K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Sunday 28 February 2021

 💊 *राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम* 💊


*दि.01/03/2021* रोजी शाळा व अंगणवाडयांमध्ये मुलांना (वय वर्ष १ ते १९) जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम आहे.


*जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम*


- रक्तक्षय (अँनिमिया )

-पोटदुखी,उलट्या, अतिसार, मळमळणे

-भूक मंदावणे

-कुपोषण

-थकवा व अस्वस्थता

-शौचाच्या वेळेस रक्त पडणे

-आतड्याला सूज येणे.


*जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग*

-जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे

-भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे

-स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.

-पायात चपला,बुट घालावेत

-नियमित नखे कापावित

-शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये

-परिसर स्वच्छ ठेवावा.


*जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे*

-रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो

-बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.

-शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते

-आरोग्य चांगले राहते.


🔹 *जंतनाशक गोळी- अल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम* 


वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून


वय २ ते ३ वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून 


वय:- ३ ते१९वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) चघळून खाऊ घालणे. 


🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत *दि 01/03/2021* रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.


 या दिवशी गोळी दिलेल्या मुलांच्या नावापुढे *A*अशी खुण करणे.


शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देण्यात येणार आहेत.


*गोळी खाऊ घालण्यापूर्वी घ्यावयाची काळजी*


-आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.

-प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.

-आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठीक झाल्यानंतर किंवा वंचित लाभार्थी यांना *मॉप अप राऊंड दिन दि 08/03/2021* गोळी देणे.

-गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा, अंगणवाडीत थांबवून ठेवावे.


यादिवशी गोळी दिल्यास *aa* अशी खुण करणे.


-गोळी खाल्यानंतर काही दुष्परिणाम दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदयकीय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे. 

-ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही.

दहावी-बारावीसाठी सुधारित अंतिम वेळापत्रक जाहीर... 


पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने एप्रिल-मे मध्ये घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी पेपरच्या वेळा वाढवून देण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या निर्णयानुसार बोर्डाच्या परीक्षेसाठीच्या वाढवून दिलेल्या वेळेसह परीक्षांचे सुधारित अंतिम वेळापत्रक आणि त्याचबरोबर परीक्षेसाठीच्या मार्गदर्शक सूचनाही जाहीर करण्यात आल्या आहेत.


हे पण वाचा :- HSC परीक्षा एप्रिल मे 2021 करीता प्रात्यक्षिक,तोंडी परीक्षा,श्रेणी परीक्षा,प्रकल्प गुणविभागणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे कडून...


       कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून लाखो विद्यार्थी घरात राहूनच शिक्षण घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या लिखाणाचा वेग मंदावला असण्याची शक्यता आहे. याचाच विचार करून शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेसाठी वेळ वाढवून देण्याचा निर्णय मागील आठवड्यात जाहीर केला. त्यानुसार राज्य मंडळाने वाढीव वेळेसह सुधारित अंतिम वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे दरम्यान, तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे दरम्यान होणार आहे. लेखी परीक्षेसाठी ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे आणि ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे वाढवून दिली आहेत. त्याप्रमाणे परीक्षेच्या वेळेमध्ये बदल केल्याने सुधारित अंतिम वेळापत्रक आणि लेखी, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा, प्रकल्प यासंदर्भातील विशेष मार्गदर्शक सूचना www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.


हे पण पहा : शै.वर्ष २०२०-२१ च्या इ.१२ वी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाईन काढणेबाबत...


सदर वेळापत्रकानुसार बारावीच्या लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होतील तर माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन स्वरुपात दि. 22 मे ते 28 मे या कालावधीत घेण्यात येईल. 

       तर दहावीच्या लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 या कालावधीत होतील.

 

💥 वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.👇

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा  ( दहावी )

📌 इ.१०वी चे वेळापत्रक (SSC)

SSC April-May 2021 final timetable


उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा ( बारावी )

📌 इ.१२वी चे वेळापत्रक (नवा अभ्यासक्रम) (HSC)

HSC April-May 2021 General final (New) 

HSC April-May 2021 Vocational final (New) 


हे पण वाचा - पहिली ते बारावीच्या परीक्षेसाठी 75% च अभ्यासक्रम... कमी केलेला 25% अभ्यासक्रम डाउनलोड करण्यासाठी येथे टच करा.


हे पण वाचा - दहावी व बारावी चे नवनीत प्रश्नसंच व कृती आराखडा 2021 विषयनिहाय डाउनलोड करा. 

    

📌 यांना १०० टक्के अभ्यासक्रम

लेखी परीक्षेमध्ये नियमित, तुरळक विषय घेऊन आणि प्रथमच प्रविष्ट होणाऱ्या खासगी विद्यार्थी आणि आयटीआयचे टान्सफर ऑफ क्रेडिटसाठी काही विषयांसह परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना २५ टक्के कमी केलेल्या अभ्यासक्रमानुसार परीक्षा द्यावी लागेल. तर पुनर्परीक्षार्थी, श्रेणीसुधार म्हणून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० टक्के अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा द्यावी लागणार आहे, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा - दहावी आणि बारावी परीक्षा एप्रिल-मे 2021 च्या परीक्षार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना वाचण्यासाठी येथे टच करा...

 

📌 लेखी परीक्षेसाठी मार्गदर्शक सूचना

- लेखी परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातच घेणार

- अपवादात्मक परिस्थितीत एकापेक्षा अधिक कनिष्ठ महाविद्यालये एकत्र करून होतील परीक्षा

- आरोग्याविषयक कारणामुळे विद्यार्थी परीक्षेस गैरहजर असल्यास त्याचदिवशी विभागीय मंडळाकडे नोंदवले जाणार

- आरोग्याविषयक कारणामुळे गैरहजर विद्यार्थ्यांची विशेष परीक्षा (ऑफलाइन) जूनमध्ये होणार

- विशेष परीक्षा मूळ परीक्षेचाच भाग असल्याने वेगळे शुल्क आकारले जाणार नाही

- परीक्षार्थींना थर्मल स्क्रिनिंगसाठी परीक्षेच्या प्रत्यक्ष वेळेपूर्वी किमान एक ते दीड तास अगोदर परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार

- तापमान तपासल्यानंतर प्रत्यक्ष पेपरच्या वेळेपूर्वी ३० मिनिटे अगोदर परीक्षा कक्षामध्ये बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी स्थानापन्न व्हावे

Source from : Sakal


हे पण वाचा :- दहावी बारावी परीक्षा एप्रिल-मे 2021 लेखी परीक्षेचे सुधारित अंतिम वेळापत्रक बाबतचे चे प्रकटन बघण्यासाठी येथे क्लिक करा...

