K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Friday 13 August 2021

नागपंचमी. (१)

*नागपंचमी हा श्रावण महिन्यातील सण आहे. या दिवशी घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे. कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते.*


*दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी (अहिल्या-गौतमी) संगमावर स्नान करतात.*


*आख्यायिका .*

*एका शेतकऱ्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला, अशीही समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही. कोणीही खणत नाही, घरी कोणीही भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही. असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे.*


*श्रद्धाळू माणसे नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आपले संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.*


*अनंत (म्हणजेच शेष), वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची या दिवशी पूजा केली जाते.*


*वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः। ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनञ्जयौ ॥*

*(भविष्योत्तरपुराण – ३२-२-७)*


*सांस्कृतिक महत्त्व.*

*भारतीय संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन भारतीय लोकांनी त्याला देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले.*


*स्त्रिया व नागपंचमी सण.*


*मेंदी.*

*या सणाच्या निमित्ताने विवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येतो अशी पद्धती भारतात रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणे म्हणत झोके घेतात. पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग म्हणून आलेली दिसते.*


*या दिवशी महिला झिम्मा-फुगडी असे गोल आकार तयार करून नृत्य व खेळ खेळतात.*


*पूजेचे स्वरूप.*

*या दिवशी महिला घराची स्वच्छता करतात. जमिनी शेणाने सारवितात. अंगणात रांगोळी काढतात. नागाची चित्रे भिंतीवर काढतात आणि त्याची पूजा करतात. काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. भारताच्या काही प्रांतात नागपंचमीला जिवंत नागाची पूजा होते दूध- लाह्या ह्या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे. पावसाळ्यात तो माणसाच्या हिताचा आहार आहे.*


     🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

               🔸नागपंचमी.(२)🔸


*श्रावणमास म्हणजे सणांचा मास असेही या मासाचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. श्रावणातील पहिला सण ‘ नागपंचमी ’चा ! या दिवशी स्त्रिया उपवास करतात. नवीन वस्त्रे, अलंकार परिधान करून नागदेवतेची पूजा करतात आणि त्याला दुधाचा नैवेद्य दाखवतात. या दिवशी काही चिरणे, कापणे वर्ज्य असते. या सर्व गोष्टींमागील इतिहास आणि शास्त्र आपण जाणून घेणार आहोत.*


*१. तिथी.*

*नागपंचमी हा सण श्रावण शुद्ध पंचमी या दिवशी साजरा केला जातो.*


*२. इतिहास.*

*अ. सर्पयज्ञ करणाऱ्या जनमेजय राजाला आस्तिक नावाच्या ऋषींनी प्रसन्न करून घेतले. जनमेजयाने ‘वर मागा’, असे म्हटल्यावर सर्पयज्ञ थांबवण्याचा वर त्यांनी मागून घेतला. जनमेजयाने सर्पयज्ञ थांबवला, तो दिवस पंचमीचा होता.*


*आ. ‘शेषनाग त्याच्या फण्यावर पृथ्वी धारण करतो. तो पाताळात राहातो. त्याला सहस्र फणे आहेत. प्रत्येक फण्यावर एक हिरा आहे. त्याची उत्पत्ती श्रीविष्णूच्या तमोगुणापासून झाली, असे म्हटले जाते. श्रीविष्णु प्रत्येक कल्पाच्या अंती महासागरात शेषासनावर शयन करतो. त्रेतायुगात श्रीविष्णूने रामाचा अवतार घेतला. तेव्हा शेषाने लक्ष्मणाचा अवतार घेतला. द्वापर आणि कली या युगांच्या संधीकाळात कृष्णाचा अवतार झाला. त्या वेळी शेष बलराम झाला.*


*इ. श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नागाचे मर्दन केले. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता.*


*ई. पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. त्या वेळी नागदेवतेने वचन दिले की, जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील, तिचे रक्षण मी करीन. त्यामुळेच त्या दिवशी नागाची पूजा करून प्रत्येक स्त्री नागपंचमी साजरी करते.*


*३ नागपूजनाचे महत्त्व.*

*अ. ‘नागांतील श्रेष्ठ जो ‘अनंत’ तोच मी’, अशी गीतेत (१०.२९) श्रीकृष्ण आपली विभूती सांगतो.*

*अनन्तं वासुकिं शेषं पद्मनाभं च कम्बलम् । शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं, कालियं तथा ।।*

