K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 23 March 2019

​🔹२२ मार्च : जागतिक जल दिन

           पाण्याची गरज नाही असे कोणतेच क्षेत्र आढळणार नाही. परंतु, एकंदरीत पाण्याचा अविचारी, आयोग्य आणि अतिवापर होत असल्याचे काही दशकांपूर्वी जाणवले. गोड्या म्हणजेच पिण्यायोग्य पाण्याचे निसर्गातील प्रमाण अगदीच मोजके असल्याने त्याचा अत्यंत जपून वापर करणे, त्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी मिळवण्यासाठी तिसरे महायुध्द होण्याची शक्यता वर्तवली जाते इतके त्याचे महत्त्व आहे !

▪️मूळ संकल्पना व सुरुवात

संयुक्त राष्ट्रसंघ म्हणजेच युएनओच्या सर्वसाधारण सभेने २२ मार्च १९९३ रोजी पहिला ‘वर्ल्ड वॉटर डे’ साजरा केला. तेव्हापासून दरवर्षी, युनोच्या जागतिक जलविकास अहवालाशी सुसंगत असलेली, वेगळी संकल्पना वापरण्याची प्रथा आहे. उदा.२०१५ ची संकल्पना होती पाणी व शाश्वत विकास- कारण पाण्याच्या अविचारी वापराने खरा विकास न होता आपले जीवन भकास होईल.

▪️अधिक माहिती

तहान लागल्यावर विहीर खणू लागल्याने पश्न सुटत नाही. त्यासाठी या बाबींकडे सर्वांचेच सतत लक्ष असले पाहिजे-

― पाण्याचा योग्य आणि आवश्यक तितकाच वापर करणे.
― पाण्याचा स्रोत प्रदूषित न करणे.
― जगात गोड्या पाण्याच प्रमाण मुळातच फार कमी आहे.
― पिण्याचे पाणी सर्वांनाच गरजेप्रमाणे मिळेल हे पाहणे.

▪️साधी तरीही अत्यंत महत्त्वाची कृती

स्वत: ला खरोखरी किती पाण्याची गरज आहे हे समजून घेऊन तितकेच पाणी प्रत्येकाने वापरले आणि या मुद्याचा प्रसार केला तरी खूप काही साधेल!

चला जागतिक जल दिन साजरा करू या
       एखाद्या महत्वाच्या प्रश्‍नावर आपले लक्ष केंद्रीत करण्यासाठी, आपण त्या प्रश्‍नाचे महत्व जनमानसावर बिंबवण्यासाठी एखादा दिवस राष्ट्रीय दिन म्हणून पाळतो. पाणी प्रश्‍न दिवसेंदिवस आक्राळ विक्राळ रूप धारण करीत आहे. त्यामुळे सामान्य माणसाला पाण्याचे महत्व पटावे म्हणून आपण गेल्या काही वर्षांपासून जागतिक जल दिन साजरा करीत असतो. त्या निमित्ताने पाणी प्रश्‍नावर समाजात उद्बोधक चर्चा व्हावी, पाणी प्रश्‍नाचे खरे रूप सामान्य माणसाला कळावे, जनतेनी तो प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने काही संकल्प करावेत या दृष्टीने दर वर्षी २२ मार्च हा दिवस जागतिक जलदिन म्हणून पाळला जातो.

       हा जागतिक दिन साजरा करणे सुरू करण्याचा मान एका भारतीयाला जातो हे आपल्याला माहित आहे काय ? जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ, स्टॉकहोम जल पुरस्काराचे विजेते डॉ. माधवराव चितळे यांनी हा प्रश्‍न सर्वप्रथम जागतिक मंचावर मांडला. त्यावर भरपूर चर्चा होवून २२ मार्च हा दिवस निवडण्यात आला. सुरूवातील हा दिवस निवडण्याबद्दल जल तज्ज्ञात मतभेद होते. काही जण २२ मार्च बद्दल तर काही जण २२ सप्टेंबर बद्दल आग्रही होते. विषुववृत्ताने पृथ्वीचे दोन भाग पडतात. त्याचे वरचा एक भाग तर त्याचे खालील एक भाग. वरच्या भागातील देशांना २२ मार्च ही तारीख पसंत होती तर खालच्या भागातील देश २२ सप्टेंबर बद्दल आग्रही होते. खालच्या भागातील देशांपेक्षा वरच्या भागात जास्त देश आहेत हे आपल्याला माहित आहे. त्यामुळे मतदान झाल्यावर २२ मार्च तारीख निश्‍चित झाली हे सांगायला नको.

