मुलांचा अभ्यास
K P B
- Home
- Contact us
- पालकांसाठी
- R.K. MALIK'S NEWTON CLASSES BIOLOGY NEET MATERIAL
- शालेय रेकॉर्ड
- मूल्यसंवर्धन
- Activity time for childrens
- जीवन प्रेरणा
- चला पर्यटनाला
- गोपनीय अहवाल
- Biology Blueprint and que. paper format
- शालेय प्रकल्प
- लोकसहभागातून करावयाची शालेय कामे
- ABL Information
- 365 इंग्रजी सुविचार
- Final NEET Exam Core Syllabus
- प्रथमोपचार पेटी
- दहा नैतिक मूल्ये
- First aid kit and their uses
- मानवी शरीर-देवाची अद्भुत रचना
- सेवापुस्तिकातील महत्वाच्या नोंदी
- स्मार्ट मनी मॅनेजमेंट लहान मुलांसाठी
- सूत्रसंचालन मार्गदर्शिका
- ताज्या मराठी बातम्या
- प्रार्थना गीते
- शालेय शैक्षणिक गीते
- MP3 श्लोक
- स्वागत गीते
- संगीतमय परीपाठ
- देशभक्तीपर गीते
- शाळासिद्धी संपूर्ण माहिती
- विविध वर्तमानपत्रे वाचा
- Maharashtra Board all text book Downloads
- NEET Study Material Links
- Allen NEET Study Materials
- Get the Books in PDF Format
- Apps for Online Class Or Meeting or Webinar
- Swayamprabha Digital Learning Channel
- E-Post Graduate Pathshala Website
Thursday, 27 May 2021
JEE Advanced 2021: 3 जुलैला होणारी जेईई अॅडव्हान्स परीक्षा लांबणीवर; कोरोनामुळे निर्णय
परीक्षेच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा –
- १) सूचना योग्य रीतीने वाचा: कोणतीही महत्वाची माहिती सुटू नये म्हणून माहिती काळजीपूर्वक वाचा.
- २) विभागाची निवड: प्रथम रसायनशास्त्र विभाग निवडण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे प्रश्न सोडवा, कारण जर आपण हा विभाग त्वरीत पूर्ण केला तर उर्वरित विभागात आपण पुरेसा वेळ देऊ शकता.
- ३) प्रत्येक विभागाला वेळ द्या, वेळेचे व्यवस्थापन करा: प्रत्येक विभागासाठी वेळ वाटून घ्या. असे केल्याने तुम्ही प्रत्येक विभागाला पुरेसा वेळ देऊ शकाल. आपण कोणत्याही विभागासाठी जास्त वेळ घालवत नाही आहोत, याची खात्री करा. रसायनशास्त्राला ४० मिनिटे, गणिताला ६० मिनिटे आणि भौतिकशास्त्रावर ८० मिनिटे देण्याचा सल्ला दिला जातो.
- ३) प्रत्येक प्रश्नासाठी लागणारा वेळः एका प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. जर कोणताही प्रश्न आला तर ताबडतोब करा, परंतु कोणत्याही प्रश्नावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका.
- ५) सर्व प्रश्न वाचा: प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. प्रत्येक प्रश्न समजून घ्या. जर उमेदवारांनी प्रश्न चांगले वाचले तर उमेदवार चुका करणे टाळू शकतात.
- ६) पर्याय काळजीपूर्वक वाचा: सर्व चार पर्याय काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. वाचताना घाई करू नका.
- ७) परीक्षेच्या वेळी शांत राहा: आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी शांत राहणे महत्वाचे आहे. म्हणूनच परीक्षेच्या वेळीही शांत राहण्यावर भर द्या.
परीक्षेच्या वेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक- दोन वेळा दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे मेंदूला आराम मिळतो. - ८) स्वत:वर विश्वास ठेवा: जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही मिळवू शकता. प्रेरणा ही त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा घटक असतो. या किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
- ९) त्वरित नवीन प्रश्न सोडवायला घेऊ नका: शेवटी नवीन असलेल्या संकल्पना टाळा. आधी आपल्याला जे येते ते आधी सोडवावे.
- १०) अंदाज लावू नका, खात्री कराः अंदाजानुसार उत्तरे निवडणे योग्य नाही. उमेदवारांनी ज्या प्रश्नांची त्यांना खात्री नाही अशा प्रश्नांची उत्तरे सोडावीत. ज्यांबाबत खात्री आहे, अशीच उत्तरं द्यावीत.
जेईई मेन २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी –
- – नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जावे.
- – होमपेजवरील अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक करावे.
- – विचारलेली माहिती भरावी.
- – सबमिट करावे.अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
- – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे, प्रिंटआऊट घ्यावे आणि त्यावरील संपूर्ण माहिती, सूचना नीट वाचावी.
सातबारा (७/१२) बद्दल मूलभूत माहिती
सात बारा म्हणजे काय व त्यात कशाचा समावेश होतो?
जमिनीसंदर्भातील रेकॉर्ड कमीत कमी शब्दात व विशिष्ट मांडणीत असलेला तपशील म्हणजे सातबारा होय.जमिनीची माहिती ज्यामध्ये असते त्याला गाव नमुना असे म्हणतात. गाव नमुना ठेवण्यासाठी 1-21 अशी विभागणी केलेली असते. त्यातील 7 नम्बरचा नमुना मालकी हक्का बाबत असतो. तर 12 नम्बर मध्ये पीकसंबंधित माहिती असते. या दोन्ही नमुना माहितीचे एकत्रीकरण 7/12 मध्ये केलेले असते.
7/12 संबंधीची महत्वाच्या महत्वाच्या बाबी:
1) 7/12 हा जमीन मालकी हक्का चा प्राथमिक व अंतिम पुरावा असतो.
2 7/12 बेकायदेशीर ठरविला जात नाही तो पर्यंत तो कायदेशीर मानला जातो.
3 7/12 ची नविन पुस्तके साधारणता 10 वर्षानी लिहिली जातात.
4 7/12 तील मालकी व इतर हक्का च्या ठिका नी कोण तेही महत्वाचे लिखान हे फेरफार नोंद के ल्या शिवाय ये वू शतेकत नाही. गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही.
