाजीसह कर्नाटकात गेली असे कागदपत्रां वरूनस्पष्ट होते. कर्नाटकात कंपिलीला शहाजी राज्यांच्या सोबत १६३७ ते १६४२ साला पर्यंत शिवाजी आणि जिजाऊ हे तिथेच होते… तिथे शहाजी महाराजांनी शिवाजी ७ वर्षाचा
झाल्यावर.. अक्षर ओळख व जुजबी गणित त्यावेळच्या पद्धतीने शिकवले. त्या काळी एवढेच काय ते शिक्षण “अध्ययना” खाली त्रैवर्णिकांना दिले जात असे. परंतु वडिलांच्या व्यावहारिक अनुभवाचा मुलांना पूर्ण वाटा घेता येत होता. वैश्यांना आपल्या हिशोबा पुरता लेखन वाचनाचा सराव असे. क्षत्रिय आणि ब्राह्मणांना अक्षर ओळखी नंतर , जर त्यात धंदा रोजगार करावयाचा असेल तरच तो या संस्कारानंतर अधिक लेखन वाचनाचा सराव करी..अन्यथा वंशातील मोठ्या माणसाच्या सान्निध्यात राहून त्याच्या कडून पारंपारिक कला कौशल्य शिकत असे ..त्या प्रमाणे शिवाजी महाराजांनी महादेव भटाकडून अक्षर ओळख करून घेतली, वतलवारबाजी, घोडेस्वारी तश्याच अन्य कला त्या त्या क्षेत्रात माहीर असणाऱ्याव्यक्तींकडून याच काळात घेतले.. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे.. राजनीती चे डाव पेच अथवा.. राज कारभाराचीकार्य पद्धती.. हे सर्व शिवाजी महाराजांनी ह्या काळात आपले वडील शहाजी महाराज व वडील बंधू संभाजी महाराज ह्यांच्या कडून शिकले… याच दरम्यान १६४० च्या अखेरीस शिवाजी महाराज यांचे लग्न निम्बालकर पवारयांच्या “जिऊबाई” नावाच्या मुलीशी झाले. तिचे सासरचे नाव “सईबाई” असे ठेविले. पुढे १६४२ साली…शहाजी महाराजांविरुद्ध आदिलशाहीतील कारस्थानेवाढली…रन्दुल्लाखान मेल्यावर त्याचा पोरगा कम कर्तुत्वी निघाल्याने अफजलखानाला त्याची जहागीर मिळाली.व त्याने बाजी घोरपड्या सारखे सरदार गोळा करूनशहाजी महाराजांविरुद्ध कारस्थान रचले.. त्या नुसार.. शहाजी महाराजांचा बराच प्रदेश त्यांच्या कडून आदिलशाहने काढून घेतला..व त्यांचेच भाऊ बंद बाजी घोरपड्यास दिला ….तसेच शहाजी राजे ह्यांचे मुतालिक दादाजी कोंडदेव ह्यांची बाही बाजी घोरपाड्याने कापली . हे सर्व बघून आदिलशाही तील आपली पकड ढिली पडतेय आणि आपल्या विरुद्ध षडयंत्र शिजतेय हे बघून शहाजी महाराजांनी शिवाजी आणि जिजाऊ ह्यांना पुणे प्रांतात पाठवण्याचा निर्णय घेतला.. त्या सोबतच आपण आदिलशाही सोडू इच्छितो अश्या आशयाचे बोलणे त्याने आदिला शहशी लावून ठेवले… १६४२ च्या अखेर शिवाजी राज्यांना शहाजी महाराजांनी शिक्का, झेंड्या सोबत…पेशवे, मुजुमदार, सबनीस, व सैन्यासह पुणे प्रांती

रवाना केले…ह्या मूळे शहाजी राज मोघालांशी संधान साधतोय कि काय ह्याची भीतीआदिलाशाहाला झाली त्या मूळे आदिलशाहने शहाजीशी चाललेल्या वादावर पडदाटाकत.. शहाजी राज्यांना काढून घेतलेल्या जहागिरी पेक्षा जास्त किंमतीचा सन्मान दिला…१६४४ साली आदिलशाहने शहाजी राज्यांची आधीच्या (काढून घेतलेल्या ) ४ लक्षजहागिरी ऐवजी ५ लाखाचा सुभा बंगलोर दिला…व तिकडे रवाना केले..(अर्थातशहाजी राज्यान सारख्या प्रबळ सरदाराचे मोघलानकडे जाने चांगले नाही ह्या भीतीनेशहाजी राज्यांशी आदिलशाहने जुळवून घेतले.. व इकडे मोघालांशी संधान साधायला नको म्हणून तिकडे कर्नाटकात बंगरूळला रवाना केले… इथे शिवाजी महाराजांना पुणे प्रांती पाठवून शहाजी महाराजांनी मोठी राजकीय खेळी तर खेळलीच पण चालू वातावरणाचा फायदाघेऊन शिवाजी राज्याकडून त्या प्रकारची बंडयुक्त कार्य करण्याचे आदेश पाठवले होते…
