K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Wednesday 22 November 2017

ज्ञानरचनावाद

ज्ञानरचनावाद - उपक्रम

Constructivism
    ज्ञानरचनावाद म्हणजे काय ?
                          शिक्षणाची अशी नैसर्गिक पद्धत कि मुलांच्या पूर्व ज्ञानाशी सांगड घालून , त्यांच्या विचारांना चालना देणाऱ्या विविध कृतीशील सहभाग असणाऱ्या अध्ययन अनुभवांची रचना करून , ताणरहित वातावरणात आनंददायी पद्धतीने शिकवण्याकडून शिकण्याकडे नेणे.

विद्यार्थी संसद उपक्रम
                ज्ञानरचनावादामध्ये
       शालेय मंत्रिमंडळाचे स्थान
🌞 रचनावादी शिक्षण पध्दतीची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक शिक्षक - विद्यार्थी गुणोत्तर प्रमाण खुपच व्यस्त आहे. आपल्या अनेक वाड्या - वस्त्यांमधील शिक्षकांना 3-4   वर्ग सांभाळत प्रशासनाचा गाडि हाकावा लागतो. अशा वेळी "विद्यार्थी संसद / शाळा मंत्रीमंडळ " महत्त्वाची भूमिका बजावते. याचे काही प्रातिनिधीक फायदे पाहूयात.
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
⌛रचनावादी उपक्रमासाठी वेळेचे नियोजन⌛
ज्ञानरचनावाद शाळेत अंमलात आणताना आपणास खुप अडचणी येतात. सर्वात मुख्य अडचण म्हणजे वेळेची! आपण रचनावादासाठी इतर साहित्य, उपक्रम नियोजन यात गुंतून जातो व मुलांना रचनावादी बनविण्यासाठी वेळ कमी पडतो. सोबत हे सर्व उपक्रम आपल्या पाठ्यक्रमाचा भाग नसल्याने आपणास पाठ्यक्रमही पुर्ण करण्याची कसरत करावी लागते. त्यातच जर शाळेमध्ये विविध माहितीचे टप्पे किंवा अहवाल आले कि मग आपण पुरते हताश होतो. व यामूळे कधी - कधी आपला भ्रमनिराश पण होतो.
      यावर उपाय म्हणून व आपणास विविध उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात "शाळा मंत्रीमंडळ" खुप उपयोगी येते.
✨: 🐣 मुलांच्या कल्पकतेला वाव 🐣
मी बरेच वेळी असे पाहिले आहे की "ज्ञानरचनावाद" म्हटले की शिक्षक स्वतःच्या कल्पक बुध्दीला ताण देऊन विविध रेडीमेड उपक्रम मुलांसमोर ठेवतात व मुले ते पुर्ण करण्यात गुंतून जातात!
मात्र यात मुलांच्या सृजनशिलतेला आव्हान देणारे, कल्पनाशक्तीला चालना देणारे उपक्रम विद्यार्थ्यांनीच स्वतः तयार करावेत नव्हे त्यांनीच पुढाकार घेऊन राबवावेत अशी अपेक्षा असते. व शिक्षक यात केवळ एका निरीक्षकाची भूमिका बजावतात! आणि यासाठी "शाळा मंत्रिमंडळ" एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते.
🐬 मुलांच्या सुप्त गुणांचा विकासासाठी सर्वोत्तम 🐬
मुलांच्या सुप्त गुणांच्या विकासासाठी आपण वेगवेगळे स्वतंत्र उपक्रम राबवतो. परंतु "शाळा मंत्रिमंडळ" हे यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करुन देते. यातून खालील गुणांचा विकास होतो.
1. निर्णय क्षमता
2. सहकार्याची भावना
3. पुढाकार घेऊन कार्य करणे.
4. जबाबदारीची जाणीव
5. 'स्व' चा विकास
6. नेतृत्व गुण
7. कार्यक्रम नियोजन
8. वक्तृत्व कौशल्य
9. परस्पर सहसंबंध
10. दुसऱ्याच्या मताचा आदर
इ.
🎈शिक्षकावरील कामाचा ताण हलका 🎈
शाळा मंत्रिमंडळ स्वतः पुढाकार घेऊन विविध उपक्रमाचे आयोजन करते, त्यामुळे शिक्षकांना इतर कामांसाठी वेळ मिळतो! व हे इतर कामे वेळेत पुर्ण केल्याने शिक्षकांची मानसिक तणावातून मुक्ती होऊन ते पूर्ण क्षमतेने अध्ययन - अध्यापनात झोकून देऊ शकतात!!!
☀ इतर उपक्रमांची सहजतेने अंमलबजावणी ☀
आपण जे दैनंदिन उपक्रम राबवतो, त्याची अंमलबजावणी शाळा मंत्रीमंडळावर सोपविल्यास आपणास इतर उपक्रमासाठी व पाठ्यक्रमासाठी वेळ मिळतो.
💧 यासह अनेक फायदे अपणास शाळा मंत्रीमंडळ करुन देते. फक्त त्याचे नियोजन व अंमलबजावणी व्यवस्थित करावी लागते.