5 प्रतेक वेळी 7/12 काढल्यावर कर्ज व कर्ज देना री संस्थेची नावे, विहीर बोअरवेल, फळझाडे, झाडे अशा नोंदी खात्रीने पाहिल्या पाहिजे.
6 प्रतेक स्वतंत्र गटा साठी एक सातबारा असतो.
7 7/12 पीक पाहनी नोंद दर वर्षी केली जाते .
8 7/12 त मालकाशिवाय दूसरया व्यक्तिचे नाव , कुळ , खंड सदरात थेट लावण्याचे अधिकार तलाठी यां ना नाही.
9 7/12 वरुण जमिनी च्या मालकी हक्का बाबत माहिती मिलते.
10 पूर्वी जेव्हा 7/12 नसत तेव्हा शेतवार पत्रक व सूडपत्रका वर नोंद लिहत.
फेरफार / गावनमुना 6 मधील नोंद
गावनमुना 6 म्हणजेच फेरफार नोंद वही यावर घेतले ल्या नों दी च 7/12 वर येतात. त्यामुळे शेतकर्याच्या दृष्टिने फेरफार उता रयाला अनन्य साधारण महत्व आहे. यातिल तपशील हा चार भागात लिहिला जातो. यात १ ) फेरफार नोंदणीचा अनुक्रमांक 2) हक्क प्राप्त व्यक्तिच्या अधिकाराचे स्वरुप, व्यवहाराचे स्वरुप दिनांक, संबंधित खातेदारांची नावे, मोबदला रकम आदी. बाबीचा उल्लेख असतो. 3) जमीन ज्य़ा गटात अथवा सर्वे नम्बर मधील आहे त्याचा नम्बर लिहिला जातो. 4) शेवटी फेरफार बरोबर आहे असे प्रामाणित करनारा अधिकारी / मंडल अधिकारी यांचे पदनाम व स्वाक्षरी असते.
फेरफार नोंद व प्रामाणित नोंद
शेत जमीन अथवा जमीन व्यक्तीकडे जमीन खरेदी करून किंवा इतर कारणाने येते.अशी प्राप्त झालेली जमीन आपल्या मालकीची आहे यासाठी त्याचे रीतसर नोंद होणे गरजेचे आहे. त्यासाठी ती जमीन आपल्या कडे कश्या पद्धतीने आली आहे हे दर्शवणारे पुरावे सादर करावे लागतात त्या कागदपत्रांच्या आधाराने सर्वप्रथम फेरफार नोंद लिहिली जाते.व ती प्रमाणित आहे किंवा नाही हे तपासण्याची प्रक्रिया सुरु होते.
१.कोणत्याही कागदपत्राद्वारे जमिनीचा हक्क प्राप्त झाल्यानंतर त्याची नोंद प्रमाणित करण्यासाठी सर्व संबंधिताना नोटीस देणे आवश्यक असते. नोटीस दिल्याशिवाय फेरफार मधील नोंद प्रमाणित करण्याची प्रक्रीयापूर्ण होत नाही. २.खरेदी करणार व घेणार हे वेगवेगळ्या गावाचे असतील तर त्याचे नाव पत्ते तलाठी यांना कळविणे गरजेचे असते.त्याच प्रमाणे वारसाच्या नोंदीसाठी सर्व वारसांचे नाव पत्ते व वारसांचे मयत खातेदारांशी नाते कळविले पाहिजे. ३.फेरफार नोंद लिहिल्यानंतर ती प्रमाणित होणे करिता नोटीस काढल्यानंतर किमान १५ दिवसाचा कालावधी जाऊ देणे गरजेचा असतो.या नंतर नोंद प्रमाणित करता येते .व त्यानंतर दुरुस्तीचा ७/१२ मिळतो.
फेरफार नोंद व प्रमाणित नोंद यामधील काही महत्त्वाच्या बाबी खालील प्रमाणे आहेत.
१.फेरफार नोंद झाल्यावर लगेचच त्याची नोंद ७/१२ वर येते. २.काही कारणाने जर सूची २ मध्ये चूक झाली असल्यास ते खरेदीखत सादर करून सब रजिस्टर यांच्या कार्यालयातून दुरुस्ती करता येते. ३.सातबारा वरील मालकी हक्काचा उल्लेख हा फेरफार नोंदीत असतो. ४.कायद्याने प्रमाणित नोंद चुकीची आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तो पर्यंत ती खरी मानण्यात येते. ५. जमिनीच्या अधिकारात जसजसा बदल होतो. म्हणजेच जमिनीचे मालक जसे बदलतात त्या क्रमवारीने त्याच्या नोंदी फेरफार मध्ये नमूद केलेल्या असतात. ६. फेरफार वरून खातेदाराच्या मालकीच्या एकूण जमिनीबाबत माहिती मिळते
सातबारा (७/१२) बद्दल मूलभूत माहिती पहा 👇
सातबारा (७/१२) बद्दल मूलभूत माहिती पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
7/12 वरील वारस नोंदी
७/१२ उतारा हा सर्वसामान्य माणसाच्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे.७/१२ वर होणारी प्रत्येक नोंद ही खातेदारासाठी महत्वाची असते.अनेक प्रकारच्या नोंदी ७/१२ वर करणेत येतात त्यासाठी तलाठी यांचेकडून फेरफार केला जातो व तो फेरफार मंडळ अधिकारी यांचेमार्फत प्रमाणित केला जातो व अशा प्रमाणित नोंदीचा अंमल ७/१२ वर घेतला जातो.या नोंदीमध्ये सर्वात महत्वपूर्ण नोंद म्हणजे वारस नोंद.