*अर्थ: अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कंबल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया अशा नऊ जातींच्या नागांची आराधना करतात. त्यामुळे सर्पभय उरत नाही आणि विषबाधा होत नाही.*


*४. नागपंचमीच्या दिवशी उपवास करण्याचे महत्त्व.*

*सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. त्यामुळे भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न ग्रहण केले नाही. त्यामुळे त्या दिवशी स्त्रिया भावाच्या नावाने उपवास करतात. ‘भावाला चिरंतन आयुष्य आणि अनेक आयुधांची प्राप्ती होवो आणि तो प्रत्येक दुःख आणि संकट यांतून तारला जावो’, हेही उपवास करण्यामागे एक कारण आहे. नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक बहिणीने भावासाठी देवतांकडे हाक मारल्यास त्याचा भावाला ७५ टक्के लाभ होतो आणि त्याचे रक्षण होते.*


*५. नवीन वस्त्रे आणि अलंकार घालण्याचे कारण.*

*सत्येश्वरीचा भावासाठीचा शोक पाहून नागदेव प्रसन्न झाला. त्याने तिचा शोक दूर करण्यासाठी आणि तिला आनंदी करण्यासाठी नवीन वस्त्रे परिधान करण्यासाठी दिली. तसेच निरनिराळे अलंकार देऊन तिला सजवले. त्यातून सत्येश्वरी समाधानी झाली. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी स्त्रिया नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान करतात.*


*६. मेंदी लावण्याचे महत्त्व.*

*नागराज सत्येश्वराच्या रूपात सत्यश्वेरीच्या पुढ्यात उभा राहिला. ‘तो निघून जाईल’, असे वाटून तिने त्याच्याकडून, म्हणजे नागराजाकडून तसे हातांवर वचन घेतले. ते वचन देतांना सत्येश्वरीच्या हातांवर वचनचिन्ह निर्माण झाले. त्या वचनाचे प्रतीक म्हणून नागपंचमीच्या आदल्या दिवशी प्रत्येक स्त्री स्वतःच्या हातांवर मेंदी काढते.*


*७. नागपंचमीच्या दिवशी झोका खेळण्यामागील इतिहास.*

*पाच युगांपूर्वी सत्येश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती. सत्येश्वर हा तिचा भाऊ होता. सत्येश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला. सत्येश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला. तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला. दुसऱ्या दिवशी सत्येश्वरीला नागराज दिसला नाही. तेव्हा ती रानात सैरावैरा भटकू लागली आणि शोधता शोधता झाडांच्या फांद्यांवर चढून पाहू लागली. त्यानंतर नागराजाने तिला दृश्य स्वरूपात समोर येऊन सत्येश्वराचे रूप प्रकट केले. तेव्हा ती आनंदाने झाडांच्या फांद्यांवर झोके घेऊ लागली. त्यामुळे स्त्रिया त्या दिवशी झोका खेळतात. झोका खेळण्यामागील उद्देश असतो – जसा झोका वर जातो, तसा भाऊ प्रगतीच्या शिखरावर जाऊ दे आणि झोका खाली येतो, तशा भावाच्या आयुष्यात आलेल्या सर्व अडचणी आणि दुःखे खाली जाऊ देत.*


*८. नागपंचमी साजरी करतांना करावयाच्या प्रत्येक कृतीचा आध्यात्मिक लाभ.*

*अ. नवीन वस्त्र आणि अलंकार परिधान केल्याने आनंद आणि चैतन्य यांच्यालहरी आकर्षित होतात.*

*आ. झोका खेळल्याने क्षात्रभाव आणि भक्तीभाव वाढून त्यातून सात्त्विकतेच्या लहरी मिळतात.*

*इ. उपवास केल्याने शक्ती वाढते आणि उपवासाचे फळ मिळते.*

*उ. ‘जी स्त्री नागाच्या आकृत्यांचे भावपूर्ण पूजन करते, तिला शक्तीतत्त्व प्राप्त होते.*

*ऊ. या विधीमध्ये स्त्रियांनी नागांचे ‘भाऊ’ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते.*

*ए. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे नागदेवतेस प्रसन्न करून घेणे.*

*ऐ. नागपंचमीच्या दिवशी नागाची पूजा करणे, म्हणजे सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणे आहे. त्यामुळे त्या दिवशी वातावरणात आलेल्या शिवलहरी आकृष्ट होऊन त्या जिवाला ३६४ दिवस उपयुक्त ठरतात.*


