मराठी राजभाषा दिन विशेषः मराठी राजभाषा दिन आणि त्याचे महत्त्व! -
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।
२७ फेब्रुवारी हा दिवस ‘जागतिक मराठी भाषा दिवस’, मराठी राजभाषा दिन, ‘मराठी भाषा गौरव दिन’ अशा अनेक नावाने साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपिठ पुरस्कार विजेते विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिना निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पुढे पाहू यात.
कुसुमाग्रज यांच्या कार्याची महती… पुणे येथे १९१२ साली जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांनी लहानपणापासून लिहण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला. तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.
कुसुमाग्रज यांचे मराठी साहित्यातील योगदान खरचं अवर्णनीय असून आपण आणि भविष्यातील पीढीने मराठीचा वारसा पुढे चालवावा म्हणूनच ‘मराठी राजभाषा दिन’ साजरा करण्याची प्रथा सुरू करण्यात आली. याचे महत्त्व आपण पुढे पाहू यात.
कुसुमाग्रज यांच्या कार्याची महती… पुणे येथे १९१२ साली जन्मलेल्या वि. वा. शिरवाडकर यांनी लहानपणापासून लिहण्याची आवड होती. त्यांनी कोवळ्या वयातच कविता लिहण्यास सुरूवात केली. पुढे कथा, कादंबरी, नाटक, ललित वाड्यमयातील नावाजलेलेली साहित्य रचना त्यांच्या लिखानातून अवतरत राहिली. त्यांच्या अनोख्या साहित्यासाठी १९७४ साली नटसम्राट या नाटकासाठी ‘साहित्य अकादमीचा पुरस्कार’ मिळाला. तसेच १९८७ साली साहित्यातील सर्वोच्च असा ‘ज्ञानपीठ पुरस्कार’ आणि भारत सरकारने १९९१ मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरवीत करण्यात केले.
२७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाष दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच… दरम्यान आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे, नक्कीच, याबद्दल दुमत नाही; परंतु, त्यासाठी आपण मराठीची कास सोडावी, हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो, मध्ये मराठी भाषा कशी अवघड आहे आणि काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हॉट्स अपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्य देण्याऐवजी आपण ते व्हिडीओ एकमेकांना पाठवून मजा घेत होतो.७ फेब्रुवारी या दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रात, देशभरात आणि जगभरात जिथे मराठी माणसे वास्तव्यास आहेत तेथे मराठी राजभाष दिन साजरा केला जातो. या दरम्यान विविध प्रकारचे मराठी नाटके, चित्रपट, शास्त्रीय संगीत, काव्य संमेलन, निबंध, वक्तृत्व स्पर्धा आणि मराठी भाषेला उत्तम दिशा देण्याचे कार्यक्रम आयोजित केले जातात.
मराठी भाषा संवर्धनाची जबाबदारी आपलीच… दरम्यान आज आपण आपल्या भाषेचा म्हणजेच आपल्या मायबोलीचा त्याग करून इंग्रजी भाषेचा अवलंब करीत आहोत. इंग्रजी ही काळाची गरज आहे, नक्कीच, याबद्दल दुमत नाही; परंतु, त्यासाठी आपण मराठीची कास सोडावी, हे मनाला पटणारे नाही. आज आपण आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पाठवतो, मध्ये मराठी भाषा कशी अवघड आहे आणि काना, मात्रा, उकार आणि वेलांटीने आम्ही कसे हैराण झालो आहोत, अशा आशयाचे विद्यार्थ्यांचे व्हिडीओ व्हॉट्स अपवर व्हायरल करण्यात आले होते. मुलांना मराठीचे ज्ञान योग्य देण्याऐवजी आपण ते व्हिडीओ एकमेकांना पाठवून मजा घेत होतो.