एखादा खातेदार मयत झाला असलेस त्यास नेमके कोण वारस आहेत याबाबत अनेकदा विचारणा होते व संभ्रमता देखील पहावयास मिळते.तलाठी,मंडळाधिकारी यांना देखील अनेकदा वारस चौकशी करताना अडचणी येतात. अशावेळी वारस नोंदीबाबत या कायद्यातील सहज ,सोप्या भाषेतील तरतुदी सर्वाना माहित असावेत या दृष्टीकोनातून डॉ.संजय कुंडेटकर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी सर्व वारस कायदे एका पुस्तकात सोप्या सहज व सर्वाना समजतील अशा भाषेत लिहिले आहेत. वारस कायद्यातील मृत्युपत्र व त्यासंबंधी तलाठी कार्यालयात असणारे नमुने याचा उचित संगम “७/१२ वरील वारस नोंदी” या पुस्तिकेत केला आहे.
तलाठी व मंडळाधिकारी यांना वारस नोंदी करताना ही पुस्तिका अत्यंत उपयोगी आहे तसेच महसूल अधिकारी,कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक यांना देखील या पुस्तिकेचा अवश्य लाभ होईल याची मला खात्री आहे.
मा.डॉ.संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी उत्तम लेखन करून पुस्तिका उपलब्ध करून दिलेबद्दल व या पुस्तकाला शुभेच्छा देणारे मा.गणेश मिसाळ सर ,उपविभागीय अधिकारी ,धुळे यांचे मनापासून आभार.
वारस नोंदी पुस्तिका पहा
वारस पुस्तिका प्राप्त करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 👇
हक्कसोडपत्र
महसुली कामकाज करत असताना बरेच वेळा खरेदीखत,मृत्युपत्र ,साठेखत,हक्कसोड पत्र अशा अनेक बाबी आपलेला अभ्यासाव्या लागतात.हे सर्व दस्त आपण अभ्यासणार आहोत त्यातील एक दस्त म्हणजे हक्कसोडपत्र.हक्कसोड पत्राबाबत खालील बाबी स्पष्ट करणारा लेख मा.ऍड. लक्ष्मण खिलारी, पुणे यांनी लिहिला आहे
हक्क सोडपत्र म्हणजे काय ?
हक्क सोडपत्र कोण करू शकतो?
हक्क सोडपत्र हे कोणाच्या लाभात होऊ शकते?
हक्क सोडपत्र व मोबदला
हक्क सोडपत्र व नोंदणी
हक्कसोडपत्र कार्यपद्धत
हक्क सोडपत्र कधी करता येते?
वारसांचे प्रतिज्ञापत्र
हक्कसोडपत्र दस्त नोंदणीनंतर काय करावे ?
हक्क सोडपत्र व वाटपपत्र यातील फरक .
हक्क सोडपत्र पहा 👇
Wednesday, 26 May 2021
शिधापत्रिकेची दुसरी प्रत मिळण्याकरिता करावयाचा अर्ज (नमुना १५)
शिधापत्रिकेची दुसरी प्रत मिळण्याकरिता करावयाचा अर्ज (नमुना १५) 👇
शिधापत्रिकेची दुसरी प्रत मिळण्याकरिता करावयाचा अर्ज (नमुना १५) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
शिधापत्रिकेमध्ये (रेशन कार्ड) बदल करणे (नमुना १४)
शिधापत्रिकेमध्ये (रेशन कार्ड) बदल करणे (नमुना १४)
शिधापत्रिकेमध्ये (रेशन कार्ड) बदल करण्यासाठी करावयाचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नमुना ९- युनिट कमी करणे (नाव वगळणे)
नमुना ९- युनिट कमी करणे (नाव वगळणे) साठी करावयाचा अर्ज पहा. 👇
नमुना ९- युनिट कमी करणे (नाव वगळणे) याचा अर्ज डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन पुरवठापत्रिकेसाठी / शिधापत्रिकेसाठी / रेशन कार्ड काढण्यासाठी अर्ज
(अर्ज कुटुंब प्रमुखाने भरावा)
ताकीद :-
(१) पुरवठापत्रिका/ शिधापत्रिका मिळण्यासाठी खोटी माहिती देणे हा दखलपात्र गुन्हा असून, खोटी माहिती देणाऱ्याविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाईल.
(२) अर्जात दिलेली कोणतीही माहिती बरोबर नसल्याचे आढळून आल्यास पुरवठा/ शिधापत्रिका रद्द करण्यात येईल व नागरी पुरवठ्याचे कोणतेही लाभ मिळणार नाहीत.
(३) संपूर्ण तपशील नमुन्यानुसार न दिल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
नवीन पुरवठापत्रिकेसाठी / शिधापत्रिकेसाठी / रेशन कार्ड काढण्यासाठी करावयाचा अर्ज पहा
मतदार यादीतील नाव दुरुस्त करणे.(फॉर्म नं.८)
मतदार यादीतील नाव दुरुस्त करण्यासाठी करावयाचा अर्ज (फॉर्म नं.८) पहा
मतदार यादीतील नाव दुरुस्त करण्यासाठी करावयाचा अर्ज (फॉर्म नं.८) डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
मतदार यादीतील नाव वगळणे.(फॉर्म नं.७)
मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी करावयाचा अर्ज पहा
मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी करावयाचा अर्ज (फॉर्म नं.७) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे.(नमुना ६)
नमुना ६ भरण्याकरिता मार्गदर्शक सूचना सर्वसाधारण सूचना -
नमुना ६ कोण दाखल करु शकतो.
१. मतदार यादी ज्या वर्षी सुधारण्यात येत असेल त्या वर्षी १ जानेवारी रोजी वयाच्या १८ वर्ष पूर्ण करणारा किंवा त्यापेक्षा अधिक वयाचा कोणताही अर्जदार.
२. एखादया व्यक्तीने ज्या मतदार संघात त्याचे/तिचे नांव आधीच नोंदविलेले आहे. त्या मतदारसंघातील निवासस्थान सोडून अन्य ठिकाणी स्थलांतरीत झाली असेल अशी व्यक्ती.