*९. नागपंचमीच्या दिवशी प्रत्येक साधिकेने करायची प्रार्थना.*


*नागपंचमीच्या दिवशी जी बहीण भावाच्या उन्नतीसाठी ईश्वराला कळकळून आणि भावपूर्ण प्रार्थना करते, त्या बहिणीची हाक ईश्वराच्या चरणी पोहोचते. त्यामुळे प्रत्येक साधिकेने त्या दिवशी ईश्वरी राज्याच्या स्थापनेसाठी प्रत्येक युवकाला सद्बुद्धी, शक्ती आणि सामर्थ्य मिळण्यासाठी प्रार्थना करावी.*


*१०. निषेध.*

*नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे आणि तळणे या क्रिया निषिद्ध असण्याचे कारण, कापणे, चिरणे आणि तळणे, या प्रक्रियांतून रज-तमाशी संबंधित इच्छालहरी, म्हणजेच देवताजन्य इच्छालहरींच्या कार्याला अवरोध करणार्या लहरी वायूमंडलात ऊत्सर्जित होण्याचे प्रमाण जास्त असल्याने या दिवशी नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यात अडथळा प्राप्त होऊ शकतो. या कारणास्तव नागपंचमीच्या दिवशी अशा प्रकारच्या कृती केल्याने पाप लागू शकते; म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे, चिरणे, तळणे, तसेच भूमी उकरणे, नांगरणे, या कृती निषिद्ध मानल्या आहेत.*



      *🌺🙏।।श्री स्वामी समर्थ।। 🙏🌺*     

                🏵 नागपंचमी (३)🏵

     

           *भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवेतर स्रुष्टीकडे प्रेमाने पहायचे शिकवते. आपल्या संस्कृतीने पशु-पक्षी, वृक्ष-वनस्पती, सर्वांशी आत्मियतेने संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या येथे गायीची पूजा होते. कित्येक भगिनी कोकिळा व्रत करतात. कोकिळेचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर कानी पडेल, तेव्हाच भोजन करायचे असे हे व्रत आहे. आपल्या येथे पोळा महत्वाचा सण आहे. या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते. वटसावित्रीच्या व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते. परंतु नागपंचमीच्या दिवशी जेव्हा नागाचे पूजन आपण करतो त्या वेळी तर आपल्या संस्कृतीची, वैशिष्ट्याची विलक्षणता दिसून येते.*


           *भारतीय संस्कृतीत नागांची पूजा अनेक प्रकारे केली जाते. शिवशंकर आपल्या गळ्यात नाग धारण करतात. भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर पहुडलेले असतात व गणपतीच्या कमरेस बंध म्हणून नागच असतो. नागाची उत्पत्ती कथा पुढील प्रमाणे -*


*कथा : पौराणिक कथेनुसार नाग हे काश्यप व कद्रु यांचे पुत्र होत. यातील अष्टनाग प्रसिद्ध आहेत. १)अनंत २)वासुकी ३)पद्म ४)महापद्म ५)तक्षक ६)कर्कोटक ७)शंख ८)कुलिक (कालिया). ते प्रजेला त्रास देऊ लागले, म्हणून ब्रम्हदेवाने त्यांना शाप दिला की, तुम्ही तुमच्या सावत्र भावाकडून (गरूडाकडून) मारले जाल व जनमेजयाचे सर्पसत्रात तुमचा नाश होईल. या भागातील अनंत, वासुकी हे मानवाला अनुकूल व तक्षक, कर्कोटक, कालीय हे देव- मानवांचे कट्टर वैरी; या दोन्ही प्रकारच्या नागांची पूजा होते. कृतज्ञतेपोटी उपकारांची व भितीपोटी विघातकांची नागपूजेबरोबर नागांची व्रते होतात.*


           *यमुनेच्या डोहात कालिया नांवाचा महाविषारी नाग होता. त्याच्या साध्या फुत्काराने सुध्दा सर्वकाही भस्मसात होई. भगवान श्रीकृष्णांनी कालिया नागाला मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले. तो दिवस म्हणजे श्रावण शुध्द पंचमी (नागपंचमीचा) होता. तेव्हापासून लोक नागाची पूजा करून त्याला लाह्या, दूध देतात. या दिवशी नागदेवते बरोबर श्रीकृष्णाची पूजा करतात. या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचा नाग काढतात. पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात व नवनागांची नावे घेऊन यथासांग पूजा करतात.*