परिस्थितीचा फायदा उठवण्यात शहाजी राजे पुन्हा एकदा यशस्वी झाले… अवघ्या १२-१३ व्या वर्षी शिवाजी राज्यांना स्वतंत्र वाट चाल करावी लागलीपण…स्वतः शहाजी महाराज व शिवाजी महाराजांचे वडील बंधू संभाजी महाराजांवरदेखील याच वयोमानात अश्या प्रकारची जवाबदारी अंगी पडली होती हे नमूदकरण्यासारखे आहे…तर शहाजी महाराजांना त्यांच्या लहान पणी (१० व्या वर्षी )अश्याच प्रकारे जवाबदारी पडली असतांना त्यांना त्यांचे थोरले चुलत बंधू संभाजी राजे ह्यांचा आश्रय अथवा मार्ग दर्शन मिळाले.. तर.. शिवाजी राज्यांचे वडील बंधू संभाजी राजे यांना तर अश्या (९ व्या वर्षी ) वेळेत स्वतः शहाजी राज्यांचे मार्ग दर्शन मिळाले..
संदर्भ ग्रंथ – श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचीकीत्सक चरित्र (पूर्वार्ध व उत्तरार्ध)

छत्रपती शिवाजीराजे भोसले (१९ फेब्रुवारी १६३० ते ३ एप्रिल १६८०) हे इ.स. १८१८ पर्यंत टिकलेल्या आणि आपल्या परमोत्कर्षाच्या अवस्थेत भारतीय उपखंडाचा बराचसा भाग व्यापणाऱ्या मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. जनता त्यांना शिवराय, शिवाजी महाराज किंवा राजे नावाने संबोधते. भोसले कुळातील या सुपुत्राने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध ऐतिहासिक संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. रायगड ही राजधानी असलेले स्वतंत्र मराठा राज्य शिवाजीने उभे केले आणि इ.स. १६७४ मध्ये छत्रपती म्हणून राज्याभिषेक करवून घेतला. उत्कृष्ट योद्धा, आदर्श शासनकर्ता, प्रजाहितदक्ष कल्याणकारी राजा म्हणून जागतिक आणि विशेषत्वाने मराठी इतिहासात त्यांना अत्युच्च स्थान आहे.
महाराष्ट्रात, छत्रपती शिवाजी हे शिवाजीराजा, शिवाजीराजे, शिवबा, शिवबाराजे, शिव, शिवराय, शिवा अशा अनेक नावांनी ओळखले जातात. शिवाजींचा जन्मदिवस हा ‘शिवजयंती’ म्हणून साजरा होतो. शिवाजी आणि त्यांचा पुत्र संभाजी यांचा संयुक्त उल्लेख शिवशंभू असा होतो. शिवाजींच्या कारकीर्दीला शिवकाल असेही म्हणतात.
शिस्तबद्ध लष्कर व सुघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक राज्य उभे केले. भूगोल, आश्चर्यजनक वेगवान हालचाली आणि बलाढ्य शत्रूंचे मनोधैर्य खच्ची करणारे नेमके हल्ले यांचा वापर करणारे गनिमी काव्याचे तंत्र त्यांनी यशस्वीपणे वापरले. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या २,००० सैनिकांच्या छोट्या तुकडीपासून एक लाख सैनिकांचे लष्कर शिवाजी महाराजांनी उभे केले. किनारी आणि अंतर्गत प्रदेशातील किल्ल्यांची डागडुजी करण्यासोबतच अनेक किल्लेही त्यांनी उभारले. राज्यकारभारात मराठी भाषेचा वापर करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. व्हियतनामच्या युद्धात शिवकालिन गनिमी काव्याचा आदर्श आणि अभ्यास करून अमेरिका सारख्या सैन्याला जेरीस आणले.