      

🎤 बोर्ड परीक्षा तयारी आणि मार्गदर्शन :-

👉 इयत्ता १२वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन विषयनिहाय शंका समाधान 

👉  इयत्ता १०वी तील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन विषयनिहाय शंका समाधान 


🔊 hsc exam time table 2021 pdf download 

🔊 ssc exam  time table 2021pdf download



💥 शैक्षणिक वर्ष -२०२१ चे नवनीत अपेक्षित प्रश्नसंच व कृती पत्रिका १० वी व १२ वी PDF डाऊनलोड.

       शैक्षणिक वर्ष 2020-2021 साठी नवनीत प्रकाशन ने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव प्रश्नपत्रिका संच व कृती पत्रिका तयार केलेल्या आहेत.

 

हे पण वाचा :- दहावी बारावी परीक्षा एप्रिल-मे 2021 लेखी परीक्षेचे अंतिम वेळापत्रक बघण्यासाठी येथे क्लिक करा...


💥 नवनीत सराव प्रश्नपत्रिका व कृती पत्रिका वैशिष्टये :-

1. बोर्डाच्या 2021 च्या परीक्षेसाठी परिपूर्ण रचना

2. प्रत्येक पुस्तकाच्या सुरुवातीला 'अत्यंत महत्त्वाचे' या अंतर्गत शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी वगळलेला अभ्यासक्रम 

3. त्यानंतर बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचा / कृती पत्रिकेचा अद्ययावत आराखडा

4. प्रत्येक विषयात बोर्डाची मार्च 2020 ची प्रश्नपत्रिका / कृती पत्रिका आदर्श उत्तरासह 

5. प्रत्येक विषयात वगळलेला अभ्यासक्रम लक्षात घेवून तज्ञ व अनुभवी लेखकांनी तयार केलेल्या 5-5 प्रश्नपत्रिका / कृती पत्रिकांचा संच


📌 इयत्ता १० वी चे नवनीत अपेक्षित विषयनिहाय प्रश्नसंच व कृती पत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

Click here 👈


📌 इयत्ता १२ वी चे नवनीत अपेक्षित सराव प्रश्नसंच व कृती पत्रिका डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.

Click here 👈




काळजी घ्या,मास्क वापरा. 😷

घरी रहा,सुरक्षित रहा.

धन्यवाद. 🙏

Saturday 27 February 2021

 माझी मायबोली मराठी भाषा मराठी निबंध भाषण, लेख

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||

       भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. केवळ भारतातच नव्हे तर मराठी भाषा मॉरिशस व इस्रायल मध्येही बोलली जाते. मराठी हि महाराष्ट्राची एकमेव राज्यभाषा आहे. त्याचप्रमाणे गोवा, कर्नाटक, गुजराथ, आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू मध्येही हि भाषा बोलली जाते. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्य उभे केले आणि पेशव्यांनी त्याचे अटकेपार झेंडे लावले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठी भाषेस राज्याश्रय मिळाला.

       १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला. मराठी भाषा हि साधारणपणे १५०० वर्ष जुनी भाषा समजली जाते. त्यानंतर काळानुसार त्यात बदल होत गेले. मराठी भाषेच्या काही बोलीभाषा सुद्धा आहेत त्यापैकी अहिराणी, कोंकणी, कोल्हापुरी, चित्पावनी, खान्देशी, नागपुरी, मराठवाडी, बेळगावी या काही प्रमुख बोलीभाषा समजल्या जातात. देश तसा वेष या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रात पाच कोसांवर बोलीभाषा बदलते. मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीचे मुळाक्षरे हेच मराठी मुळाक्षरे होत. यात बारा स्वर आणि छत्तीस व्यंजन आढळतात. 

       आधुनिकता जसजशी वृद्धिंगत होत गेली तसे मराठी भाषेचे रूप पालटले. सुरवातीला संस्कृत त्यानंतर मोडी भाषेत आढळून येणारे ग्रंथ हस्तलिखित असत. हळूहळू नवनवीन तंत्रज्ञान अवलंबिले जाऊ लागले आणि हस्तलिखितांना टंकलेखनाचा नवा पर्याय उपलब्ध झाला. त्यानंतर मराठी भाषेला अत्याधुनिक रूप दिले ते युनिकोड ने. त्याच्या जोरावर आज मराठी भाषा हि संगणक आणि मोबाईल वर सर्रास वापरता येऊ लागली.


‘माझ्या मराठी मातीचा

लावा ललटास टिळा

तिच्या संगाने जागल्या

दऱ्याखोऱ्यातील शिळा’


        कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अवघ्या चार ओळीतून मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे. मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. ते अनेकदा म्हणायचे समाजाची प्रगती वा क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येते. आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

       मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे हे भविष्यातील अनेक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. मातृभाषेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यामुळे मुलांना कुटुंब, समाज यांच्याविषयी आस्था, वाचनाची गोडी, कविता आणि सामाजिक समरसता निर्माण होते. पण गेल्या दशकापासून इंग्रजी माध्यमातील शिक्षण पाल्याला देण्यावर पालकांचा भर आहे. काही पालकांना वाटते की मराठी किंवा मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे उच्च शिक्षणात इंग्रजी माध्यम असल्यामुळे समस्या निर्माण होईल.

       पण पालकांच्या आग्रहामुळे मुलाला नीट इंग्रजीही येत नाही वा पूर्णपणे आपली मातृभाषाही बोलता येत नाही. आजच्या घडीला शिक्षणाच्या विकासाचा जो डोंगर निर्माण झाला आहे. त्याला जागोजागी भाषेने आधार दिला आहे. शिक्षण शास्त्रज्ञ देखील मान्य करतात की, शिक्षण मातृभाषेतून दिले जावे. आपल्या आजूबाजूला उच्च शिक्षण घेतलेले संशोधक, डॉक्टर, अभियंता झालेले पाहिले तर त्यांनी मातृभाषेत शिक्षण घेऊन प्रगती केली आहे. मराठी दिन २७ फेब्रुवारी माहिती, निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये

       मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते. त्यामुळे मुलांना मातृभाषेवर व बोलीभाषेवर प्रेम करायला शिकवा. हेच वारंवार कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून पटवून देण्याचा अट्टाहास केला आहे. पण अलीकडे तरुण पिढीला इंग्रजी भाषेचे फार आकर्षण वाटत चालले आहे. याचे कारण शिक्षणपद्धती बदलत चालली आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वच इंग्रजी भाषेत होत असल्याकारणाने त्यांच्यापुढ्यात इंग्रजीच आकर्षण जास्त आहे. पदव्या घेऊन तरुण मंडळी परदेशात जातात. तिथे त्यांना इंग्रजी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो.