           *या दिवशी चुलीवर तवा ठेवू नये, विळीने चिरू नये, तळण करू नये. पाटावर नागाची रांगोळी काढून नागाची पूजा करावी. श्रावण महिन्यातील शुध्द पंचमीला नागाची पूजा केली जाते म्हणून त्याला नागपंचमी असे म्हणतात. या दिवशी स्वयंपाकात पुरणाचे दिंडे किंवा साखर खोबऱ्याचे दिंडे करावेत, उकडीचे पदार्थ करावेत व त्याचा नैवेद्य दाखवावा. नागाची पूजा करतांना उपचाराचे वेळी "अनंतादि नागेभ्यो नम: " हा मंत्र म्हणावा.*


           *आपली भारतीय संस्कृती सर्वांवर प्रेम करायला शिकवते. तसे पाहिले तर नाग हा रानावनात राहणारा प्राणी. पण पावसाळ्यात त्याचे घर पाण्याने भरते म्हणून तो गावात येतो. घराच्या वळचणीला बसतो. तो अतिथी, पाहुणा असतो म्हणून त्याचे पूजन करायचे. नागाला वनात राहणेच आवडते, त्याला पावित्र्य आवडते, स्वच्छता आवडते, सुगंध आवडतो, तो फुलाला जवळ करतो. नागांचा आणखी एक गुण म्हणजे ते शेतांची राखण करतात. उंदीर, घुस इत्यादी शेतात येऊ देत नाहीत. हा सुध्दा त्यांचा उपकारच आहे. नागाची पूजा म्हणजे विषारी सर्पातलाही चांगुलपणा पहावयास आपली संस्कृती सांगत आहे.*


*संदर्भ: सण-वार- व्रत-वैकल्ये, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणीत).*


                      🔸नाग.🔸


*नाग हा एक विषारी साप आहे. नागाचा वावर मुख्यत्वे आशिया व आफ्रिका खंडातील उष्ण प्रदेशात आहे.*


*नागाची ओळखण्याची सर्वांत मोठी खूण म्हणजे त्याचा फणा. नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचीक असतात त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाचा फणा काढण्याचा अर्थ म्हणजे संकट काळी आपली छबी मोठी करून समोरील प्राण्यांना घाबरवणे. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्यालायक असतात. फण्याच्या मागील बाजूस देखिल विविध खुणा असतात.*


*भारतातील नागांना फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो, तर काहींना शून्याचा आकडा (monoclour) असतो. असे दाखवून नाग मोठे डोळे असल्याचे भासवतो. नाग हे अनेक रंगात आढळतात. काळा रंग व तपकिरी रंगातील नाग जास्त आढळतात. नागांना दोन विषारी दात असतात तसेच नागांचे विषारी दात हे दुमडू शकत नाहीत. नागाची लांबी बरीच, म्हणजे सरासरी लांबी १.२ ते २.५ मीटर असते.*


*खाद्य.*

*उंदीर, बेडूक, सरडे, इतर छोटे प्राणी व पक्षी हे नागाचे मुख्य खाद्य आहे. आहेत. शेतीमधील उंदराचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडून नाग शेतकर्‍याला मदत करत असतात. माणूस हा नागाचा मुख्य शत्रू आहे. माणूस भीतीपोटी मोठ्या प्रमाणावर नागांना व इतर सापांना मारतो. इतर नैसर्गिक शत्रूंमध्ये मुंगूस, गरुड, कोल्हे, खोकड, अस्वले तसेच मोर इत्यादी आहेत. नाग शिकार करताना प्रामुख्याने आपल्या विषाचा उपयोग करतो. आपल्या भक्ष्याला चावल्यावर भक्ष्य मरेपर्यंत नाग वाट बघगतो व भक्ष्य मेल्यानंतर अथवा अर्धमेले असताना नाग तोंडाच्या बाजूने भक्ष्याला पूर्णपणे गिळतो.*


*नाग आपली अंडी इतर प्राण्यांच्या बिळात टाकतो (आयत्या बिळात नागोबा ही मराठीत म्हण आहे!) व अंड्यातून पिल्ले बाहेर पडेपर्यंत पहारा देतो.*


*नागाच्या उपजाती.*

*भारतीय नाग.*

*नागाची सर्वाधिक आढळणारी जात ही भारतीय उपखंडात आढळते. याच्या फण्याच्या मागील बाजूस १० चा आकडा असतो भारतातील हिमालयातील मध्यम ते उंच रांगा सोडून ही जात सर्वत्र आढळते. प्रामुख्याने हे नाग शुष्क वातावरण जास्त पसंत करतात परंतु तसे त्यांचा वावर सर्वत्र असतो.*


