K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday, 22 January 2021

 शरीरातील रक्त कमी झाले कसे ओळखाल?

         शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणे ही आता सामान्य समस्या झाली आहे. ही समस्या पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त दिसून येते. जेव्हा रक्ताची कमतरता भासते तेव्हा शरीरात हिमोग्लोबिन कमी असते.

        हिमोग्लोबिन हे एक प्रकारचे प्रोटीन आहे त्यामुळे शरीरातील ऑक्सीजनच्या प्रसारणाचे काम पार पाडते. त्याच्या कमतरतेमुळे ॲनिमिया नावाचा आजार होतो

        ॲनिमियाचे प्रमुख तीन प्रकार आहेत.

1- शरीरात रक्ताचे प्रमाण कमी असणारा ॲनिमिया
2- हेमोलायसिस ॲनिमिया
3- रक्तात पेशींचे प्रमाण कमी असल्याने होणारा ॲनिमिया

ॲनिमियाचे कारण


4- लोह्याच्या तत्वाची कमतरता
5- व्हिटॅमिन बी-12 ची कमतरता
6- फोलिक ॲसिडीचे कमी प्रमाण
7- गरजेपेक्षा जास्त रक्त असल्यानंतर सुध्दा ही समस्या उद्भवते. 

8- पोटात इन्फेक्शन झाल्यास
9- धुम्रपान केल्यास
10- रक्ताची कमतरता
11- वृध्दत्व
12- काही औषधांचे अतिसेवन

ॲनिमियाचे लक्षण

1- जास्त झोप येणे
2- थकवा जाणवणे.
3- अस्वस्थता
4- श्वास घेण्यास त्रास होणे.
5- भिती वाटणे.
6- सर्दीमुळे जास्त संवेदनशिल होणे.
7- पाय आणि हातावर सुज
8- क्रोनिक हार्ट बर्न
9- जास्त घाम येणे


रक्तवाढीसाठी काय उपाय  कराल? -

मध :-
        मध अनेक आजारांचे औषध आहेॲनिमियाचे रुग्णांसाठी हे खूप फायदेशीर असते. 100 ग्रॅम मधामध्ये 0.42 मिली ग्रॅम आयर्न असते. म्हणून हे खाल्यास रक्ताच्या प्रमाणात वाढ होते.

कसा खावा मध

एका लिंबूच्या रसात एक ग्लास पाणी मिसळा. त्यानंतर एक चमचा मध मिसळा. रोज असे एक ग्लास लिंबू पाणी प्यायल्यास तुमच्या शरीरात रक्ताची वाढ होईल.

पालक :-

        पालकाची भाजी ॲनिमियासाठी औषधासारखे काम करते. यामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन , बी9, व्हिटॅमिन आणि व्हिटॅमिन सी, फायबर, बीटा केरोटीनचा सामावेश असतो. अर्धा कप उकळलेल्या पालकामध्ये 3.2 मि.ग्रा. आयर्नचा सामावेश असतो. याचे एकदा सेवन केल्यास महिलांच्या शरीरातील 20 टक्के आयर्नची कमतरता पूर्ण करते.

कशी खावी पालकाची भाजी

हिरव्या भाज्यांमध्ये पालक टाकून खावे. सोबतच, सलाडच्या रुपातसुध्दा याचे सेवन केले जाऊ शकते. पालकाला उकळून त्याचे सूप बनवले जाऊ शकते. याचे सूप पिल्यास रक्ताचे प्रमाण वाढते.

बीट :-

        बीटला ॲनिमियासाठी एक रामबाण उपाय मानले जाते. हे लोह तत्वपूर्ण फळ आहे. बीट हे रक्त पेशींना उर्जी देण्याचे काम करते. रक्त पेशी ॲक्टीव्ह झाल्यास त्या पूर्ण शरीरात ऑक्सीजन प सरवण्यास मदत करतात. म्हणून ॲनिमियामुळे त्रस्त लोकांनी आपल्या रोजच्या डायटमध्ये याचा समावेश करणे गरजेचे आहे.