       साहजिकच त्या भाषेचे संस्कार जास्त होतात. त्या विकसित देशात द्रव्यप्राप्ती आपल्या देशापेक्षा जास्त होत असल्याकारणाने तिथेच स्थायिक होणे त्यांना जास्त रुजते. परिणामी पुढील पिढीला मराठी भाषा येत नाही. त्यांच्या आचार विचारात फार फरक पडतो. इकडे भारतातील तरुण पिढीलाही इंग्रजीचे जास्त आकर्षण असल्याने मराठी भाषा मागे पडत चालली आहे. मराठी भाषेचा अभिमान राहिला नाही. असे जर घडत गेले तर एक दिवस मराठी भाषा महाराष्ट्रातून नाहीशी होईल. असे न होता प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगून वागले पाहिजे. ती आपली मातृभाषा आहे. याउलट परदेशी भाषांचा अभ्यास करून त्याचा फायदा महाराष्ट्राला कसा होईल याचा विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा लिहिता बोलता आलीच पाहिजे.

       आपल्या मराठीत खूप मोठे साहित्य आहे. शास्त्र, विज्ञान, ललित या खूप विषयांवर लेखन झालेले आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा अभिमान बाळगून परदेशातून स्वदेशात येण्यासाठी ‘ सागरा प्राण तळमळला’ म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण ठेवा. मातृभाषेचा उदोउदो केलात तरच महाराष्ट्राचा जयजयकार होईल.

       तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये माझी मायबोली मराठी भाषा या विषयावर निबंध, माहिती, भाषण दिले आहे.

 मराठी राजभाषा दिन विशेषः मराठी राजभाषा दिन आणि त्याचे महत्त्व! -


लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।

धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।

एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

        २७ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी राजभाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पुढे पाहू यात.

       कुसुमाग्रज यांच्या कार्याची महती… पुणे येथे १९१२ साली जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांनी लहानपणापासून लिहण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला. तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.

    कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पुढे पाहू यात.

कुसुमाग्रज यांच्या कार्याची महती… पुणे येथे १९१२ साली जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांनी लहानपणापासून लिहण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला. तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.

       २७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाष दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

       मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच… दरम्यान आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे, नक्कीच, याबद्दल दुमत नाही; परंतु, त्यासाठी आपण मराठीची कास सोडावी, हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो, मध्ये मराठी भाषा कशी अवघड आहे आणि काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हॉट्स अपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्य देण्याऐवजी आपण ते व्हिडीओ एकमेकांना पाठवून मजा घेत होतो.७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाष दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

       मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच… दरम्यान आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे, नक्कीच, याबद्दल दुमत नाही; परंतु, त्यासाठी आपण मराठीची कास सोडावी, हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो, मध्ये मराठी भाषा कशी अवघड आहे आणि काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हॉट्स अपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्य देण्याऐवजी आपण ते व्हिडीओ एकमेकांना पाठवून मजा घेत होतो.


संकलित


हे पण वाचा: मायबोली मराठी भाषा निबंध,भाषण व लेख


दुसरा लेख-

       वर्षातले १७ दिवस मराठीचा गजर करण्यापेक्षा आपल्या रोजच्या व्यवहारांत वर्षभर-३६५ दिवस मराठी येणे आवश्यक आहे. त्यासाठी, पूर्वगौरव आणि उत्सव यांच्यापलीकडे समाजाची दृष्टी व कृती जायला हवी...

       आज मराठी-राजभाषादिन. मराठीच्या वाट्याला तर भाषा-संवर्धन-पंधरवड्याचे पंधरा, भाषादिनाचा एक आणि महाराष्ट्रदिनाचा एक असे सतरा दिवस येतात. तरी मराठीसाठी काम करणारी माणसं रडत असतात. वेडगळ भाषा-आग्रही जमात कुठची! इतर तीनशे अठ्ठेचाळीस दिवस, जन्मानं तेवढे मराठी असलेले नि स्वाक्षरीरूप स्व-ओळखही इंग्रजी असलेले; अन्यभाषकांशी सोडाच, पण इतर मराठी माणसांशीही हिंदीत वा इंग्रजीत बोलणारे; मराठी बोलायची-लिहायची वेळ येते तेव्हा 'एक स्पून हल्दी, बर्थडे सेलिब्रेट केला’ अशी भेळभाषा वापरणारे व त्याचं ‘काळानुरूप भाषा बदलच असते’ असं समर्थन करणारे; मराठी शुभेच्छासंदेश लॅटिन (पक्षी : रोमन) लिपीत पाठवणारे; ‘देवनागरी लिपीतले वेलांटी-उकार कठीण जातात, त्यापेक्षा रोमनमध्येच मराठी लिहायला काय हरकत आहे,’ असे सिद्धान्त मांडणारे; इंग्रजीतील वर्णरचना (स्पेलिंग) घोटून पाठ करणारे पण मराठीतील ऱ्हस्व-दीर्घाच्या नियमांवर आक्षेप घेणारे; एक ते दहापर्यंतचे मराठी अंकही न वापरणारे; मराठी पुस्तकं विकत न घेणारे, मराठी नाटकं-चित्रपट न पाहणारे; मराठी माध्यमातच शिकून सुस्थापित असूनही, मुलांना मात्र मराठी माध्यमात घातलं तर नुकसान होईल असं मानणारे; पदवीसाठी मराठी विषय निवडणाऱ्या मुलांना ‘मराठी घेऊन भाकरी मिळणार नाही, ‘क्ष’ विषय घे त्यापेक्षा’ असा परोपकारी उपदेश करणारे; अस्खलित मराठी बोलणाऱ्या-लिहिणाऱ्यांचं दुर्मिळ प्रजातींतील जिवांचं करावं तसं ‘कौतुक’ करणारे किंवा त्यांच्यावर खडे भिरकावणारे; ‘परप्रांतीयांमुळे मराठीचं नुकसान होतंय’ अशी समजूत करून घेऊन, भाषकांची निजभाषेप्रती कर्तव्यं असतात ह्याचं विस्मरण होणारे; ‘अमृतातेही पैजा जिंके’च्या पूर्वगौरवात रमून बंद पडणाऱ्या मराठी शाळा नि महाविद्यालयीन मराठी विभाग.. हे वर्तमान आणि जागतिकीकरण तसेच सपाटीकरणाच्या रेट्यामुळे अडचणीत असलेलं भवितव्य दिसून न दिसल्यासारखं करणारे मराठीभाषक हे सतरा दिवस मराठीपण नऊवाऱ्या, फेटे, भगवे झेंडे, गाणीबजावणी ह्यांसह ‘साजरं’ करतात, ह्यातच समाधान मानायला हवं. भाकरीही न देऊ शकणाऱ्या मराठीचा, विकासाकांक्षी मराठीजनांनी ‘योगायोगाने आम्ही मराठीभाषक कुटुंबात जन्म घेतला, ह्यापुढे मराठी ही आमची ओळख मानण्यात येऊ नये’ अशा प्रतिज्ञापत्राद्वारे त्याग न करता, तिचे दिवस साजरे करावे (खरं तर, ‘दिवस घालावे’) हे त्यांचे मराठीवरील केवढे उपकार म्हणावे लागतील!

