K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 18 February 2019

शिवाजी महाराज कविता



टेकूनी माथा जया चरणी
मी वंदन ज्यासी करितो…
नित्यारोज तयांचे
नवे रूप मी स्मरितो…
न भूतो न भविष्यती
ऐसेची होते माझे शिवछत्रपती…
जन्मले आई जिजाऊ उदरी
पावन झाली अवघी शिवनेरी…
ऐकत असता पोवाडा सदरी
त्यात वर्णिली राणी पद्मिनी…
रजपूत राणी सुंदर विलक्षणी
कैद झाली मोघल जनानखानी…
चरचर कापले हृदय शिवरायांचे
डोळ्यात दाटले अश्रू संतापाचे…
कडाडले शिवरायsss
आम्ही आहो वंशज रामरायाचे
दिवस भरले आता मोघलांचे…
ज्याची फिरेल नजर वाकडी
आईबहिणीकडे….
त्याच क्षणी शीर मारावे
हुकुम घुमला चोहीकडे…
काबीज करता कल्याण-भिवंडी
अमाप आला हाती खजिना…
वेळ न दवडिता सरदारांनी
सादर केला एक नजराणा…
कल्याण सुभेदाराची
स्नुषा विलक्षण सुंदर…
उभी होती राजांपुढती
झुकुवूनी घाबरी नजर…
धीमी पाऊले टाकीत राजे
तिज जवळी आले…
रूप पाहुनी विलक्षण सुंदर
राजे पुढे वदले….
जर का आमच्या मांसाहेब
इतक्या सुंदर असत्या…..
आम्ही तयांचे पुत्र लाडके
असेच सुंदर निपजलो असतो….
वंदन तुजला शतदा करतो
धन्य तू शिवराया….
स्त्री जातीचा मान राखुनी
तूच शिकविले जगाया….!!

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”।। ६ ।।
|| जय जिजाऊ ||...|| जय शिवराय ||....|| जय शंभुराजे||

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠

नाव होतं त्याचं ''छत्रपती शिवाजी''...

महाराष्ट्र माझा होता अंधारात
औरंगजेबरूपी अजगराच्या विळख्यात
...
अडकली होती भवानीमाता माझी
गुलामरूपी साखळदंडांच्या बेड्यांत

तेव्हा घेतला एका प्रकाशाने जन्म
शिवनेरीही झाला धन्य
होते त्याच्यावर जिजाऊचे संस्कार
आणि पाठीवर दादोजींचा हात
डोक्यावर जिरेटोप व हाती भवानी तलवार
घातला स्वराज्याचा पाया छातीवर शोषून वार

होता तो सिंहाचा छावा
खेळून गनिमी कावा
माजवून रणदुदुंभी रणांगणात
खेचून आणला विजय त्यानं आपल्या अंगणात
जिंकून घेतलं आकाश त्यानं
जिंकून घेतले दुर्ग
विशाल सागरालाही पायबंध घातला त्यानं
बांधून सिंधुदुर्ग

नजर त्याची गरूडापरी
पडली सिद्दिच्या जंजिरावरी
केली त्यानं नऊवेळा स्वारी
तरीही पडलं अपयश पदरी
असेल का दुःख यापरी

म्हणून थांबला नाही तो
झुकला नाही तो
पेटून उठला तो मर्दमराठा
भिडला थेट मुघलांना
दिलं त्यानं आव्हान डच, पोर्तुगीजांना
घेतलं अंगावर त्यानं ब्रिटिशांना
शेवटी मराठ्यांचा राजाच तो
पुरून उरला सगळ्यांना

बसून त्यानं दख्खनच्या भूमीं...त
हालवलं त्यानं दिल्लीचे तख्त
उडवली त्यानं दाणादाण औरंगजेबाची
नाव होतं त्याचं ''छत्रपती शिवाजी''

💠💠💠💠💠💠💠💠💠💠💠
महाराष्ट्राची ही पावन भूमी
संताची लाभली पुण्याई
भगवी पताका शिवनेरीची
फडकू दे आता दारोदारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || १ ||

एक एक थेंबातुन दुधाच्या
पाज शौर्य तव बाळासी
नको खेळणी नकोत गोष्टी
नको रात्री ती अंगाई
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || २ ||

होउनी मैतर, मावळा, दादोजी
शिकव रणांगण आणि लढाई
निष्पापांचे रक्त सांडते
अश्रु ढाळी माय भवानी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ३ ||

घर आपुलेच जाहले रणभूमि
आप्ल्यांशिच आपली लढाई
ओरबाडुनि माझ्या मातृभूमीला
राज्यकर्ते आपुली भाजती पोळी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ४ ||

होईल का ग पुन्हा एकदा
इतिहासाची पुनरावृत्ती
एक जाणता राजा मांगे
धाय मोकलून माय मराठी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ५ ||

संहार करू दे
विनाशाचा, नराधमांचा, आतंकाचा
लखलखु दे तलवार विजयी
गर्जु दे पुन्हा एक मर्द मराठा
सह्याद्रीच्या कड़ेकपारी
घडव पुन्हा एक शिवबा आता
आई तूच हो जिजाई || ६ |
===================================
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।

शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।

सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।

याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।

शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।

निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।

No comments:

Post a Comment