K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday, 27 May 2021

JEE Advanced 2021: 3 जुलैला होणारी जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षा लांबणीवर; कोरोनामुळे निर्णय




जेईई मेन परीक्षा पुढे ढकलली
जेईई मेन २०२१ मे सत्राची परीक्षा देखील स्थगित करण्यात आली आहे. करोना विषाणू महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक ट्विट करत यासंबंधीची माहिती दिली आहे.
         एप्रिल नंतर आता जेईई मेन मे सत्राची परीक्षा देखील लांबणीवर पडली आहे. ही परीक्षा २४ ते २८ मे २०२१ या कालावधीत होणार होती. दरम्यान, जेईई एप्रिल सत्र परीक्षाही यापूर्वी स्थगित करण्यात आली आहे. केवळ फेब्रुवारी आणि मार्च सत्राच्या परीक्षा झाल्या आहेत.
जेईई मुख्य परीक्षा 2021
जेईई आणि एनईईटी बोर्ड परीक्षा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. विविध स्त्रोतांकडून प्राप्त माहितीनुसार, सर्व राज्यांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून अंतिम निर्णय 30 मे पर्यंत घेण्यात येईल.



परीक्षेच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा –

  • १) सूचना योग्य रीतीने वाचा: कोणतीही महत्वाची माहिती सुटू नये म्हणून माहिती काळजीपूर्वक वाचा.
  • २) विभागाची निवड: प्रथम रसायनशास्त्र विभाग निवडण्याचा प्रयत्न करा आणि त्याचे प्रश्न सोडवा, कारण जर आपण हा विभाग त्वरीत पूर्ण केला तर उर्वरित विभागात आपण पुरेसा वेळ देऊ शकता.
  • ३) प्रत्येक विभागाला वेळ द्या, वेळेचे व्यवस्थापन करा: प्रत्येक विभागासाठी वेळ वाटून घ्या. असे केल्याने तुम्ही प्रत्येक विभागाला पुरेसा वेळ देऊ शकाल. आपण कोणत्याही विभागासाठी जास्त वेळ घालवत नाही आहोत, याची खात्री करा. रसायनशास्त्राला ४० मिनिटे, गणिताला ६० मिनिटे आणि भौतिकशास्त्रावर ८० मिनिटे देण्याचा सल्ला दिला जातो.
  • ३) प्रत्येक प्रश्नासाठी लागणारा वेळः एका प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. जर कोणताही प्रश्न आला तर ताबडतोब करा, परंतु कोणत्याही प्रश्नावर तीन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घालवू नका.
  • ५) सर्व प्रश्न वाचा: प्रत्येक प्रश्न काळजीपूर्वक वाचणे महत्वाचे आहे. प्रत्येक प्रश्न समजून घ्या. जर उमेदवारांनी प्रश्न चांगले वाचले तर उमेदवार चुका करणे टाळू शकतात.
  • ६) पर्याय काळजीपूर्वक वाचा: सर्व चार पर्याय काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. वाचताना घाई करू नका.
  • ७) परीक्षेच्या वेळी शांत राहा: आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी शांत राहणे महत्वाचे आहे. म्हणूनच परीक्षेच्या वेळीही शांत राहण्यावर भर द्या.
    परीक्षेच्या वेळी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा एक- दोन वेळा दीर्घ श्वास घेण्याचा प्रयत्न करा, कारण यामुळे मेंदूला आराम मिळतो.
  • ८) स्वत:वर विश्वास ठेवा: जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही काहीही मिळवू शकता. प्रेरणा ही त्यांच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी महत्त्वाचा घटक असतो. या किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक आहे.
  • ९) त्वरित नवीन प्रश्न सोडवायला घेऊ नका: शेवटी नवीन असलेल्या संकल्पना टाळा. आधी आपल्याला जे येते ते आधी सोडवावे.
  • १०) अंदाज लावू नका, खात्री कराः अंदाजानुसार उत्तरे निवडणे योग्य नाही. उमेदवारांनी ज्या प्रश्नांची त्यांना खात्री नाही अशा प्रश्नांची उत्तरे सोडावीत. ज्यांबाबत खात्री आहे, अशीच उत्तरं द्यावीत.

जेईई मेन २०२१ अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्यासाठी –

  • – नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जावे.
  • – होमपेजवरील अॅडमिट कार्ड डाऊनलोड करण्याच्या लिंकवर क्लिक करावे.
  • – विचारलेली माहिती भरावी.
  • – सबमिट करावे.अॅडमिट कार्ड तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
  • – अॅडमिट कार्ड डाऊनलोड करावे, प्रिंटआऊट घ्यावे आणि त्यावरील संपूर्ण माहिती, सूचना नीट वाचावी.

No comments:

Post a Comment