K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 22 December 2017

गणित दिवस विषयी उपयुक्त पोस्ट

गणित दिवस विषयी उपयुक्त पोस्ट

श्रीनिवास रामानुजन (डिसेंबर २२, १८८७:तंजावर - एप्रिल २६, १९२०) भारतीय गणितज्ञ होते.



श्रीनिवास रामानुजन
पूर्ण नाव श्रीनिवास रामानुजन अय्यंगार
जन्म डिसेंबर २२, १८८७
एरोड, मद्रास प्रांत, ब्रिटिश भारत
मृत्यू एप्रिल २६, १९२०
मद्रास, ब्रिटिश भारत
निवासस्थान कुंभकोणम
नागरिकत्व भारतीय
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र गणित
प्रशिक्षण ट्रिनिटी कॉलेज, केंब्रिज, युनायटेड किंग्डम
डॉक्टरेटचे मार्गदर्शक जी.एच्.हार्डी
ख्याती लांडाउ-रामानुजन स्थिरांक, रामानुजन मूळ संख्या, रामानुजन थीटा फंक्शन
वडील के. श्रीनिवास
आई कोमलताम्मा
पत्नी एस. जानकीअम्मा
रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन यांच्या ध्यानी-मनी-स्वप्नी सतत गणितच असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे. आणि म्हणूनच की काय कोण जाणे पण अनेकदा रामानुजन झोपेतून जागे होताच अतिशय अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत.





जन्म व संशोधन -

                या महान गणितज्ञाचा जन्म डिसेंबर २२, १८८७ रोजी तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात तिरोड या गावी झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे त्यांना या शाळेत शिष्यवृत्तीही मिळाली. माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत.

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजमनी त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. १९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत.

रामानुजन यांना मिळालेले बहुमान संपादन करा

रामानुजना यांनी एकदा केंब्रिज विद्यापीठातील प्रसिद्ध गणितज्ञ हार्डी यांना एक पत्र लिहले. या पत्रामध्ये गणितातील १२० नव्या प्रमेयांचा समावेश होता. पत्र वाचल्यानंतर हार्डी यांना रामानुजन यांच्या विलक्षण बुद्धीमत्तेचा साक्षात्कार झाला. त्यांनी मार्च १९१४ दरम्यान रामानुजन यांना केंब्रीज विद्यापीठात संशोधनासाठी आमंत्रित केले. २८ फेब्रुवारी १९१८ रोजी त्यांना रॅायल सोसायटीचे सन्माननीय सदस्यत्व बहाल करण्यात आले. ट्रीनीटी कॅालेजमध्ये अध्यापन करणारे ते पहिले भारतीय शिक्षक होते. रामानुजन यांनी गणितात अनेक नविन प्रमेयांचा, पद्धतींचा अंतर्भाव केला. रामानुजन यांच्या गणितातील संशेधनाची तुलना प्रसिद्ध गणितज्ञ युलर किंवा जोकोबी यांच्याशी केली जाते. त्यांना २० व्या शतकाती सर्वोत्तम गणितज्ञ असे संबोधले जाते.

मृत्यू -
              १९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरूणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले.

ग्रंथसाहित्य संपादन करा

श्रीनिवास रामानुजम (चरित्र). लेखक : प्रा. जयंत विनायक खेडकर; प्रकाशक भारतीय विचार साधना)

पुरस्कार संपादन करा

श्रीनिवास रामानुजम यांच्या नावे दिलेल्या पुरस्कारांचे धनी==

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
आनंदकुमार
गणिती हरिश्चंद्र


12 वी नंतरचे शैक्षणिक करिअर

☆12 वी नंतरचे शैक्षणिक करिअर ☆
     
           ☆ वैद्यकीय क्षेत्र ☆
शिक्षण - एमबीबीएस
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र आणि सीईटी प्रवेश परीक्षा
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका

               ☆शिक्षण - बीएएमएस ☆
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी, एमएस व इतर पदविका

                   ☆  शिक्षण - बीएचएमएस ☆
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडी

                   ☆ शिक्षण - बीयूएमएस ☆
कालावधी - पाच वर्षे सहा महिने
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

                          ☆ शिक्षण - बीडीएस ☆
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय, रुग्णालयात नोकरी
पुढील उच्च शिक्षण - एमडीएस

                    ☆शिक्षण - बीएससी इन नर्सिंग ☆
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - रुग्णालयात नर्स म्हणून नोकरी
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

                 ☆शिक्षण - बीव्हीएससी ऍण्ड एएच ☆
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - प्राणी, जनावर रुग्णालयात नोकरी, प्राणी संग्रहालय, अभयारण्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण

                        ☆ शिक्षण - डिफार्म ☆
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, थेट प्रवेश
संधी कोठे? - औषधनिर्मिती कारखान्यात नोकरी, स्वतःचा व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - बीफार्म