marathi-language-day

       भाषा-आग्रही लोकांना हे कळतच नाही. त्यांना असं वाटतं की, मराठीभाषकांचा हा दांभिकपणाच मराठीच्या मुळावर येतोय. भाषादिन साजरे करण्यापेक्षा आपली भाषा दीन होणार नाही, ह्याकडे कसून, प्रामाणिक वृत्तीने आणि मुख्य म्हणजे वर्षाचे ३६५ दिवस लक्ष पुरवायला हवं. मराठीच काय, कोणतीही भाषा ही अस्तित्वात येते, तेव्हाच ती कधी ना कधी मरणार हे निश्चित असतं. पण तिचा मृत्यू नैसर्गिक असावा आणि तोपर्यंतचं तिचं अस्तित्व हे सन्मानपूर्ण, वर्धनीय असावं. भाषा-आग्रहींना असंही वाटतं की, केवळ अभिजात वाङ्मयपरंपरा भाषा जिवंत राहण्यासाठी पुरेशी नसते. नाही तर, संस्कृत व लॅटिन मृत झाल्या नसत्या. एखाद्या भाषेच्या विकासाकरिता ती वर्तमानात व्यवहारभाषा, ज्ञानभाषा, व्यवसायभाषा, आविष्कारभाषा आणि राजभाषा म्हणून सुदृढ होईल ह्याची काळजी घ्यावी लागते. मराठी दैनंदिन संभाषण, न्यायव्यवहार, वाचनलेखन, शिक्षण आदी सर्व व्यवहारांत आवर्जून वापरायला हवी. नवनवीन शब्द घडवायला हवेत. अभिजन-बहुजन-वादात मराठीला ‘दोन्ही घरची पाहुणी उपाशी’ ही अवकळा आणण्यापेक्षा नवशब्दसिद्धीसाठी संस्कृत व बोली ह्या दोन्हींतील शब्दभांडार लुटायला हवं. तिच्या देवनागरी व मोडी ह्या दोन्ही लिप्यांचंही अस्तित्व जपायला हवं.

प्रमाणलेखनाचे नियम काळानुरूप बदलून ते समाजाला शिकवायला हवेत.

       भाषा-आग्रही असंही सांगतात की, मराठी ही केवळ बोली स्वरूपात उरू नये. शिक्षणाचं माध्यम म्हणून तिचा आग्रह असावा. मराठीला ज्ञानभाषेचं वैभव प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर मराठीभाषकांनी वैश्विक नागरिक अवश्य व्हावं, पण आपली मुळं, आपली स्थानिक ओळख विसरू नये. त्यांनी आपापले ज्ञानविषय, संज्ञा-संकल्पना ह्यांचं धन मराठीत आणावं. परप्रांतीयांवर खापर फोडण्यापेक्षा, त्यांना मराठी शिकावं लागेल अशी शासकीय धोरणं आखावीत आणि त्यांना मराठी शिकावीशी वाटेल अशी व्यवस्था करावी. सर्वांसाठीच मराठीचे प्रमाणित अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापनाच्या उत्तम साधनसुविधा, नवमाध्यमांचा वापर ह्यांतून मराठीचं शिक्षण आनंददायी बनवायला हवं.

       मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यापनक्षेत्रापलीकडे प्रसारमाध्यमं, मनोरंजनमाध्यमं, प्रकाशनव्यवसाय, भाषांतर, भाषा-साहित्य-समाजविषयक संशोधन, भाषा आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांसाठीची व्यावसायिक कौशल्यं रुजवायला हवीत. त्या दृष्टीने अभ्यासक्रममंडळं, अध्यापक, शिक्षणसंस्था आणि विद्यार्थी ह्यांनी चाकोरीच्या बाहेर पडून विचार व्हावा. शिक्षणक्षेत्रात मराठी हा विषय टिकणं हे निव्वळ मराठीच्या शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याकरिता आवश्यक नाही; तर मराठीला ज्ञानभाषा बनविण्याकरिता आवश्यक ती कोश, सूची आदी साधनं निर्माण करण्यासाठीचं कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होण्यासाठीही ते आवश्यक आहे. शासकीय पातळीवर मराठी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयं व विद्यापीठं येथील मराठीचे विभाग ह्यांसाठी संरक्षक धोरणं आखली जायला हवीत आणि ह्या धोरणांना समाजाची साथ हवी.

       मराठीभाषकांनी आपापल्या व्यवसायक्षेत्रांत, आविष्कारमाध्यमांत मराठीचा वापर करण्याचा प्रयत्न तरी करायला हवा. "लोकांना आजकाल अशीच भाषा कळते नि आवडते म्हणून आम्ही मिंग्लिश, मिंदी वापरतो,” असं म्हणणारे हे विसरताहेत की, ते स्वतः ज्या फांदीवर बसले आहेत, त्या फांदीवर कुऱ्हाड चालवताहेत. अंतिमतः मराठी टिकली, तर आणि तरच मराठी वर्तमानपत्रं, दूरचित्रवाणी-वाहिन्या, साहित्य, नाटकं, चित्रपट, संगीत ह्यांना वाचक, प्रेक्षक, श्रोते लाभतील. अन्यथा जागतिकीकरणाची वावटळ साऱ्यांचा घास घेईल. मराठीचा प्रश्न हा केवळ भावनिक अस्मितेचा प्रश्न बनवणाऱ्यांच्या मागून आंधळेपणानं जाणं आणि नंतर निराश होणं हेही नको. धर्म, जात, लिंग ह्यांप्रमाणे भाषाही राजकीय, आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक सत्ताकारणाचा, विषमतानिर्मितीचा आणि शोषणव्यवस्थांचा भाग म्हणून वापरली जाते, ह्याचं गंभीर भान बाळगून मराठीच्या प्रश्नाविषयी विचार व्हावा. कुठलीही भाषा स्वतःहून बलवत्तर किंवा कमतर नसते, भाषकांची ताकद ही भाषेला बळ देते, हे इंग्रजी भाषेच्या इतिहासाकडे पाहिल्यास सहज लक्षात येतं. मराठीभाषकांनी ज्ञान, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक व्यवहार ह्यांतील आपलं बळ वाढवावं आणि मुख्य म्हणजे ते मराठीच्या पाठीशी उभं करावं.