*काळा नाग.*

*ही मुख्य नागाचीच उपजात आहे. ही जात प्रामुख्याने पाकिस्तानमध्ये व राजस्थानमध्ये आढळते. याचे संपूर्ण शरीर काळे असते तसेच मुख्य नागापेक्षा लांबीने लहान असतो व फणादेखील लहान असतो.*


*शून्य आकडी नाग प्रामुख्याने दक्षिण भारतात व आशियातील इतर देशात आढळतात. याच्या फण्यामागे शून्याचा आकडा असतो. फण्यामागील आकडा सोडला तर इतर सर्व गोष्टी मुख्य नागासारख्याच आहेत.*


*थुंकणारा नाग हा प्रामुख्याने आग्नेय आशियात म्हणजे थायलंड, मलेशिया, व्हिएतनाम व चीन या देशांत आढळतो. घनदाट जंगले व भातराशी हे त्याचे निवासस्थान आहे.*


*नावाप्रमाणेच हा नाग आपल्या विषारी दातांमधून विषाची चिळकांडी आपल्या भक्ष्यावर उडवतो. भक्ष्याचे डोळे हे त्याचे मुख्य लक्ष्य आहे. विषाच्या प्रभावाने भक्ष्य तात्पुरते अंध होते व त्याचा फायदा घेऊन हा भक्ष्याची शिकार साधतो. डिस्कव्हरी चॅनेल वरील क्षणचित्रांमध्ये कित्येक मीटरपर्यंत हे नाग चिळकांडी उडवू शकतात असे दाखवले आहे.*


*नागराज.*

*नागराज (किंग कोब्रा) हा भारतातील पूर्व व दक्षिण भागात आढळणारा दुर्मीळ साप आहे हा नावाप्रमाणेच नागराज आहे. लांबीला सर्वाधिक व विषाच्या प्रभावात सर्वाधिक. याचे विषाने माणूस अर्ध्या तासाच्या आत मरू शकतो. दिसायला रुबाबदार असा हा साप लांबीला पाच ते साडेपाच मीटर असू शकतो. याचा फणा इतर नागांपेक्षा छोटा असतो. हा साप घनदाट जंगले पसंत करतो व कमीत कमी माणसाच्या संपर्कात येतो. अभ्यासकांच्या मते हा सर्वाधिक उत्क्रांत साप आहे.*


*सापांमध्ये अतिशय दुर्मीळ असे सहचरी जीवन जगतो (काही काळापुरतेच) अंडी टाकण्यासाठी हा साप घरटे बांधतो. तसेच पिल्ले बाहेर येईपर्यंत अंड्याचे रक्षण करतो.*


*नागाचे विष .*

*दरवर्षी हजारो माणसे नागदंशाने मरण पावतात. नाग चावला आहे या भीतीनेच बहुतांशी माणसे दगावतात. नाग हे माणसावर स्वतःहून आक्रमण करत नाहीत, केलाच तर त्याच्यामागे स्वसंरक्षण हाच हेतू असतो.. जर नागाचा आमने सामने झालाच, तर आपले चित्त स्थिर ठेवणे हे सर्वोत्तम. आपली हालचाल कमीत कमी ठेवणे व जास्ती जास्त स्थिर रहाणे. हालचाल करायची झाल्यास नागाच्या विरुद्ध दिशेला अतिशय हळूवारपणे करणे. सर्वच नागदंश हे जीवघेणे नसतात काही वेळा कोरडा दंश देखील होऊ शकतो. साधारणपणे १० टक्के नागदंश हे जीवघेणे असतात. नागाचे विष हे मुख्यत्वे संवेदन प्रणालीवर neural system वर परिणाम करतात. दंशानंतर लवकर मदत मिळाली नाही, तर दंश जीवघेणा ठरू शकतो. दंश झाल्यानंतर काही वेळाने दंश झालेला भाग हा असंवेदनशील होतो व हळूहळू शरीराचे इतर भाग असंवेदनशील होण्यास सुरुवात होते.*


*विषबाधा झालेला माणूस विषदंशाचा भाग हलवण्यास असमर्थ होतो. विष शरीरात पसरल्यावर इतरही भाग हलवण्यास तो असमर्थ होतो. जीव मुख्यत्वे मेंदूद्वारे नियंत्रित श्वसन प्रणालीचे कार्य बंद पडल्याने जातो. विषाचा प्रादुर्भावाने जीव जाण्यास एक तास ते दीड दिवस लागू शकतो.*