                  ☆ शिक्षण - बीफार्म ☆
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - औषध कंपनी किंवा औषध संशोधन संस्था इत्यादी ठिकाणी नोकरी, स्वतःचा व्यवसाय, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमफार्म

              ☆संरक्षण दलांत प्रवेशासाठी ☆
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (यूपीएससी) वर्षातून एनडीए (एक) व एनडीए (दोन) अशा दोन वेळा लेखी परीक्षा होतात.
एअर फोर्स व नेव्हीसाठी जे उमेदवार राज्य शिक्षण मंडळाची किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाची बारावी परीक्षा भौतिकशास्त्र व गणित या विषयांसह उत्तीर्ण आहेत किंवा त्या परीक्षेस बसलेले आहेत, असे उमेदवार परीक्षेसाठी पात्र ठरतात.
वयोमर्यादा : साडेसोळा ते 19 वर्षांदरम्यान वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतात.
--------------
            ☆अभियांत्रिकी व ऑटोमोबाईल ☆
शिक्षण - इंजिनिअरिंग डिप्लोमा
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश परीक्षा - बारावी शास्त्र, थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश
संधी कोठे? - आयटी औद्योगिक क्षेत्रात, उद्योग किंवा व्यवसाय, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - बीईच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश
शिक्षण - बीई
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय, आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, अभियांत्रिकी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए; तसेच जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - बीटेक
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, आयआयटी जेईई, एआयईईई
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्र, सरकारी उद्योग, खासगी उद्योग, संशोधन संस्था, आयटी क्षेत्र, नागरी सेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमई, एमटेक, एमबीए किंवा जीआरई देऊन परदेशात एमएस
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदवी -
कालावधी - चार वर्षे
पात्रता - बारावी शास्त्र, सीईटी
शिक्षण - ऑटोमोबाईल अभियांत्रिकी पदव्युत्तर शिक्षण
कालावधी - दोन वर्षे
पात्रता - बीई, ऑटोमोबाईल, मॅकेनिकल, उत्पादन, तत्सम शिक्षण
----------------
                ☆  कॉम्प्युटरमधील कोर्सेस ☆
डीओईएसीसी "ओ' लेव्हल
कालावधी - एक वर्ष ऊजएअउउ
डिप्लोमा इन ऍडव्हान्स्ड सॉफ्टवेअर टेक्‍नॉलॉजी
कालावधी - दोन वर्षे
सर्टिफिकेट कोर्स इन इन्फर्मेशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - सहा महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - तीन महिने
सर्टिफिकेट इन कॉम्प्युटिंग
कालावधी - दहा महिने
इग्नू युनिव्हर्सिटी
सर्टिफिकेट कोर्स इन कॉम्प्युटर प्रोग्रॅमिंग
कालावधी - एक वर्ष
शिक्षण - बारावी शास्त्र
कॉम्प्युटर ऍप्लिकेशन
कालावधी - एक वर्ष
वेब डिझाईनिंग ऍण्ड वेब डेव्हलपमेंट
कालावधी - दोन महिने
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅम असिस्टन्स
कालावधी - एक वर्ष
(फक्त मुलींसाठी)
डिप्लोमा इन ऍडव्हर्टायझिंग ऍण्ड ग्राफिक डिझाईनिंग
कालावधी - दोन वर्षे
गेम डिझाईन ऍण्ड डेव्हलपमेंट
कालावधी - एक वर्ष
प्रिंट इमेजिंग ऍण्ड पब्लिशिंग, कार्टून ऍनिमेशन, ई-कॉम डेव्हलपमेंट, वेब ग्राफिक्‍स ऍण्ड ऍनिमेशन
कालावधी - एक वर्ष
कॉम्प्युटर ऑपरेटर ऍण्ड प्रोग्रॅमिंग असिस्टंट
कालावधी - एक वर्ष
डेस्क टॉप पब्लिशिंग ऑपरेटर
कालावधी - एक वर्ष
------------------
                    ☆  रोजगाराभिमुख कोर्सेस ☆
शिक्षण - डिप्लोमा इन प्लॅस्टिक मोल्ड टेक्‍नॉलॉजी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता - बारावी (70 टक्के)
संधी कोठे? - प्लॅस्टिक आणि मोल्ड
इंडस्ट्रीमध्ये संधी, सिंगापूर, मलेशियामध्ये संधी
उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
कोठे? सेंट्रल इन्स्टिट्यूशन ऑफ प्लॅस्टिक्‍स
इंजिनिअरिंग ऍण्ड टेक्‍नॉलॉजी, म्हैसूर
शिक्षण - टूल ऍण्ड डाय मेकिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता - दहावी आणि बारावी पास
संधी - टूल ऍण्ड डाय इंडस्ट्री, भारत आणि मलेशियाशियामध्ये भरपूर संधी गव्हर्नमेंट टूल रूम ऍण्ड ट्रेनिंग सेंटर
(जीटीटीसी), नेट्टूर टेक्‍नॉलॉजी ट्रेनिंग
फाउंडेशन (एनटीटीएफ)
सेक्रेटरीअल प्रॅक्‍टिस
कालावधी - एक वर्ष
फॅशन टेक्‍नॉलॉजी
कालावधी - एक वर्ष
मॉडर्न ऑफिस प्रॅक्‍टिस
कालावधी - तीन वर्षे
---------------
          ☆हॉस्पिटॅलिटी ऍण्ड टुरिझम
                             टूरिस्ट गाइड ☆
कालावधी - सहा महिने
डिप्लोमा इन फूड ऍण्ड बेव्हरेज सर्व्हिस
कालावधी - दीड वर्ष
बेसिक कोर्स ऑन ट्रॅव्हल फेअर ऍण्ड टिकेटिंग
कालावधी - तीन महिने
बेसिक कोर्स इन कॉम्प्युटराइज्ड रिझर्व्हेशन
सिस्टम (एअर टिकेटिंग)
कालावधी - एक महिना
अप्रेन्टाईसशिप
कालावधी - पाच महिने ते चार वर्षे
शिक्षण - व्होकेशनल स्ट्रिममध्ये बारावी
डिजिटल फोटोग्राफी
कालावधी - एक वर्ष
स्टोअर कीपिंग ऍण्ड पर्चेसिंग
कालावधी - एक ते तीन वर्षे
सेल्स ऍण्ड अकाउंटन्सी
कालावधी - एक ते तीन वर्षे
----------------
                 ☆ बांधकाम व्यवसाय ☆
शिक्षण - बीआर्च
कालावधी - पाच वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - स्वतःचा व्यवसाय किंवा बांधकाम उद्योगांमध्ये नोकरी, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमआर्च, एमटेक
---------------
                    ☆ पारंपरिक कोर्सेस ☆
    ☆शिक्षण - बीएससी
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, प्रवेश थेट
संधी कोठे? - आयटी, औद्योगिक क्षेत्र, संशोधन संस्था, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील उच्च शिक्षण - एमएससी, एमबीए, एमसीए, एमपीएम इत्यादी

