K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 12 December 2017

मतदार यादी

मतदार यादी

1. मतदार पात्रता
प्रश्न 1 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी कोणती मतदार यादी उपयोगात आणली जाते ?

उत्तर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या तरतुदीखाली विधानसभेसाठी तयार केलेली आणि विधानसभेच्या मतदार संघाचा जो भाग स्थानिक संस्थेच्या म्हणजेच ग्रामपंचायतीच्या निवडणूक मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला असेल अशा भागासाठी राज्य निवडणूक आयोग अधिसुचित करील अशा तारखेस अंमलात असलेली मतदार यादी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अपायोगात आणली जाते.
प्रश्न 2 मतदार होण्यासाठी पात्रता काय आहेत ?

उत्तर मतदार होण्यासाठी पात्रता खालील प्रमाणे आहेत.
भारताचा नागरिक असावा.
मतदार यादी तयार करण्याच्या वर्षाच्या 1 जानेवारी या दिनांकास 18 वर्ष वय पुर्ण झालेले असावे.
मतदार नोंदणी करावयाच्या मतदार संघातील सर्वसाधारण रहिवासी असावा.
लोकप्रतिनिधीत्व अधिनियमाचे तरतुदीनुसार अन्य कारणामुळे अपात्र नसावा.
प्रश्न 3 मतदार म्‍हणून मतदार यादीत नाव केव्‍हा नोंदविता येते?

उत्तर भारत निवडणूक आयोग जेंव्हा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करतो त्या कालावधीत किंवा अन्य कोणत्याही वेळी मतदार नोंदणीसाठी तहसिल कार्यालयात अर्ज करता येतो व नांव नोंदविता येते.
प्रश्न 4 कोणत्या कारणांवरुन एखादया व्यक्तीचे नांव मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ शकत नाही ?

उत्तर लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 चे कलम 16 नुसार
जी व्यक्ती भारताचा नागरिक नाही
सक्षम न्यायालयाने विकल मनाची ठरविला आहे.
भ्रष्ट मार्ग वापरल्यासाठी कायदयाने मतदानास अपात्र ठरविल आहे.
लोकप्रतिनिधीत्व कायदा 1950 चे कलम 11 अ नुसार अन्य गुन्हयासाठी मतदानाला आपत्र ठरविले. या कारणावरुन एखादया व्यक्तीचे नांव मतदार यादीमध्ये समाविष्ट होऊ शकले नाही.
प्रश्न 5 भारताचा रहिवासी नसलेला व्यक्ती मतदार यादीमध्ये नांव नोंद करु शकतो काय ?

उत्तर नाही. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 च्या कलम 19 नुसार ती व्यक्ती नोंदणी करावयाच्या मतदार संघाची सर्वसाधारण रहिवासी असणे आवश्यक आहे. मात्र भारत सरकारच्यार सेवेतील अधिकारी जे परदेशामध्ये सेवारत आहेत त्यांची नोंदणी मतदार यादीमध्ये होऊ शकते.
प्रश्न 6 दुस-या देशामध्ये वास्तव्य करणारी मात्र भारताव्यतिरिक्त इतर देशाचे नागरिकत्व न स्विकारलेली व्यक्ती मतदार यादीत नांव नोंदवू शकते काय ?

उत्तर होय. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 चे कलम 20 अ नुसार अशा व्यक्तींची नोंदणी मतदार यादीमध्ये करता येईल. सदरची बाब दिनांक 10.02.2011 पासूण अंमलात आलेली आहे.
प्रश्न 7 ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये नाव असल्यास कोठेही मतदान करता येते का ?

उत्तर नाही. ज्या निवडणूक प्रभाग व मतदान केंद्राच्या यादीत नांव असेल त्याच ठिकाणी मतदान करता येते.
2. निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करणे व अर्हता दिनांक
प्रश्न 1 ग्रामपंचायमीच्या निवडणूकीसाठी मतदार याद्या तयार करण्यासंबंधातील अधिक्षण, संचालन व नियंत्रण कोण करते?