संकलित
हे पण वाचा: मायबोली मराठी भाषा निबंध,भाषण व लेख
दुसरा लेख-
वर्षातले १७ दिवस मराठीचा गजर करण्यापेक्षा आपल्या रोजच्या व्यवहारांत वर्षभर-३६५ दिवस मराठी येणे आवश्यक आहे. त्यासाठी, पूर्वगौरव आणि उत्सव यांच्यापलीकडे समाजाची दृष्टी व कृती जायला हवी...
आज मराठी-राजभाषादिन. मराठीच्या वाट्याला तर भाषा-संवर्धन-पंधरवड्याचे पंधरा, भाषादिनाचा एक आणि महाराष्ट्रदिनाचा एक असे सतरा दिवस येतात. तरी मराठीसाठी काम करणारी माणसं रडत असतात. वेडगळ भाषा-आग्रही जमात कुठची! इतर तीनशे अठ्ठेचाळीस दिवस, जन्मानं तेवढे मराठी असलेले नि स्वाक्षरीरूप स्व-ओळखही इंग्रजी असलेले; अन्यभाषकांशी सोडाच, पण इतर मराठी माणसांशीही हिंदीत वा इंग्रजीत बोलणारे; मराठी बोलायची-लिहायची वेळ येते तेव्हा 'एक स्पून हल्दी, बर्थडे सेलिब्रेट केला’ अशी भेळभाषा वापरणारे व त्याचं ‘काळानुरूप भाषा बदलच असते’ असं समर्थन करणारे; मराठी शुभेच्छासंदेश लॅटिन (पक्षी : रोमन) लिपीत पाठवणारे; ‘देवनागरी लिपीतले वेलांटी-उकार कठीण जातात, त्यापेक्षा रोमनमध्येच मराठी लिहायला काय हरकत आहे,’ असे सिद्धान्त मांडणारे; इंग्रजीतील वर्णरचना (स्पेलिंग) घोटून पाठ करणारे पण मराठीतील ऱ्हस्व-दीर्घाच्या नियमांवर आक्षेप घेणारे; एक ते दहापर्यंतचे मराठी अंकही न वापरणारे; मराठी पुस्तकं विकत न घेणारे, मराठी नाटकं-चित्रपट न पाहणारे; मराठी माध्यमातच शिकून सुस्थापित असूनही, मुलांना मात्र मराठी माध्यमात घातलं तर नुकसान होईल असं मानणारे; पदवीसाठी मराठी विषय निवडणाऱ्या मुलांना ‘मराठी घेऊन भाकरी मिळणार नाही, ‘क्ष’ विषय घे त्यापेक्षा’ असा परोपकारी उपदेश करणारे; अस्खलित मराठी बोलणाऱ्या-लिहिणाऱ्यांचं दुर्मिळ प्रजातींतील जिवांचं करावं तसं ‘कौतुक’ करणारे किंवा त्यांच्यावर खडे भिरकावणारे; ‘परप्रांतीयांमुळे मराठीचं नुकसान होतंय’ अशी समजूत करून घेऊन, भाषकांची निजभाषेप्रती कर्तव्यं असतात ह्याचं विस्मरण होणारे; ‘अमृतातेही पैजा जिंके’च्या पूर्वगौरवात रमून बंद पडणाऱ्या मराठी शाळा नि महाविद्यालयीन मराठी विभाग.. हे वर्तमान आणि जागतिकीकरण तसेच सपाटीकरणाच्या रेट्यामुळे अडचणीत असलेलं भवितव्य दिसून न दिसल्यासारखं करणारे मराठीभाषक हे सतरा दिवस मराठीपण नऊवाऱ्या, फेटे, भगवे झेंडे, गाणीबजावणी ह्यांसह ‘साजरं’ करतात, ह्यातच समाधान मानायला हवं. भाकरीही न देऊ शकणाऱ्या मराठीचा, विकासाकांक्षी मराठीजनांनी ‘योगायोगाने आम्ही मराठीभाषक कुटुंबात जन्म घेतला, ह्यापुढे मराठी ही आमची ओळख मानण्यात येऊ नये’ अशा प्रतिज्ञापत्राद्वारे त्याग न करता, तिचे दिवस साजरे करावे (खरं तर, ‘दिवस घालावे’) हे त्यांचे मराठीवरील केवढे उपकार म्हणावे लागतील!