  ☆शिक्षण - बीएससी (ऍग्रो)
कालावधी - तीन वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र
संधी कोठे? - कृषी उद्योग कारखान्यात नोकरी, सरकारी कृषी सेवा नोकरी, नागरी सेवा परीक्षा, शेती व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - एमएससी (ऍग्रो), राष्ट्रीय कृषी परिषद संस्थांमध्ये संशोधन

           ☆शिक्षण - बीए
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - नोकरीसाठी व्यावसायिक, मृदू कौशल्ये, प्रमाणपत्र अथवा पदविका अभ्यासक्रम बीए करतेवेळी जास्त फायदेशीर. नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार
पुढील शिक्षण - एमए, एमबीए, पत्रकारिता, पदविका, एलएलबी

                  ☆शिक्षण - बीकॉम
कालावधी - तीन वर्षे
संधी कोठे? - आयसीडब्ल्यूए, सीए, सीएस परीक्षांचा अभ्यास बीकॉम करताना देणे फायदेशीर, नागरी सेवा परीक्षा, स्वयंरोजगार, लेखापाल म्हणून नोकरी

                  ☆शिक्षण - बीएसएल
कालावधी - पाच वर्षे
संधी कोठे? - विधी व्यवसाय, विधी सल्लागार, नागरी सेवा परीक्षा, न्याय सेवा
पुढील उच्च शिक्षण - एलएलएम

                  ☆शिक्षण - डीएड
कालावधी - दोन वर्षे
प्रवेश - सीईटी आवश्‍यक
संधी कोठे? - प्राथमिक शिक्षण शिक्षक
पुढील उच्च शिक्षण - बीए, बीकॉम व नंतर बीएड

             ☆शिक्षण - बीबीए, बीसीए,बीबीएम
कालावधी - तीन वर्षे
प्रवेश - सीईटी
संधी कोठे? - औद्योगिक क्षेत्रात नोकरी, आयटी क्षेत्रात नोकरी, स्वयंरोजगार, नागरी सेवा परीक्षा
पुढील उच्च शिक्षण - एमबीए, एमपीएम, एमसीए

              ☆ फॉरेन लॅंग्वेज
(जर्मन, फ्रेंच, रशियन, स्पॅनिश, चायनीज,
जॅपनीज, कोरियन)
कालावधी ः बेसिक, सर्टिफिकेट किंवा इतर
कोर्सेसवर आधारित
-------------------
      ☆हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
शिक्षण - हॉटेल मॅनेजमेंट ऍण्ड केटरिंग
कालावधी - चार वर्षे
पात्रता व प्रवेश - बारावी शास्त्र, सीईटी
संधी कोठे? - पंचतारांकित हॉटेल, मॉल्स किंवा रेस्टॉरंटमध्ये नोकरी, केटरिंग व्यवसाय
पुढील उच्च शिक्षण - पदव्युत्तर शिक्षण
डिप्लोमा इन बेकरी ऍण्ड कॉन्फेक्‍शनरी
कालावधी - दीड वर्षे
डिप्लोमा, क्राफ्ट कोर्स इन फूड प्रॉडक्‍शन
कालावधी - दीड वर्षे
💎💎💎🏵🏵💎💎💎