उत्तर राज्य निवडणूक आयोग विशिष्ट दिनांक निश्चित करुन त्या दिनांकास उपलब्ध असलेल्या भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या (त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्राशी सबंधित) मतदार यादया प्राप्त करतो. या प्राप्त झालेल्या मतदार यादया निवडणूकीसाठी तयार करण्याच्या कामकाजाचे अधिक्षण, संचालन व नियंत्रण राज्य निवडणूक आयोगाव्दारे प्राधिकृत केलेल्या अधिका-यामार्फत केले जाते.
प्रश्न 2 ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदार यादी कोणत्या अधिनियमातील तरतूदीनुसार तयार केली जाते?

उत्तर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदार यादी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 12 नुसार केली जाते.
प्रश्न 3 मतदार यादी केव्‍हा तयार करण्‍यात येते?

उत्तर राज्य निवडणूक आयोग सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाव्दारे अधिसुचित करेल अशा तारखेस विधानसभेसाठी अंमलात असलेल्या मतदार यादीवरुन्‍ ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदार यादी तयार करण्यात येते.
प्रश्न 4 ग्रामपंचायतीच्या मतदार यादीसाठीचा अर्हताकारी दिनांक कोण ठरविते ?

उत्तर राज्य निवडणूक आयोग ग्रामपंचायतीच्या मतदार यादीसाठीचा अर्हताकारी दिनांक निश्चित करते.
प्रश्न 5 मूळ मतदार यादी म्हणजे काय ?

उत्तर मतदान नोंदणी कार्यक्रमानुसार विहित तारखेला प्रसिघ्द केलेली अंतिम मतदार यादी व ज्याला कुठलीही पुरवणी जोडलेली नाही अशी यादी म्हणजे मुळ मतदार यादी होय.
प्रश्न 6 पुरवणी यादी म्हणजे काय ?

उत्तर मूळ मतदार यादीसोबत त्या यादीतील मतदारांच्या नांवांची दुरुस्ती, नवीन समाविष्ट नांवे, वगळलेली नांवे , यांचा समावेश असलेली स्वतंत्र जोडलेली यादी म्हणजे पुरवणी यादी होय.
प्रश्न 7 मतदार यादीचा भाग क्रमांक म्हणजे काय ?

उत्तर विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी मतदान केंद्रनिहाय विभाजित झाल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रनिहाय मतदार यादीच्या भागास अनुक्रमांक दिला जातेा त्याला मतदार यादीचा भाग क्रमांक असे म्हणतात.
प्रश्न 8 निवडणूकीकरिता मतदार यादी तयार करताना नवीन नावे समाविष्ट करता येतात काय?

उत्तर राज्य निवडणूक आयोगाने अधिसुचित केलेल्या दिनांकांनंतर कोणतीही नवीन नावे समाविष्ट करता येत नाहीत.
प्रश्न 9 निवडणूकीसाठी प्रभागनिहाय मतदार यादी कशा प्रकारे तयार करता येते?

उत्तर राज्य निवडणूक आयुक्तांनी अधिसुचित केलेल्या दिनांकाला अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीला प्रभागामध्ये विभाजित करुन प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात येते.
प्रश्न 10 एकापेक्षा जास्त मतदार संघामध्ये मतदार यादीत नांव नोंदविता येईल काय ?

उत्तर नाही. एकापेक्षा जास्त मतदारसंघामध्ये मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळी मतदार म्हणून नाव नोंदविले लोकप्रतिकनधीत्व अधिनियम 1950 चे कलम 31 नुसार गुन्हा असून अपराध सिध्दा झाल्यास एका वर्षापर्यंतची शिक्षा देण्याची तरतूरद आहे.
प्रश्न 11 एखादया मतदाराचे नांव विधानसभेच्या मतदार यादीत आहे, (अर्हता दिनांकास) मात्र ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत नसेल तर काय करावे ?

उत्तर मतदार यादी अधिप्रमाणित करण्यासाठी सक्षम असलेल्या अधिका-याने अशा नावांची यादी करुन व त्याखाली तारखेसह स्वाक्षरी करुन संबंधित प्रभागाच्या मतदार यादीसोगत सदरील यादी जोडावी.
प्रश्न 12 नगरपालिका हद्दीबाहेरील गांव ग्रामपंचायतीच्या प्रभागामध्ये समाविष्ट नसल्यास त्या गावातील मतदारांना ग्रामपंचायत प्रभागात समाविष्ट करुन मतदानाचा हक्क देता येईल काय ?