कसे खावे बीट

बीटला शिमला मिरची, गाजर, टोमॅटोसारख्या भाज्यांमध्ये मिक्स करून खावे.

याव्यतिरिक्त बीटला सलाडच्या रुपात किंवा ज्यूस तयार करूनसुध्दा खाऊ शकता.

पनीर बटर :-

        पनीर बटर हे प्रोटीनयुक्त असते. म्हणून पनीर बटरचा आपल्या रोजच्या डायटमध्ये समावेश करण्याचा प्रयत्न करावा. रोज पंचवीस ग्रॅम शेंगदाणे खाल्यास सुध्दा ॲनिमियापासून आराम मिळतो. दोन चमचे पनीर बटरमध्ये 0.6 मिली ग्रॅम आयर्नचा समावेश असतो.

कसे खावे पनीर बटर

रोज सकाळी ब्रेडवर पनीर बटर लावून खावे. त्यानंतर संत्र्याचे ज्यूस पिल्यास शरीराला आयर्न मिळण्यास मदत होते.
कोणत्याही पदार्थात याचे सेवन केल्यास फायदा होऊ शकतो.

टोमॅटो :-

        टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि लायकोपिनचे प्रमाण आढळून येते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आयर्नला एब्जार्ब करण्याचे काम करते. सोबतच, यामध्ये बीटा केरोटीन आणि व्हिटॅमिन यांचासुध्दा समावेश असतो. म्हणून हे शरीरासाठी नॅचरल कंडिशनरचे काम करते.

कसे खावे टोमॅटो

टोमॅटोला सलाडच्या रुपात खाऊ शकता. याव्यतिरिक्त ज्यूस किंवा सूप बनवून त्याचे सेवन करू शकता.

सोयाबीन :-

        सोयाबीन आयर्न आणि व्हिटॅमिनयुक्त असते. याचे सेवन केल्यास लो फॅटसह जास्त प्रमाणात आयर्न मिळण्यास मदत मिळते. म्हणून ॲनिमिया रुग्णांसाठी खूप लाभदायक आहे.

कसे खावे सोयाबीन

सोयाबीनला रात्री कोमट पाण्यात भिजवावे. त्यानंतर उन्हात वाळवून घ्यावेत.
गहू आणि सोयाबिन एकत्र दळून त्याच्या चपाती तयार कराव्या.
याव्यतिरिक्त सोयाबीनला उकळून त्याचेसुध्दा सेवन करता येऊ शकतो.

 

 

Thursday, 21 January 2021

 दहावी व बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर..

          दहावी व बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कधी व कशा होणार याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.

         कोरोना विषाणूच्या संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात आले होते. दहावी बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु झाल्यानंतर दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. आता हा प्रश्न दूर झाला आहे. परीक्षा कधी होणार?  याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. 

     बारावी ची परीक्षा व निकाल कधी?

        बारावीची लेखी परीक्षा येत्या २३ एप्रिल पासून सुरु होणार आहे. तर प्रॅक्टिकल परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा २७ मे २०२१ ते ५ जून २०२१ दरम्यान होईल. आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.   

     दहावी ची परीक्षा व निकाल कधी?

        दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेतली जाईल. तर प्रॅक्टिकल परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा २८ मे २०२१ ते ९ जून २०२१ दरम्यान होईल. आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. 


Wednesday, 20 January 2021

 बारावीत दोनदा नापास झालेला वैभव नवले PSI च्या परीक्षेत राज्यात पहिला.

     बारावीच्या परिक्षेत दोनदा नापास तर राज्य लोकसेवा आयोगाच्या दुसऱ्याच परिक्षेच्या प्रयत्नात बाजी मारत करमाळ्याच्या वैभव अशोक नवलेने महाराष्ट्र पहिला येत पोलिस उपनिरिक्षक पदावर विराजमान होण्याची संधी मिळवली आहे. विशेष म्हणजे वैभव मागील परिक्षेत पहिलाच प्रयत्न असतानाही अवघ्या एका मार्काने अपयशी ठरला होता तर तालुक्यातुन आठ जण परिक्षा उत्तीर्ण झाले होते. पण यंदा मागील अपयश धुऊन लावत वैभवने परिवारासह तालुक्याचे नाव महाराष्ट्रात कमावले आहे.