स्वच्छतेचे महत्त्व

        
                       स्वच्छता हा माणसाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. ह्या एका गुणा मुळे माणसाचे जीवन सुंदर बनते. ही एक सवय आहे. स्वच्छता म्हटली की आपल्या समोर अनेक बाबी उभ्या राहतात. स्वच्छता कश्याकश्याची आणि कशी ठेवायाची हा मोठा प्रश्न आपल्या समोर असतो. स्वच्छतेची सुरुवात ही स्वतः पासून म्हणजे स्वतःच्या शरीर स्वच्छते पासून करावी. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपल्या स्वच्छते विषयी आपण जागरूक राहून कार्य केल्यास आपली छाप इतरावर निश्चितपणे पडते. लहानपणी सकाळी उठले की आई मुलांच्या मागे राहून दात स्वच्छ घास, चूळ भर आणि हात-पाय स्वच्छ धुउन घेण्याविषयी तगादा लावते. कारण स्वतः च्या स्वच्छतेची सुरुवात ही याच क्रियेपासून होते. लहानपणी लागलेली स्वच्छतेची चांगली सवय त्यांच्या सोबत आयुष्यभर राहते ही तर चांगली गोष्ट आहेच यासोबत आपल्या दाताचे आयुष्यही वाढते. दाताचे विकार होत नाही. आपल्या जीवनात दाताचे काय महत्त्व आहे हे दात नसणाऱ्या लोकांना विचारून पहिल्याशिवाय कळणार नाही. स्नान करणे ही त्या नंतरची अत्यंत महत्वाची क्रिया. बहुतांश व्यक्ती स्नान ही क्रिया महादेवाला पाणी घातल्यासारखे डोक्यावरुन पाणी ओततात त्यामुळे अंगाची सफाई होत नाही. साबणाचा वापर करीत अंग घासुन स्नान केल्यास आपल्या अंगाचा वास येत नाही. विशेष म्हणजे त्वचा रोगापासून आपण दूर राहू शकतो. दररोज स्वच्छ कपडे परिधान करून बाहेर पडण्याची आपली सवय इतराना त्रासदायक ठरत नाही. मळके कपडे अंगावर असतील आणि प्रवासात कुठे तरी आपण बसलात तर कपड्याच्या दुर्गन्धी मुळे कुणी आपल्याजवळ बसत नाही. शाळेत तर याचा फार वेगळा अनुभव येतो. त्यामुळे घराबाहेर जाताना स्वच्छ कपडे एक तर आपणास शोभुन दिसते आणि आपल्यामुळे इतराना त्रास ही होत नाही. म्हणून स्वच्छ कपडे वापरण्याची सवय शाळेत असताना जी लागते ती आयुष्यभर सोबत राहते. बाहेरुन घरात येताना हात-पाय स्वच्छ धूउन घरात प्रवेश करावा. बहुतांश वेळा मुले बाहेर उघड्यावर खेळतात आणि तसेच घरात प्रवेश करतात. ज्यामुळे बाहेरील अनेक किटक थेट घरात प्रवेश मिळवितात आणि घरातील अनेक लोक आजारी पडतात. शौचास जाऊन आल्यावर सुद्धा स्वच्छ हात-पाय धुवावे आणि मगच घरात यावे. जेवण करण्यापूर्वी हात अगदी स्वच्छ धुवावे आणि कोरड्या रुमालाने साफ करावे. रात्री झोपण्या पूर्वी सुद्धा स्वच्छ हात-पाय धुतल्या नंतर छान झोप लागते की नाही ते पहा. म्हणजे स्वतः ची स्वच्छता ही जीवनात अत्यंत महत्वाचे आहे. याशिवाय आपले जीवन दीर्घायुष्य होउच शकत नाही. अस्वच्छ रहाणे म्हणजे आपले अर्धे आयुष्य कमी करून घेण्यासारखे आहे. त्याच अनुषंगाने नुकतेच आपण जागतिक हात धुण्याचा दिवस साजरा केला आहे. त्यातून आपणास हाच संदेश मिळतो की स्वच्छ रहा ; निरोगी रहा.

