K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 27 February 2021

 माझी मायबोली मराठी भाषा मराठी निबंध भाषण, लेख

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी |

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ||

       भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक आहे. महाराष्ट्र आणि गोवा ह्या राज्यांची मराठी ही अधिकृत राजभाषा आहे. केवळ भारतातच नव्हे तर मराठी भाषा मॉरिशस व इस्रायल मध्येही बोलली जाते. मराठी हि महाराष्ट्राची एकमेव राज्यभाषा आहे. त्याचप्रमाणे गोवा, कर्नाटक, गुजराथ, आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू मध्येही हि भाषा बोलली जाते. शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्य उभे केले आणि पेशव्यांनी त्याचे अटकेपार झेंडे लावले. त्यानंतर खऱ्या अर्थाने मराठी भाषेस राज्याश्रय मिळाला.

       १९४७ च्या स्वातंत्र्यानंतर मराठी भाषेला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा प्राप्त झाला. मराठी भाषा हि साधारणपणे १५०० वर्ष जुनी भाषा समजली जाते. त्यानंतर काळानुसार त्यात बदल होत गेले. मराठी भाषेच्या काही बोलीभाषा सुद्धा आहेत त्यापैकी अहिराणी, कोंकणी, कोल्हापुरी, चित्पावनी, खान्देशी, नागपुरी, मराठवाडी, बेळगावी या काही प्रमुख बोलीभाषा समजल्या जातात. देश तसा वेष या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रात पाच कोसांवर बोलीभाषा बदलते. मराठी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते. त्यामुळे देवनागरीचे मुळाक्षरे हेच मराठी मुळाक्षरे होत. यात बारा स्वर आणि छत्तीस व्यंजन आढळतात. 

       आधुनिकता जसजशी वृद्धिंगत होत गेली तसे मराठी भाषेचे रूप पालटले. सुरवातीला संस्कृत त्यानंतर मोडी भाषेत आढळून येणारे ग्रंथ हस्तलिखित असत. हळूहळू नवनवीन तंत्रज्ञान अवलंबिले जाऊ लागले आणि हस्तलिखितांना टंकलेखनाचा नवा पर्याय उपलब्ध झाला. त्यानंतर मराठी भाषेला अत्याधुनिक रूप दिले ते युनिकोड ने. त्याच्या जोरावर आज मराठी भाषा हि संगणक आणि मोबाईल वर सर्रास वापरता येऊ लागली.


‘माझ्या मराठी मातीचा

लावा ललटास टिळा

तिच्या संगाने जागल्या

दऱ्याखोऱ्यातील शिळा’


        कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या अवघ्या चार ओळीतून मराठी भाषेचा स्वाभिमान उगवत्या सूर्याप्रमाणे प्रकाशमान झाला आहे. मातृभाषेतून अध्ययन व्हावे हा कुसुमाग्रजांचा आग्रह होता. ते अनेकदा म्हणायचे समाजाची प्रगती वा क्रांती स्वभाषेच्या किनाऱ्यावरच पेरता येते. आज मराठी भाषा व शिक्षणातील मराठी माध्यम याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.

       मातृभाषेला दूर लोटून इंग्रजीची आराधना करणे हे भविष्यातील अनेक समस्यांना निमंत्रण देण्यासारखे आहे. मातृभाषेतून प्राथमिक व माध्यमिक शिक्षण घेतल्यामुळे मुलांना कुटुंब, समाज यांच्याविषयी आस्था, वाचनाची गोडी, कविता आणि सामाजिक समरसता निर्माण होते. पण गेल्या दशकापासून इंग्रजी माध्यमातील शिक्षण पाल्याला देण्यावर पालकांचा भर आहे. काही पालकांना वाटते की मराठी किंवा मातृभाषेत शिक्षण घेतल्यामुळे उच्च शिक्षणात इंग्रजी माध्यम असल्यामुळे समस्या निर्माण होईल.

       पण पालकांच्या आग्रहामुळे मुलाला नीट इंग्रजीही येत नाही वा पूर्णपणे आपली मातृभाषाही बोलता येत नाही. आजच्या घडीला शिक्षणाच्या विकासाचा जो डोंगर निर्माण झाला आहे. त्याला जागोजागी भाषेने आधार दिला आहे. शिक्षण शास्त्रज्ञ देखील मान्य करतात की, शिक्षण मातृभाषेतून दिले जावे. आपल्या आजूबाजूला उच्च शिक्षण घेतलेले संशोधक, डॉक्टर, अभियंता झालेले पाहिले तर त्यांनी मातृभाषेत शिक्षण घेऊन प्रगती केली आहे. मराठी दिन २७ फेब्रुवारी माहिती, निबंध, भाषण, लेख मराठी मध्ये

       मुलांच्या कर्तृत्वाला उजाळा देण्याचे काम मातृभाषा करते. त्यामुळे मुलांना मातृभाषेवर व बोलीभाषेवर प्रेम करायला शिकवा. हेच वारंवार कुसुमाग्रजांनी आपल्या कवितेतून पटवून देण्याचा अट्टाहास केला आहे. पण अलीकडे तरुण पिढीला इंग्रजी भाषेचे फार आकर्षण वाटत चालले आहे. याचे कारण शिक्षणपद्धती बदलत चालली आहे. प्राथमिक शिक्षणापासून ते उच्च शिक्षणापर्यंत सर्वच इंग्रजी भाषेत होत असल्याकारणाने त्यांच्यापुढ्यात इंग्रजीच आकर्षण जास्त आहे. पदव्या घेऊन तरुण मंडळी परदेशात जातात. तिथे त्यांना इंग्रजी भाषेचा जास्तीत जास्त वापर करावा लागतो.

       साहजिकच त्या भाषेचे संस्कार जास्त होतात. त्या विकसित देशात द्रव्यप्राप्ती आपल्या देशापेक्षा जास्त होत असल्याकारणाने तिथेच स्थायिक होणे त्यांना जास्त रुजते. परिणामी पुढील पिढीला मराठी भाषा येत नाही. त्यांच्या आचार विचारात फार फरक पडतो. इकडे भारतातील तरुण पिढीलाही इंग्रजीचे जास्त आकर्षण असल्याने मराठी भाषा मागे पडत चालली आहे. मराठी भाषेचा अभिमान राहिला नाही. असे जर घडत गेले तर एक दिवस मराठी भाषा महाराष्ट्रातून नाहीशी होईल. असे न होता प्रत्येकाने मराठी भाषेचा अभिमान बाळगून वागले पाहिजे. ती आपली मातृभाषा आहे. याउलट परदेशी भाषांचा अभ्यास करून त्याचा फायदा महाराष्ट्राला कसा होईल याचा विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा लिहिता बोलता आलीच पाहिजे.

       आपल्या मराठीत खूप मोठे साहित्य आहे. शास्त्र, विज्ञान, ललित या खूप विषयांवर लेखन झालेले आहे. त्यामुळे आपल्या भाषेचा अभिमान बाळगून परदेशातून स्वदेशात येण्यासाठी ‘ सागरा प्राण तळमळला’ म्हणणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांची आठवण ठेवा. मातृभाषेचा उदोउदो केलात तरच महाराष्ट्राचा जयजयकार होईल.

       तर अशा प्रकारे आम्ही ह्या लेखामध्ये माझी मायबोली मराठी भाषा या विषयावर निबंध, माहिती, भाषण दिले आहे.

No comments:

Post a Comment