*प्रतिविष.*

*नाग चावल्यानंतर सर्वांत पहिले प्रथमोपचार होणे गरजेचे आहे. प्रथमोपचारानंतर साप चावलेल्या माणसाला प्रतिविषाचे इंजेक्शन देणे गरजेचे आहे. प्रतिविष हे विषाच्या रेणूंचा प्रादुर्भाव नाहिसा करते व शरीराच्या विषाचे रेणू शरीराच्या बाहेर काढायला मदत करते. विषाचे अंश शरीराच्या बाहेर पडेपर्यंत त्याचा प्रादुर्भाव रहातो. प्रतिविष हे देखिल नागाच्याच विषापासून बनवलेले असते.*


*भारतीय संस्कृतीतील नागाचे स्थन.*

*गारुड्याकडील नाग.*

*भारतीय संस्कृतीमध्ये नागाला भीतीयुक्त आदराचे स्थान आहे. महाराष्ट्रात श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते. या दिवशी महिला जिवंत नागाची पूजा करतात व नागाला दुधाचा प्रसाद दिला जातो. नागोबाला दूध म्हणून आरोळी देत गारुडी लोक गावांगावांत फिरत असतात व त्यादिवशी लोकांकडून अन्न धान्य, कपडा-लत्ता, पैसे घेतात. सांगली जिल्ह्यामधील ३२ शिराळा या गावी दरवर्षी नागपंचमी निमित्त मोठा सण आयोजित केला जातो. हजारो नाग या दिवसाकरिता पकडले जातात. कित्येक पर्यटक केवळ हा सण पहायला या गावी जातात. गारुड्यांकडून पकडलेल्या या नागांचे मोठ्या प्रमाणावर हाल केले जातात असे लक्षात आले आहे. (सद्या यावर बंदी आहे.) काही संघटनांनी केलेल्या कार्यामुळे काही ठिकाणी नागपंचमीला केवळ नागाच्या प्रतिमेची पूजा केली जावी असे आवाहन केले आहे. त्याचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.*


*समुद्रमंथनासाठी लागलेली मंदार पर्वतापासून बनवलेली रवी घुसळण्यासाठी वासुकी नागाला दोरी म्हणून वापरले होते. हिंदू देवता शंकर यांनी सागरमंथना नंतर आलेल्या विषाचे प्राशन केले व त्यामुळे त्यांना गळ्यात प्रचंड जळजळ झाली. ह्या जळजळीपासून त्यांनी थंडावा मिळावा म्हणून नाग गळयाभोवती लपेटला व त्यांना विषप्राशन सहन करता आले, अशी कथा आहे. विष्णू हे सदैव शेषनागाच्या शय्येवर विश्राम घेत असतात असे पुराणात सांगितले आहे. महाभारतातील अर्जुनाने नाग जातीतील उलुपी नावाच्या मुलीशी लग्न केले होते. पंडूची पत्‍नी कुंती नागवंशीय होती.*


*डॉ. आंबेडकरांच्या मते महाराष्ट्रातील महार हे नागांचे वंशज आहेत. सातवाहन राजे नागकुलातले होते. ईशान्य भारतात बोलल्या जाणार्‍या गारो, खासी, बोडो आदी भाषा या नाग परिवारातील भाषा समजल्या जातात. नाग जमातीचे लोक भारताचे नागरिक आहेत; त्यांची वस्ती प्रामुख्याने नागालॅंड प्रांतात आहे.*


*हिंदू धर्मातील नवनाग स्तोत्रात नागाच्या नऊ नावांचा उल्लेख आहे. ते स्तोत्र खालीलप्रमाणे,*


*अनंतं वासुकीं शेषं पद्मनाभं च कंबलं | शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कलियं तथा|| एतानि नव नामानी नागानां च महात्मनां| सायंकाले पठेन्नित्यं प्रातः काले विशेषतः|| तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत् |*


*या स्तोत्रात अनंत, वासुकी, शेष, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालीय या नऊ प्रकारच्या नागांच्या नावांचा किंवा जातींचा उल्लेख आका आहे.*