जन्म : शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ - शिवनेरी
पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहरानजीक वसलेल्या शिवनेरी या डोंगरी किल्ल्यावर इ.स. १६३० मध्ये शिवाजींचा जन्म झाला. इतिहासाच्या अभ्यासकांमध्ये शिवाजींची नेमकी जन्मतारीख हा एकेकाळी मतभेदांचा मुद्दा होता. तो वाद नंतर मिटला. महाराष्ट्र राज्य शासनाने फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख २००१ साली स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध कॅलेडरांत वेगवेगळी तारीख दाखविली असते.
एका आख्यायिकेनुसार शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली होती म्हणून या मुलाचे नाव ' शिवाजी ' ठेवले गेले.

शिवाजी महाराजांचे कुटुंब :

वडिल : शहाजीराजे - शहाजीराजे प्रथम अहमदनगरच्या निजामशहाच्या पदरी एक सरदार म्हणून होते. मलिक अंबर ह्या निजामशहाच्या प्रभावी वजिराच्या मृत्यूनंतर मोगल सम्राट  शहाजहानच्या  सैन्याने  इ.स. १६३६  मधे अहमदनगरवर चाल करून ते शहर आपल्या ताब्यात घेतल्यानंतर शहाजीराजे विजापूरच्या आदिलशहाच्या पदरी सरदार म्हणून रूजू झाले. आदिलशहाने त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजांनी  तुकाबाईंशी  आपला  दुसरा विवाह केला. लहान शिवाजीराजांना घेऊन जिजाबाई पुण्याला रहायला आल्या. तुकाबाई आणि शहाजीराजे ह्यांच्या एकोजी भोसले (व्यंकोजी भोसले) ह्या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजावरला आपले राज्य स्थापन केले.
आई : जिजाबाई - जिजाबाई पुण्यात रहायला गेल्या त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी ह्यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात प्रतीकादाखल सोन्याच्या मुलाम्याचा नांगर फिरवून, जिजाबाईंनी दादोजी कोंडदेवांच्या मदतीने पुण्याची पुन:स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानाचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावरही (मोठेपणीच्या सिंहगडावरच्या स्वारीसारख्या) प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंनी खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजीमहाराजांच्या त्या आद्यगुरू होत. हिंदवी स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार करायला शिवाजीमहाराजांना  जिजाबाईंनी  स्फूर्ति  दिली असे काही इतिहासकार मानतात.
पत्नी : सईबाई निंबाळकर , सोयराबाई मॊहिते , पुतळाबाई पालकर , लक्ष्मीबाई विचारे , काशीबाई जाधव , सगणाबाई शिंदे , गुणवंतीबाई इंगळे , सकवारबाई गायकवाड
वंशज : मुलगे - छत्रपती संभाजी भोसले , छत्रपती राजारामराजे भोसले
मुली : अंबिकाबाई महाडीक , कमळाबाई (सकवारबाईची कन्या) दीपाबाई राजकुंवरबाई शिर्के (सगुणाबाईची मुलगी, गणोजी शिर्के यांची पत्नी) राणूबाई पाटकर , सखुबाई निंबाळकर (सईबाईची मुलगी)
सुना : संभाजीच्या पत्नी येसूबाई , राजारामांच्या पत्नी ताराबाई (माहेरच्या मोहिते) जानकीबाई , राजसबाई (पुत्र संभाजी - १६९८-१७६०) अंबिकाबाई (सती गेली) सगुणाबाई
नातवंडे : संभाजीचा मुलगा - शाहू , ताराबाईची राजारामाची मुले - दुसरा शिवाजीराजा , सईबाईची मुले - दुसरा संभाजी
पतवंडे : ताराबाईचा नातू रामराजा, याला शाहूने दत्तक घेतले, म्हणजे तो स्वतःचाच काका झाला. दुसऱ्या संभाजीचा मुलगा - द्वितीय शिवाजी (खरेतर ३रा शिवाजी) (कोल्हापूर)
मार्गदर्शक : लोककथा आणि इतिहास ह्यांमधे कालौघात पुष्कळदा सरमिसळ होते, आणि त्यामुळे इतिहासाचा नेमका मागोवा घेणे कठीण होते. शिवाजीमहाराजांच्या बाबतीत ती सरमिसळ खूपच आहे; परिणामी शिवाजीराजांना कोणाचे मार्गदर्शन किती मिळाले हे नक्की ठरवणे निदान आज तरी कठीण आहे. युद्धाभ्यास आणि रणनीती तसेच राजकारभार ह्यांसबंधी प्राथमिक मार्गदर्शन त्यांना शहाजीराजांकडून, दप्तरव्यवस्था व न्यायव्यवस्थेचे शिक्षण दादोजी कोंडदेव मलठणकर यांजकडून, तर परकीय सत्तेविरूद्ध लढा करण्याकरता आवश्यक असलेल्या शिस्तीचे शिक्षण जिजाबाईंकडून मिळाले असे मात्र उपलब्ध ऐतिहासिक माहितीवरून निश्चितपणे सांगता येते.