उत्तर असे मतदार कोणत्याही ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट नसल्यास लगतच्या ग्रामपंचायतीच्या प्रभागामध्ये समाविष्ट करता येतात व त्यांना मतदानही करता येते.
प्रश्न 13 सर्व्हिस व्होटर्सबाबत स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत काय तरतूद आहे ?

उत्तर सर्व्हिस व्होटर्सबाबत ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये त्यांच्या प्रतिनिधीकडून मतदान नोंदविण्याची तरतूद नाही.
3. मतदार नोंदणी पध्दत
प्रश्न 1 ग्रामपंचायतींना मतदार यादी तयार करण्याचे अधिकार आहेत का?

उत्तर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 नुसार विधानसभेसाठी मतदार यादी तयार करण्याचे अधिकार भारत निवडणूक आयेगाला आहेत. त्यावरुन्‍ प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिका-यास आहेत.
प्रश्न 2 मतदार नोंदणी केव्‍हा व कोठे करावी लागते?

उत्तर भारत निवडणूक आयोग जेंव्हा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करतो त्यावेळी पदनिर्देशित अधिकारी यांचेकडे अथवा तहसिलदार कार्यालयात मतदारांची नोंदणी करावी लागते. या व्यतीरिक्त अन्य कालावधीत देखील मतदार नोंदणी अधिकारी अ‍‍थवा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे मतदार नोंदणीसाठी अर्ज दाखल करता येऊ शकतो.
प्रश्न 3 मतदार यादीमध्ये नांव नोंदविण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो ?

उत्तर मतदार यादीमध्ये नांव नोंदविण्यासाठी फॉर्म नंबर 6 भरावा लागतो , नमुना 6-अ हा अनिवासी भारतीयांच्या नोंदणीसाठी वापरावा लागतो.
प्रश्न 4 मतदार यादीमध्ये नोंदविलेल्या नावामध्ये मुद्रण दोष असल्यास तो दुरुस्त करण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो ?

उत्तर मतदार यादीतील मुद्रणदोष दुरुस्तीसाठी फॉर्म नंबर 8 भरावा लागतो.
प्रश्न 5 स्वत:च्या निवासी पत्त्यामध्ये झालेला बदल मतदार यादीमध्ये करुन घेण्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागतो ?

उत्तर स्वत:च्या निवासी पत्त्यामध्ये त्याच मतदारसंघामध्ये झालेला बदल मतदार यादीमध्ये करुन्‍ घेण्यासाठी फॉर्म नंबर 8 अ भरावा लागतो.
प्रश्न 6 मतदार यादीमध्ये नवीन नांव नोंदविणे, वगळणे अथवा त्यामध्ये सुधारणा करण्याचे काम कोण करु शकतो ?

उत्तर मतदार यादीमध्ये नवीन नांव नोंदविणे, वगळणे अथवा त्यामध्ये सुधारणा करण्याचे काम मतदार नोंदणी अधिकारी करु शकतात. विधानसभा क्षेत्रासाठी मतदार नोंदणी अधिकारी हे उपविभागीय अधिकारी/प्रांत/ उपजिल्हाधिकारी हे असतात. तर सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी हे तहसिलदार हे असतात.
प्रश्न 7 मतदार यादीमध्ये नवीन नांव नोंदविणे, वगळणे अथवा त्यामध्ये सुधारणा करण्याची तरतूद कोणत्या नियमात आहे ?

उत्तर लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950 मधील कलम 22 व 23 मध्ये मतदार यादीमध्ये नवीन नांव नोंदविणे, वगळणे अथवा त्यामध्ये सुधारणा करण्याची तरतुद आहे.
प्रश्न 8 राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची घोषणा झाल्यांनंतर ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये नाव दाखल करता येते काय ?

उत्तर राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायतीच्या निवडणूकीची घोषणा झाल्यांनंतर ग्रामपंचायतीच्या मतदार यादीमध्ये नाव नोंदवता येत नाही. मतदार यादी ग्राहय धरण्यासाठी अधुसूचित केलेल्या दिनांकापासून ज्यांनी मतदार यादीमध्ये नांव नोंदविले असेल त्याच व्यक्तीचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होते.
4. विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज
प्रश्न 1 मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज कोणते आहेत?