स्वतःच्या स्वच्छतेनंतर आपण आपल्या घराच्या स्वच्छतेकडे लक्ष देतो आणि ते आवश्यक आहे. कारण आपले ज्याठिकाणी उठणे, बसणे, खाणे, आणि पिणे असते त्या ठिकाणी स्वच्छता असणे गरजेचे आहे. त्यामुळे रोज सकाळी आणि संध्याकाळी आपले घर झाड़ूने साफ करीत असतो. आपले अंगण स्वच्छ करतो. घरातील आणि अंगणातील कचरा परिसरात टाकतो. म्हणजे आपणास परिसर घाण असलेले चालते परंतु आपले घर आणि अंगण स्वच्छ असावे असे वाटते ही प्रत्येकाची मानसिकता आहे. हा बदल करण्यासाठी स्वच्छतेचे धडे किंवा पाठ आज समाजाला शिकविण्याची खरी गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे हे चुकीचे आहे हे कळतय पण वळत नाही अशी स्थिती झाली आहे. 
आज ग्रामीण भागात जर गेलो तर गावाच्या प्रवेशालाच दुर्गन्धी सुरु होते. प्रत्येक जण उघड्यावर शौचास जाउन गावाचा प्रवेशाचा संपूर्ण रस्ता अस्वच्छ करतात. यात कधी बदल होणार आहे ? गावात असलेली शाळा आपणास कधीच स्वच्छ ठेवता येत नाही. शाळा सुटली की गावातले काही रिकामटेकडे पोरे शाळेत येऊन वर्ग खोल्याच्या भिंती खराब करतात. काही गुटखा शौकीन मुले पान तंबाखू खातात आणि सर्व परिसर कधी कधी भिंती रंगवून टाकतात. दारू पिणारे मंडळी दारू पितात आणि वर्ग खोलीत बाटली फेकतात तर काही जण बाटली मैदानावर टाकतात, अश्या रीतीने सकाळी स्वच्छ केलेला शाळेचा परिसर सायंकाळी घाण केल्या जातो. शालेय स्वच्छालय कोणत्याच गावात चांगली ठेवली जात नाहीत. ज्या गावात शालेय स्वच्छालयाची देखभाल स्वतः गावकरी करीत असतील त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते. गावात इतर काही ठिकाणी सुध्दा ही मंडळी अस्वच्छता पसरवितात. ज्यामुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरते. त्यामुळे गावात साथीचे अनेक रोग पसरतात. मग दवाखाना आपल्या मागे लागते. जेथे लाखो रुपये खर्च करावे लागते तरी आपले डोळे उघडत नाही आणि आपला गांव स्वच्छ ठेवत नाही. डेंग्यू सारखा आजार तर कधी कधी आपला जीव ही घेतो. हा रोगप्रसार फक्त आणि फक्त आपल्या अस्वच्छतेमुळे होते याची जाणीव आपणास व्हायला हवी. ग्रामपंचायत कार्यालय जमेल तेवढे कार्य करते पण संपूर्णपणे त्यावर अवलंबून रहाणे हे ही चूक आहे. वैयक्तिक स्वच्छते सोबत गावाची स्वच्छता देखील तेवढीच महत्वाची आहे.
सार्वजनिक ठिकाणी आपली वागणूक चांगली असेल तर परिसर स्वच्छ राहू शकते. बरेच जण सार्वजानिक ठिकाणी बेजबाबदरपणे वागतात आणि त्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरत जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बस मध्ये प्रवास करताना असा अनुभव खास करून येतो. बसमध्ये प्रवास करणारे काही मंडळी पान तंबाखू आणि गुटखा खाऊन कोपऱ्यात थुंकुन सर्व जागा घाण करतात. त्यामुळे इतर प्रवाश्याना त्याचा त्रास होतो. धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे ह्या फलक ऐवजी कोपऱ्यात थुंकू नका असे फलक लावावे लागेल असे वाटते. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छ करणाऱ्या व्यक्तिस दंड लावण्याचा कायदा अस्तित्वात आहे मात्र फक्त तो कागदावरच आहे. त्याची अंमलबजावणी जर करण्यात आली आणि दंड लावण्याची प्रक्रिया चालू केल्यास अस्वच्छता कमी होईल, असे वाटते. बसनंतर सर्वात जास्त प्रवासी वाहून नेणारे रेल्वेमध्ये स्वच्छता दिसणे खूपच दुरापास्त आहे. आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवणारे नागरिक रेल्वेत मात्र सर्व काही विसरून वागतात. जेथे काही खाल्ली तेथेच कचरा करतात. ज्याचा त्रास इतर प्रवाश्याना होतो. कधी कधी त्याचे बळी आपणच ठरतो हे ही सत्यच आहे. बागेत सुध्दा आपली हीच बेफिकिर वृत्ती दिसून येते. पर्यटननाच्या स्थळी सुध्दा आपण स्वच्छ वागतो असे काही दिसून येत नाही. त्यामुळे बस आणि रेल्वेमधील स्वच्छता असो वा इतर ठिकाणची स्वच्छता ही आपल्या हातात आहे. ती आपली सर्वाची मालमत्ता आहे अशी काळजी घ्यावी. आपण एकटे स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करू या आपल्या सोबत एक-दोन व्यक्ति तरी निश्चितपणे या मार्गावर येतात. महात्मा गांधीजी यांनी ज्याप्रकारे आपल्या जीवनात स्वच्छतेला महत्त्व दिले होते. तसे आपण ही महत्त्व देऊ या. स्वच्छ भारत निर्माण करण्यात आपले ही काही योगदान देऊ या.