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाचा अर्ज (नमुना ६) पहा. 👇
मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी करावयाचा अर्ज.(नमुना ६) डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
Tuesday, 25 May 2021
गोपनीय अहवाल
अधिकारी व कर्मचारी यांचे वर्षभरातील कामकाजाचे मूल्यमापन करण्याचे एकमेव साधन म्हणजे गोपनीय अहवाल.गोपनीय अहवाल हा अधिकारी / कर्मचारी यांचेसाठी अत्यावश्यक भाग याविषयी थोडक्यात माहिती देणारा लेख. या सर्वांचे संकलन करून गोपनीय अहवाल विषयी एक pdf तयार केली असून त्यामध्ये खालील बाबी आहेत
गोपनीय अहवाल मुलभूत माहिती
गोपनीय अहवालांचे संस्करण करणे
प्रतिकूल शेरे कळविणे व त्यावरील अभिवेद्नावर कार्यवाही करणे
प्रतिकूल शेऱ्याविरुद्ध दुसऱ्याच्या अभिवेद्नावर कार्यवाही करणे
गोपनीय अहवाल बाबत असणारे शासन निर्णय
गोपनीय अहवाल pdf प्राप्त करणेसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
गोपनीय अहवाल पहा.
गोपनीय अहवाल PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
गोपनीय अहवाल मार्गदर्शिका
गोपनीय अहवाल मार्गदर्शिका PDF डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
💐निरोप संदेश / निरोप समारोप शुभेच्छा💐
1) सप्रेम नमस्कार,
मी (नाव) दि.(बदली झाल्याचा दिनांक व दिवस) रोजी महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळ येथे बदली झाल्याने कल्याण परिमंडलातील कल्याण ग्रामीण विभाग, गोवेली शाखा मधून कार्यमुक्त झालो.दि.27/05/2017 पासून आजपर्यंत च्या सेवाकाळात कल्याण मधील,मिञमंडळी, सहकारी कर्मचारी ,वरिष्ठ अधिकारी,बाह्यस्ञोत कर्मचारी,ग्राहक या सर्वांचे कामकाजात,सुखदुःखात चांगले सहकार्य,प्रेम लाभले एवढ्या ४ वर्षाच्या काळात आपण बाहेरगावी राहत असल्याची कधीही पुसटशी जाणीवही झाली नाही.
यापुढेही असेच,प्रेम,लोभ,स्नेह राहावा, ही अपेक्षा !
या कालावधीत माझ्याकडून कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे. सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करित आपली रजा घेतो.!
२.आपण निरोप घेताय, सेवानिवृत्त होताय
हे अगदी खरं आहे
मात्र तुमचं आमचं नातं सदैव अबाधित राहील
तुमच्या सहवासात घालवलेले क्षण
आजही आमच्या मनात रुंजी घातल आहेत
तुमचा स्वभाव, तुमचं वागणं
आम्हाला सतत आठवत राहील
तुमचं पुढील आयुष्य असंच सुखसमाधानाचं जावो... हिच शुभेच्छा !
३.प्रवासाचे प्लॅन तुम्ही आधीच आखुन ठेवले असतील
मस्त जीवनाचा आनंद लुटत सेवानिवृत्तीची मजा घ्या
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा !
४.मस्त मजेचे आयुष्य
गाडी थांबली वळणावर
विश्रांती घ्यायची आहे तुम्ही
सेवानिवृत्त झाल्यावर
सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!
५.तुम्ही होता म्हणून सगळे प्रश्न सहज सुटत होते
सगळी कामे नियोजितपणे होत होती
आता तुम्ही सेवानिवृत्त होताय... पण आम्हाला तुमची सोबत कायम स्मरणात राहील
सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा !
६.सेवानिवृत्ती छे छे ! ही तर आहे क्षणभर विश्रांती !!
मनाप्रमाणे जगण्याची घ्या आता अनुभूती...
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
७.जीवनातला वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा
सवे घेऊन प्रियजनांना आठवणीने भरला घडा
सेवानिवृत्तीच्या मनापासून शुभेच्छा!
८.उशीर झाला, गाडी जाईल. डबा आता नसणार
या सर्वांना बगल देत नवे आयुष्य फुलणार
सेवानिवृत्तीसाठी हार्दिक शुभेच्छा!
९. सहकाऱ्यांची साथ आणि शब्दरूपी भावना
आरोग्य आणि धनसंपदा तुम्हाला लाभो हिच मनापासून शुभकामना !
१०.सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही
आपल्या लोकांमध्ये जाणार आहात
वाईट वाटुन घेऊन नका आठवणी
आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!
११. काम करायचं आहे तुमच्यासारखं
निघून इथून जाताना
गहिरावे सारे जग
निरोपदेखील घेताना
सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा !
१२) "रिटायर झालेल्या कामगाराच्या बायकोचे मनोगत"
“आई पापा रिटायर झाले, ताई दादा रिटायर झाले | मामी मामा रिटायर झाले, आजी आजोबा रिटायर झालें ॥"
" अरे बाळा, हळू बोल, ते दुखावतील | आपल्या समोर हासतील, पण मनाने खचतील ||"
" आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला जपले, आता आपण त्यांना उपले पाहीजे | जे-जे हवे आपल्याला. ते सगळे त्यांनी दिले, आत्ता आपण त्यांना सुख दिले पाहीजे ।। "
बाळा तुला काय सांगु त्यांचा जीवन प्रवास | इच्छा नसताना ही सोसला त्यांनी किती उपवास | " “नोकरी लागली तेंव्हा मामा कडे राहत होते जेवणाबरोबर मामीचे बोलणे (टोमणे) ही खात होते ॥ "
मग त्यांचा जीवनात मी आली, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो।
चांगले दिवस येतील, एकमेकांना आधार देत होतो || कंपनीच्या कामाबद्दल, त्यांनी कधी तक्रार केली नाही । कमी पगार असून सुद्धा, आपल्याला काही कमी पडू दिल नाही "
"फ्लैट घेतला, निर्लज्ज होऊन ओवर टाईम केला । सोसायटी, फंड, स्वत:साठी काही न ठेवता, सगळा आपल्यावर
खर्च केला ॥ दोघांच शिक्षण, दोघांच लग्न, देव जाणो, त्यांनी कस पार पाडला मी जेव्हा चौकशी करायची, तुला काय कळतय त्याच्यातल हसून एकच उत्तर मिळाल || "
"बाळानों त्यांना अजिबात दुखवायच नाय । त्यांचा मनाला लागेल, अस काय बी बोलायच नाय ॥ "
रामप्रसाद वर्मा
8888239797
१३)
१४)
१५)
🎂वाढदिवस शुभेच्छा ( Birthday Wishesh)🎂
१) जन्मदिवसाच्या लाख लाख शिव शुभेच्छा..