       मराठी टिकावी असं वाटत असेल; तर एकीकडे सतरा दिवस मातृभाषेवरील प्रेमाचे प्रासंगिक, प्रतीकात्मक आविष्कार करायचे आणि दुसरीकडे उरलेले दिवस 'मायमराठी मरो पण इंग्रजीमावशी जगो' असं वागायचं या दांभिकपणा सोडायला हवा. मराठीचे हे खुळे भाषा-आग्रही मालुसरे 'एक दिवस शहाण्यांचा असतो, एक दिवस पण मिळे खुळ्यांना' ह्या विंदा करंदीकरांच्या पंक्तीवर विश्वास ठेवून असं काय काय म्हणत असतात; मराठीच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्नं पाहत बसतात; झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करायचा प्रयत्न करीत राहतात. तसे ते करीत राहावेच लागणार आहेत...

संकलन-

महाराष्ट्र टाइम्स 

- डॉ. अनघा मांडवकर

(लेखिका मुंबईच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करतात.)

 संत रोहिदास यांचे दोहे पहिले १० अर्थासहित एकूण १३


ब्राह्मण मत पूजिए जो होवे गुणहीन,

पूजिए चरण चंडाल के जो होने गुण प्रवीण

किसी व्यक्ति को सिर्फ इसलिए नहीं पूजना चाहिए क्योंकि वह किसी ऊंचे कुल में जन्मा है. यदि उस व्यक्ति में योग्य गुण नहीं हैं तो उसे नहीं पूजना चाहिए, उसकी जगह अगर कोई व्यक्ति गुणवान है तो उसका सम्मान करना चाहिए, भले ही वह कथित नीची जाति से हो.



कह रैदास तेरी भगति दूरि है, भाग बड़े सो पावै

तजि अभिमान मेटि आपा पर, पिपिलक हवै चुनि खावै

ईश्वर की भक्ति बड़े भाग्य से प्राप्त होती है. यदि आदमी में थोड़ा सा भी अभिमान नहीं है तो उसका जीवन सफल होना निश्चित है. ठीक वैसे ही जैसे एक विशाल शरीर वाला हाथी शक्कर के दानों को नहीं बीन सकता, लेकिन एक तुच्छ सी दिखने वाली चींटी शक्कर के दानों को आसानी से बीन सकती है.

जा देखे घिन उपजै, नरक कुंड में बास

प्रेम भगति सों ऊधरे, प्रगटत जन रैदास

जिस रविदास को देखने से लोगों को घृणा आती थी, जिनके रहने का स्थान नर्क-कुंड के समान था, ऐसे रविदास का ईश्वर की भक्ति में लीन हो जाना, ऐसा ही है जैसे मनुष्य के रूप में दोबारा से उत्पत्ति हुई हो.

मन चंगा तो कठौती में गंगा

जिस व्यक्ति का मन पवित्र होता है, उसके बुलाने पर मां गंगा भी एक कठौती (चमड़ा भिगोने के लिए पानी से भरे पात्र) में भी आ जाती हैं.

करम बंधन में बन्ध रहियो, फल की ना तज्जियो आस

कर्म मानुष का धर्म है, सत् भाखै रविदास

आदमी को हमेशा कर्म करते रहना चाहिए, कभी भी कर्म के बदले मिलने वाले फल की आशा नही छोड़नी चाहिए, क्‍योंकि कर्म करना मनुष्य का धर्म है तो फल पाना हमारा सौभाग्य.

मन ही पूजा मन ही धूप,

मन ही सेऊं सहज स्वरूप

निर्मल मन में ही ईश्वर वास करते हैं, यदि उस मन में किसी के प्रति बैर भाव नहीं है, कोई लालच या द्वेष नहीं है तो ऐसा मन ही भगवान का मंदिर है, दीपक है और धूप है. ऐसे मन में ही ईश्वर निवास करते हैं.

कृष्ण, करीम, राम, हरि, राघव, जब लग एक न पेखा

वेद कतेब कुरान, पुरानन, सहज एक नहिं देखा

राम, कृष्ण, हरि, ईश्वर, करीम, राघव सब एक ही परमेश्वर के अलग-अलग नाम हैं. वेद, कुरान, पुराण आदि सभी ग्रंथों में एक ही ईश्वर की बात करते हैं, और सभी ईश्वर की भक्ति के लिए सदाचार का पाठ पढ़ाते हैं.

हरि-सा हीरा छांड कै, करै आन की आस

ते नर जमपुर जाहिंगे, सत भाषै रविदास

हीरे से बहुमूल्य हैं हरि. यानी जो लोग ईश्वर को छोड़कर अन्य चीजों की आशा करते हैं उन्हें नर्क जाना ही पड़ता है.

रविदास जन्म के कारनै, होत न कोउ नीच

नकर कूं नीच करि डारी है, ओछे करम की कीच

कोई भी व्यक्ति किसी जाति में जन्म के कारण नीचा या छोटा नहीं होता है, आदमी अपने कर्मों के कारण नीचा होता है.

१०

जाति-जाति में जाति हैं, जो केतन के पात,

रैदास मनुष ना जुड़ सके जब तक जाति न जात

जिस प्रकार केले के तने को छीला तो पत्ते के नीचे पत्ता, फिर पत्ते के नीचे पत्ता और अंत में कुछ नही निकलता, लेकिन पूरा पेड़ खत्म हो जाता है. ठीक उसी तरह इंसानों को भी जातियों में बांट दिया गया है, जातियों के विभाजन से इंसान तो अलग-अलग बंट ही जाते हैं, अंत में इंसान खत्म भी हो जाते हैं, लेकिन यह जाति खत्म नही होती.


११

रैदास कनक और कंगन माहि जिमि अंतर कछु नाहिं।

तैसे ही अंतर नहीं हिन्दुअन तुरकन माहि।।


१२

हिंदू तुरक नहीं कछु भेदा सभी मह एक रक्त और मासा।

दोऊ एकऊ दूजा नाहीं, पेख्यो सोइ रैदासा।।


१३

वर्णाश्रम अभिमान तजि, पद रज बंदहिजासु की।

सन्देह-ग्रन्थि खण्डन-निपन, बानि विमुल रैदास की।।


संत रोहिदास दोहे समाप्त

संत रोहिदास यांची जयंती

       संत रोहिदास इ.स. १५ ते १६ व्या शतका दरम्यान भक्ती चळवळीचे भारतीय रहस्यंवादी कवी होते. रविदासांच्या भक्तिगीतांचा भक्ति चळवळीवर पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशात गुरू (शिक्षक) म्हणून कायमचा प्रभाव पडला आहे. ते कवी-संत, समाजसुधारक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्त्व होते.