- नागोराव सा. येवतीकर
  मु. येवती ता. धर्माबाद
★★★★★★◆◆◆◆◆◆★★★★★★★★
*स्वच्छतेचे महत्त्व*                  

                     स्वच्छता म्हणजे फक्त बाह्य स्वरूप नाही.तर स्वछता हे आरोग्यदायी जीवनाचे बहुसमावेशक तत्व आहे.ती मनाची व अंतः करणाची अवस्था देखील आहे. ज्यामध्ये आपली नैतिक मूल्ये आणि उपासना यांचा समावेश होतो.                   गावागावातून ज्यांनी स्वच्छतेचे धडे दिले त्या संत गाडगेबाबांना एकाने प्रश्न विचारला , बाबा आपण मंदिरात का येत नाहीत? तेंव्हा बाबा बोलले अरे देव दगडात नाही तर माणसात आहे. आणि त्याच्या निरोगी जीवनासाठी मला हा मंदिराबाहेरील पडलेले फुले, नारळाचा कचरा साफ करणे गरजेचे वाटते. त्यांचा हा विचार आपल्याला अगदी विचार करायला लावणारा आहे.
          जगभरात स्वच्छतेविषयी एकसमान दर्जे नाहीत आणि वेगवेगळ्या लोकांना स्वच्छतेविषयी वेगवेगळ्या कल्पना असतात. पूर्वी, शाळेचा परिसर स्वच्छ, नीटनेटका असायचा आणि त्यामुळे बऱ्याच देशांमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लागत असतात. 

 दररोजच्या जीवनात किंवा व्यापारी जगातही स्वच्छतेच्या बाबतीत प्रौढ नेहमीच आदर्श नसतात. जसे की, पुष्कळशी सार्वजनिक ठिकाणे घाणेरडी, गलिच्छ असतात. काही कंपन्यांमुळे वातावरणात प्रदूषण होते. प्रदूषणाला, कारखाने आणि व्यापार नव्हे तर त्यातील लोक जबाबदार आहेत. प्रदूषण व त्याच्या दुष्परिणामांच्या जागतिक समस्येचे प्रमुख कारण स्वार्थ असला तरीही लोकांच्या अस्वच्छ वैयक्तिक सवयी देखील काही अंशी याला कारणीभूत आहेत. ऑस्ट्रेलियन राष्ट्रसंघाचे भूतपूर्व अध्यक्ष यांनीही या निष्कर्षाला सहमती दर्शवत असे म्हटले: “सार्वजनिक आरोग्यासंबंधीचे सर्व प्रश्न प्रत्येक पुरुष, प्रत्येक स्त्री आणि प्रत्येक मुलावर अवलंबून आहेत.”
           स्वच्छता स्वतः पासून सुरु करा . वैयक्तिक  स्वचतेच्या लक्ष्मण रेषा पाळल्या की सामाजिक स्वच्छता आपोआपच घडून येते.
म्हणूनच घेऊ वसा मन प्रसन्न करण्याचा, शरीर निरोगी करण्याचा , घर -परिसर स्वच्छ ठेवण्याचा,समाज निरोगी करण्याचा!!                        शामल कुलकर्णी                 
★★★★★★★★★★★★★★★★★★★★


                    स्वच्छता आपली मुलभूत गरजच आहे.केवळग पंतप्रधानांनी आवाहन केले म्हणुन नाही तर प्रत्येकाने आपले कर्तव्य समजून स्वच्छतेच पालन केल पाहीजे.
जवळजवळ ६०% आजारांच मुळ अस्वच्छतेत असत.
प्रत्येक व्यक्तीन लहानपणापासुनच स्वच्छतेचा धडा गिरविला पाहीजे जो आयुष्यभर पक्का लक्षात बसेल..घर, परिसर, गल्ली, गाव, शहर देश  अस स्वच्छतेच अव्याहत चक्र चालु असेल तर आपल जीवन सुकर होईल अन्यथा घाण, रोगराई, प्रदुषण याचा पडत असलेला विळखा आणखी घट्ट होऊन मानवी जीवन जगण कठीण होत जाईल..
आपलआरोग्य निसर्ग याच्या संरक्षणार्थ स्वच्छतेचा मार्ग हाच सुखी जीवनाचा मार्ग असेल 
..पुष्पा गायकवाड. नांदेड
★★★★★★★★★★★★★★★★★★★★