२२ मार्च ह्या दिवसाचे असे काय वैशिष्ट्य आहे की हा दिवस निवडला जावा ? दरवर्षी पावसाळा सुरू होण्यासाठी २२ मार्च पासून वातावरण बदल व्हावयास सुरूवात होते. त्यामुळे तात्विक दृष्ट्या पावसाळ्याची सुरूवात होण्यासाठी हा दिवस कारणीभूत ठरतो हा तर्क वापरून हा दिवस निवडण्यात आला.

पाण्याशी निगडीत खरे प्रश्‍न कोणते ?

एखादी गोष्ट अति परिचित असली तर त्या गोष्टीबद्दल जास्त अज्ञान असते. पाण्याबाबत नेमकी हीच परिस्थिती आहे. याचा वापर करावयाची आपल्याला इतकी सवय लागून गेली आहे की त्याच्याशी निगडीत प्रश्‍न सतत दुर्लक्षिले जातात. पाण्याशी संबंधित प्रश्‍न नेमके कोणते आहेत त्यांची आपण यादी करू या.

१. पाण्याकडे पहाण्याची मानसिकता कशी बदलता येईल ?
२. पावसाच्या पध्दतीत होणार्‍या बदलांची नोंद घेवून पाण्याची साठवणूक कशी करता येईल ?
३. भूजलाची घसरती पातळी कशी थांबविता येईल ?
४. नद्यांचे बारमाहीकरण कसे करता येईल ?
५. तलावांवरील आक्रमण थांबवून त्याचे संवर्धन कसे करता येईल ?
६. पाण्याचे वाढते दुर्भिक्ष लक्षात घेवून त्याचा पुनर्वापर कसा करता येईल ?
७. पाण्याच्या वाढत्या प्रदूषणाला आळा कसा घालता येईल ?
८. पाण्याचा अधिक उत्पादक पध्दतीने वापर कसा वाढविता येईल ?
९. पाणी वितरणाचे व्यवस्थापन कसे सुधारता येईल ?
१०. पाण्याचे सरकारीकरण कसे थांबविता येईल ?

मानसिकतेत बदल :

पूर्वीचे काळी लोकसंख्या खूप कमी होती. त्यामुळे दरडोई पाण्याची उपलब्धता जास्त होती. आता लोकसंख्या वाढीमुळे दरडोई उपलब्धता घसरली आहे. पण माणसाने पाण्याच्या वापरात मात्र काहीच बदल केले नाहीत. या उलट पाणी वापराचे नवनवीन मार्ग मात्र तो शोधित असतो. त्यामुळे पाणी प्रश्‍नाची तीव्रता वाढतच चालली आहे. ती थांबवायची असेल तर आपण आपली मानसिकता बदलून पाणी बचतीचे नवनवीन मार्ग शोधून काढावयास हवेत.

पावसाचे पध्दतीत बदल :

हवामानात होत चाललेल्या बदलामुळे पावसाच्या पध्दतीत झपाट्याने बदल होत आहेत. पावसातील नियमितपणा कमी होवून तो बेभरवशाचा होत आहे. पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. त्या बरोबर पावसाचा वेगही वाढत चालला आहे. वेगाने पडणारा पाऊस वेगाने वाहून जातो व आपले भांडे मात्र रिकामेच राहते. त्यामुळे पावसातील बदलांची नोंद घेवून आपल्याला त्याचा संग्रह कसा करता येईल याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे.

भूजलाची घसरती पातळी :

पाण्याची वाढती गरज भागविण्यासाठी आपण भूजलाचा उपसा भरमसाठ वाढविला आहे. कोणत्याही प्रकारचे जल पुनर्भरण न करता निव्वळ उपसा वाढविल्यामुळे भूजल पातळी वेगाने घसरत आहे. भूजल साठे खरे पाहिल्यास राखीव स्वरूपाचे साठे आहेत. ते हात राखूनच वापरले जावेत. पण आपण मात्र आपल्या ऐहिक सुखासाठी वेगाने उपसा केल्यामुळे आज भूजलावर संकट आले आहे. हे असेच चालू राहिले तर निसर्ग आपल्याला कधीच माफ करणार नाही. कृत्रिम पध्दतीने जलसाठे कसे वाढविता येतील याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ येवून ठेपली आहे.