*गैरसमज.*

*नागाच्या बाबतीत समाजात गैरसमज मोठ्या प्रमाणावर आहेत. खरेतर उंदरांसारख्या प्राण्यांचा मोठ्या प्रमाणावर फडशा पाडणारे नाग माणसाचे मित्र आहेत. परंतु माणूस आपल्याच चुकीने त्यांना डिवचतो व कधी कधी जीव गमावून बसतो. भारतात नागाला देवतेसमान जरी मानत असले, तरी नाग किंवा कुठलाही साप दिसला तर मारायचाच हा प्रघात पडलेला आहे. नागाचे विष हे माणूस व नागाच्या शत्रुत्वामधील मुख्य कारण असले तरी इतरही अनेक गैरसमज भारतात आहेत खालीलप्रमाणे.*


*नाग दूध पितो - वास्तविक नाग हा सस्तन प्राणी नाही, त्यामुळे नाग दूध पीत नाही.*

*नाग गारुड्याच्या पुंगीपुढे डोलतो - वास्तविक सापांना कान नसतात त्यामुळे गारुडी काय वाजवतोय हे नागाला कधीच कळत नाही. गारुडी पुंगी घेउन स्वतः हालचाल करीत असतो व त्या हालचालीला नाग फक्त प्रतिसाद देतो.*

*नागिणीला मारले, तर नाग त्याचा सूड घेतो. (या सूडाला डूख धरणे असे म्हणतात.)*

*नागाच्या डोक्यामध्ये नागमणी असतो.*

*नागाला अनेक फणे असू शकतात.*


*चित्रपटातील गैरसमजुती.*

*सर्वांत प्रसिद्ध चित्रपट १९८६ मधील श्रीदेवी, अमरीश पुरी व ऋषी कपूरचा नागिन आहे, ज्यामध्ये श्रीदेवी ही नागाचे तसेच मानवी रूप धारण करू शकत असते.*

*जॅकी श्रॉफचा 'दूध का कर्ज' हा चित्रपटसुद्धा नागांवर आधारित आहे. हा चित्रपट उपकार दुधाचे या मूळ मराठी चित्रपटावरून घेतलेला आहे.*

*जितेंद्र व रानी रॉय चा 'नागिन' हा चित्रपट नागाच्या मृत्युचा बदला वर आधारित आहे. साप 'डुख'धरतो, या गैरसमज वाढविन्यास कारणीभूत ठरतो.*

*स्रोत: विकिपीडिया.*


〰️〰️〰️〰️〰️〰️

नाग पंचमी विधी,नियम,पुजा

〰️〰️〰️〰️〰️〰️



नागपंचमी हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सण आहे. श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमीला नाग पंचमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी नाग दैवताची पूजा केली जाते.


श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण पाळला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.


या वर्षी, पंचमीची तारीख 12 ऑगस्ट रोजी दुपारी 03.24 पासून सुरू होईल आणि 13 ऑगस्ट रोजी सकाळी 1.42 पर्यंत राहील. आचार्यांच्या मते नाग पंचमीचा सण 13 ऑगस्ट रोजी साजरा केला जाईल. पूजेसाठी सर्वात शुभ वेळ 13 ऑगस्ट रोजी सकाळी 5:49 ते सकाळी 8.28 पर्यंत असेल.



नागपंचमी पूजा विधी

या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्य कर्मांहून निवृत्त व्हावे.

अंघोळ करून स्त्रियांनी नवीन वस्त्रे, अलंकार धारण करावे.

पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिलांची चित्रे काढावी.

त्यांची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दूर्वा वाहून पूजा करावी.

नाग देवताची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीची पुरणाची दिंड करून नैवेद्य दाखवावा.

या सणाला विशेषतः: गव्हाची खीर आणि चण्याची डाळ, गूळ यांपासून बनवलेल्या उकडीची पुरणाची दिंड तयार केली जाते.


नागपंचमी मंत्र

या दिवशी अष्टनागांच्या या मंत्राचा जप केला पाहिजे.

वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।

ऐरावतो धृतराष्ट्रः कार्कोटकधनंजयौ ॥

एतेऽभयं प्रयच्छन्ति प्राणिनां प्राणजीविनाम् ॥


नागपंचमीचे नियम

नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नये, कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये वगैरे संकेत पाळले जातात. तसेच या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये असेही म्हटले जाते.


कहाणी नागपंचमीची

ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होतं. तिथं एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.


शेषभगवानास तिची करुणा आली. त्यानं ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारलं तिनंही हाच माझा मामा असं सांगितलं. ब्राह्मणानं तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेलं. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ता‍कीद दिली की, हिला कोणी चावू नका!


एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्‍याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.


नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चि‍त्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्‍या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.


