राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ सुरु करणेबाबत, व शिक्षकांच्या उपस्थितीबाबत शासनाचे (१४ जून ला) परिपत्रक जाहीर.
संदर्भ
१. या कार्यालयाचे पत्र क्र. अमाशा/ शासू/एस-२/१५५८, दिनांक ३०.०४.२०२१
२. मा. मंत्री महोदय, शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे शि. सी. मधील संदेश दिनाक १४.०६.२०२१
उपरोक्त विषयी व संदर्भान्वये कळविण्यात येते की, राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना संदर्भ क्र. ०१ नुसार दिनांक १४ जून २०२२ पर्यंत व विदर्भासाठी दिनांक २७ जून पर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
त्यानुसार दिनांक १५ जून, २०२१ पासून राज्यातील (विदर्भ वगळता) शाळांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ पासून सुरू करण्यात येत आहे. विदर्भातील शाळांचे शैक्षणिक वर्ष दिनांक २८.०६.२०२१ पासून सुरू होईल.
शाळेमध्ये / कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पुढील प्रमाणे शिक्षकांची उपस्थिती आवश्यक राहील.
१. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वी व इयत्ता ११ वीचे ५० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
२ इयत्ता १० वी व इयता १२ वी चे १०० टक्के शिक्षक उपस्थिती अनिवार्य राहील.
३. शिक्षकेतर कर्मचारी यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य राहील.
४. प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी १०० टक्के उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
🔖 शासनाचे परिपत्रक पहा 👇
🔖 शासनाचे परिपत्रक डाऊनलोड करा.
No comments:
Post a Comment