     वैभव नवले याचे वडील सामान्य कुटुंबातील त्यांनी करमाळा आगारात क्लार्क म्हणुन नोकरी केली आहे. सेवा निवृत्त झाल्यानंतर मुळचे कंदरचे पण करमाळ्यात स्थायिक झाले आहेत. वैभव ने आपले शिक्षणाला सुरुवात करमाळा येथील नगरपरिषद मराठी शाळा क्रमांक तीन मधुन सुरुवात केली. त्यानंतर महात्मा गांधी विद्यालयातुन शिक्षण घेत असताना अकरावी व बारावीला विज्ञान विभागात प्रवेश मिळवला. अभ्यासात जेमतेम असल्याने २००९ व २०१० ला सलग दोन वर्षी बारावीची परिक्षा अनुउत्तीर्ण झाला. दोन्ही वर्षी चार चार विषय गेले पण न खचता वैभवने यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कला शाखेतुन प्रवेश मिळवला व आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले. मागील वर्षी पोलिस उपनिरिक्षक पदी विराजमान झालेल्या कृनाल घोलप यासह इतर मित्रांच्या संगतीत वैभव पुढील परिक्षांच्या तयारीसाठी २०१६ ला पुणे येथे गेला. अनुभव घेण्यासाठी काही शिबीरेही त्याने घेतली. कधी शिकवणी किंवा वेगळे शिक्षण न घेता मित्रांच्या अनुभव व अभ्यासावर अभ्यास करीत राहिला.

Tuesday, 19 January 2021

 Digital Tools for Education Webinar Time-Table


 https://drive.google.com/file/d/1-ZmwPv4B4zoOQbnPK_Ndf2meihEFUUZf/view



     दैनंदिन अध्यापन करत असताना विविध डिजिटल टुल्सचा यशस्वी व प्रभावी वापर करता येणे गरजेचे आहे. त्यासाठी " Digital tools for education " या विषयावरील दोन दिवसीय वेबिनार प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे व गुगल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणार आहे. सदर वेबिनार मध्ये अध्यापनासाठी उपयुक्त अशा सर्व गुगल टुल्सच्या वापराबाबत प्रात्यक्षिकासह सविस्तर प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

यामध्ये Google  meet,

 Google drive, 

Google docs, 

Google sheets, 

Google slides, 

Google classroom 

यांचा समावेश आहे. 

*दि.२२.०१.२०२१ रोजीचे नियोजन*


*वेळ - १०.०० ते ११.३०*

*विषय* - 👇

*Program inauguration* 10min

*Google meet intro*  10min

How to use *Google Drive* 10min

How  to use *Google Docs* 10min

How to use *Google Slides* 15min

How to use *Google forms* 15min

How to use *Google Sheets* 5min

How to use *Google Classroom* login details 5min

Question and answer *FAQs* 10min

        या प्रशिक्षणासाठी सर्व शिक्षकांनी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. 


 नावनोंदणी साठी  लिंक


https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeBYeMEgtXhKtN058_oI7g8qNcvVf-t5iZnjxoZVdyv1yEr7g/viewform?gxids=7826


       आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शिक्षकांना सदर वेबिनारबाबत अवगत करुन तसेच वेबिनार लिंकवर नावनोंदणी करुन प्रत्यक्ष वेबिनारला उपस्थित राहणे बाबत सुचित करण्यात यावे, असे संचालक MSCERT पुणे यांनी म्हटले आहे. 

    आपल्या केंद्राच्या ग्रुपवर तसेच इतर सर्व शैक्षणिक ग्रुप वर शेअर करा.

Saturday, 16 January 2021

 मुलांच्या राग, चिडचिड व आक्रस्ताळीपणावर उपाय

मुलांच्या भावनांशी समरस होऊन त्यांच्या राग, चिडचिडेपणा, अबोला, हट्टीपणा, आदळ-आपट व आक्रस्ताळीपणा यावर विजय मिळवण्यासाठी पुढील टिप्स् चा उपयोग करा.

