दहावी व बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर..
दहावी व बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा कधी व कशा होणार याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली.
कोरोना विषाणूच्या संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे मार्गदर्शन वर्ग सुरु करण्यात आले होते. दहावी बारावीचे प्रत्यक्ष वर्ग सुरु झाल्यानंतर दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. आता हा प्रश्न दूर झाला आहे. परीक्षा कधी होणार? याबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे.
बारावी ची परीक्षा व निकाल कधी?
बारावीची लेखी परीक्षा येत्या २३ एप्रिल पासून सुरु होणार आहे. तर प्रॅक्टिकल परीक्षा १ एप्रिल ते २२ एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयाची ऑनलाईन परीक्षा २७ मे २०२१ ते ५ जून २०२१ दरम्यान होईल. आणि निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
दहावी ची परीक्षा व निकाल कधी?
दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे दरम्यान घेतली जाईल. तर प्रॅक्टिकल परीक्षा ९ एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान पार पडणार आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण विषयाची परीक्षा २८ मे २०२१ ते ९ जून २०२१ दरम्यान होईल. आणि निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल.
No comments:
Post a Comment