marathi-language-day
भाषा-आग्रही लोकांना हे कळतच नाही. त्यांना असं वाटतं की, मराठीभाषकांचा हा दांभिकपणाच मराठीच्या मुळावर येतोय. भाषादिन साजरे करण्यापेक्षा आपली भाषा दीन होणार नाही, ह्याकडे कसून, प्रामाणिक वृत्तीने आणि मुख्य म्हणजे वर्षाचे ३६५ दिवस लक्ष पुरवायला हवं. मराठीच काय, कोणतीही भाषा ही अस्तित्वात येते, तेव्हाच ती कधी ना कधी मरणार हे निश्चित असतं. पण तिचा मृत्यू नैसर्गिक असावा आणि तोपर्यंतचं तिचं अस्तित्व हे सन्मानपूर्ण, वर्धनीय असावं. भाषा-आग्रहींना असंही वाटतं की, केवळ अभिजात वाङ्मयपरंपरा भाषा जिवंत राहण्यासाठी पुरेशी नसते. नाही तर, संस्कृत व लॅटिन मृत झाल्या नसत्या. एखाद्या भाषेच्या विकासाकरिता ती वर्तमानात व्यवहारभाषा, ज्ञानभाषा, व्यवसायभाषा, आविष्कारभाषा आणि राजभाषा म्हणून सुदृढ होईल ह्याची काळजी घ्यावी लागते. मराठी दैनंदिन संभाषण, न्यायव्यवहार, वाचनलेखन, शिक्षण आदी सर्व व्यवहारांत आवर्जून वापरायला हवी. नवनवीन शब्द घडवायला हवेत. अभिजन-बहुजन-वादात मराठीला ‘दोन्ही घरची पाहुणी उपाशी’ ही अवकळा आणण्यापेक्षा नवशब्दसिद्धीसाठी संस्कृत व बोली ह्या दोन्हींतील शब्दभांडार लुटायला हवं. तिच्या देवनागरी व मोडी ह्या दोन्ही लिप्यांचंही अस्तित्व जपायला हवं.
प्रमाणलेखनाचे नियम काळानुरूप बदलून ते समाजाला शिकवायला हवेत.
भाषा-आग्रही असंही सांगतात की, मराठी ही केवळ बोली स्वरूपात उरू नये. शिक्षणाचं माध्यम म्हणून तिचा आग्रह असावा. मराठीला ज्ञानभाषेचं वैभव प्राप्त व्हावं असं वाटत असेल, तर मराठीभाषकांनी वैश्विक नागरिक अवश्य व्हावं, पण आपली मुळं, आपली स्थानिक ओळख विसरू नये. त्यांनी आपापले ज्ञानविषय, संज्ञा-संकल्पना ह्यांचं धन मराठीत आणावं. परप्रांतीयांवर खापर फोडण्यापेक्षा, त्यांना मराठी शिकावं लागेल अशी शासकीय धोरणं आखावीत आणि त्यांना मराठी शिकावीशी वाटेल अशी व्यवस्था करावी. सर्वांसाठीच मराठीचे प्रमाणित अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापनाच्या उत्तम साधनसुविधा, नवमाध्यमांचा वापर ह्यांतून मराठीचं शिक्षण आनंददायी बनवायला हवं.