गेल्या अनेक महिन्यांपासून ऑनलाइन शाळा सुरु आहेत. तसंच खेळायला घराबाहेर जाता येत नाही. त्यामुळे आपल्या लहानग्यांचा दिवसातील बराचसा वेळ मोबाइल, टीव्ही या माध्यमावर जातोय. यातूनच प्रचंड प्रमाणात वाढलेला स्क्रीन टाइम आणि टीव्ही-मोबाइलवर पाहिल्या गेलेल्या घातक दृश्यांमुळे मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम होत आहे. यामुळे मुलं रागीट आणि चिडचिडी होत आहेत.

सध्याच्या काळात आणि नंतरही मुलामुलींच्या वर्तनामध्ये बदल घडताना दिसत आहेत. काहींमध्ये वर्तन समस्याही दिसत आहेत. हट्टीपणा, आक्रस्ताळीपणा वाढला आहे. बऱ्याच मुलांमध्ये मोबाइलचं वेड वाढलं आहे. तर काहींना नैराश्य तर काही चिंताग्रस्त होताना दिसत आहेत.

भावनांच्या निगडित क्षमता :-

कौशल्यं कमी असल्यास मुलं चुकीच्या पद्धतीने व्यक्त होतात, त्याला आपण गैरवर्तणूक म्हणतो. मुलांच्या प्रत्येक वर्तनाच्या मागे काहीतरी भावना असतात उदा. हट्टीपणा\आक्रमकता. यामागे राग, एकाकीपणा, कंटाळा या भावना असू शकतात. मुलांच्या वर्तनांना समोरं जाताना पालक म्हणून त्यांच्या भावनांना योग्य प्रतिसाद देणं अपेक्षित असतं. ते योग्य प्रकारे झालं नाही तर वर्तणुकीमध्ये बदल होताना दिसत नाहीत. पालक म्हणून आपला भावनांबद्दल दृष्टिकोन काय आहे यावर बऱ्याचदा सर्व अवलंबून असतं. उदा. भीती कमकुवत बनवते, रागापासून चार हात दूर राहा, भावना कमकुवत बनवतात, मनाने सक्षम राहिलं पाहिजे असा चुकीचा दृष्टिकोन बघावयास मिळतो. भावना काहीतरी उपयुक्त संदेश घेऊन येते असं नवीन संशोधनातून निष्पन्न झालं आहे. राग आणि भीती यासारख्या नकारात्मक भावनाही आपल्याला तितक्याच गरजेच्या आहेत. मुलांच्या भावना नजरेआड करतो, त्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

मुलांच्या भावनांचे कोच व्हा! :-

मुलांमध्ये तीव्र भावना असताना संवाद साधताना आपण त्यांच्या भावनांचे कोच होऊ शकतो. कल्पना करा तुमचा ८ वर्षांचा मुलगा मोबाइल न मिळाल्यामुळे प्रचंड उद्वेगानं वस्तूंची फेकाफेक करत आहे. पालक समोर हे सर्व बघत आहेत. मुलांच्या वर्तनाला आणि त्यामागील भावनांना सामोरं कसं जाल?

भावनांकडे लक्ष द्या :-

स्वतःच्या आणि मुलांच्या भावनांकडे लक्ष द्या. त्या चाणाक्षपणे ओळखा. स्वतःच्या आणि मुलांच्या मानसिक विश्वाशी समरस होणं म्हणजेच त्या भावना ओळखणं गरजेचं आहे. तुमच्या मनातील भावनांचं भान असू द्या. तुमच्या आणि मुलाच्या देहबोलीतून, बोलण्याच्या टोनमधून कुठल्या भावना प्रतिबिंबित होत आहेत ते पाहा.