गुरु ग्रंथ साहिब या शीख धर्मग्रंथांमध्ये रविदासांच्या भक्तिगीतांचा समावेश होता. हिंदू धर्मातील दादूपंथीपरंपरेच्या पंच वाणी मजकुरामध्ये रोहिदासांच्या असंख्य कवितांचा समावेश आहे. रविदास यांनी जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन दिले.


वाचा : संत रोहिदास यांचे दोहे वाचण्यासाठी येथे क्लिक करा


जीवन

रोहिदास यांचा जन्म वाराणसीजवळील सीर गोवरधनपूर गावात झाला आहे. त्यांचे जन्मस्थान श्री गुरु रविदास जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. त्यांची आई घुरबिनिया आणि त्यांचे वडील रघुराम. त्यांचे पालक चामड्याचे काम करीत. त्यांनी त्यांचे बहुतांश आयुष्य गंगा नदीच्या काठावर आध्यात्मिक अनुयायांमध्ये आणि सूफी संत, साधू व तपस्वी यांच्या सहवासात घालवले.


विविध भक्ती चळवळीतील कवयित्रींच्या प्राचीन जीवनांपैकी एक असलेला अनंतदास परचाईचा हा मजकूर रविदासच्या जन्माची ओळख करून देतो.


बनारस शहरामध्ये, कोणत्याही वाईट गोष्टी कधीही पुरुषांना भेट देत नाहीत.

जो कोणी मरण पावला तो नरकात जात नाही, स्वत: शंकर राम या नावाने येतो.

जेथे श्रुती आणि स्मृती यांचा अधिकार आहे, तिथे रोहिदासांचाचा पुनर्जन्म झाला,


आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आणि हिमालयातील हिंदू तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिली. त्याने परमात्म्याचे सगुण (गुणधर्म, प्रतिमेसह) सोडून दिले आणि निर्गुण (गुणधर्मांशिवाय, अमूर्त) परमात्म्यांच्या स्वरुपावर लक्ष केंद्रित केले.


बहुतेक विद्वानांचा असा विश्वास आहे की रोहिदास शीखधर्माचे संस्थापक गुरु नानक देव जी यांना भेटले. त्यांचा शीख धर्मग्रंथात आदर आहे आणि रविदासांच्या ४१ कवितांचा आदि ग्रंथात समावेश आहे. या कविता त्यांच्या कल्पना आणि साहित्यिक कामांचे सर्वात जुने प्रमाणित स्त्रोत आहेत. रविदासांच्या जीवनाबद्दल आख्यायिका आणि कथांचा आणखी एक महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे शीख परंपरेतील प्रेमलेखन म्हणजे प्रेमबोध. १६९३ मध्ये रविदास यांच्या मृत्यूनंतर १५० वर्षांहून अधिक काळ रचलेल्या या मजकूरामध्ये भारतीय धार्मिक परंपरेतील सतरा संतांपैकी एक म्हणून त्यांचा समावेश आहे. रवीदासांच्या जीवनाविषयी इतर बहुतेक लेखी स्त्रोत, शीख परंपरा आणि हिंदू दाद्रपंथी परंपरेचे ग्रंथ, २० व्या शतकाच्या सुरूवातीस किंवा सुमारे ४०० वर्षांनंतर तयार केले गेले होते.


विन्नंद कॉलवेर्टने नमूद केले आहे की रविदासांवर अनंतदास यांच्या संतचरित्राच्या 30 हस्तलिखिते भारताच्या विविध भागात सापडली आहेत.


साहित्यिक कामे

शिखांचा आदि ग्रंथ आणि हिंदू योद्धा-तपस्वी गटाचे पंचवानी दादूपंथी हे रविदासांच्या साहित्यकृतींचे दोन प्राचीन साक्षात स्त्रोत आहेत. आदि ग्रंथात, रविदासांच्या चाळीस कवितांचा समावेश आहे. रविदासांच्या कवितेत द्वितीय किंवा तृतीय श्रेणी असमान नागरिक, वैराग्याची आवश्यकता आणि खरा योगी अशा विषयांचा समावेश आहे.


पीटर फ्राईडलँडर असे म्हणतात की रविदासांच्या मृत्यू नंतरही त्यांचे लिखाण भारतीय समाजात संघर्षाचे आहे, रविदासांचे जीवन विविध प्रकारच्या सामाजिक आणि आध्यात्मिक विषयांना अभिव्यक्त करण्याचे साधन देते.


संत साहित्यातून संकलित केलेली माहिती.

Thursday 25 February 2021

विश्वकर्मा जयंती (मराठी माहिती)

       सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्माकडे पाहिले जाते. शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता, असे म्हटले आहे. परंतु, देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते. सृष्टीचा सृजनकर्ता म्हणून विश्वकर्माकडे पाहिले जाते.                    शास्त्रांमध्ये विश्वकर्मा यांचा जन्म भाद्रपद वद्य संक्रांतीला झाला होता, असे म्हटले आहे. परंतु, देशभरात यामध्ये मतभिन्नता आढळते. देशातील काही ठिकाणी दिवाळीत, तर काही ठिकाणी माघ महिन्यात विश्वकर्मा जयंती साजरी केली जाते. मात्र, बहुतांश ठिकाणी भाद्रपद वद्य संक्रांतीला विश्वकर्मा पूजनाची परंपरा सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते.               