नद्यांचे बारमाहीकरण :

वेगाने नद्यांचे पाणी वाहून जात असल्यामुळे पावसाळा संपताच नद्या कोरड्या पडत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे नद्या पूर्वीसारख्या बारमाही कशा वाहू शकतील याचा विचार करावा लागणार आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात या बाबत यशस्वी प्रयोग करण्यात आले आहेत. त्या प्रयोगांचे यशापयश तपासून तशी योजना देशभर राबविता येणार नाही काय याचा विचार गंभीरपणे केला जावा.

तलावांचे पुनरूज्जीवन :

ग्रामीण भागातील पाणी पुरवठा आणि सिंचन या साठी तलावांचे पुनरूज्जीवन अत्यंत निकडीचे आहे. पूर्वी भारत हा तलावांचा देश म्हणून प्रसिध्द होता. आज तलावांवरील अतिक्रमाणांमुळे कित्येक तलाव बुजवण्यात आले. एवढेच नव्हे तर वाढत्या नागरी वस्तींची गरज भागविण्यासाठी तलावांचे आकार घटत आहेत. यामुळे ग्रामीण पाणी प्रश्‍नाने गंभीर रूप धारण केले आहे. यासाठी सरोवर संवर्धिनीसारखी चळवळ उभारावी लागणार आहे.

पाण्याचा पुनर्वापर :

लोकसंख्येच्या तुलनेत पाणी कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे तेच ते पाणी पुन्ह: पुन्हा वापरावे लागणार आहे. आज तंत्रज्ञान वेगाने विकसित होत आहे. त्यामुळे जल शुध्दीकरणाचे नवनवीन मार्ग सापडत आहेत. या मार्गांचा वापर करून पाण्याचा पुरवठा वाढविणे शक्य झाले आहे. सिंगापूर सारख्या देशात या मार्गाचा फार झपाट्याने वापर सुरू झाला आहे. अरब देश समुद्राचे पाणी शुध्द करून पिण्यासाठी सुध्दा वापरत आहेत. आज जरी नाही तरी उद्या आपल्याला सुध्दा याच मार्गाने जावे लागणार आहे.

पाण्याचे वाढते प्रदूषण :

पाण्याचा सर्वात महत्वाचा दुर्गूण म्हणजे ते कोणाशीही तात्काळ मैत्री करते. प्रदूषकांचा पाण्याशी संबंध आल्यास ते अगदी सहजपणे त्याच्या विळख्यात सापडते व चांगले शुध्द पाणी प्रदूषित होवून जाते. माणसाला होणार्‍या विकारांपैकी ९० प्रतिशत विकार प्रदूषित पाण्यामुळे होतात असे वैद्यक शास्त्र म्हणते. जिवाणू आणि विषाणू पाण्याच्या संपर्कात आले तर पाणी प्रदूषित होते. सध्या यामुळे नद्यांतील, तलावांतील एवढेच नव्हे तर भूगर्भातील पाणी सुध्दा प्रदूषित झाले आहे. यावर ताबडतोब उपचार न झाल्यास सामाजिक आरोग्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही.

पाण्याचा उत्पादक कारणासाठी वापर :

आज जगात मोअर क्रॉप पर ड्रॉप ऑफ वॉटर चे नारे लावले जात आहेत. या मानाने आपण फारच मागासलेले आहोत. कारण पाण्याचा उत्पादकतेने वापर करण्यात आपण फारच मागे पडलो आहोत. आपल्याला देशात शेतीसाठी जी सिंचम व्यवस्था वापरली जाते तिला प्रवाही पध्दती म्हणतात. या पध्दतीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात दुर्वापर होतो व पाण्यासारखे दुर्मिळ संसाधन आपण वाया घालवितो. देशाची प्रगती करावयाची असेल तर पाणी अधिक उत्पादक पध्दतीने वापरावे लागेल.