आऊसाहेब जिजाऊ आपणांस उदंड
आयुष्य देवो हिच ईच्छा..
शिवछत्रपतिंच्या अशिर्वादाने
गाठावि यशाची शिखरे..
आदर्श
शंभुचा ठेवता लाभो मस्तकी मानाची तुरे..
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
२) यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
३) शिखरे उत्कर्षाची सैर तुम्ही
करीत रहावी.....
कधी वळून पाहता आमची
शुभेच्छा स्मरावी... ......
"तुमच्या इच्छा आकांक्षांचा
वेलू गगनाला भिडू दे........
तुमच्या जीवनात सर्वकाही
मनासारखे घडू दे.....
...तुम्हाला दिर्घ आयुष्य लाभो
ही इच्छा....
४) वाढदिवस आमच्या काळजाचा .....
वाढदिवस आपल्या माणसाचा .....
वाढदिवस लाडक्या भावाचा .
रक्ता पेक्षा ही जास्त जवळच नात असलेल्या (दादा) ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा........!!!!!
५) ωιsн_υ_α_мαηү_мαηү_нαρρү
яεтυяηs_σғ_тнε_∂αү 👑🎂🎊🎉
आपणास_वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा
६) #वर्षाचे 365 दिवस
#महिना चे 30 दिवस
#हप्त्याचे 7 दिवस
#आणि आमचा आवडीचा
1 दिवस तो म्हणजे
दादांचा जन्मदिवस
७)*जीवा हूनी प्यारा तुच माझ्या यारा*
आशा ह्या जीवा हून प्यार्या दोस्ताला
वाढदिवसाच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा..💐💐
८) व्हावास तू शतायूषी
व्हावास तू दीर्घायुषी
ही एक माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
!वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
९) शाश्वत शुभेच्छाच
माणसाला या जन्मात तसेच
पुढील जन्मात देखील
उपयोगी पडतात…
बाकी
सारं नश्वर आहे!
म्हणुन वाढदिवसाच्या या
शुभदिनी तुम्हाला
खूप खूप शुभेच्छा ..!
१०) आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात
अस नाही,
पण काही क्षण असे असतात जे विसरु
म्हणताही विसरता येत नाहीत.
हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत
क्षणातला असाच एक क्षण.
हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.
पण
आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण
एक"सण" होऊ दे हिच सदिच्छा..
११) आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे…
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे…
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेले… सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!
१२) जीवेत शरद: शतं !!! पश्येत शरद: शतं !!! भद्रेत शरद: शतं !!! अभिष्टचिंतनम !!! जन्मादिवसस्य शुभाशय: !!! जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
१३) सर्वांचे आवडते व्यक्तिमत्व,विशेष म्हणजे माझ्या शैक्षणिक वाटचालीस व माझ्या प्रगतीस योग्य दिशा देणारे,त्यांच्या नोकरीच्या कारकिर्दीत असलेले कार्यकुशल,कार्यतत्पर,सर्वांचे उत्तम मार्गदर्शक,सर्वांच्या सुख दुःखात सहभागी असणारे,आदरणीय ***** यांना वाढदिवसाच्या हरित शुभेच्छा.
आई एकविरा तसेच ग्रामदेवता तुम्हाला लाख आशीर्वाद देवोत तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण करो, हि ईश्वरचरणी प्रार्थना...
तुमच्या पुढील भविष्यासाठी तसेच भविष्यातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आई भवानी आपणास उदंड ताकद देवो तसेच आपणांस निरोगी आयुष्य लाभो,हीच मनोकामना...🎂🎂💐🙏🏻
१४) आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,
शहराची शान तसेच सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,शिक्षण क्षेत्राची आण-बाण-शान आणि
अत्यंत ,उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले…
शिक्षकांसाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे सळसळीत रक्त… अशी Personality!
कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे…
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,मार्गदर्शक *श्री सर*
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा…
देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…💐💐💐🎂🎉🎊🎊🎊🎊🎊🎉🎉🎉🎉
१५) सदैव स्मित भाषिक असणारे व युवकांचे उत्तुंग नेतृत्व करणारे , प्रत्येकाच्या सुख दुःखात सहभागी होवुन सर्वोतोपरी मदतीचा हात देणारे आमचे लाडके व सर्व परिचित व्यक्तीमत्व असलेले
श्री भाऊ
यांना वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा .💐🌹💐🎂🌷
शुभेच्छुक -
१६)
१७)
१८)
१९)
२०)
🎂वाढदिवस आभार संदेश🎂
१) सर्वांचे मनपुर्वक धन्यवाद....
खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्या शिवाय कधी-कधी पर्यायच नसतो !
"बघायला गेलंतर आज माझा वाढदिवस नव्हताच मुळी, होत ते तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा,आशिर्वाद व आजवर मिळालेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावनांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी.
माझ्या वाढदिवसा दिवशी सर्वच क्षेत्रातील लहान,थोरा-मोठ्यांनी दिलेल्या अमुल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासुन स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडुन झाल्या असतील किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो !
असेच स्नेह,प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहुद्या !!
पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद !!!!