       सृष्टीच्या प्रारंभी केवळ विश्वकर्मा अस्तित्वात होता. समस्त प्राणीसृष्टीचा विश्वकर्मा जनक मानला गेला आहे. एक वैदिक देवता असा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो. पुराणे व महाभारत यात विश्वकर्मांना देवांचा महान शिल्पशास्त्रज्ञ मानले आहे. ब्रह्मांच्या इच्छेनुसार विश्वकर्मांनी नवीन औजारे शोधलीत. सौर उर्जा वापरण्याचे व त्या उर्जेच्या नियंत्रणाचे ज्ञान त्यांना प्राप्त होते. सूर्य शक्तिचा वापर करून त्यांनी विष्णू, शिव व इंद्रासाठी अनुक्रमे सुदर्शन चक्र, त्रिशूळ व विजय रथ निर्माण केला. ते हरहुन्नरी होते. शस्त्रे व अस्त्रे, अलंकार, पुष्पक विमान आदींची निर्मिती त्यांनी केली. हजारो यंत्र-तंत्र, शस्त्रास्त्रे व साधनांची त्यांनी निर्मिती केली. सोनार, लोहार, सुतार, कुंभार, कासार समाजबांधव त्यांना आपले दैवत मानतात. कलियुगातही विश्वकर्मा यांचे पूजन अत्यंत लाभदायक मानले गेले आहे. जाणून घेऊया. विश्वकर्मांनी इंद्रासाठी इंद्रलोक, सुतलनामक पाताळलोक, श्रीकृष्णासाठी द्वारका नगरी, वृंदावन, राक्षसांसाठी लंका तसेच पांडवांसाठी हस्तिनापूर आणि इंद्रप्रस्थ, गरूड भवन आदींची निर्मिती केली. विश्वकर्मा यांनी श्रीरामांना सहकार्य केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच महाबली हनुमान, विश्वकर्मा पुत्र नल व नील यांनी रामसेतू बांधला. विश्वकर्मा यांनी १४ ब्रम्हांडाची रचना केली. त्यात वायुमंडळ, कैलास, वैकुंठ, ब्रम्हपुरी, इंद्रपुरी, स्वर्ग, पृथ्वी, पाताळातील नागलोक आदींची रचना केली. याशिवाय जगन्नाथ पुरी येथील भगवान जगन्नाथ, बलभद्र आणि सुभद्रा यांच्या मूर्ती, लंका, श्रीकृष्णांची द्वारका अशा अनेकविध दिव्य वास्तूंची निर्मिती विश्वकर्मांनी केली होती, असे सांगितले जाते.

विश्वकर्मा जयंती – ​कलियुगातील विश्वकर्मा पूजन

        भारतात १७ सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय श्रम दिवस आणि त्यांची जयंती म्हणून साजरा करण्यात येतो. या दिवशी विश्वकर्मा यांची पूजा केली जाते, स्मरण केले जाते. या दिवशी उपलब्ध सर्व शस्त्रांची, दररोज उपायोगात येणारी यंत्रे, तंत्रे यांचे पूजन केले जाते कलियुगात आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण लॅपटॉप, मोबाइल आणि टॅबलेट अगदी दररोज वापरतो. हीदेखील यंत्रे आणि शस्त्र आहे. यांशिवाय आपले पानही हलत नाही. त्यामुळे या यंत्रांचे पूजन करणे लाभदायक ठरते, असे सांगितले जाते. विश्वकर्मा पूजनाच्या निमित्ताने या यंत्र, शस्त्रांप्रति कृतज्ञता व्यक्त करावी, असे सांगितले जाते.

विश्वकर्मा जयंती – ​कोणाचे करावे पूजन?

       भाद्रपद वद्य संक्रांतीला असलेल्या विश्वकर्मा जयंतीनिमित्त घर आणि कारखाना किंवा कार्यालयात वापरल्या जाणाऱ्या अवजारे, शस्त्र, हत्यारे, यंत्रे यांचे पूजन केले जाते. सर्व अवजारे, शस्त्रे, हत्यारे, यंत्रे यांची स्वच्छता केली जाते. त्याला तेल-पाणी, ग्रीसिंग केले जाते. यानंतर विश्वकर्मा पूजन केले जाते. कार्यालय व कारखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांना प्रसादाचे वाटप केले जाते. उपस्थित सर्वजण एकमेकांना विश्वकर्मा जयंतीनिमित्त शुभेच्छा देतात आणि विश्वकर्मा यांचे मनोभावे स्मरण करतात. ब्रह्मांडातील प्रथम शिल्पकार, वास्तुकार आणि अभियंता म्हणून विश्वकर्मा यांची ख्याती आहे.

​विश्वकर्मा जयंती – विश्वकर्मा पूजा विधी

       विश्वकर्मा पूजनात कलश, अक्षता, फुले, मिठाई, फळ, सुपारी, धूप, दीप, रक्षासूत्र, दही आणि विश्वकर्मा यांची तसबीर आदी पूजासाहित्य एकत्र करावे. यांनतर अष्टदलाची रांगोळी काढावी. यानंतर एका चौरंगावर विश्वकर्मा यांची तसबीर स्थापन करावी. विश्वकर्मा यांची पंचोपचार पूजा करावी. यानंतर अक्षता, चंदन, हळद-कुंकू अर्पण करावे. ऋतोकालोद्भव फुले, फळे, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावे. विश्वकर्मा यांचे स्मरण करावे. यानंतर कारखान, कार्यालयातील सर्व अवजारे, हत्यारे, शस्त्रे, यंत्रे यांचे पूजन करावे. या सर्वांना गंधाक्षत अर्पण करावे. यावेळी ॐ पृथिव्यै नमः ॐ अनंतम नमः ॐ कूमयि नमः ॐ श्री सृष्टतनया सर्वसिद्धया विश्वकर्माया नमो नमः, असे मंत्र म्हणून कलशातील पाणी अवजारे, शस्त्रे, यंत्रे यांच्यावर शिंपडावे. यानंतर सर्व उपस्थितांनी विश्वकर्मांची आरती करावी आणि प्रसादाचे वाटप करावे.


विश्वकर्मा जयंती – ​विश्वकर्मा पूजनाचे महत्त्व

       भारतीय संस्कृती, परंपरांमध्ये विश्वकर्मा पूजनाला विशेष महत्त्व आहे. यावेळी करण्यात येणाऱ्या अवजार, शस्त्रे, यंत्र, हत्यारे यांच्या पूजनालाही महत्त्व आहे. या माध्यमातून त्यांविषयी आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. आपल्यासाठी झटणाऱ्या अगदी निर्जीव गोष्टींचाही आपण मान राखला पाहिजे, असा महत्त्वाचा संस्कार यामधून होतो, असे सांगितले जाते. तसेच या पूजनामुळे यंत्रे, शस्त्रे, हत्यारे, अवजारे आपला विश्वासघात करत नाहीत. कोणत्याही प्रसंगात आपली साथ कायम ठेवतात, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते.


विश्वकर्मा यांच्या जन्माची कथा

       विश्वकर्मा यांच्या जन्माबाबत शास्त्रांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत. एका शास्त्रानुसार, ब्रह्म देवाचे पुत्र धर्म, धर्माचे पुत्र वास्तूदेव आहे. वास्तूदेव आणि अंगिरसी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. स्कंद पुराणाप्रमाणे, धर्म ऋषींचे आठवे पुत्र प्रभास होते. प्रभास यांचा विवाह बृहस्पती ऋषींच्या भगिनी भुवना ब्रह्मवादिनी यांच्याशी झाला. भुवना ब्रह्मवादिनी यांचे पुत्र विश्वकर्मा आहेत. तर, महाभारतातही विश्वकर्मांचा उल्लेख आढळतो. वराह पुराणानुसार, ब्रह्म देवांनी विश्वकर्मा यांना पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली.

