K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Saturday 15 May 2021

 

कोरोना विषाणू विषयी घ्यायची काळजी - Coronavirus disease (COVID-19) Advice for the Public

कोरोनावर आहे फक्त हा एकच उपाय ! जाणून घ्या या लेखाद्वारे.

Q&A on Coronavirus

गेल्या काही महिन्यांपूर्वी चीनच्या वुहान शहरापासून संपूर्ण जगात कोरोनामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, कोरोना विषाणू विषयी आज काल सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी वायरल होत आहे कोणी गाईच्या शेणापासून उपचारांचे दावे देत आहेत तर कोणी बाबा बनून कोरोनाला पळविण्याचे उपाय सांगत आहे.

तर या आजच्या लेखात आपण कोरोनाविषयी त्या सर्व गोष्टींच्या मागचे सत्य पाहणार आहोत, आपण हे सर्व जाणून घेऊ काही प्रश्नांच्या माध्यमातून

कोरोना विषाणू विषयी घ्यायची काळजी – Coronavirus disease (COVID-19) Advice for the Public

Dos and Don'ts in Coronavirus

प्रश्न क्र.१. मास्क पेक्षा तोंडाला रुमाल बांधला तर चालेल का?

उत्तर- हो, आपल्याजवळ काही कारणास्तव तोंडाला लावण्यासाठी मास्क नसेल तर आपण रूमालचा वापर करू शकता, पण लक्षात ठेवा, रुमाल स्वच्छ असला पाहिजे.

प्रश्न क्र-२. कोरोनाची लागण झालेली आहे कसं ओळखायचं?

उत्तर- आपली मागील काही दिवसाची पार्श्वभूमी जर प्रवासाची असेल तर आपण जवळील वैद्यकीय केंद्राला भेट देऊन तेथे आपली चाचणी करून घ्यावी. तेथे पूर्णपणे आपल्याला कळून जाईल.

प्रश्न क्र-३. प्रवासाची पार्श्वभूमीवर असल्यावर सुद्धा माझी चाचणी कोरोना निगेटिव्ह आली तरीही मी विलगिकरण का करावे?

उत्तर- जरीही प्रवसांनातर आपली चाचणी निगेटिव्ह आली असेल तरीही लक्षात ठेवा, कोरोना असा विषाणू आहे जो की सुरुवातीचे १४ दिवस त्याचे लक्षण दाखवत नाही, त्यासाठी आपण काही दिवस परिवारपासून स्वतःचे विलगिकरण करावे.

प्रश्न क्र-४. हाथ धुण्यासाठी कशाचा वापर योग्य आहे?

उत्तर – हाथ धुण्यासाठी आपण हँडवाश किंवा अल्कोहोल युक्त सॅनिटायझर चा वापर करू शकता, आणि जर ह्या वस्तू उपलब्ध नसतील तर आपण साबणाने आपले हात स्वछ धुवू शकता.

प्रश्न क्र-५. मला तर कोरोना नाही मग मला काय भीती त्याची?

उत्तर- आपल्याला कोरोना नाही ही चांगली गोष्ट आहे पण आपण कोरोना बाधित लोकांच्या संपर्कात आलात तर आपण याचे शिकार होऊ शकता. त्यासाठी आपण घरीच राहणे योग्य आहे.

प्रश्न क्र-६. माश्यांमुळे कोरोना पसरू शकतो का?

उत्तर – नाही, माश्यांमुळे कोरोना विषाणू पसरत नाही.

प्रश्न क्र-७. कोरोना पासून वाचण्यासाठी काय करावे?

उत्तर – आपण आणि आपल्या परिवाराला सोशल डिस्टनसिंग म्हणजेच जेवढे कमी लोकांच्या संपर्कात राहाल तेवढे चांगले राहील आणि त्यामुळे कोरोनापासून सुरक्षित राहाल.

प्रश्न क्र८. कोरोना विषाणूचे संक्रमण कश्या प्रकारे होते?

उत्तर- कोरोना हा एक विषाणू असून ह्याचे संक्रमण कोरोनाबाधित व्यक्तीच्या शिंकेतून, खोकल्यातून, निघालेल्या कणांच्या माध्यमातून याचे संक्रमण होते. सोबतच त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सुद्धा याचे संक्रमण होऊ शकते.

प्रश्न क्र-९. कोरोनावर कोणता उपाय आहे का?

उत्तर – सध्यातरी कोरोनावर कोणताही उपाय उपलब्ध झालेला नाही, पण हो आपण कोरोनाला होण्यापासून रोखू शकतो, दर दोन तासाला आपले हात साबणाने किंवा हँडवाश ने २० सेकंद धुवावे. जर आवश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे तेही चेहऱ्यावर रुमाल किंवा मास्क घालून, लोकांच्या जितके कमी संपर्कात राहाल तेवढे चांगले.

तर हे होते काही प्रश्न ज्यांच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाविषयी आणखी जागरूकता झाली असेल, आपण काळजी घ्या आपल्या परिवाराची काळजी घ्या.

काम नसताना घराबाहेर पडू नका, याच प्रकारे आपले आणखी काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकता त्यावर आमची टीम आपले सहकार्य करेल. हा लेख आपल्याला आवडला असेल तर या लेखाला आपल्या मित्र परिवारात शेयर करून त्यांच्यात जागरूकता पसरावा.

आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल धन्यवाद!

Thank You So Much And Keep Loving Us!


No comments:

Post a Comment