वरील पोस्ट मध्ये अजून खालीलप्रमाणे भर केलेली आहे

संकलित
रचनावाद काय आहे ?
  
            रचनावाद म्‍हणजे विदयार्थी कसा शिकतो ? याच्‍या निरीक्षण आणि शास्‍त्रीय अभ्‍यासावर आधारीत सिध्‍दांत होय.रचनावादानुसार मनुष्‍य हा स्‍वताचे आकलन आणि जगाविषयीचे ज्ञान हे वस्‍तूच्‍या अनुभवातून व त्‍यांच्‍या प्रतिसादातून निर्माण करत असतो. ज्‍या ज्‍या वेळी आपण नवीन ज्ञान अथवा माहितीचे ग्रहण करतो तेव्‍हा ते ज्ञान अथवा माहिती आपण आपल्‍या पुर्वीच्‍या संकल्‍पना आणि अनुभवाशी जोडत असतो.यासाठी आपण प्रश्‍न विचारावे लागतात,माहितीचा कसून शोध घ्‍यावा लागतो.आणि मिळालेल्‍या माहितीवरून आपणास काय ज्ञात आहे हे ठरवावे लागते.
वर्गामध्‍ये रचनावादी अध्‍ययनाच्‍या दृष्‍टीने विविध प्रकारचे अध्‍ययन अनुभव महत्‍वाचे असतात.शिक्षकांनी विदयार्थ्‍यांना सतत कृतिशील ठेवणे गरजेचे आहे.शिक्षकांनी विदयार्थ्‍यात अस्त्त्विात असलेल्‍या संकल्‍पना लक्षत घेवून त्‍याप्रमाणे विदयार्थ्‍यांना त्‍यासंबधित कृती करायला प्रेरीत करून त्‍यांच्‍या ज्ञानाची रचना करायला मदत करावी.
रचनावादी शिक्षक हे विदयार्थ्‍यांना आकलनासाठी कृती कषा सहायक ठरतात याचे सातत्‍याने महत्‍व समजून घेण्‍यासाठी विदयार्थ्‍यांना प्ररीत करत असतात.त्‍यांना स्‍वताला प्रश्‍न विचारून आणि मिळालेल्‍या माहितीची रचना करून रचनावादी वर्गातील विदयार्थी हा एक तरबेज अध्‍ययनार्थी(Perfect Learner) बनतो.
विदयार्थ्‍यांना प्राप्‍त अनुभवांच्‍या प्रक्रियेतून ते गुंतागुंतीतून माहिती कशी प्राप्‍त करायची हे शिकतात.आणि नवीन ज्ञान संकलित करण्‍याच्‍या क्षमता प्राप्‍त करतात.म्‍हणून विदयार्थ्‍यांना अध्‍ययनासाठी प्रवृत्‍त अथवा प्रेरीत करत राहणे ही शिक्षकाची महत्‍वाची भूमिका राहते.
उदा. 

