K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 21 December 2017

सायबर गुन्हे म्हणजे काय

🌏 *सायबर गुन्हे म्हणजे काय?* 🌎


         What is Cyber Crime?

           आजकाल आपण सायबर गुन्ह्यांबद्दल बरेच ऐकतो,वर्तमानपत्रात वाचतो परंतु सायबर गुन्हे म्हणजे काय ? त्याबद्दल कोणता कायदा आणि त्यात शिक्षेच्या कोणत्या तरतुदी हे बऱ्याच जणांना माहित नसते.म्हणून हा आजचा लेख.
            संगणक, मोबाइल किंवा इंटरनेटसह इलेक्ट्रॉनिक व टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्‍सचा गैरवापर करून एखादी व्यक्ती किंवा समूहाला शारीरिक, मानसिक हानी पोहचविण्यासाठी किंवा त्यांची बदनामी करण्यासाठी गुन्हेगारी उद्देशाने केलेले कृत्य म्हणजे सायबर गुन्हा.

💥 *सायबर गुन्ह्यांचे प्रकार*
            वैयक्तिक स्वरूपातील संवेदनशील माहितीची चोरी किंवा परस्पर देवाण-घेवाण, आर्थिक फसवणूक (फिशिंग, स्पूफिंग), हॅकिंग (डिनायल ऑफ सव्‍‌र्हिस), अश्लील मजकूर म्हणजे सायबर गुन्हेगारीच्या भाषेत ‘पोर्नोग्राफी’, कॉपीराइट व बौद्धिक संपदा हक्कांचे उल्लंघन आदी गुन्हे सायबर गुन्हा या प्रकारात मोडतात.

💥 *सुरक्षित ब्राऊजिंगसाठी..*

💢 मोबाइल बँकिंगचा वापर करताना ‘स्क्रीन लॉक’चा पर्याय सक्रिय ठेवा.

💢 बँक खात्याशी संबंधित कोणतीही माहिती (उदा. खाते क्रमांक, एटीएम पिन, नेटबँकिंग पासवर्ड इ.) आपल्या मोबाइलमध्ये स्टोअर करून ठेवू नका.

💢 सोशल मीडियाचा वापर करताना ‘मालवेअर’पासून सावध राहा. कोणत्याही प्रकारच्या अनोळखी वा संशयास्पद लिंक, जावा फाइल, फ्लॅश प्लेअर फाइल डाऊनलोड अथवा रन करू नका.

💢 बँक किंवा अन्य कोणत्याही ठिकाणी पासवर्डची नोंद करताना केवळ तुम्हालाच माहीत असेल अशा सांकेतिक अंक व अक्षरांचा वापर करा. जन्म तारीख, स्वत:चे नाव किंवा इतरांना सहज माहीत करून घेता येईल, अशा प्रकारचे पासवर्ड ठेवू नका.

💢 संगणक वा मोबाइलवरून समाज माध्यमे किंवा नेटबँकिंगवर ‘लॉगइन’ करताना ब्राऊजरसाठी विचारण्यात येणारा ‘रिमेंबर पासवर्ड’चा पर्याय नेहमी बंद ठेवा.

💢 सार्वजनिक ठिकाणच्या संगणकांवरून ब्राऊजिंग केल्यानंतर ‘ब्राऊजिंग हिस्ट्री’ आणि ‘कुकीज’ हटवायला विसरू नका.

💢 ‘इंटरनेट एक्स्प्लोरर’ वापरताना ‘इनप्रायव्हेट ब्राऊजिंग’ या सुविधेचा वापर करा.

💢  संशयास्पद ई-मेल खुले करू नका वा त्यातील कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.

💥 *सायबर कायदा काय?*

💢 अश्लील व आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल भारतीय दंड विधानाच्या २९२ कलमान्वये गुन्हा दाखल होऊ  शकतो. त्या अंतर्गत दोन ते पाच वर्षांचा तुरुंगवास आणि दंड अशी शिक्षेची तरतूद आहे.

💢 माहिती तंत्रज्ञानाचे कलम ६६ हे संगणकाशी संबंधित गुन्ह्य़ांसाठी वापरले जाते.  आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६६ (अ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे.

💢  ‘आयडेंटिटी थेफ्ट’ म्हणजे ‘वैयक्तिक संवेदनशील माहिती’ची चोरी व गैरवापर केल्याबद्दल ६६(क) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि एक लाख रुपये दंडापर्यंतची शिक्षा होऊ  शकते.

💢  ‘प्रायव्हसी’च्या उल्लंघनाबद्दल ६६(इ) कलमान्वये तीन वर्षे तुरुंगवास आणि दोन लाखांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ  शकते.

💢 आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित, प्रकाशित केल्याबद्दल ६७(अ) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा वर्षे दंडाची शिक्षा होऊ  शकते.

💢  अल्पवयीन मुलांचे आक्षेपार्ह लैंगिक कृत्य किंवा मजकूर प्रसारित केल्याबद्दल ६७ (ब) कलमान्वये पाच ते सात वर्षे तुरुंगवास आणि दहा लाख रुपये दंडाच्या शिक्षेची तरतूद कायद्यात आहे.

No comments:

Post a Comment