                    विश्वची माझे घर असे संत मंडळी बोलून गेलीआहेत .आपण स्वत: ते विश्व या आयुष्याच्या प्रवासात आपले कुटुंब,घर, शेजारी पाजारी,परिसर,गाव ,तालुका,जिल्हा ,राज्य, देश या सार्यांशी आपली व्यक्ती म्हणून देशाचा जबाबदार नागरीक म्हणून बांधिलकी असते.
        'स्वच्छता' ही अशीच वैयक्तिकते कडून सामाजिकते कडे नेणारी गोष्ट आहे.
       स्वच्छतेचे बाळकडू 
बालपणापासून आपणास मिळत आले,स्वच्छतेच्या चांगल्या सवयी जोपासत आपण शाळा शिकलो ,मोठे झालो.कुटुंबातून ,शिक्षकांकडून ,पाठ्यपुस्तकातून स्वच्छता का करायची हे ऐकत आलोआणि तेपटणारेच होते. सकाळच्या रम्य प्रहरी शरीराची ,घराची ,परिसराची स्वच्छता झाली की प्रसन्न वाटते.या प्रसन्नतेत देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतले वा घरच्याच देव्हार्यासमोर प्रार्थना श्लोक म्हटले की मनही ताजे तवाने होऊन जाते.मनातील नकारात्मक विचारांची जागा सुविचार कधी घेतात कळतही नाही.आणि मग जाणीव होते स्वच्छता म्हणजे नेमके काय याची.शरीरातील,मनातील घरातील नको असणारे निरूपयोगी,अडगळ ,अस्वच्छ असे सारे दूर केल्याने योग्य विल्हेवाट लावल्याने मंगलमय असे वातावरण तयार होते.ज्याची सर्व प्राणी मात्रांना गरज आहे.
    देह देवाचे मंदीर
    आत्मा एक पंढरपूर
हे खरे आहे.जसे देहामधे परमेश्वराचे अस्तित्व आहे तसेच ते चरचरात भरून उरले आहे मग आपण या सृष्टीची किती स्वच्छता ठेवायला हवी हे वेगळे सांगायला नको. 
      स्वच्छ शरीरामुळे व स्वच्छतेच्या सवयींमुळे उत्तम आरोग्याचा लाभ होतो .हे वैयक्तिक आरोग्य ा बरोबरच सामाजिक आरोग्यासाठीही लाभदायी आहे.कचर्याची योग्यप्रकारे सुका कचरा ओला कचरा अशी विभागणी करण्याची सवयही अंगीकारणे गरजेचे आहे.डंपिंग ग्राउंडची समस्या उग्र रूप धारण करते आहे .हे सामाजिक भान आपल्यात जागवणे ही काळाची गरज आहे.आज ई_कचरा ही सुद्धा दिवसा गणिक वाढणारी समस्या ठरते आहे याकडेही  समाजाचे लक्ष वेधणे व स्वच्छतेच्या प्रश्नाकडे अधिक सजगतेने पहाणे गरजेचे आहे.
    मी ,माझ्यापुरते पाहून चालणार नाही.देशाच्या स्वच्छता अभियानाचे आपण सारे जण अग्रदूत होउन काम केले तर स्वच्छ गाव,स्चछ देश हे स्वप्न सत्या त उतरेल नाहीतर माझ्या एकट्याने स्वच्छतेचे महत्व जाणून काय होणार? हा नकारात्मक विचार झटकून स्वच्छतेची क्रांती लाट यायला हवी.विज्ञानयुगात स्वच्छतेचे महत्व अधोरेखित करणार्या अनेक बातम्या, शोध ,जाहिराती प्रसारीत होतात.अनेक रोगजंतूचा प्रसार रोखण्यासाठी रोग बरे होण्यासाठी औषधांबरोबरच आरोग्यदायी वातावरणाची
नितांत आवश्यकता आहे.
सत्यम शिवम सुंदरम,अशी वाटचाल करायची तर स्वच्छ  शरीर
       व स्वच्छ सुंदर मन
घडवायलाच हवे.ज्याची सुरूवात स्वतापासून करूया तरच स्वताची कर्तव्ये पार पाडण्यासाठी
योग्य उर्जेची प्राप्ती होईल.निसर्ग सुंदर आहे,आयुष्य सुंदरआहे.
चला तर मग हाती घेऊन हात
अस्वच्छतेवर करू मात
सुविचारांना देऊ साथ
आरोग्यदायी  उगवेल प्रभात
 विद्या प्रभु
★★★★★★★★★★★★★★★★★★★★