विदयार्थ्‍याचा गट विज्ञानातील एका समस्‍येवर चर्चा करत आहे.तरी शिक्षकाला समस्‍येचे उत्‍तर माहिती असले तरी शिक्षक त्‍या विदयार्थ्‍यांना उपयुक्‍त दिशांनी विचार करायला प्रवृत्‍त करणारे प्रश्‍न पुन्‍हा पुन्‍हा विचारतील.शिक्षक विदयार्थ्‍यांना स्‍वतकडील उपलब्‍ध ज्ञान अथवा माहिती आणि नवीन प्रयत्‍नांमधून प्राप्‍त  माहितीवर लक्ष देवून त्‍याची चिकित्‍सा करायला सांगतील.त्‍यावेळी समस्‍येची सोडवणूक करण्‍यासाठी एखादया विदयार्थ्‍याला योग्‍य दिशा प्राप्‍त झाली अथवा योग्‍य माहिती मिळाली तर शिक्षक विदयार्थी गटाचे लक्ष त्‍या माहितीकडे वेधून घेवून समस्‍येचे उत्‍तर प्राप्‍त करण्‍यासठी प्रेरीत करतील.विदयार्थ्‍ी गट त्‍याप्रमाणे नियोजन,कृती व प्रयोग यातून ज्ञानाची प्राप्‍ती करेल.यानंतर शिक्षक शिक्षक आणि विदयार्थी आपण काय आणि कसे शिकलो यावर चर्चा करतील.त्‍यावेळी निरीक्षण आणि प्रयोग त्‍यांना नवीन माहिती प्राप्‍त होण्‍यासाठी कसे उपयोगी पडले यावर चर्चा करतील.
पारंपारीक पध्‍दतीने अध्‍ययन करणारे या पध्‍दतीला विरोध करतात अथवा टिका करतात,की या पध्‍दतीमध्‍ये शिक्षकाचा सक्रिय भाग असत नाही.तथापि ज्ञानरचनावादाने शिक्षकाची भूमिका बदलली आहे.जेणेकरून शिक्षक विदयार्थ्‍यांना आपले ज्ञान देण्‍यापेक्षा ज्ञानाची रचना करायला मदत करतात.सुविधा पुरवितात.रचनावादी शिक्षक विदयार्थ्‍याना समस्‍या निराकरण आणि प्रश्‍न कौशल्‍यावर आधारीत अध्‍ययन कृती याद्वारे विदयार्थी स्‍वताच्‍या कल्‍पना,अनुमान काढून सह अध्‍ययनार्थीच्‍या मदतीने शिकण्‍याची साधने उपलब्‍ध करून देत असतात.रचनावाद हा विदयार्थ्‍यांना निष्क्रिय माहिती ग्रहण करणारा न बनवता सक्रीय सहभागी बनवत आहे.पाठयपुस्‍तक अथवा शिक्षकांकडून यांत्रिक पध्‍दतीने ज्ञान प्राप्‍त करण्‍यापेक्षा शिक्षकांच्‍रूा मार्गदर्शनाने विदयार्थी स्‍वता ज्ञानाची रचना करतो.
ज्ञानरचनावाद हा विदयार्थ्‍यांना शिक्षकांनी ज्ञानाने भरावयाचे रिकामे भांडे ,आकार इयावयाचा मातीचा गोळा अथवा शिक्षकांनी गिरवायची कोरी पाटी समजत नाही.रचनावादी सिध्‍दांतानुसार विदयार्थ्‍यांना स्‍वताच्‍या अध्‍ययन प्रक्रीयेमध्‍ये सक्रीय सहभागी करून घेतले आहे.शिक्षक हा सुविधादाता(Fasililator) आहे.जो मार्गदर्शन करतो,तात्‍काळ प्रेरणा देतो,आणि विदयार्थ्‍यांना स्‍वताची आकलनशक्‍ती विकसित करण्‍यासठी मदत करतो.म्‍हणुन उपयुक्‍त प्रश्‍न  विचारणे हे शिक्षकांचे मोठे आणि महत्‍वाचे काम या पध्‍दतीत आहे.
वर्तनवादाच्‍या पारंपारीक विचारांपेक्षा वेगळा विचार देणारा रचनावाद आहे.वर्तनवादामध्‍ये शिक्षक अध्‍यापन करतो मात्र सर्वच विदयार्थी 100 टक्‍क्‍े अध्‍ययन करतातच असे नाही.तथापि ज्ञानरचनावादामध्‍ये शिक्षक सुविधा पुरवितात,अध्‍ययन अनुभव निर्माण करतात आणि विदयार्थी पुर्णपणे अध्‍ययन करतात.यासाठी ज्ञानरचनावाद हि फार महत्‍वाची संकल्‍पना ,दृष्‍टीकोन आहे.
                   (लेखन श्री. खंदारे रविंद्र शिक्षण विस्‍तार अधिकारी,जिल्‍हा परीषद सातारा) 

धन्यवाद साहेब 

No comments:

Post a Comment