🙏🙏🙏🙏🙏
**********************************
२)कालचा माझा वाढदिवस तुम्हा सर्वांच्या असंख्य शुभेच्छांमुळे अविस्मरणीय ठरला. असेच प्रेम करीत रहा. आशिर्वाद देत रहा. तुमच्या शुभेच्छा हीच माझी खरी ताकद आहे. मी व्यक्तीश: प्रत्येकाला धन्यवाद देण्याच्या पूर्ण प्रयत्न केला परंतु तरीही काहींचे आभार मानायचे राहिले असतील तर क्षमस्व 🙏🏽
**********************************
३) प्रथम सर्वांचे मनापासून #आभार।।
काल माझ्या #वाढदिवसानिम्मित विविध क्षेत्रातील त्यात #राजकीय, #शैक्षणिक, #सामाजिक, #वडीलधारी आणि मित्र परिवार तुम्ही सर्वांनी दिलेल्या #आशीर्वाद रुपी शुभेच्छांचा मी मनस्वी स्वीकार करतो।।
#शुभेछाचा वर्षाव एव्हडा होता की कोणाचे #वैयक्तिक आभार पण करता आले नाही त्याबद्दल #दिलगिरी व्यक्त करतो।।
कोणी विचारलं काय कमावलं तर मी #अभिमानाने सांगू शकेल की तुमचा सारखे जिवा #भावांचे #मानस कमावली।।।
#मनापासून आभार।।।।
**********************************
४) आजच्या या धावपळीच्या युगात
आपण मला आठवणीने
जन्मदिवसाच्या
शुभेच्छा दिल्या. आपले
प्रेम, आपुलकीचे,आशिर्वाद
असेच सदैव सोबत राहुद्या
आपल्या सर्वाचे मनापासून
#आभार
**********************************
५) 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय ??🚩
#आभार
#आपन_सर्वांनी_माझ्या
#वाढदिवसानिमित्त_शुभेच्छा_दिल्या, #आपले_प्रेम_आणि_आशीर्वाद_दिलेत , #आपणा_सर्वांचे_धन्यवाद...
**********************************
६) 🙏#आभार🙏
माझा वाढदिवस झाला अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन , एसएमएस ,व्हॉट्सअप,फेसबूक ,सोशल मिडीया,प्रिंट मिडियाद्वारे मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या,आशिर्वादही दिले , त्या सर्वांचा मी आभारी आहे.......!!! असेच सर्वांचे प्रेम,सहकार्य,आशिर्वाद,शुभेच्छा सदैव माझ्यावर राहोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।
पुनः एकदा धन्यवाद...
**********************************
७) आपला खुप खुप आभारी आहे
आपण कितीही व्यस्त असलात तरी, मला तुम्ही वेळात वेळ काढून शुभेच्छा संदेश पाठविले.
आनंदलो, सुखावलो!
तुमचे प्रेमाचे बंध असेच घट्ट राहू दया. मैत्री, प्रेम आणि विश्वास असाच कायम राहुद्या ! ज्याने मला माझी नवी वाट शोधताना एकटेपणा जाणवणार नाही.
तुमच्या शुभेच्छासाठी मी ऋणी आहे!🍁🙏🏼
**********************************
८) 🎂💐🎂आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..🎂💐🎂
मनुष्य जीवनात वित्त आणि श्रमाची जितकी किंमत आहे,तितकीच किंमत ही वेळेचीही आहे,असे मला वाटते.
आपण आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ काढून मला फोन,टेक्स्ट मॅसेजेस,व्हाट्सअप,फेसबुक,ई.सोशल मिडीयाच्या माध्यमातून तसेच पर्सनली भेटून दिवसभर माझ्या वाढदिवसानिमित्त ज्या शुभेच्छ्या दिल्या,
त्याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे..
तसेच बऱ्याच जणांनी मनोमन दिलेल्या शुभेच्छ्यांचाही मी स्वीकार करतो तसेच ईच्छा असतांनाही वेळेअभावी शुभेच्छ्या देऊ न शकलेल्या माझ्या सर्व स्नेहीजणांचाही मी आभारी आहे..
आपण दिलेल्या ह्या शुभेच्छ्यांच्या जोरावर मी माझ्या पुढील आयुष्यात गरूडझेप घेईल,यात शंका नाही..
आपले हे प्रेमच आयुष्याचा मूळ भाग असलेल्या देव,देश,धर्म अर्थात थ्री डी च्या संकल्पना माझ्या आयुष्यात दृढवत करतील..
यापुढील आयुष्यपर्वात आपले प्रेम आणि साथ अशीच कायम रहावी,अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो..
धन्यवाद..!!
शुक्रिया..!!
थँक यू..!!
आभारी..!!
आपला ऋणनिर्देशी..
**********************************
९) छत्रपती शिवरायांच्या पावन भुमीत माझा जन्म झाला याचा मला अभिमान आहे, ज्या महाराष्ट्रात मराठी अस्मितेची ज्योत पेटवत ठेऊन शिवरायांनी पवित्र भगवा ध्वज फडकला, अश्या या महाराष्ट्रात मी जन्म घेतला हि मी माझी पुण्यायीच समजतो. येथे तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे सोन्याहून पिवळं होण्यासारखे आहे. तुमच्या सर्वांसारखे मित्र मिळणे म्हणजे माझे भाग्यच म्हणावे लागेल. मला या वाढदिवसासाठी तुम्ही नेहमी प्रमाणे शुभेच्छांचा वर्षाव करत माझा जन्मदिवस पुन्हा एकदा अविस्मरणीय बनवला त्यासाठी मी आपल्या सर्वांचा ऋणी आहे. आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच माझ्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. आपण दिलेल्या शुभेच्छा रुपी आशिर्वादाचा मी कायम ऋणी राहील......तुमच प्रेम असच राहुद्या....
आपण दिलेल्या शुभेच्छांचा
अगदी मनापासून स्वीकार…
आपले मनःपूर्वक आभार…!
असेच प्रेम माझ्यावर राहील हीच अपेक्षा…
मनापासून मी आपला आभारी आहे
**********************************
१०) माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आठवणीने स्नेहपूर्वक शुभेच्छ्या दिल्यात, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. 🙏🏽 *धन्यवाद*🙏🏽
वाढदिवस हे निव्वळ निमित्त, खरेतर या निमित्ताने अमुल्य क्षण आठवतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो आणि सर्वांत महत्वाचे, जगण्याच्या लढाईला बळ मिळते.....
माझा जन्मदिवस अविस्मरणीय केला, आपले मनःपूर्वक आभार.....
माझ्या आजवरच्या वाटचालीत आपल्यासारख्या हितचिंतकांच्या शुभेच्या आणि स्नेह यांचा बहुमोल वाटा आहे.
आपल्या शुभेच्छ्या मी हाती घेतलेल्या कार्यात मला निश्चितच मनोबल वाढविणाऱ्या आणि प्रेरणादायी ठरणार आहेत.
