K P B

स्वागतम...सुस्वागतम..."Nitya Study Centre" या सर्वसमावेशक ब्लॉग ला भेट दिलेल्या मान्यवरांचे हार्दिक स्वागत... शै. वर्ष-२०२०-२१ इ.१२ वी निकाल व मूल्यमापन पद्धती जाहीर... NEWS : दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार ड्रॉईंगचे अतिरिक्त गुण... "ज्ञानगंगा" शैक्षणिक कार्यक्रम दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी, आजपासून सह्याद्री वाहिनीवर सुरू... दहावीचा निकाल तयार करण्याचे फॉर्मुले ठरले... MHT-CET Exam 2021: एमएचटी-सीईटी परीक्षेच्या ऑनलाईन अर्जांची नोंदणी आजपासून 7 जुलै पर्यंत राहणार सुरु नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनाबाबत... कोविड टेस्ट...खूप  महत्वाची माहीती..अवश्य वाचा व इतरांनाही पाठवा... दहावी व बारावीतील विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी ताण तणावाचे व्यवस्थापन - विशेष मार्गदर्शन सत्रांचे आयोजन... इ.11 वी व 12 वी आरोग्य व शारिरीक शिक्षण मुल्यमापन व गुणदान योजना... आनापान ध्यान साधना - अर्थ,पद्धत,फायदे आणि प्रशिक्षाणा विषयी माहिती.. दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखा जाहीर...

Thursday 6 May 2021

 क्लाऊड कॉम्प्युटिंग

क्लाऊड कॉम्प्युटिंगचे क्षेत्र युवकांसाठी एक सुवर्णसंधी ठरत आहे. या क्षेत्राला सध्या सुगीचे दिवस आले असून पुढील 5 वर्षात 22 टकक्यांची वाढ होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पुढील काही वर्षात या क्षेत्रामध्ये 20 लाख संधी निर्माण होतील.

क्लाऊड कॉम्प्युटिंग म्हणजे काय ?

क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या बाबतीत लोकांमध्ये बरेच गैरसमज आहेत. इंटरनेटवर आधारित एक कॉम्प्युटिंग पॉवर आहे, ज्याचे केंद्र क्लाऊड असते. ढगांप्रमाणे असणाऱ्या जटील संरचनेमुळे याचे नाव क्लाउडिंग कॉम्प्युटिंग पडले आहे.

यूजर्स, डाटा इत्यादी प्रोग्राम सर्व्हरवर स्टोअर झालेला असतो ज्याला क्लाऊड म्हणतात. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर क्लाउडिंगचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. आता कंपन्या आपआपल्या सोयीनुसार हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर बनवून घेत आहेत. समजा एखाद्याला 6 महिन्यांसाठी सर्व्हर, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरची गरज आहे. या साऱ्या गोष्टींसाठी किमान लाखभर रूपये तरी खर्च होतात. पण क्लाऊड कॉम्प्युटिंग वापरल्याने कमी खर्चामध्ये आणि ठराविक अवधीमध्ये या सुविधा चटकन मिळू शकतात.


पात्रता

या क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी कॉम्प्युटर सायन्स आणि आयटी क्षेत्रातील डिग्री आवश्यक आहे. या व्यतिरिक्त क्लाऊड कॉम्प्युटिंगशी संबंधित सर्टिफिकेट कोर्स करण्याचा फायदा होऊ शकतो. यासाठी आयबीएम, एनआयआयटी, अॅपटेक यांची मदत घेता येईल. क्लाऊड कॉम्प्युटिंगशी संबंधित काही टॉप प्रोग्राम आहेत. यामध्ये क्लाऊड कॉम्प्युटिंग आर्किटेक्चर, आयबीएम सर्टिफाईड सोल्यूशन अॅडवायझर आयबीएम सर्टिफाईड आर्किटेक्ट, क्लाऊड कॉम्प्युटिंग इंन्फ्रास्ट्रक्चर सर्टिफाईड क्लाऊड प्रोफेशनल्स इत्यादींचा समावेश होतो.


संधी

क्लाऊड कॉम्प्युटिंगसोबत बिग डाटा आणि डाटा अॅनिलिसिमध्येही करिअर बनू शकते. बिग डाटा संकल्पनेत मोठमोठ्या कंपन्यांचा डाटा सुरक्षित ठेवणे आणि त्यांचे अॅनॅलिसिस करणे याचा समावेश असतो. भविष्यात बिजनेस फोरकास्टिंगसाठी देखील बिग डाटा आणि डाटा अॅनॅलिसिसची गरज भासू शकते क्लाऊड कॉम्प्युटिंगच्या क्षेत्रात क्लाऊड आर्किटेक्ट, क्लाऊड सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेटर, क्लाऊड प्रॉडक्ट मॅनेजर अशा विविध ठिकाणी संधी मिळू शकतात. अर्थातच यासाठी अद्ययावत राहणे आणि नवनव्या तंत्रज्ञानाशी जुळवून घेणे आवश्यक आहे.


पगार

या क्षेत्रात एंट्री लेव्हलवरच 4 ते 6 लाख रूपये दरवर्षी मिळू शकतात. अन्य क्षेत्रांच्या तुलनेत हे क्षेत्र नवे आहे. यामुळे या क्षेत्रात ट्रेंड प्रोफेशनल्सची आवश्यकता फार आहे. कदाचित म्हणूनच अन्य इंजिनिअरिंगच्या क्षेत्रापेक्षा या क्षेत्रामध्ये मिळणारे पॅकेज जास्त आहे. आयटी क्षेत्राशी संबंधित असल्याने परदेशात देखील पगाराचे चांगले पॅकेज मिळते. या क्षेत्रातील अनुभव जसजसा वाढत जाईल तसतसे वेतन वाढत जाते.


भविष्य -

केंद्र सरकारने सध्या डिजिटल इंडिया, स्मार्ट इंडिया, ई-गव्हर्नन्ससारख्या योजना हाती घेतल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये डिजिटल इंन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे आगामी काळात रोजगाराच्या संधी निश्चितच वाढणार आहेत. इतकेच नाही तर सरकारच्या या योजनेमध्ये विदेशी कंपन्या देखील रस घेत आहेत. मायक्रोसॉफ्ट आणि आयबीएमसारख्या विदेशी कंपन्या आणि टीसीसएस, विप्रो, इन्फोसिससारख्या कंपन्यादेखील यामध्ये सक्रिय होत आहेत. एका सर्व्हेनुसार देशातील मध्यम आणि छोट्या स्वरूपाच्या 90 टक्के कंपन्या या क्लाऊड कंपन्यांचा स्वीकार करत आहेत. सरकार स्टार्टअप कंपन्यांना सवलत देत आहे. त्यामुळे या कंपन्यादेखील क्लाऊड कंपन्यांचा स्विकार करतील.

No comments:

Post a Comment