K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday, 2 March 2019

भूमिती मुलभूत संबोध (भौमितिक माहिती)

(१)  बिंदू  :-

--  अतिशय अणकुचीदार, सुक्ष्म टोकाने
     कागदावर किंवा कोणत्याही पृष्ठभागावर 
     काढलेल्या टिंबाला बिंदू म्हणतात. 
-------------------------------------------------
(२) रेषा  :-

--- ● दोन टोकाकडे अमर्याद असणाऱ्या 
       आकृतीला रेषा म्हणतात. 
    ●  रेषा हा बिंदूंचा एक समूह आहे. 
------------------------------------------------
(३) किरण :-

--● एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद 
     असणाऱ्या रेषेला किरण असे म्हणतात. 
  ● किरणाचे नाव लिहिताना आरंभ 
     बिंदूकडून बाणाच्या दिशेने लिहितात. 
------------------------------------------------
(४) रेषाखंड  :-

-- दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला 
    रेषाखंड म्हणतात. 
---------------------------------------------------
(५) कोन :-

--- एकाच आरंभबिंदू असणाऱ्या परंतू एकाच 
     रेषेत नसणाऱ्या दोन भिन्न किरणांमुळे जी 
     आकृती तयार होते त्या आकृतीला कोन 
     म्हणतात.
---------------------------------------------------
(६) काटकोन :-

-  ९० अंशाच्या कोनाला काटकोन असे म्हणतात. 
--------------------------------------------------
(७) लघुकोन  :-

-- काटकोनापेक्षा लहान असणाऱ्या कोनाला 
   लघुकोन म्हणतात. 
--------------------------------------------------
(८)  विशालनोन  :-

--- काटकोनापेक्षा मोठ्या असणाऱ्या कोनाला 
     विशालकोन म्हणतात. 
---------------------------------------------------
(९) त्रिकोण :-

-- तिन्ही बाजूंनी बंदिस्त असलेल्या तीन बाजू
   व तीन कोन असणाऱ्या आकृतीला त्रिकोण 
   म्हणतात.
--------------------------------------------------
(१०) चौकोन :-

-- चारही बाजूंनी बंदिस्त असलेल्या चार बाजू
   व चार कोन असणाऱ्या आकृतीस चौकोन 
   म्हणतात.
--------------------------------------------------
(११) चौरस :-

--- ज्या चौकोनाच्या सर्व बाजू एकरूप व प्रत्येक 
     कोन काटकोन असतो. त्या चौकोनास 
     चौरस म्हणतात.
--------------------------------------------------
(१२) आयत :-

--- ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजू 
    समान लांबीच्या व सर्व कोन काटकोन 
    असतात. त्या चौकोनास आयत म्हणतात. 
--------------------------------------------------
(१३) वर्तूळ  :-

- ● एका स्थिर बिंदूपासून स्थिर अंतरावरील 
     बिंदूसंचास वर्तुळ म्हणतात.

 ● भूमितीनुसार एका बिंदूपासून समान अंतरावर 
     असणाऱ्या व एकाच प्रतलावर असणाऱ्या 
     सर्व बिंदूच्या संचाला वर्तुळ असे म्हणतात. 

No comments:

Post a Comment