K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Tuesday 25 May 2021

💐निरोप संदेश / निरोप समारोप शुभेच्छा💐

1) सप्रेम नमस्कार,


 मी (नाव) दि.(बदली झाल्याचा दिनांक व दिवस) रोजी महावितरण कंपनीच्या अकोला परिमंडळ येथे बदली झाल्याने कल्याण परिमंडलातील कल्याण ग्रामीण विभाग, गोवेली शाखा मधून कार्यमुक्त झालो.दि.27/05/2017 पासून आजपर्यंत च्या सेवाकाळात कल्याण मधील,मिञमंडळी, सहकारी कर्मचारी ,वरिष्ठ अधिकारी,बाह्यस्ञोत कर्मचारी,ग्राहक   या सर्वांचे कामकाजात,सुखदुःखात  चांगले सहकार्य,प्रेम लाभले एवढ्या ४ वर्षाच्या काळात आपण बाहेरगावी राहत असल्याची कधीही पुसटशी जाणीवही झाली नाही.

यापुढेही असेच,प्रेम,लोभ,स्नेह राहावा, ही अपेक्षा ! 

या कालावधीत माझ्याकडून  कळत नकळतपणे काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने माफ करावे. सहकार्याबद्दल धन्यवाद व्यक्त करित आपली रजा घेतो.!


२.आपण निरोप घेताय, सेवानिवृत्त होताय

हे अगदी खरं आहे

मात्र तुमचं आमचं नातं सदैव अबाधित राहील

तुमच्या सहवासात घालवलेले क्षण

आजही आमच्या मनात रुंजी घातल आहेत

तुमचा स्वभाव, तुमचं वागणं

आम्हाला सतत आठवत राहील

तुमचं पुढील आयुष्य असंच सुखसमाधानाचं जावो... हिच शुभेच्छा !



३.प्रवासाचे प्लॅन तुम्ही आधीच आखुन ठेवले असतील

मस्त जीवनाचा आनंद लुटत सेवानिवृत्तीची मजा घ्या 

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा !



४.मस्त मजेचे आयुष्य

गाडी थांबली वळणावर

विश्रांती घ्यायची आहे तुम्ही

सेवानिवृत्त झाल्यावर

सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा!



५.तुम्ही होता म्हणून सगळे प्रश्न सहज सुटत होते

सगळी कामे नियोजितपणे होत होती

आता तुम्ही सेवानिवृत्त होताय... पण आम्हाला तुमची सोबत कायम स्मरणात राहील 

सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा !



६.सेवानिवृत्ती छे छे ! ही तर आहे क्षणभर विश्रांती !!

मनाप्रमाणे जगण्याची घ्या आता अनुभूती...

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!



७.जीवनातला वसंत हा अनुभवांचा प्राजक्त सडा

सवे घेऊन प्रियजनांना आठवणीने भरला घडा

सेवानिवृत्तीच्या मनापासून शुभेच्छा!



८.उशीर झाला, गाडी जाईल. डबा आता नसणार

या सर्वांना बगल देत नवे आयुष्य फुलणार

सेवानिवृत्तीसाठी हार्दिक शुभेच्छा!



९. सहकाऱ्यांची साथ आणि शब्दरूपी भावना

आरोग्य आणि धनसंपदा तुम्हाला  लाभो हिच मनापासून शुभकामना !



१०.सोडून आमची साथ तुम्ही दूर नाही

आपल्या लोकांमध्ये जाणार आहात

वाईट वाटुन घेऊन नका आठवणी

आपल्या सदैव ताज्या राहणार आहेत

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा!


११. काम करायचं आहे तुमच्यासारखं

निघून इथून जाताना

गहिरावे सारे जग

निरोपदेखील घेताना 

सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा !


१२) "रिटायर झालेल्या कामगाराच्या बायकोचे मनोगत" 

“आई पापा रिटायर झाले, ताई दादा रिटायर झाले | मामी मामा रिटायर झाले, आजी आजोबा रिटायर झालें ॥"


" अरे बाळा, हळू बोल, ते दुखावतील | आपल्या समोर हासतील, पण मनाने खचतील ||"


" आत्तापर्यंत त्यांनी आपल्याला जपले, आता आपण त्यांना उपले पाहीजे | जे-जे हवे आपल्याला. ते सगळे त्यांनी दिले, आत्ता आपण त्यांना सुख दिले पाहीजे ।। "


बाळा तुला काय सांगु त्यांचा जीवन प्रवास | इच्छा नसताना ही सोसला त्यांनी किती उपवास | " “नोकरी लागली तेंव्हा मामा कडे राहत होते जेवणाबरोबर मामीचे बोलणे (टोमणे) ही खात होते ॥ "


मग त्यांचा जीवनात मी आली, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो।


चांगले दिवस येतील, एकमेकांना आधार देत होतो || कंपनीच्या कामाबद्दल, त्यांनी कधी तक्रार केली नाही । कमी पगार असून सुद्धा, आपल्याला काही कमी पडू दिल नाही "


"फ्लैट घेतला, निर्लज्ज होऊन ओवर टाईम केला । सोसायटी, फंड, स्वत:साठी काही न ठेवता, सगळा आपल्यावर


खर्च केला ॥ दोघांच शिक्षण, दोघांच लग्न, देव जाणो, त्यांनी कस पार पाडला मी जेव्हा चौकशी करायची, तुला काय कळतय त्याच्यातल हसून एकच उत्तर मिळाल || "


"बाळानों त्यांना अजिबात दुखवायच नाय । त्यांचा मनाला लागेल, अस काय बी बोलायच नाय ॥ "


रामप्रसाद वर्मा

8888239797


१३) 


१४)


१५) 


No comments:

Post a Comment