उत्तर मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी सर्वसाधारणपणे खालील दस्ताऐवज आवश्यक आहेत.
वयाचा दाखला
रहिवासी पुरावा
2 पासपोर्ट आकाराची छायाचिते्र
प्रश्न 2 मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी आवश्यक दस्तऐवज कोणाकडे सादर करावेत ?

उत्तर मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांकडे (BLO) / तहसिलदार कार्यालयात अथवा तहसिलदार निर्देशित करतील अशा अधिका-याकडे सादर करावीत.
प्रश्न 3 मतदार यादीमध्ये नांव नोंदणीसाठी रेशनकार्ड आवश्यक आहे काय ?

उत्तर नाही. रहिवासी संदर्भात इतर कोणताही पुरावा उदा. पासपोर्ट, बँक पासबुक, वाहन परवाना, वीज बिल इ. सादर करता येते.
प्रश्न 4 रहिवासासंबंधी कोणताही पुरावा नसल्यास काय करावे ?

उत्तर केवळ फॉर्म नंबर 6 भरुन दयावा. मतदार नोदंणी अधिकारी BLO मार्फत सत्यता पडताळतील, व निर्णय घेतील.
प्रश्न 5 पूर्वी एका ठिकाणी मतदार म्हणून नोंद असल्यास तेथील नाव कमी केल्याबाबत दाखला आवश्यक आहे का ?

उत्तर नाही, मात्र फॉर्म् नं. 6 च्या भाग 4 मध्ये याबाबतचा तपशिल अचुकपणे भरुन्‍ देणे आवश्यक आहे.
प्रश्न 6 बहुसदस्यीय प्रभाग पध्दतीमध्ये एका प्रभागात अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीची जागा राखीव असल्यास त्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी जागा आरक्षित ठेवता येते काय ?

उत्तर होय, याकरिता फॉर्म् नं 6 भरुन्‍ दयावा.
प्रश्न 7 वयाचा दाखला म्हणून कोणते दस्तऐवज मतदार नोंदणीसाठी ग्राहय धरले जातात ?

उत्तर खालील दस्तवेज वयाचा दाखला म्हणून ग्राहय धरले जातात.
ग्रामपंचायत / नगरपालिका / महानगरपालिका यांनी दिलेला जन्मदाखला.
शाळा, कॉलेज सोडल्याचे प्रमाणपत्र ज्यावर जन्मतारिख नमुद आहे.
एस.एस.सी. अथवा एच.एस.सी. बोर्डाचे प्रमाणपत्र
जन्मदाखला अथवा जन्मतारिख नमुद असलेला अन्य शासकीय दस्ताऐवज
अशिक्षित अर्जदाराबाबत परिशिष्ट 4-10 मध्ये दिलेले घोषणापत्र
प्रश्न 8 बेघर व्यक्तीला मतदार यादीत नांव नोंदविता येईल काय ?

उत्तर बंघर व्यक्तीला मतदार यादीमध्ये नांव नोंदविता येते.
5. भारत निवडणूक आयोगातर्फे मतदार नोंदणीसाठी विविध उपाय योजना
प्रश्न 1 विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणीसाठी निवडणूक आयोगाकडून कोणकोणत्या उपाय योजना करण्‍यात येतात?

उत्तर
मतदार नोंदणीसाठी भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीबाबत जागरुकता निर्माण करणे
मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांची नेमणूक करणे
मतदार नोंदणी कार्यक्रमाला विशेष प्रसिध्दी देणे
25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करणे इ. उपाय योजना करण्यात येतात. त्याचप्रमाणे भारत निवडणूक आयोगाकडून या संदर्भात वर्षातून एकदा संक्षिप्त पुनरिक्षण आवश्यकतेनुसार विशेष पुनरिक्षण माहिम घेतली जाते. त्याच बरोबर मतदार जागृती अभियान, ऑनलाईन मतदार नोंदणीही केली जाते.
प्रश्न 2 विधानसभा मतदारसंघाकरिता मतदार नोंदणीसाठी वर्षातून किती वेळा नोंदणी वेळापत्रक ठरविण्‍यात येते?

उत्तर 2 मतदार नोंदणी ही निरंतर पक्रिया आहे तथापि मतदार नोंदणीसाठी वर्षातून एकदा संक्षिप्त पुनरिक्षण व निवडणुकीच्या वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा विशेष पुनरिक्षण करण्यात येते.
प्रश्न 3 मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली जाते?