यापुढेही आपला स्नेह असाच वृद्धिंगत होवो!
**********************************
११) मनापासून आभार...
सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद......
खरंतर आपल्या माणसांना धन्यवाद देणे म्हणजे परके केल्यासारखे वाटते पण व्यक्त झाल्याशिवाय कधी कधी पर्यायच नसतो ! "काल माझा वाढदिवस होता, परंतू तुमचे प्रेम, काळजी, सदिच्छा, आशिर्वाद व आजवर मिळलेली अतुट अशी तुम्हा सर्वांची खंबीर साथ अशा पवित्र भावानांचा तो "सोहळा" होता माझ्यासाठी, माझ्या वाढदिवसानिमित्त सर्वच क्षेत्रातील मित्र मोठे लहान थोरा-मोठ्यांनी दिलेल्या अमूल्य शुभेच्छां व अनेक उत्तम आशिर्वादांचा मी मनापासून स्विकार करतो व सोबतच गेल्या वर्षभरात काही चुका माझ्याकडून झाल्या असतील किंवा अजाणतेपणामुळे कुणी दुःखावले गेले असेल तर त्याबद्दल क्षमा मागतो ! असेच स्नेह, प्रेम व आशिर्वाद माझ्यावर निरंतर राहु द्या !!
पुनःश्च एकदा सर्वांचे धन्यवाद...!
आपलाच
१२)
१३)
यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ” शिक्षण”
मानवी जीवनाचा सर्वांगीण विकास हा त्याच्या शिक्षणावरच अवलंबून असतो तो जितका शिक्षणामध्ये ज्ञान अर्जित करतो करतो तो तितकाच याशायाच्या शिखरावर जाऊन बसतो शिक्षणाची दिशा ही माणसाच्या संपुर्ण विकासासाठी आणि त्याच्या मुलभूत अधिकारांसाठी महत्वाची असते. देशाला आर्थिक महासत्ता आणि प्रभावी राष्ट्र बनवण्यात युवक महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात त्यामुळेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणाऱ्या शालेय शिक्षणाची आता देशाला गरज आहे .
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आणि व्यक्तिमत्त्वाचा पाया शाळेतच रचला जातो, शाळेत मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार, मुल्यांच्या आधारावरच पुढील शिक्षणातील यश अवलंबून असते. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तुमच्यातील जे काही सर्वोत्तम आहे ते प्रकट करणे म्हणजे खरे शिक्षण. मानवतेच्या पुस्तकापेक्षा जास्त चांगले पुस्तक कोठे असू शकते? असे महात्मा गांधी म्हणाले होते खरी समस्या ही आहे की वास्तविक ’शिक्षण’ म्हणजे काय लोकांना ह्याची कल्पना नाही. एखाद्या जमिनीचे किंवा एखाद्या वस्तुचे मोल मोजावे स्टॉक एक्सचेंज बाजारातील आपल्या शेअरचे मूल्यांकन करतो तसे आपण शिक्षणाचे मूल्यांकन करतो. जे शिकल्यामुळे विद्यार्थी जास्तीत जास्त पैसे कमवू शकतील असेच शिक्षण मुलांना द्यावे असे आपल्याला वाटते. मात्र शिकलेल्यांच्या चरित्राचा विकास घडविण्याकडे आपण फारच थोडे लक्ष देतो.
शिक्षणाची गरजच नाही. शिक्षण म्हणजे काही पुस्तके वाचली, परिक्षा दिली व उत्तीर्ण झालो असे नव्हे. शिक्षण म्हणजे माणसाच्या जन्मापासुन मरणापर्यंत चाललेली शिकायची प्रक्रिया आहे एकविसाव्या शतकातही आपल्याला कायद्याचा बडगा उगारून शिक्षणाचे महत्त्व सांगावे लागते, … शिक्षणाचे खरे महत्त्व समाजात रुजलेच नाही. त्यासाठी आपला समाजच कारणीभूत आहे. आपण केवळ आपल्या प्राथमिक गरजा व उपलब्ध साधन साम्रगीपर्यंत पोहचलो आहे. देशाची प्रगती, विकास व येणारी संधी याकडे आपले दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तानुरूप शिक्षण दिले गेलेच पाहिजे. विकासकार्यात समाज्यातील प्रत्येक वर्ग जोपर्यंत सहभागी होत नाही . आपल्या प्रजासत्ताकाच्या राज्य घटनेला साठ वर्षे होत आली तरीही, शिक्षणाचे सार्वत्रिकरण, समान सामाजिक न्याय, समान संधी आणि समान नागरी कायदा ही मार्गदर्शक तत्त्वे घटनेच्या पुस्तकातच राहिली आहेत. संपूर्ण देश साक्षर व्हावा, सर्वांना हव्या त्या शिक्षणाची समान संधी मिळावी यासाठीचे प्रयत्न अपुरे पडले आहेत आर्थिक विकासात शिक्षणास अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. निरनिराळे विकास कार्यक्रम राबविण्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षित मनुष्यबळ वाढवून मानवी भांडवल निर्माण करण्याचे शिक्षण हे मुख्य साधन आहे. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासातील शिक्षणाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेऊन शिक्षण विषयक कार्यक्रम राबविले जातात. शिक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊनच राज्य शासन सर्वसाधारण शिक्षणावर मोठा खर्च करतो
शिक्षणक्षेत्र गेल्या सात - महिन्यांपासून या ना त्या कारणाने विशेष चर्चेत आहे. अर्थात राष्ट्रीय जीवनात शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण असणे उचितच आहे.गेली दहा वर्षे संसदेच्या शिक्कामोर्तबाची वाट पाहात असलेले शिक्षणाच्या अधिकाराचे विधेयक. सहा ते चौदा वर्षे या वयोगटातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे, हा त्याचा हक्क आहे. त्याला शाळेत पाठवणे हे पालकांचे कर्तव्य आहे. त्यात कसूर झाल्यास कायद्याने शिक्षा होण्याचे प्रावधान आहे. शाळांवरही अशा प्रकारचे निर्बंध घालण्याची तरतूद विधेयकात आहे. संविधानात मार्गदर्शक तत्त्वांच्या स्वरूपात राज्यसंस्थेचे कर्तव्य म्हणून सर्वांना शिक्षणाची तरतूद होती, पण स्वातंत्र्यानंतर अर्धशतक उलटूनही प्राथमिक शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांची संख्या खूप मोठी आहे. म्हणूनच शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे आणि त्यासाठी सक्तीचे व निःशुल्क शिक्षण चौदा वर्षे वयापर्यंत प्रत्येक भारतीयाला मिळण्यासाठी कायदा करणे आवश्यक ठरले. अर्थात केवळ कायदा करून निरक्षरतेची समस्या चुटकीसरशी सुटेल, अशी अपेक्षा नाही. एका स्वयंसेवी संस्थेच्या गेल्या वर्षाच्या अभ्यासानुसार भारतात किमान तीन कोटी मुलांनी शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. शाळेची फी न भरल्यामुळे शाळा सोडणाऱ्यांची संख्याही सुमारे तीन कोटी आहे. आठव्या इयत्तेपर्यंत विद्यार्थी गळतीचे प्रमाण चौपन्न टक्के आहे. दलित मुलींपैकी दहावीआधीच ऐंशी टक्के शाळा सोडतात तर आदिवासी गटातील मुलींपैकी शालेय शिक्षण अर्ध्यावर सोडणाऱ्यांचे प्रमाण नव्वद टक्के आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षणाचा हक्क कायद्याने मिळूनही त्याचा लाभ सर्वांना मिळण्यासाठी देशाला दृढ संकल्प करून त्याची पूर्ती करण्यासाठी निर्धाराने काम करावे लागेल.
संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचा विकास हे सर्व शिक्षणाचे उद्दिष्ट मानल्यास मूल्यमापन प्रत्येक विद्यार्थ्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वाचे, त्याच्या क्षमता, त्याची बुद्धिमत्ता, छंद, सवयी, वृत्ती/दृष्टिकोन, जीवनविषयक मूल्ये आणि क्षमता, शारीरिक कृती या सर्व आयामांसह होणे आवश्यक आहे त्यासाठी शिक्षक, पालक, संस्थाचालक, प्रशासक, विद्यार्थी या सर्व घटकांत जागृती आणि जिज्ञासा हवी. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करतानाच उच्च शिक्षण गुणवत्तापूर्ण करण्यावरही सरकार भर देत आहे. कालानुरूप नवीन विषय, नवे अभ्यासक्रम, आवश्यक साधनसुविधा, नव्या अभ्यासपद्धती यांना प्राधान्य देऊन त्यांच्या प्रसाराला प्रोत्साहन देणे हे एक आव्हान आहे. कारण बदल स्वीकारणे सहजरीत्या घडत नाही. असे बदल घडवताना अनेक निर्णय घ्यावे लागतात. शिक्षणक्षेत्रात बदलांची गती खूप कमी आहे. शिक्षण राष्ट्रनिर्मितीचे, विकासाचे प्रमुख साधन म्हणून महत्त्वाचे आहे. त्या दृष्टीने शिक्षणाकडे जास्त डोळसपणे, जागरूकपणे पाहून अपेक्षित बदल समजून घेणे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते. धोरणात्मक निर्णय आणि घोषणा यांच्यापुढे प्रत्यक्ष अंमलबजावणी आणि प्रयोग यांना महत्त्व आहे.
पालक, शिक्षक, सर्वसामान्य नागरिक यांची भूमिका या कामी बहुमोलाची आहे. ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीत विद्यार्थ्याला केवळ माहिती मिळवून भागणार नाही. तिचा उपयोग करण्याची कौशल्ये आणि मार्ग त्याला अनुभवातून आत्मसात करता येणे ही खरी आवश्यकता आहे. शाळांच्या पालक-शिक्षक संघातून, गावच्या ग्रामशिक्षण समित्यांतून अशा निर्णया-घोषणांवर, ध्येयधोरणांवर मोकळी चर्चा हवी. कारण
शैक्षणिक ध्येयधोरणांत आणि निर्णयप्रक्रियेत जनसहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. शालेय शिक्षणात विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा असे चार मुख्य घटक असतात तर समाज हा त्याचा परिसर आहे. शिक्षणाच्या बालवाडीपासून महाविद्यालयापर्यंत अनेक पायऱ्या आहेत. प्रत्येक पायरीवर शिक्षणाचे नियोजन, विद्यार्थी, वय या सर्व बदलणाऱ्या गोष्टी आहेत. जरी अभ्यासक्रम एकच असेल तरीही शाळा, शिक्षक, शहर वा खेडे तसेच इतर अनेक घटक यामुळे शिक्षणाचा दर्जा बदलतो व त्यात एकवाक्यता, सुसूत्रता येत नाही. यासाठी या सर्व घटकांचे संघटन करणे व उत्कृष्ट शिक्षणपद्धतीचा अवलंब सर्व स्तरावर पोहोचेल असा प्रयत्न करणे आवश्क आहे.
महाराष्ट्राच्या या सुवर्णमंगल वर्षात जनतेला आणि सरकारला एक कळकळीचे आवाहन आहे की , उत्तम दर्जाचे आणि सर्वांसाठी शिक्षण हे आपले प्राथमिक ध्येय असायला हवे. महाराष्ट्रात जन्मलेल्या , किंबहुना देशातील प्रत्येक मुलाला शिक्षण मिळणे हा त्याचा अधिकार असला तरी तो वास्तवात उतरायला हवा. जसे प्रत्येकाला अन्न मिळायला हवे तसेच प्रत्येक मुलाला शिक्षण हे मिळायलाच हवे. हे ध्येय साध्य करण्यासाठी सरकार आणि समाज अशा दोघांनीही एकमेकांच्या हातात हात घेऊन काम करणे गरजेचे आहे. प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक तसेच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारे शिक्षण सर्वांपर्यंत कसे पोहचेल याचा सर्वांनीच विचार करायला हवा कारण यशस्वी जीवनाचा मूलमंत्र ” शिक्षण” हेच आहे
माहिती संकलन - अमरीन पठाण