पाण्याचे वितरण असमाधानकारक :

पाण्याच्या वापरात आज आपल्या देशात झुंडशाही आढळते. बळी तो कानपिळी याचा प्रत्यय आपल्याला या क्षेत्रात येतो. आपल्या देशात काही लोक अति खाऊन मरतात तर काही खायला न मिळाल्यामुळे मरतात. तीच परिस्थिती पाण्याचे बाबतीत आढळून येते. काही जमिनी अति सिंचनामुळे नापिक व्हावयास लागल्या आहेत तर काही पाणी न मिळाल्यामुळे नापिक आहेत. पाणी वितरण संस्था स्थापून त्यांचे हाती हा कारभार सोपवून आपल्याला पाण्याचे समान वितरण साधावायाचे आहे.

पाण्याचे सरकारीकरण धोक्याचे :

जी गोष्ट नीट सांभाळू शकतो तीच आपल्या हातात ठेवावी हे शहाणपण आपले सरकार कधी शिकणार नकळे. आज संपूर्ण पाणी प्रश्‍न सरकारमय झाला आहे. सरकारने मोठी धरणे बांधून ठेवली पण त्याची योग्य वितरण व्यवस्था न उभारल्यामुळे त्या पाण्याचा योग्य वापरच होत नाही. नागरी पाण्याचे वितरणही समाधानकारक नाही. जल वितरणात लोकांचा सहभाग नाही व त्यामुळे पाणी प्रश्‍न सरकार निर्मित तर नाहीना असे वाटावयास लागले आहे. जागतिक बँक आपल्याला पाणी व्यवस्था सुधारा असे वारंवार सांगत आहे. पण या क्षेत्रात केली जाणारी प्रगती अत्यंत धीम्या गतीने चालू आहे.
       या सर्व प्रश्‍नांवर जलजागरण होणे आवश्यक आहे. जलदिनाच्या निमित्ताने यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. लोकांना प्रश्‍न समजला तरच त्याची उत्तरे शोधली जावू शकतील. म्हणून आपण सर्वांनी मिळून जागतिक जल दिन साजरा करू या व या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकू या.

जागतिक जल दिवस जगभरात 22 मार्चला साजरा करण्यात येतो. युनायटेड नेशन वॉटर (United Nations Water) या संस्थेद्वारे या  दिवसाचे आयोजन केले जातं. पृथ्वीवर जमिनीखाली पाण्याचे अनेक नैसर्गिक स्त्रोत असतात. ज्यामधून नदी, विहीर, झरे, तलावांना पाणी मिळत असतं. मात्र प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे आज हे नैसर्गिक स्त्रोत लुप्त होत आहेत. हीच परिस्थिती कायम राहिली तर पाण्याचा  दुष्काळ पडण्याची शक्यता दाट आहे. पाण्याच्या दुष्काळामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत होऊ शकते. पुढील पिढीचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आताच याबाबत योग्य पावलं उचलणं गरजेचं आहे. यासाठी जागतिक जल दिवसानिमित्त जगभरात स्वच्छ आणि ताज्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपण्यासाठी जागरुकता निर्माण केली जायला हवी. खरंतर यासाठी जागतिक जल दिवसाचे (International water day) आयोजन करावं लागणं हे माणसाचं खूप मोठं दुर्देव आहे. कारण निसर्गाने माणसाला बहाल केलेली जलसंपत्ती माणसाने स्वतःच्या हातानेच वाया घालवलेली आहे. ज्यामुळे पाणी वाचवा जीवन जगवा या घोषवाक्याचा प्रचार आणि प्रसार करणं आज अत्यंत गरजेचं झालं आहे. म्हणूनच यंदाच्या जागतिक जल दिवसानिमित्त या संकल्पनेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ही पाणी वाचवा घोषवाक्य नक्कीच उपयुक्त आहेत.

जागतिक जलदिनानिमित्त पाणी वाचवा घोषवाक्य - Save Water Slogans In Marathi

१. पाणी जीवन आहे त्याची काळजी घ्या

२. पाणी नाही द्रव्य ते आहे अमृततुल्य 

३. दुष्काळाची नको असेल आपत्ती, तर वेळीच जपा जलसंपत्ती

४. थेंब थेंब वाचवा पाण्याचा हाच मार्ग आहे सुखी भविष्याचा

५. ठिंबक आणि तुषार सिंचनाची किमया न्यारी, कमी पाण्यात मिळेल उत्प्नन्न भारी

६. जीवन हवं असेल सुंदर तर वेळीच करा काटकसर

७. पाणी अडवा, पाणी जिरवा, भविष्यात तुम्हाला जे जे हवं ते मिळवा

८. पाण्याचे संवर्धन करा आणि मुलांच्या भविष्य सुरक्षित करा

९. शुद्ध पाण्याचे नवे तंत्र,सुखी जीवनाचा हाच खरा मंत्र 

१०. स्वच्छ पाणी, सुंदर परिसर, तुमचे जीवन होईल सुखकर

११. पाणी शुद्धीकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्यसंपन्न करू 