जिजाबाई यांनी बाल शिवाजींच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांस युद्धकला व राजनीतिशास्त्राचे शिक्षण देवविले शिवाय संत एकनाथ महाराजांच्या भावार्थ रामायण, भारूडइत्यादींच्या माध्यमातून बाल शिवबाच्या मनात स्वराज्याचे स्फुल्लिंग चेतविले. पालक व स्वराज्याच्या प्राथमिक संत तुकाराममहाराज ह्यांचे महत्त्वाचे मार्गदर्शनही शिवाजीराजांना लाभले होते.
मावळ प्रांत : छत्रपती शिवाजीराजाच्या सैन्यातील मावळ्यांनी शिवाजीराजांच्या सोबत हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मोठा सहभाग नोंदवला. सह्याद्रीच्या दोन डोंगररांगांच्या मधल्या खोऱ्याला " मावळ " आणि खोऱ्यातील सैनिकांना    " मावळे " म्हणत.


शिवाजी महाराजांचे मावळामधील सवंगडी आणि अन्य प्रसिद्ध मावळे :

कान्होजी जेधे , बाजीप्रभू देशपांडे , मुरारबाजी देशपांडे , नेताजी पालकर , बाजी पासलकर , जिवा महाला : जिवा महाला याचे छायाचित्र असलेले टपाल तिकीटही निघाले आहे. तानाजी मालुसरे , हंबीरराव मोहिते.
शिवाजी महाराजांचे सरसेनापती : नेताजी पालकर , प्रतापराव गुजर , हंबीरराव मोहिते , खंडेराव कदम.
लढाऊ आयुष्य : शिवाजीराजांचे जवळजवळ अर्धे आयुष्य लढाया करण्यात गेले. प्रसंगी घोड्यावरून प्रवास करताना झोपदेखील ते घोड्यावरच आणि केवळ तीन-चार तास घेत असत.
सुरुवातीचा लढा : पहिली स्वारी - तोरणगडावर विजय : इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या शिवाजीराजांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवाजीराजांनी कोंढाणा (सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले. या शिवाय तोरणगडासमोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
राजमुद्रा : छत्रपती शिवाजीराजे जेव्हा पुण्याचा कारभार पाहू लागले, तेव्हा त्यांनी स्वतःची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली. ही राजमुद्रा संस्कृत भाषेत होती. ती खालीलप्रमाणे-
" प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते "
मराठी  अर्थ :
ज्याप्रमाणे प्रतिपदेचा चंद्र वाढत जातो, आणि साऱ्या विश्वात वंदनीय होतो, तशीच शहाजींचा पुत्र शिवाजींची ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल.
इंग्रजी अर्थ :
The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji (Maharaj ) will grow like the first day moon .It will be worshiped by the world & it will shine only for well being of people.
शहाजीराजांना अटक : शिवाजीराजांच्या यशस्वी स्वाऱ्यांना बिथरून शिवाजीराजांना आळा घालण्याची एक युक्ती म्हणून आदिलशहाने शहाजीराजांना अटक केली. शिवाय सुमारे ५००० फौज घेऊन  फत्तेखान  नावाच्या सरदाराला शिवाजीराजांवर हल्ला करण्यास पाठवले. शिवाजीराजांनी  पुरंदरावर  फत्तेखानाचा पराभव केला. बाजी पासलकर सैन्यासकट पळत्या फत्तेखानाच्या  पाठलागावर सासवडपर्य़ंत गेले. सासवडजवळ झालेल्या लढाईत बाजी पासलकरांचा मॄत्यू झाला.