विश्वकर्मा यांची आश्चर्यकारक निर्मिती

       विश्वकर्मा यांनी पृथ्वीवर अनेक महाल, वास्तू, शस्त्र यांची निर्मिती केली. महर्षी दधिची यांच्या हाडांपासून स्वर्गाधिपती इंद्रासाठी वर्ज निर्माण केले, अशी मान्यता आहे. या व्रजाच्या मदतीने इंद्राने अनेक असुरांचा वध केला होता. वज्रासह, श्रीकृष्णाची द्वारका नगरी, पांडवांसाठी इंद्रप्रस्थ, हस्तिनापूर नगर आणि रावणाच्या लंकेची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केल्याचे म्हटले जाते. याशिवाय, महादेवाचे त्रिशूळ, विष्णूंचे सुदर्शन, यमराजाचा कालदंड, कर्णाची कुंडले आणि पुष्पक विमानाची निर्मितीही विश्वकर्मा यांनी केली आहे


संत साहित्यातून संकलित केलेली माहिती.

Tuesday 23 February 2021

संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंती विषयी निबंध, भाषण, चरित्रात्मक माहिती

संत गाडगेबाबा महाराज

जन्म - २३ फेब्रुवारी १८७६ (अमरावती)

स्मृती - २० डिंसेंबर १९५६


"देव दगडात नसून तो माणसांत आहे" हे सांगणारे संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन !

        अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्वच्छतेचा नायनाटासाठी जीवन खर्ची घातलेले अनाथ, अपंगांचे सेवेकरी म्हणून थोर संत गाडगेबाबा यांची ओळख सांगता येईल. हे ईश्वर कशात आहे सुद्धा नेमकी जाणीव असलेले संत आणि गोरगरीब, दीनदलित यांचा ऐहिक व आध्यात्मिक विकास होण्यासाठी; अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते.

       "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका" अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

संत गाडगेबाबा यांचे बालपण -

       संत गाडगेबाबा महाराजांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते. ते त्यांच्या आईच्या माहेरी, मूर्तिजापूर तालुक्यातील दापुरे येथे त्यांच्या मामाकडेच त्यांचे बालपण गेले. त्यांच्या मामाची बरीच मोठी शेतजमीन होती. लहानपणापासूनच त्यांना शेतीत रस होता, विशेषतः गुरांची निगराणी राखायला त्यांना फार आवडे. त्यांचे वडिल झिंगराजी हे परीट होते. आई सखूबाईने त्यांचे नाव डेबूजी असे ठेवले होते. डेबूजी लहान असतांनाच त्यांचे वडिल दारूच्या व्यसनापायी मृत्युमुखी पडले. त्यामुळे डेबूजींचे घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्याने लहानपणापासूनच गुरे राखणे, नांगर चालविणे, शेतीवाडी करणे अशी कामे ते करत असत. त्यांना कामाची खूप आवड होती. स्वच्छता हा त्यांचा विशेष गुण होता. 

संत गाडगेबाबा यांचे संसारिक जीवन -

डेबूजींचे लग्न लहानपणीच झाले होते. त्यांना चार मुली होत्या. पण ते संसारात फारसे रमले नाहीत. घरदार सोडून अवघ्या समाजाचा संसार सुधारण्यासाठी ते घराबाहेर पडले. १८९२ साली त्यांचे लग्न झाले. त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण दिले होते. हा त्या काळातील परंपरेला दिलेला छेद होता. गावात कोणाचे काही अडले नडले, कोठेही काही काम करावयाचे असले की, गाडगे महाराज स्वतःहून पुढे येत. सार्वजनिक हिताची कामे ‘सर्व जनांनी’ एकवटून केली पाहिजेत हा धडा त्यांनी मिटल्या तोंडी गावकऱ्यांना शिकविला.

डेबूजी  गाडगेबाबा कसा झाला? -

       १ फेब्रुवारी १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

संत गाडगेबाबा यांचा पोशाख -

       डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू तर दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश असे.

संत गाडगेबाबा यांचा कीर्तनातून संदेश -

समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. 

       चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. "देव दगडात नसून तो माणसांत आहे" हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. 

       आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा (प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते शहरी नास्तिका पर्यंत, कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते. 

संत गाडगेबाबा यांचे सामाजिक कार्य -

गाडगे महाराज यांनी नाशिक, देहू, आळंदी व पंढरपूर या धार्मिक क्षेत्रांच्या ठिकाणी धर्मशाळा बांधल्या, गोरगरीब जनतेसाठी छोटी-मोठी रुग्णालये बांधली, अनेक नद्यांकाठी घाट बांधले, अतिशय गरीब, अनाथ व अपंग लोकांसाठी अन्नछत्रांची व्यवस्था केली, कुष्ठरोग्यांची सेवा केली. ‘महाराष्ट्रातील समाजवादाचे प्रचंड व्यासपीठ’, असे यथार्थ उद्गार आचार्य अत्रे यांनी संत गाडगे बाबांबद्दल काढले आहेत. ‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ या भजनाचा प्रसार करणाऱ्या, कर्मयोगावर दृढ श्रद्धा असणाऱ्या या सत्पुरुषाची आणि कर्त्या समाजसुधारकाची समाधी अमरावती येथे आहे.

अमरावती विद्यापीठाला संत गाडगेबाबा यांचे नाव-

अमरावती विद्यापीठाला गाडगे बाबांचे नाव देऊन "संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ" असे नामकरण करण्यात आलेले आहे. 


थोर संत गाडगेबाबा यांचे निधन २० डिंसेंबर १९५६ रोजी झाले. 

संत गाडगे बाबा यांना आदरांजली !


संत गाडगेबाबांचा दशसूत्री संदेश -

भुकेलेल्यांना = अन्न


तहानलेल्यांना = पाणी


उघड्यानागड्यांना = वस्त्र


गरीब मुलामुलींना = शिक्षणासाठी मदत


बेघरांना = आसरा


अंध, पंगू रोगी यांना = औषधोपचार


बेकारांना = रोजगार


पशु-पक्षी, मुक्या प्राण्यांना = अभय


गरीब तरुण-तरुणींचे = लग्न


दुःखी व निराशांना = हिंमत


गोरगरिबांना = शिक्षण 


थोर संत गाडगे बाबांना विनम्र अभिवादन.

🙏🙏🙏

Wednesday 17 February 2021

SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा.


     मुंबई : कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
       परीक्षा पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.
       कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते. राज्यात नववी ते बारावीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. 18 जानेवारी रोजी 21,66,056 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, तर 21287 शाळा सुरू आहेत. सुमारे 76.8 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. हे उत्साहवर्धक चित्र आहे.
       कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
        कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे व त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

संकलित
एबीपी माझा वेब टीम.