१२. सांडपाण्याची करू या विल्हेवाट, गावात होईल आरोग्याची पहाट

१३. पाणी वाचवण्याची धरू या कास, सर्वांचा होईल नक्कीच विकास

१४. पाणी सिंचन क्षेत्र वाचवूया नवीन पिढीला शिकवण देऊ या

१५. बचत पाण्याची गरज काळाची 

१६. पाणी बचत करेल जीवन सुसंगत 

१७. पाण्याच्या स्वच्छतेविषयी दक्षता घेऊ, सर्व रोगराईला दूर ठेवू

१८. पाण्याचे पुर्नभरण, जीवनाचे संवर्धन

१९. थोडे सहकार्य आणि थोडे नियोजन, पाण्याने वाचेल सर्वांचे जीवन

२०. पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा

२१. वाचवाल पाणी आणि राबवाल जलनीती तर पळून जाईल दुष्काळाची भीती

२२. पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्याचा करा प्रयत्न

२३. पाण्याचे संरक्षण वसुधंरेचे करा रक्षण

२४. पाणी म्हणजे पृथ्वीचं स्पंदन, जीवसृष्टीसाठी आहे जीवन

२५. पाणी वापरा जपून म्हणजे भविष्य राहील टिकून

२६. स्वच्छ पाणी घरोघरी, आरोग्याची खरी हमी 

२७. पाणी म्हणजे जीवनाचे सार, याचा तुम्ही  करा विचार

२८. पाणी वाचवा जीवन वाचवा

२९. पाण्याविना जीवन बेजार, जीवसृष्टीला त्याचाच आधार

३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी

३०. पिण्यासाठी शुद्ध पाणी, नाही होणार आरोग्याची हानी

३१. सांडपण्याचा पुर्नवापर, जीवनाला द्या आकार

३२. पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाही पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ

३३. पाणी वाचवण्याचा ध्यास, भविष्याचा होईल विकास

३४. स्वच्छ पाणी आणि सुंदर परिसर, आरोग्य राहील तुमचे निरंतर

३५. प्रत्येक गावात एक नारा, पाण्याची काटकसर करा

३६. पाण्याची शुद्धता राखा आजारपणातून मिळेल मुक्तता 

३७. पाण्याचे योग्य नियोजन, आनंदाने फुलवा तुमचे जीवन

३८. वाचवा थेंब थेंब पाण्याचा, हाच एकमेव मार्ग सुखी होण्याचा

३९. पाणी देते जीवनदान पाणी वाचवणे हेच श्रेष्ठ काम

४०. पाणी वाचवा पाणी तुम्हाला वाचवेल

२०. पाणी वाचवल्याने होईल फायदा मिळेल सर्वांना जलसंपदा.

४१. वाणी आणि पाणी जपून वापरा, वाणी जपली तर वर्तमान 
काळ चांगला राहील आणि पाणी जपलं तर तुमचा भविष्यकाळ शाबूत राहील.

४२. पाणी घ्या ओगराळ्याने, दूषित करू नका तुमच्या हाताने
जलसंवर्धन आणि जलसंरक्षण, लहान मुलांना द्या ही शिकवण

४३. प्रदूषण थांबवा पाणी वाचवा

४४. भविष्याची नको हवी असेल चिंता तर आताच पाणी वाचवा

४५. गरिब असो श्रीमंत पाणी वाचवा नाहीतर कराल खंत

४६. सुरक्षित साधन पाण्याचे, महत्त्व पटवा हातपंपाचे

४७. नका वाया घालवू पाणी आणि इंधन, हेच आहे देशाचे खरे धन

४८. पाण्याविना माणसाचा जन्म आहे व्यर्थ, पाणी वाचवण्याचे समजून घ्या महत्त्व

४९. पाण्याचे महत्त्व पटवा, भविष्याची चिंता मिटवा

५०. पाणी वाचवा, पुढच्या पिढीला काय द्यायचे हे आताच ठरवा.

जलप्रतिज्ञा

No comments:

Post a Comment