🍀🍀🍀🍀🍀🍀🍀

नाग पंचमी स्पेशल पुरणाचे दिंडोरे

➖➖➖➖➖➖➖



साहित्य:

1 कप चणाडाळ

1 कप गूळ

1 कप कणिक

२ टेस्पून तेल

चिमूटभर मिठ

१/४ टिस्पून वेलचीपूड किंवा जायफळ पूड


कृती:

प्रथम पुरणपोळीसाठी ज्याप्रकारे पुरण तयार करतो तसे बनवावे. त्यासाठी चणाडाळ शिजवून घ्यावी. चाळणीत घालून पाणी निथळून डाळ पातेल्यात घ्यावी. त्यात किसलेला गूळ घालून मध्यम आचेवर हे मिश्रण आटून घ्यावं. आटवताना ढवळत राहावं. यात वेलचीपूड घालावी. मिश्रण घट्टसर झाल्यावर भांड गॅसवरून उतरुन घ्यावं. गार होऊ द्यावं.


कणकेत मिठ आणि २ टेस्पून कडकडीत तेलाचे मोहन घालून घट्टसर मळून घ्यावी. थोडावेळ झाकून मुरू द्या. नंतर कणकेचे ८ ते १० गोळे करावे. कणकेच्या गोळ्याची पातळ पुरी लाटून मधोमध १ चमचा पुरण ठेवावं व समोरासमोरील बाजू पुरणावर ठेवून चौकोनी आकारात बंद करावं.


मोदकपात्र असेल २ लिटर पाणी गरम करयाला ठेवावे. मोठ्या पातेल्यात देखील पाणी गरम करता येईल. त्यावर बसणारी चाळणी ठेवून त्यावर सुती कपडा घालावा. १५ ते २० मिनीटे वाफू द्यावे.


गरमागरम दिंडं तूप घालून नैवेद्य दाखवावा.


〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

12 राशी,12 मंत्र नागदेवता प्रसन्न होईल

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️



।।ॐ नवकुलाय विद्महे, विषदन्ताय धीमहि तन्नो सर्प प्रचोदयात।।


संपूर्ण पृथ्वीचे भार आणि भगवान शिव यांच्या गळ्यात धारण केलेल्या सुंदर नाग महाराजांना आपले पूर्वज, देवता, राक्षस आणि किन्नर हे सर्व पूजतात.


नागपंचमीच्या दिवशी नाग महाराजांची पूजा केल्याने विविध प्रकारचे त्रास संपतात. जी व्यक्ती राहू-केतूच्या दशा किंवा महादशेतून जात असेल, किंवा कालसर्प दोष असेल त्यांनी नाग-नागिणीची चांदी किंवा पंचधातूची जोडी शिवलिंगावर अर्पित करावी आणि सर्व दोषांपासून मुक्त व्हावं.


दोष दूर करण्यासाठी, आपण राशीनुसार सापाची स्तुती करू शकता -


मेष-

ॐ वासुकेय नमः


वृषभ-

ॐ शुलिने नमः


मिथुन-

ॐ सर्पाय नमः


कर्क-

ॐ अनन्ताय नमः


सिंह-

ॐ कर्कोटकाय नमः


कन्या-

ॐ कम्बलाय नमः


तूळ-

ॐ शंखपालय नमः


वृश्चिक-

ॐ तक्षकाय नमः


धनू-

ॐ पृथ्वीधराय नमः


मकर-

ॐ नागाय नमः


कुंभ-

ॐ कुलीशाय नमः


मीन-

अश्वतराय नमः


विशेष: या दिवशी नागदेव भगवान शिव पूजेने प्रसन्न होतात आणि प्रत्येक इच्छा पूर्ण करतात.


स्रोत: विकिपीडिया.

Monday 2 August 2021

 उद्या दुपारी ४ वाजता १२ वीचा ऑनलाईन निकाल जाहीर होणार... बारावीच्या निकालाची प्रतिक्षा संपली...

          महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत सन २०२१ मध्ये उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा उपरोक्त निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार, दिनांक ०३/०८/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

          उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२९ साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण खालील संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. अधिकृत संकेतस्थळांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.


१. https://hscresult.11thadmission.org.in


2. https://msbshse.co.in


३. hscresult.mkcl.org


४. mahresult.nic.in.


५. https://lokmat.news18.com


www.mahresult.nic.in व https://msbshse.co.in या संकेतस्थळावर विदयार्थ्यांच्या निकालाशिवाय निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

🔖निकालाचे परिपत्रक 👇


🔖 शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी बारावीच्या निकाला बद्दल केलेले ट्विट 👇