स्वीकार करा :-

भावना दुर्लक्षित न करता किंवा नामंजूर न करता त्या भावनांचा पूर्णपणे स्वीकार करा. हे भावनिक क्षण मुलाशी संलग्न होण्यासाठी आवश्यक आहेत. मुलाच्या वर्तनावर टीका टिपण्णी न करता किंवा मुलाला कुठलंही लेबल न लावता संवाद साधा.

शब्द द्या :-

'मोबाइल न मिळाल्यामुळे तुला खूप राग येतोय आणि वाईटही वाटत आहे असं दिसतंय', अशा प्रकारे भावनांना जेव्हा शब्द मिळतात तेव्हा त्यांची तीव्रता कमी होते. इथे त्याला कसं वाटायला हवं हे सांगू नका. कुठलेही सल्ले देऊ नका किंवा टीका करू नका.

आठवण करून द्या :-

तुम्ही भावना स्वीकार केल्या आहेत, पण वर्तन नाही. वस्तूंची फेकाफेक करणं हे वर्तन अजिबात स्वीकारार्ह नाही. 'फेकाफेक करणं मला अजिबात आवडलं नाही. आपल्याकडे राग आल्यावर फेकाफेक करत नाहीत', असं मुलांना वेळोवेळी सांगा.

योग्य पर्याय निवडण्यास प्रोत्साहन :-

वर्तनाला लक्ष्मणरेषा आखून वर्तन नामंजूर केल्यावर प्रश्नानिराकरण करण्यास प्रोत्साहन द्या. 'पुढच्या वेळेस राग आल्यावर काय करशील? मोबाइल अति बघण्याचा प्रश्न एकत्र येऊन सोडवू या का?' अशा प्रकारे संवाद साधा. इथे तुम्ही वर्तनाची दिशा दाखवत आहात. कुठेही टीका टिपण्णी न करता, सल्ले न देता, लेक्चरिंग न करता, न रागावता, न मारता हे सर्व करत आहात. खऱ्या अर्थानं तुम्ही मुलाच्या भावनांचे कोच होत आहात!

वेळापत्रक करा सेट :-

पाल्याला वेळापत्रक तयार करून देण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. यामुळे जगात बदल होत असले तरी त्यांच्या नित्यक्रमात अनेक गोष्टी स्थिर असल्यास त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण होते. आठवडाभराचं वेळापत्रक तयार करा आणि आठवड्याच्या शेवटी काही गमतीशीर उपक्रमांचा समावेश करा. यामुळे आपला पाल्य व्यग्र राहून ऊर्जेचा पूरेपूर वापर करू शकेल. मुलांना योग्य वेळी जेवण आणि पुरेशी झोप घेता येईल असं नियोजन करा. याचबरोबर वेळापत्रकात सेट केलेल्या वेळा पाळण्यासाठी मुलांना सतत सूचना न करता त्यांच्या कलाने घ्यावं. इंटरनेटवर घालवायच्या वेळेचं नियोजन करण्याबरोबरच योग्य वेळी ब्रेक घेणं आणि इंटरनेटवर अवलंबून न राहण्याचं तंत्र शिकवा.

करा स्वतःचं निरीक्षण :-

लहान मुलं पालकांचं अनुकरण करतात. पालक ज्याप्रकारे ताणतणावाच्या वेळी प्रतिक्रिया देतात त्याच प्रकारे मुलं त्याचंही अनुकरण करतात. त्यामुळे पालकांनी ते स्वतः ताणतणावाच्या वेळी कोणत्या प्रकारच्या प्रतिक्रिया देतात याचं निरीक्षण करणं महत्त्वाचं आहे. जर पालक रागाने प्रतिक्रिया देत असतील तर मूलही असं करण्याकडे आकर्षित होऊ शकतं. हे लक्षात घेऊन आपल्या वागणुकीत बदल करा.

बना स्मार्ट पालक :-

मुलांना चांगल्या सवयी लावण्यासाठी, त्यांचा राग नियंत्रणात आणण्यासाठी त्यांना शिक्षा न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शिक्षेची परिणामकारकता काळानुसार आणि वयानुसार बदलत जाते. मुलांना कृती-परिणामांबद्दलची कल्पना द्या.


संकलित