K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Monday 18 February 2019

छत्रपति शिवाजी महाराजांचे पराक्रमी मावळे
शिवबाचे  मावळे



आपणास आषाढी पोर्णिमेचे म्हणजे गुरु पोर्णिमा हे माहित असेल पण आज पासुन ३४९ वर्षा आधीच्या आषाढी पोर्णिमाला शिवाजी महराज केवळ ६०० मावळ्यासोबत पन्हाळगडावरुन विशालगडाकडे निघाले होते.
पण त्यान्ची ही वाट सोपी नव्हती. पन्हाळगडा बाहेर सिद्दी जोहर ४०००० फ़ोज घेउन बसला होता. त्या नंतर त्या वेळच्या घोडखिन्डित बाजी प्रभु देशपान्डे यानी अतुलनीय साहस व पराक्रम गाजवला. मला अस वाटते की आपणास हे महीत असेल. ज्या वेळी बाजी महाराजा सोबत विशालगडा कडे कुच करत होते त्यास वेळी अजुन एक मावळा एक अतुलनीय शोर्य व धाडस करत होता.
तो मावळा म्हणजे शिवा काशिद. शिवा काशिद हा महाराजाचा न्हावी होता. त्याची अंगकाठी रुपरेषा ही शिवाजी महराजासारखिच होती. जर शिवा काशिदास महाराजाचे कपडे घातले तर नवीन माणुस नक्की फ़सेल. त्या रात्री पन्हाळगडावरुन दोन पालख्या निघाल्या. एक महाराजांजी आणी दुसरी शिवा काशिद. एक विशालगडाकडे व दुसरी सिद्धी जोहरकडे.
हे तर आपण जाणलच असेल की ४०००० च्या आत गेलेला शिवा काशिद वीर मरणास प्राप्त झाला. पण मरण्या आधी प्रहर दोन प्रहर का होइना एक सामान्य मावळा राजा झाला. स्वत: मृत्युच्या मुखात गेला जेणे करुन त्याचा राजा काही अंतर का होइना शत्रु पासुन दुर जाईल.
धन्य ते शिवाजी महाराज आणि धन्य त्यांचे मावळे
सुड घेण्या अफ़जल वधाचा पेटुन उठली होती अदिलशाही
पुणे प्रांतात धुमाकुळ घालत होती शास्ता रुपी मोगलाई
निघाली एक फ़ोज मोठी विजापुरी
महराज होते त्यावेळी कोल्हापुरी
वेढा घातला होता पन्हाळ्यास सिद्दीने
४० हजारी फ़ोज लढत होती जिद्दीने
उन पावसाची न करता तमा फ़ोज लढली महिने चार
वेढा असाकी अवघड होते लहान ही मुंगीस करणे पार
करुन संपले प्रयत्न मरठ्याचे पन्हाळगडाबाहेरील सारे
फ़िरले होते महाराजांचे नशिब, उलटे वाहत होते वारे
रात्री एक शोधुनि बिकट वाट गडावर आला हेर महादेव
गडावरी पाहुन त्यास भरीला सर्वामध्ये नवा चेव
पाहत होते वाट राजगडी सर्वासह मॉ साहेब जीजाई
गाजवण्या शोर्य आले पुढे बाजी प्रभु आणी शिवा नाई.
राजे निसटले पोहचली सिद्दीच्या गोटात बात
जणु काही अदिलशाहीवर झाला प्रचंड वज्रघात
अंगकाठी रुपरचना होती शिवा न्हाव्याची महाराजा सारखी
करुनी राजांचा पोषाख भुलवण्यास गनीम तयार दुसरी पालखी
शिवा काशिदास दिसत होते समोर आहे मरण
पण गेला तो शिवाजीराजे बनुन सिद्दीस शरण
प्रगटता रुप खरे शिवा काशिदचे, किचाळुन तलवार फ़ाजिलखान खुपसवितो
मरताना शिवा काशिद बोलतो “सोंगाचा मी शिवाजी म्हणुन काय पालथा पडतो”
समोर दिसत होते सिद्दीरुपी शिवा काशिदास अंत
स्वराज्यासाठी केली नाही स्वामीनिष्ठानी जिवाची खंत
गजापुरच्या घोड खिंडीत बाजी प्रभुनी घडवला एक इतिहास
पण विसरु नका तुम्हीही शिवा काशिदचा स्वराज्याचा ध्यास

No comments:

Post a Comment