उत्तर मतदार नोंदणी प्रक्रियेसाठी मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडून पदनिर्देयिात अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांची नेमणुक केली जाते.
प्रश्न 4 मतदान केंद्र पातळीवर मतदारांच्या नोंदणीसाठी कोण अधिकारी नेमला जातो ?

उत्तर मतदान केंद्र पातळीवर मतदारांच्या नोंदणीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी नेमला जातो.
प्रश्न 5 मतदार यादीचे संक्षिप्त पुर्ननिरीक्षण व विशेष पुर्ननिरीक्षण म्हणजे काय ?

उत्तर मतदार यादीमध्ये दरवर्षी नवीन पात्र मतदारांचा नव्याने समावेश करणे, मतदारांच्या नावात दुरुस्त्या करणे व मृत, स्थलांतरित इ. मतदारांना वगळण्याच्या प्रक्रियेसाठी राबविण्यात येणा-या मोहिमेला संक्षिप्त पुनरिक्षण तर निवडणुकीच्या वर्षामध्ये नवीन मतदार नोंदणी व इतर बाबींसाठी विशेष कार्यक्रम जाहीर केला जातेा त्याला विशेष पुनरिक्षण असे म्हणतात.
प्रश्न 6 मतदार नोंदणीसंबंधी सविस्तर माहिती कोठे मिळेल ?

उत्तर मतदार नोंदणीसबंधी सविस्तर माहिती मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांतधिकारी त्याचप्रमाणे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार सबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच तहसिलदार कार्यालयात मिळेल. अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाचे संकेत स्थळ www.eci.govt.in अथवा www.ceo.maharashtra.govt.in येथे भेट देता येईल.
6. प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी तयार करणे व प्रसिध्द करणे
प्रश्न 1 प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?

उत्तर प्रभागनिहाय प्रारुप्‍ मतदान यादी राज्य निवडणूक आयोगोनी प्राधिकृत केलेले अधिकारी करतात
प्रश्न 2 प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी केव्‍हा तयार करण्‍यात येते ?

उत्तर राज्य निवडणूक आयोग अधिसुचित करेल अशा दिनांकास अस्तित्वात असलेल्या विधानसभेच्या मतदार यादीवरुन्‍ निवडणूकीच्या पुर्वी टरवून दिलेल्या तारीखवार कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय मतदार यादी तयार करण्यात येते.
प्रश्न 3 प्रभाग पद्धतीत जागानिहाय वेगवेगळी मतदार यादी तयार करण्‍यात येते का ?

उत्तर नाही, संपुर्ण प्रभागाची एकच मतदार यादर करण्यात येते.
प्रश्न 4 प्रारुप मतदार यादी तयार करण्‍याचे सर्वसाधारण निकष काय आहेत ?

उत्तर
राज्य निवडणूक आयोग अधिसुचित करेल त्या तारखेस अस्तित्वात असणारी विधानसभेची मतदार यादी वापरणे.
ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन करणे.
मतदार यादी मतदार प्रभागनिहाय विभाजीत करतांना मतदार केंद्रासाठी ठरवून दिलेली कमाल व किमान मतदारांची संख्या विचारात घेणे. हे प्रारुप मतदार यादी तयार करण्याचे सर्वसाधारण निकष आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रारुप्‍ मतदार यादी तयार करतांना सबंधित प्रभाग रचनेच्या भोगोलीक क्षेत्रामध्ये समाविष्ट असलेल्या मूळ मतदार यादीतील सर्व मतदार समाविष्ट होणे आवश्यक आहे. त्या समाविष्ट भागातील कोणताही मतदार सुटणार नाही किंवा क्षेत्राबाहेरील कोणताही मतदार समाविष्ट होणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
प्रश्न 5 अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर त्यात दुरुस्ती करता येते काय ?

उत्तर संबंधित प्राधिकृत अधिका-याने (मतदारयादी तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिकृत अधिका-याने) याबाबत तक्रारी प्राप्त झाल्यास योग्य त्या दुरुस्त्या पुरवणी यादीच्या स्वरुपात कराव्यात. (राज्य निवडणूक आयोग यांचे पत्र दि 02.01.2002 )
प्रश्न 6 प्रारुप मतदार यादी केव्‍हा, कशी व कोठे प्रसिद्ध करण्‍यात येते?

