K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 30 November 2018

पर्यावरण,आरोग्य व शारीरिक शिक्षण



पर्यावरण, आरोग्य व शारीरिक शिक्षण

कनिष्ठ महाविद्यालयासाठी अनिवार्य विषय –
पर्यावरण, आरोग्य व शारीरिक शिक्षण:

राष्ट्रीय अभ्यासक्रमाच्या आराखड्यानुसार     महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमाची फेररचना केली. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०१० पासून नवीन अभ्यासक्रमात आकरावी व बारावीच्या सर्व शाखांना पर्यावरण व आरोग्य आणि शारीरिक शिक्षण हे विषय सक्तीचे करण्यात आलेले आहेत. 
पर्यावरण : 

कलावाणिज्यविज्ञानएमसीव्हीसी आणि बायफोकल अभ्यासक्रमांसाठी हा विषय अनिवार्य आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना प्रकल्प तयार करायचा आहे. यासाठी दोन्ही सत्रांना प्रत्येकी ३० गुण आणि जर्नल ४० गुण अशी एकूण १०० गुणांची ही परीक्षा राहील. या विषयाची लेखी परीक्षा घेण्यात येणार नाही. परंतु दोन्ही सत्रातील ५० पैकी गुणांची सरासरी काढण्यात येईल आणि या गुणांचा अंतिम निकालात समावेश करुन निकाल जाहीर करण्यात येईल.
या संधार्भीय परिपत्रक   Download   करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा 



आरोग्य आणि शारीरिक शिक्षण:




 विषयाची परीक्षा दोन्ही सत्रांमध्ये २५ गुण लेखी व २५ गुणांची प्रात्यक्षिक असे १०० गुण व याचे रुपांतर ५० गुणांमध्ये करावयाचे आहे. व या ५० गुणां चे रुपांतर ग्रेड (श्रेणीत) करावयाचे आहे. यात ३० व त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्यांना 'श्रेणी२३ ते २९ गुण मिळविणाऱ्यांना 'श्रेणी१८ ते २२ गुणांना 'श्रेणी आणि १७ पेक्षा कमी गुणांना 'श्रेणी देण्यात येईल.
या विषयाचे गुणदान करण्या संदर्भातील मानके बोर्डाने दिनांक ०६/०१/२०१४ च्या परिपत्रक तसेच दिनांक ०३/०६/२०१५ नुसार स्पष्ट केलेली आहेत. ही परिपत्रके   Download    करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

वरील परिपत्रकान्वये   आरोग्य आणि शारीरिक शिक्षण या विषयाचे गुणांकन जतन व बोर्डाकडे पाठविण्यासाठीचे नमुने   Download    करण्यासाठी खालील लिंकला   क्लिक करा.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुचविल्याप्रमाणे या विषयांतर्गत विद्यार्थ्याने त्याची नोंदवही अद्यावत करावयाची आहे. ही नोंदवही वर्षाखेरीज महाविद्यालयात जमा करावयाची आहे. ही वही नमुना   PDF    मध्ये   Download   करण्यासाठी पुढील लिंकवर जावा.  



शिक्षक पालक सभा

शिक्षक पालक सभा


शिक्षक पालक सभा समिती
( पालक शिक्षक सभा समिती )
Parents Teacher Committee

राज्यातील प्राथमिकमाध्यमिक  उच्च माध्यमिकशाळांच्या भौतिकशैक्षणिक  विद्यार्थी विकासाच्यासंदर्भातील समस्या सोडवण्यासाठी  शालेय कामकाजामध्येपालकांचा सक्रिय सहभाग  सहयोग वाढवण्यासाठी दिनांक16 मे 1996 च्या शासन निर्णयान्वये प्रत्येक मान्यताप्राप्तशाळेत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्यकरण्यात आले आहेत्या अनुषंगाने माध्यमिक शाळासंहितेतील नियम क्रमांक 3.2 मध्ये तरतूद करण्यात आलेलीआहे.

त्यानंतर माननीय उच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील प्रत्येकखाजगी विनाअनुदानित शाळेतही पालक-शिक्षक सभास्थापने  संदर्भात निर्णय देण्यात आला.
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण  क्रीडा विभागाच्यावतीने दिनांक 24 ऑगस्ट 2010 रोजी शासन निर्णय पारितकरण्यात आला या शासन निर्णयामध्ये पालक-शिक्षक संघाचेमार्गदर्शक तत्त्वे निश्चित करण्यात आली.

पालक-शिक्षक सभेची  मार्गदर्शक तत्त्वे:

.  शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याचे पालक  पालक-शिक्षकसंघाचे सभासद असतील.  
पालक-शिक्षक संघाच्या मूळ उद्देश विद्यार्थी शिक्षकांच्या समस्या सोडविणे हा आहे.  पालक शिक्षकसंघाने शाळेचा दैनंदिन कामकाजात   प्रशासनात लक्ष्यघालने अपेक्षित नाही.  
प्रत्येक शाळेत पालक शिक्षक सभेची स्थापना करणेअनिवार्य आहे.
शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यापासून तीस  दिवसाच्याआत पालक शिक्षक संघाची स्थापना करणे प्रत्येक शैक्षणिकसंस्थेला बंधनकारक असेल.

पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारिणी समितीचीरचना:

अध्यक्ष                                    प्राचार्य /मुख्याध्यापक
उपाध्यक्ष                                 पालकांमधूनएक
सचिव                                     शिक्षकांमधूनएक
सहसचिव ()             पालकांमधून  शिक्षकांमधून 
सदस्य                      प्रत्येक इयत्तेतील एकशिक्षक
प्रत्येक तुकडीसाठी एकपालक
(जेवढ्या तुकडे असतील तेवढेपालक)

  • कार्यकारणी समितीमध्ये 50 टक्के महिला असणेअनिवार्य असेल.
  • ही कार्यकारिणी सदस्यांच्या नावाची यादी शाळेच्यासूचनाफलकावर तसेच संकेतस्थळावर प्रदर्शितकरण्यात येईल.
  • पालक शिक्षक संघाची स्थापना केल्यानंतर 15दिवसाच्या आत सदस्यांची यादी संबंधितशिक्षणाधिकारी किंवा शिक्षण निरीक्षक यांच्याकडेसादर करण्यात यावी.
पालक शिक्षक संघाची कर्तव्य किंवा कार्य :

.  नियोजनाप्रमाणे अभ्यासक्रम पूर्ण होईल हे पाहणे .
.  अभ्यासक्रमात कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांसाठीयोग्य त्या उपाययोजना सुचवणे.  
.  अभ्यासक्रमाशी  पूरक असलेल्या अभ्यासक्रमाचेनियोजन करण्यासाठी शाळांना साह्य करणे.  
सहशालेय उपक्रमांना मान्यता देणे.  
शाळेतील शैक्षणिक शुल्कसत्र फी   सहशालेयउपक्रमांसाठी आकारण्यात येणारे  शुल्क संबंधीचीमाहिती घेऊन पालक-शिक्षक संघाच्या कार्यकारणीसमितीपुढे त्यांचे म्हणणे मांडणे.







हे परिपत्रक PDF  स्वरूपात Download  करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा . 

प्रथमोपचार पेटी



प्रथमोपचार पेटी


प्रथमोपचार:

प्रथमोपचार म्हणजे एखादा अपघात घडल्यानंतर व आजारावर केलेला प्राथमिक व तत्काळ उपाय योजना होय. एखादी दुर्घटना घडल्यास या दुर्घटना ग्रस्त व्यक्तीला तज्ज्ञांपर्यंत म्हणजेच डॉक्टरांपर्यंत नेण्या  पूर्वीपर्यंत नेण्यापूर्वी केलेली खबरदारी म्हणजेच प्रथम उपचार होय. 

प्रत्येक व्यक्तीला विशेषतः शिक्षकांना प्रथमोपचार तंत्र माहिती असणे गरजेचे आहे. कारण अपघात घडताच केलेली लहानशी कृती किंवा खबरदारी देखील खूप मोठे वरदान ठरू शकते.  

उदा. खेळा प्रसंगी एखाद्या मुलाला अनावधानाने अस्तिभ्रंश झाल्यास व त्यावर प्रथम उपचारान्वये खबरदारी घेतल्यास त्याच्या अस्थिभंगाची तीव्रता कमी होण्यास मदत होऊ शकते. 

बऱ्याचदा अपघात घडला तर अशा अपघाताला घाबरून जाऊन भीती पोटी खबरदारी किंवा प्रथम उपचार घेणे राहून जाते आणि त्यातूनच अपघाती व्यक्तीची इजा वाढते व किंबहुना परिस्थिती हाताबाहेर ही जाण्याचा धोका निर्माण होतो. मात्र प्रथमोपचारानंतर डॉक्टरांचा सल्ला हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो.

प्रत्येक शाळा, महाविद्यालयांमध्ये प्रथमोपचार पेटी असणे अत्यावश्यक आहे.




प्रथमोपचार पेटीतील साहित्य:
शाळेतील प्रथमोपचार पेटी मध्ये खालील साहित्य असले अत्यावश्यक असते.

१.      छोटी कात्री

२.      अँटिसेप्टिक क्रीम किंवा लोशन (सेव्हलॉन,डेटॉल) इत्यादी

३.      कापडी पट्टीबँडेज

४.      कॉटन किंवा कापूस

५.      आयोडीन

६.      थर्मामीटर 

७.      पेट्रोलियम जेली 

८.      साबण 

९.      चिमटा 

१०.    टॉर्च  

११.    डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे त्या औषधांचे उपयोगमात्रा किंवा प्रमाणमुदतमाहिती करून घेणे व नोंद ठेवणे गरजेचे असते

१२.    जवळचा डॉक्टरदवाखाना व अँबुलन्स इत्यादींचे नंबर असलेली डायरी असणे आवश्यक असते.




महत्वाचे:

१.      अपघातानंतर घाबरून न जाता धैर्याने प्रथम उपचार करावा.

२.      प्रथमोपचारानंतर लागलीच डॉक्टरांकडे अपघातग्रस्ताला घेऊन जावे.

३.      काही होत नाही……. मी बघतो……. माझ्यावर विश्वास ठेवा……. अशा व्यतितिरिकीपणा  जीवघेणा ठरू शकतो.

४.      शासनाचा आरोग्य विभागा मार्फत पुरवली जाणारी 108 ही सुविधा निश्चितच कामी येऊ शकते.

५.      शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षितते संदर्भात विद्यार्थ्यांचे मार्गदर्शनशिबिरेकार्यशाळातज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन इत्यादी खबरदारीचे उपाय घेणे गरजेचे असते त्यामुळे विद्यार्थी होणाऱ्या अपघाता पासून वाचण्यासाठी मदत होऊ शकते.

६.      लक्षात ठेवा अपघातग्रस्तांना मदत करताना ही माझी जबाबदारी नाही हे माझे काम नाही असे विचार मनात मध्ये आणू नयेत कारण अपघातग्रस्त आपणही होऊ शकतो.


Prevention is better than cure……. 


 प्रथमोपचार पेटी संदर्भात ठेवावयाचे नोंदी PDF मध्ये Download करण्यासाठी खालील लिंक ला click करा.