शिवाजीराजांनी मोगल बादशाह शाहजहान यास त्याच्या दख्खनच्या सुभेदाराकरवी (शहजादा मुरादबक्ष) पत्र पाठवून शहाजीराजांसकट त्याच्या चाकरीत जायची इच्छा प्रकट केली. त्याचा परिणाम म्हणून शाहजहानाने आदिलशहावर दबाव आणला आणि परिणामी शहाजीराजांची सुटका झाली. परंतु त्यासाठी शिवाजीराजांना  कोंढाणा  किल्ला, आणि शहाजीराजांना  बंगळूर  शहर  आणि कंदर्पीचा किल्ला आदिलशहाला द्यावा लागला.
जावळी प्रकरण : आदिलशहाशी इमान राखणारा जावळीचा सरदार चंद्रराव मोरे शहाजीराजे आणि शिवाजीराजे यांच्याविरूद्ध आदिलशहाकडे कुरापती काढत असे. त्याला धडा शिकविण्यासाठी इ.स. १६५६ साली शिवाजी राजांनी रायरीचा किल्ला सर केला. त्यामुळे कोकण भागात स्वराज्याचा विस्तार झाला.
पश्चिम घाटावर नियंत्रण : इ.स. १६५९ पर्यंत शिवाजीराजांनी जवळपासच्या पश्चिम घाटातील आणि कोकणातील चाळीस किल्ले जिंकले होते.
आदिलशाहीशी संघर्ष :
अफझलखान प्रकरण : अफझलखान मृत्यू - आदिलशहाच्या ताब्यात असणारे किल्ले जिंकत राहिल्यामुळे इ.स. १६५९ साली आदिलशहाने दरबारात शिवाजी महाराजांना संपविण्याचा विडा ठेवला. हा विडा दरबारी असलेल्या  अफझलखान नावाच्या सरदाराने उचलला. मोठ्या सैन्यासह आणि लवाजम्यासह अफझलखान मोहिमेवर निघाला. अफझलखान वाईजवळ आला तेव्हा शिवाजीराजांनी सध्याच्या महाबळेश्वर जवळ असलेल्या प्रतापगडावरून त्यास तोंड देण्याचे ठरवले. तहाची बोलणी सुरू झाली आणि अंतिम बोलणीसाठी शिवाजी महाराजांनी स्वतः यावे असा अफझलखानचा आग्रह होता. पण शिवाजीराजांच्या वकिलांनी (पंताजी गोपीनाथ बोकील यांनी) अफझलखानाला गळ घालून प्रतापगडावरच भेट घेण्यास बोलावले. भेटीच्या नियमांनुसार दोन्ही पक्षांकडील मोजकीच माणसे भेटीसाठी येतील आणि दरम्यान सर्वांनी नि:शस्त्र राहण्याचे ठरले.
शिवाजीराजांना अफझलखानच्या दगाबाजपणाची कल्पना असल्यामुळे त्यांनी सावधगिरी म्हणून  चिलखत  चढविले  आणि सोबत  बिचवा  तसेच वाघनखे  ठेवली. बिचवा चिलखतामध्ये दडविला होता तर वाघनखे हाताच्या पंजाच्या आतमध्ये वळविलेली असल्यामुळे दिसणारी नव्हती. शिवाजी महाराजांसोबत  जिवा महाला हा विश्वासू सरदार होता तर अफझलखानसोबत सय्यद बंडा  हा तत्कालीन प्रख्यात असा दांडपट्टेबाज  होता. प्रतापगडावरील एका छावणीमध्ये भेट ठरली. भेटीच्या वेळी उंचपुऱ्या, बलदंड अफझलखानाने शिवाजी महाराजांना  मिठी मारली आणि शिवाजीराजांचे प्राण कंठाशी आले. त्याच वेळी अफझलखानने कट्यारीचा वार शिवाजी महाराजांवर केला परंतु चिलखतामुळे शिवाजीराजे बचावले. अफझलखानाचा दगा पाहून शिवाजीराजांनी वाघनखे खानाच्या पोटात घुसवली. त्याचबरोबर अफझलखानाची प्राणांतिक आरोळी चहूकडे पसरली. सय्यद बंडाने तत्क्षणी शिवाजीवर दांडपट्ट्याचा जोरदार वार केला जो तत्पर जिवा महालाने स्वतःवर झेलला आणि शिवाजीराजांचे प्राण वाचले. यामुळेच " होता जिवा म्हणून वाचला शिवा " ही म्हण प्रचलित झाली.