उत्तर प्रारुप मतदार यादी तयार झाल्यांनंतर ती पदनिर्देशित अधिका-यांच्या स्वाक्षरीने त्यांच्या कार्यालयात (मतदार संघात असेल तर) व मतदार संघातील त्याने निश्चित केलेल्या ठिकाणी व विहीत नमुन्यात प्रसिध्द करण्यात येते.
7. मतदार यादीतील दुबार नांव, मयत व स्थानांतरित मतदारांचे नावाबाबत
प्रश्न 1 एखादया व्यक्तीने नावाची नोंदणी मतदार यादीत एकापेक्षा जास्त वेळा केली असेल तर भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियमामध्ये काय तरतूद आहे ?

उत्तर याप्रकरणी दावा चालविता येतो व न्यायालयात आरोप (जाणिवपुर्वक कृती केल्याचे) सिध्दा झाल्यास जास्तीत जास्त एक वर्षाची शिक्षा संबंधितांना देण्याची लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1950 मधील कलम 31 मध्ये तरतूद आहे.
प्रश्न 2 विधानसभेच्‍या मतदार यादीतील नावे स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थाच्‍या मतदार यादीत प्रसिध्द झाल्यानंतर दुबार नांव कमी करण्‍यात येते काय ?

उत्तर नाही. असे प्रकार मतदार नोदणी अधिका-यांच्या निदर्शनास आणून दिल्या जातात व दुबार कतदान होणार नाही यासाठी राज्य निवडणूक आयोगाचे दि. 24.04.2007 च्या पत्रानुसार काळजी घेतली जाते.
प्रश्न 3 मतदार यादीतील मयताचे नांव व स्‍थलां‍तरिताचे नांव आक्षेप घेतल्‍यानंतर कमी करता येते काय?

उत्तर होय, नमुना 7 मध्ये असा आक्षेप मतदार नोंदणी अधिकारी यांचेकडे घेतल्यास व आक्षेप सत्य आढळून आल्यास मतदार यादीतील मयताचे व स्थलांतरितांचे नांव कमी करता येते.
प्रश्न 4 मयत मतदारांची नावे मतदार यादीत कशी दर्शविली जातात ?

उत्तर मयत मतदाराच्या नावासमोर E अशी चौकोनात खूण केली जाते.
प्रश्न 5 स्थानांतरित झालेल्या मतदारांच्या नावापुढे कोणती खूण असते ?

उत्तर स्थानांतरित झालेल्या मतदारांच्या नावासमोर S अशी खुण असते.
प्रश्न 6 मतदार यादीमध्ये एकापेक्षा जास्त वेळा नांव असेल तर त्याच्या नावावर अन्य कोणी मतदान करण्याची शक्यता असते हे टाळण्यासाठी काय करावे ?

उत्तर
मतदार यादीमध्ये एकापेक्षा जास्त वेळा नाव असणे हा गुन्हा आहे. तथापि , असे नाव असल्यास ज्या मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त वेळा आले असेल तो मतदार एकच आहे याची खात्री करुन घ्यावी.
एकापेक्षा जास्त प्रभागात नांव असल्यास कोणत्या प्रभागात मतदान करणार हे विचारावे व जेथे मतदान करणार नसेल त्या मतदान यादीवर त्याच्या नावासमोर अभिप्राय लिहावा.,/
एकाच प्रभागात जास्त वेळा नाव आल्यास तो कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार हे विचारावे व त्याप्रमाणे नोंद घ्यावी. उपरोक्त बाबी मतदार यादीमध्ये एकापेक्षा जास्त वेळा नांव असेल तर त्याच्या नावांवर अन्य कोणी मतदान करु नये यासाठी कराव्यात.
प्रश्न 7 प्रभागनिहाय मतदार यादी तयार झाल्यानंतर त्यामध्ये मुद्रणदोष असल्यास त्यात बदल करता येईल काय ?

उत्तर होय, प्रभागनिहाय मतदार यादी तयार झाल्यानंतर त्यामध्ये मुद्रणदोष असल्यास त्यात बदल करता येते.
8. आक्षेप व हरकती
प्रश्न 1 प्रारूप मतदार यादीवर आक्षेप घेता येतात का ?