मराठी विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये अध्यापनक्षेत्रापलीकडे प्रसारमाध्यमं, मनोरंजनमाध्यमं, प्रकाशनव्यवसाय, भाषांतर, भाषा-साहित्य-समाजविषयक संशोधन, भाषा आणि तंत्रज्ञान आदी क्षेत्रांसाठीची व्यावसायिक कौशल्यं रुजवायला हवीत. त्या दृष्टीने अभ्यासक्रममंडळं, अध्यापक, शिक्षणसंस्था आणि विद्यार्थी ह्यांनी चाकोरीच्या बाहेर पडून विचार व्हावा. शिक्षणक्षेत्रात मराठी हा विषय टिकणं हे निव्वळ मराठीच्या शिक्षकांच्या व विद्यार्थ्यांच्या पोटापाण्याकरिता आवश्यक नाही; तर मराठीला ज्ञानभाषा बनविण्याकरिता आवश्यक ती कोश, सूची आदी साधनं निर्माण करण्यासाठीचं कुशल प्रशिक्षित मनुष्यबळ तयार होण्यासाठीही ते आवश्यक आहे. शासकीय पातळीवर मराठी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालयं व विद्यापीठं येथील मराठीचे विभाग ह्यांसाठी संरक्षक धोरणं आखली जायला हवीत आणि ह्या धोरणांना समाजाची साथ हवी.
मराठीभाषकांनी आपापल्या व्यवसायक्षेत्रांत, आविष्कारमाध्यमांत मराठीचा वापर करण्याचा प्रयत्न तरी करायला हवा. "लोकांना आजकाल अशीच भाषा कळते नि आवडते म्हणून आम्ही मिंग्लिश, मिंदी वापरतो,” असं म्हणणारे हे विसरताहेत की, ते स्वतः ज्या फांदीवर बसले आहेत, त्या फांदीवर कुऱ्हाड चालवताहेत. अंतिमतः मराठी टिकली, तर आणि तरच मराठी वर्तमानपत्रं, दूरचित्रवाणी-वाहिन्या, साहित्य, नाटकं, चित्रपट, संगीत ह्यांना वाचक, प्रेक्षक, श्रोते लाभतील. अन्यथा जागतिकीकरणाची वावटळ साऱ्यांचा घास घेईल. मराठीचा प्रश्न हा केवळ भावनिक अस्मितेचा प्रश्न बनवणाऱ्यांच्या मागून आंधळेपणानं जाणं आणि नंतर निराश होणं हेही नको. धर्म, जात, लिंग ह्यांप्रमाणे भाषाही राजकीय, आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक सत्ताकारणाचा, विषमतानिर्मितीचा आणि शोषणव्यवस्थांचा भाग म्हणून वापरली जाते, ह्याचं गंभीर भान बाळगून मराठीच्या प्रश्नाविषयी विचार व्हावा. कुठलीही भाषा स्वतःहून बलवत्तर किंवा कमतर नसते, भाषकांची ताकद ही भाषेला बळ देते, हे इंग्रजी भाषेच्या इतिहासाकडे पाहिल्यास सहज लक्षात येतं. मराठीभाषकांनी ज्ञान, अर्थकारण, राजकारण, समाजकारण, सांस्कृतिक व्यवहार ह्यांतील आपलं बळ वाढवावं आणि मुख्य म्हणजे ते मराठीच्या पाठीशी उभं करावं.
मराठी टिकावी असं वाटत असेल; तर एकीकडे सतरा दिवस मातृभाषेवरील प्रेमाचे प्रासंगिक, प्रतीकात्मक आविष्कार करायचे आणि दुसरीकडे उरलेले दिवस 'मायमराठी मरो पण इंग्रजीमावशी जगो' असं वागायचं या दांभिकपणा सोडायला हवा. मराठीचे हे खुळे भाषा-आग्रही मालुसरे 'एक दिवस शहाण्यांचा असतो, एक दिवस पण मिळे खुळ्यांना' ह्या विंदा करंदीकरांच्या पंक्तीवर विश्वास ठेवून असं काय काय म्हणत असतात; मराठीच्या उज्ज्वल भवितव्याची स्वप्नं पाहत बसतात; झोपेचं सोंग घेतलेल्यांना जागं करायचा प्रयत्न करीत राहतात. तसे ते करीत राहावेच लागणार आहेत...
संकलन-
महाराष्ट्र टाइम्स
- डॉ. अनघा मांडवकर
(लेखिका मुंबईच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयात मराठीचे अध्यापन करतात.)
No comments:
Post a Comment