आधीच ठरलेल्या इशाऱ्याप्रमाणे भेटीच्या वेळी तीन तोफांचे बार प्रतापगडावरून काढण्यात आले, आणि खानाच्या छावणीच्या जवळपासच्या झाडाझुडुपांमध्ये दडून बसलेल्या मावळ्यांनी हल्ला करून खानाच्या सैन्याची दाणादाण उडविली. खानाचा मुलगा फाजलखान आणि इतर काही सरदार लपूनछपून वाईच्या मुख्य छावणीपर्यंत आले. इथे खानाचा जनाना होता. ते पाठलागावर असलेल्या  नेताजीच्या  सैन्यापासून  वाचण्यासाठी खजिना, हत्ती व इतर जड सामान टाकून विजापूरला जनान्यासकट पळाले.
शिवाजीराजांना जनतेत मिळालेला आदर आणि प्रेम अनेक शतकांनंतरही टिकून आहे त्यामागचे त्यांची सहिष्णू वृत्ती हे फार महत्त्वाचे कारण आहे. अफझलखानाच्या मृत्यूनंतर त्यांनी त्याच्या शवाचे अंत्यसंस्कार इस्लामी पद्धतीने करून त्याची एक कबर प्रतापगडावर बांधली आणि त्या कबरीच्या कायम देखभालीची व्यवस्था केली.
अफझलखानच्या मृत्यूनंतर शिवाजीराजांनी दोरोजी नावाच्या सरदाराला कोकणपट्ट्यातील आणखी किल्ले आणि प्रदेश जिंकण्यास पाठवले. स्वतः राजे सातारा प्रांतात घुसून कोल्हापुरापर्यंत गेले व त्यांनी पन्हाळा जिंकून घेतला.  नेताजीने त्याच्या सैन्यासह जवळपास विजापुरापर्यंत धडक मारली.
पावनखिंडीतील लढाई : पन्हाळगडापासून काही अंतरावर वाटेत सिद्दीच्या सैन्याने त्यांना घोडखिंडीत गाठले आणि हातघाईची लढाई सुरू झाली. तेव्हा शिवाजीराजांचे विश्वासू पराक्रमी सरदार बाजीप्रभु देशपांडे यांनी शिवाजीराजांना विनंती केली की त्यांनी विशालगडासाठी पुढे कूच करावी आणि खिंडीतील लढाई स्वतः लढतील. विशालगडावर पोहोचताच तोफांच्या तीन डागण्या ऐकू आल्या म्हणजे शिवाजीराजे सुखरूप गडावर पोहचले असा संदेश मिळेल. बाजी प्रभु देशपांड्यांनी वचन दिले की जो पर्यंत तोफांचे तीन आवाज ऐकू येणार नाहीत तो पर्यंत सिद्दी जौहरला खिंडीमध्येच झुंजवत ठेवतील.
शिवाजीराजांना ते पटेना पण 'बाजी' च्या विनंतीवजा हट्टापुढे त्यांनी यास मान्यता दिली आणि विशालगडासाठी कूच केले. बाजींनी सिद्दीच्या सैन्याला रोखून धरण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली, पण संख्येने कितीतरी पटीने अधिक सैन्यापुढे बाजीप्रभूंनी प्राणांची बाजी लावली. ते स्वतः प्राणांतिक रितीने घायाळ झाले होते. शेवटी सैनिकांनी मृत्युपथावर असलेल्या घायाळ बाजींना एके ठिकाणी आणून बसविले, पण बाजींचे प्राण कानाशी साठले होते. थोड्या वेळाने तोफांचे तीन आवाज ऐकू आले आणि शिवाजीराजे गडावर पोहोचल्याचा तो संदेश समजल्यावरच बाजी प्रभु देशपांडे यांनी प्राण सोडले.
शिवाजीराजांना ही बातमी फार चटका लावून गेली. बाजीप्रभू हे ज्या घोडखिंडीत लढले आणि स्वतःच्या प्राणांचे बलिदान दिले त्या घोडखिंडीचे नाव शिवरायांनी पावनखिंडअसे बदलले. बाजीप्रभूच्या बलिदानाने पावन झालेली ती पावनखिंड.

No comments:

Post a Comment