उत्तर होय, प्रारुप मतदार यादीवर आक्षेप घेता येतो.
प्रश्न 2 मतदार यादीवरील आक्षेप, दावे अथवा दुरुस्ती अर्ज कोणत्या कालावधीमध्ये सादर करण्याची तरतूद आहे ?

उत्तर मतदार यादीवरील आक्षेप, दावे अथवा दुरुस्ती अर्ज हे राज्य निवडणूक आयोगाने निर्धारित केलेल्या कार्यक्रममानुसार विहित मुदतीमध्ये सादर करण्याची तरतुद आहे .( संदर्भ – राज्य निवडणूक आयोग आदेश दि. 02.01.2002)
प्रश्न 3 आक्षेप घेण्‍यासाठी विहित नमुने उपलब्‍ध करुन देण्‍यात येतात का? व आक्षेप कुठे दाखल करता येतो ?

उत्तर मतदार यादी तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्राधिकृत अधिका-यांकडे आक्षेप साध्या कागदावर लिहूण दाखल करता येतात, विहीत नमुना उपलब्ध नाही.
प्रश्न 4 मतदार यादीवरील आक्षेप घेण्‍याबाबत सर्वसाधारण कोणते मुद्दे गृहित धरण्‍यात येतात?

उत्तर
मतदाराचे दुस-याच प्रभागाच्या मतदार यादीत नांव असणे.
विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नांव असतांना देखील प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नांव समाविष्ट नसणे इ. सर्वसाधारण मुद्ये मतदार यादीवरील आक्षेप घेण्याबाबत गृहीत धरले जातात.
प्रश्न 5 प्रभागाच्या मतदार यादीमध्‍ये नागरिकांडून प्राप्‍त हरकती / सूचनांवर सुनावणी घेण्‍यात येते काय?

उत्तर होय, प्रभागाच्या मतदार यादीमध्ये नागरिकांकडून हरकती / सुचनांवर सुनावणी घेण्यात येते.
प्रश्न 6 आक्षेपावर अंतिम निर्णय कोण घेतो ?

उत्तर मतदार यादी तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला प्राधिकृत अधिकारी हा आक्षेपावर अंतिम निर्णय घेतो.
प्रश्न 7 प्रारुप्‍ मतदारयादीवरील आक्षेप मान्य झाल्यास प्रभागाच्‍या मतदार यादीत बदल करण्‍यात येतो काय?

उत्तर प्रारुप्‍ मतदारयादीवरील आक्षेप मान्य झाल्यास सुनावणीनंतर प्रभागाच्या मतदार यादीत आवश्यक असल्यास बदल करता येतो.
9. अंतिम मतदार यादी प्रसिध्द करणे
प्रश्न 1 आक्षेप व हरकतीनंतर अंतिम मतदार यादी केव्‍हा व कोठे प्रसिध्द करण्‍यात येते?

उत्तर प्राप्त आक्षेप व हरकतीचा निपटारा झाल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाच्या मतदार यादीबाबतच्या कार्यक्रमानुसार विहीत दिनांकास अंतिम मतदार यादी निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येते.
प्रश्न 2 अंतिम मतदार यादी तयार असल्याची सूचना कोण व कशा प्रकारे प्रसिध्द करते ?

उत्तर अंतिम मतदार यादी तयार असल्याची सूचना प्राधिकृत अधिकारी नोटीसव्दारे प्रसिध्द करतो.
प्रश्न 3 अंतिम मतदार याद्या पाहणीसाठी व माहितीसाठी उपलब्ध करुन दिल्या जातात काय? असल्यास कोठे?

उत्तर होय , ग्रामपंचायत निवडणूकीसाठी गावाच्या चावडीत आणि ग्रामपंचायतीच्या कार्यालयात तसेच तहसिल कार्यालयात अंतिम मतदार यादया पाहणीसाठी व माहितीसाठी उपलब्ध करुन्‍ दिल्या जातात.
प्रश्न 4 अंतिम मतदार यादी नागरिकांना / उमेदवारांना शुल्‍क भरुन उपलब्‍ध करुन देण्‍यात येते काय?