       स्वच्छतेच महत्व 
  स्वच्छता ही एक कला आहे,
    स्वच्छता कशी राखायची,
      हे ज्याने त्याने ठरवायच,
प्रॉब्लेम सर्वानाच असतात,प्रॉब्लेम सोडवायचे,
 की रडत बसायचे 
   हे ज्याने त्याने ठरवायाचे.
खरच स्वच्छता ही आपल्या जीवनात नंदनवन फुलविते.स्वच्छतेचाच आग्रह सर्वानी धरला पाहिजे.त्यामुळे केवळ आपल्या शारीरिक च नव्हे तर सामाजिक तक्रारी देखील दूर होतील.कारण आपण पाहतो आजुबाजुला पडलेला कचरा केवळ आपलेच नाही तर प्राण्यांच्या आरोग्य करिता अपाय कारक आहे.म्हणूनच सर्वाना हीच विनंती की आपण जसे आपले घर स्वच्छ ठेवतो तसेच परिसर ही स्वच्छ ठेवन्यास कटीबध् असावे.
 आपण शारीरिक स्वच्छता नियमित करावी.त्यामुळे आपण इतरासाठी आदर्श ठरू शकतो.
  ओला कचरा व् सुका कचरा याचे योग्य व्यवस्थापण व्हायला हवे.चला तर मग स्वच्छता पाळू,रोगराई टाळू.
जायभाये एस बी

Thursday 21 December 2017

सायबर गुन्हे म्हणजे काय

🌏 *सायबर गुन्हे म्हणजे काय?* 🌎


         What is Cyber Crime?

           आजकाल आपण सायबर गुन्ह्यांबद्दल बरेच ऐकतो,वर्तमानपत्रात वाचतो परंतु सायबर गुन्हे म्हणजे काय ? त्याबद्दल कोणता कायदा आणि त्यात शिक्षेच्या कोणत्या तरतुदी हे बऱ्याच जणांना माहित नसते.म्हणून हा आजचा लेख.
            संगणक, मोबाइल किंवा इंटरनेटसह इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्‍सचा गैरवापर करून एखादी व्यक्ती किंवा समूहाला शारीरिक, मानसिक हानी पोहचविण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा.

💥 *सायबर गुन्ह्यांचे प्रकार*
            वैयक्तिक स्वरूपातील संवेदनशील माहितीची चोरी किंवा परस्पर देवाण-घेवाण, आर्थिक फसवणूक (फिशिंग, स्पूफिंग), हॅकिंग (डिनायल ऑफ सव्‍‌र्हिस), अश्लील मजकूर म्हणजे सायबर गुन्हेगारीच्या भाषेत ‘पोर्नोग्राफी’, कॉपीराइट व बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन आदी गुन्हे सायबर गुन्हा या प्रकारात मोडतात.

💥 *सुरक्षित ब्राऊजिंगसाठी..*

💢 मोबाइल बँकिंगचा वापर करताना ‘स्क्रीन लॉक’चा पर्याय सक्रिय ठेवा.

💢 बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती (उदा. खाते क्रमांक, एटीएम पिन, नेटबँकिंग पासवर्ड इ.) आपल्या मोबाइलमध्ये स्टोअर करून ठेवू नका.

💢 सोशल मीडियाचा वापर करताना ‘मालवेअर’पासून सावध राहा. कोणत्याही प्रकारच्या अनोळखी वा संशयास्पद लिंक, जावा फाइल, फ्लॅश प्लेअर फाइल डाऊनलोड अथवा रन करू नका.

💢 बँक किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पासवर्डची नोंद करताना केवळ तुम्हालाच माहीत असेल अशा सांकेतिक अंक व अक्षरांचा वापर करा. जन्म तारीख, स्वत:चे नाव किंवा इतरांना सहज माहीत करून घेता येईल, अशा प्रकारचे पासवर्ड ठेवू नका.

💢 संगणक वा मोबाइलवरून समाज माध्यमे किंवा नेटबँकिंगवर ‘लॉगइन’ करताना ब्राऊजरसाठी विचारण्यात येणारा ‘रिमेंबर पासवर्ड’चा पर्याय नेहमी बंद ठेवा.

💢 सार्वजनिक ठिकाणच्या संगणकांवरून ब्राऊजिंग केल्यानंतर ‘ब्राऊजिंग हिस्ट्री’ आणि ‘कुकीज’ हटवायला विसरू नका.

💢 ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ वापरताना ‘इनप्रायव्हेट ब्राऊजिंग’ या सुविधेचा वापर करा.

💢  संशयास्पद ई-मेल खुले करू नका वा त्यातील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

💥 *सायबर कायदा काय?*

💢 अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंड विधानाच्या २९२ कलमान्वये गुन्हा दाखल होऊ  शकतो. त्या अंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.

💢 माहिती तंत्रज्ञानाचे कलम ६६ हे संगणकाशी संबंधित गुन्ह्य़ांसाठी वापरले जाते.  आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६६ (अ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

💢  ‘आयडेंटिटी थेफ्ट’ म्हणजे ‘वैयक्तिक संवेदनशील माहिती’ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल ६६(क) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ  शकते.

💢  ‘प्रायव्हसी’च्या उल्लंघनाबद्दल ६६(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ  शकते.

💢 आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल ६७(अ) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ  शकते.

💢  अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६७ (ब) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.