उत्तर होय, अधिकृत राजकीय पक्षांना निश्चित केलेले शुल्क आकारुन मतदार यादी पुरविली जाते.
प्रश्न 5 संकेतस्थळावरील मतदार यादीचा वापर करुन एखाद्या मतदाराला आपले नाव, प्रभाग व मतदान केंद्र शोधता येऊ शकते का ?

उत्तर होय, संकेत स्थळावरील प्रभागनिहाय मतदार यादीचा वापर करुन्‍ आपले मतदान केंद्र / प्रभाग शोधता येते.
10. ग्रामपंचायतीची मतदार यादी अधिप्रमाणित करण्याचे अधिकार
प्रश्न 1 ग्रामपंचायतीची मतदार यादी अधिप्रमाणित करणे म्हणजे काय ?

उत्तर अंतिम मतदार यादीच्या खाली सक्षम प्राधिका-याने नावानिशी सही करुन्‍ दिनांक व पदनामाचा शिक्का उमटविणे व त्यावर मतदार यादी ग्राहय धरण्याचा दिनांक नमुद करणे म्हणजे मतदार यादी अधिप्रमाणित करणे होय.
प्रश्न 2 मतदार यादी अधिप्रमाणित करण्याचे अधिकार कोणाला आहेत ?

उत्तर मतदार यादी अधिप्रमाणित करण्यासाठी ग्रामपंचायत निवडणुकीकरीता प्राधिकृत केले जाते.
प्रश्न 3 निवडणूकीसाठी मतदार यादी अधिप्रमाणित करण्‍यासाठी कोणत्‍या दर्जाचा अधिकारी नियुक्‍त करण्‍यात येतो ?

उत्तर ग्रामपंचायत निवडणूकीकरिता मतदार यादी अधिप्रमाणित करण्यासाठी तहसिलदार पदाच्या दर्जा कमी दर्जा नसलेला अधिकारी नियुक्त करण्यात येतो.
11. मतदान केंद्रनिहाय मतदार यादी छपाई व प्रसिध्दी
प्रश्न 1 निवडणूकीसाठी प्रभागाच्‍या मतदार यादीवरुन मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्‍यात येते काय ?

उत्तर होय, ग्रामपंचायत निवडणूकीसाठी प्रभागनिहाय मतदान केंद्र असल्याने प्रभागाची मतदार यादी हीच मतदान केंद्रनिहाय असते.
प्रश्न 2 मतदान केंद्रनिहाय मतदार यादी केव्‍हा तयार करण्‍यात येते ? व कोठे प्रसिद्ध करण्‍यात येते ?

उत्तर निवडणूकीपुर्वी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिध्द करण्यात येते व ती मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात येते.
प्रश्न 3 मतदान केंद्रनिहाय मतदार यादीत कोणकोणत्‍या बाबींचा तपशिल दर्शविण्‍यात येतो?

उत्तर मतदान केंद्राची व्याप्ती , मतदारांचे नांव, घर क्रमांक , वय व लिंग यासोबत मतदार यादीच्या शिर्षस्थानी प्रभाग क्रमांक, मतदान केंद्र क्रमांक , गांव व वस्ती , निवडणुकीचे वर्ष इ. बाबींचा तपशील दर्शविण्यात येतो.
प्रश्न 4 मतदान केंद्राच्‍या इमारतीत बदल झाल्‍यास मतदार यादीत बदल करण्‍यात येतो का?

उत्तर मतदान केंद्रनिहाय मतदार यादी तयार करण्यात येत असल्यामुळे तसा बदल करण्यात येत नाही.
प्रश्न 5 अंतिम मतदार यादी कोणाच्या स्वाक्षरीने प्रसिध्द केली जाते ?

उत्तर ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी प्राधिकृत अधिका-यांच्या स्वाक्षरीने प्रसिध्द केली जाते.
प्रश्न 6 अंतिम मतदार यादी कोणत्या संकेतस्थळावर प्रसिध्द करावी लागते?

उत्तर ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे संकेतस्थळ उपलब्ध आहे त्या त्या संकेतस्थळावर अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाते.
प्रश्न 7 मतदान केंद्रनिहाय मतदार यादी विकत मिळू शकते काय ?

उत्तर होय. ग्रामपंचायत निवडणूकीसाठी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी शुल्क भरुन मिळू शकते.

No comments:

Post a Comment